खनिज तेल
1 नोव्हेंबर 2020 - ऑक्टोबर 2020 मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खनिज तेलाच्या किमतीत घट झाली. तसेच खनिज तेल निर्यात करणार्या देशांनी उत्पादन कायम राखल्याने दरात मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा 37 डॉलर प्रति बॅरलवर आला.
1) भारत आपल्या गरजेच्या 83 टक्क्यांहून अधिक खनिज तेल आयात करतो. यावर दरवर्षी 100 अब्ज डॉलर इतकी रक्कम खर्च होते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर असल्याने तेल आयातीवर होणारा खर्च अतिशय जास्त आहे.
2) आतापर्यंत अनेकदा आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात घसरण होऊनही मोदी सरकारने देशातील पेट्रोल, डिझेलचे दर कमी केलेले नाहीत. पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात न केल्याने सरकारला दोन फायदे होतात. इंधनावरील करांमुळे चालू खात्यावरील तूट कमी करण्यात हातभार लागतो. याशिवाय महसुलातही वाढ होते.
3) एका बॅरलमध्ये 159 लीटर तेल असते. सध्या 1 डॉलरची किंमत 74 रुपये आहे. त्यामुळे 1 बॅरलसाठी 2733 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे एक लीटरचा दर काढल्यास तो 17.18 रुपये इतका होतो. देशात 1 लीटर बाटलीबंद पाण्यासाठी 20 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे पाण्यापेक्षा खनिज तेल स्वस्त झाले आहे.