अमेरिकन निवडणूक

  • अमेरिकन निवडणूक

    अमेरिकन निवडणूक

    • 03 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 635 Views
    • 0 Shares

     अमेरिकन निवडणूक

    1 नोव्हेंबर 2020 - अमेरिकेच्या सर्वोच्चपदासाठीची निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी. कोरोना पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या आगाऊ मतदानाला आधीपासून सुरवात झाल्याने 30 ऑक्टोबरपर्यंत 7 कोटींहून अधिक जणांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या निम्मे मतदान होऊन गेले.

         अशी होते अध्यक्षांची निवड -

    1)   मतदार थेट अध्यक्षांची निवड करत नाहीत. आपल्या उमेदवाराला पाठिंबा असणारा प्रतिनिधी, म्हणजेच इलेक्टर ते निवडतात. या प्रक्रियेला ‘इलेक्टोरल कॉलेज’ म्हणतात.

     

    2)   राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात अशा प्रतिनिधींची संख्या असते. म्हणजेच, कॅलिफोर्नियाची लोकसंख्या 4 कोटी आहे, म्हणून येथून 55 प्रतिनिधी निवडले जातात. तर, डेलवर राज्याची लोकसंख्या कमी असल्याने येथून 3 प्रतिनिधी निवडले जातात.

    3)   अमेरिकेत एकूण 538 प्रतिनिधी निवडतात. मतदार ‘पॉप्युलर व्होट’ देतात. म्हणजे त्यांना अध्यक्षपदी कोण हवे आहे, हे ते स्पष्ट करतात. काही राज्यांमध्ये ही लोकप्रिय मते ज्या उमेदवाराला अधिक मिळतात, त्याला त्या सर्व प्रतिनिधींची मते मिळतात.

         कोण बनू शकते अध्यक्ष ?

         पुढील तिन्ही अटी पूर्ण करणारी कोणत्याही वंशाची व्यक्ती अध्यक्ष बनू शकते -

    1)   किमान वय 35 वर्षे

    2)   अमेरिकेत जन्मलेली व्यक्ती

    3)   अमेरिकेत किमान 14 वर्षे वास्तव्य केलेली

    4)   एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन वेळा अध्यक्ष बनू शकते.

         घटनाक्रम -

         3 नोव्हेंबर 2020

    1)   अमेरिकेत निवडणुकीच्या तारखा जवळपास निश्चित असतात. अध्यक्षीय निवडणुकीचे मतदान नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी असते. 2020 मध्ये ते 3 नोव्हेंबरला.

    2)   50 पैकी 38 राज्यांनी आगाऊ मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याद्वारे लोकांनी टपालाद्वारे मतदान केले.

    3)   मतदानाच्या दिवशी प्रत्येक राज्यांत मतदानाच्या वेळा वेगवेगळ्या असतात. मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरवात होते.

    4)   कोरोनामुळे काही राज्यांनी मतपत्रिका पाठविण्यासाठी 13 नोव्हेंबरपर्यंत वाढीव मुदत दिली असल्याने निकाल जाहीर होण्यास विलंब.

         नोव्हेंबर - निकाल जाहीर होण्यास सुरुवात

    1)   लोकप्रिय मतांच्या आधारावर निकाल जवळपास स्पष्ट होत असला तरी सरकारी प्रक्रिया 10 नोव्हेंबरला सुरु होते. या तारखेनंतर प्रत्येक राज्य त्यांच्याकडील प्रतिनिधींची निवड जाहीर.

     

    2)   प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या तारखांना ही प्रक्रिया सुरु.

         8 डिसेंबर - मतमोजणी पूर्ण 

         कॅलिफोर्निया वगळता सर्व राज्यांमधील मतमोजणी आणि प्रतिनिधी निवड पूर्ण झालेली असते.

         14 डिसेंबर - प्रतिनिधींचे मतदान 

    1)   निवडून आलेले प्रतिनिधी आपापल्या राज्यांच्या राजधानीमध्ये मतदान करतात. बहुतेक राज्यांत लोकप्रिय मते ज्याला अधिक त्यालाच मतदान करावे लागते.

     

    2)   एखाद्या राज्यातून ज्या उमेदवाराला प्रतिनिधींची सर्वाधिक मते मिळतील, त्यालाच त्या राज्यातील सर्व प्रतिनिधींची मते जातात.

    3)   नेब्रास्का आणि माइने राज्य वगळता ही पद्धत सर्व राज्यांत लागू आहे.

    4)   ज्या उमेदवाराजवळ 270 हून अधिक प्रतिनिधी मते होतात, तो अध्यक्ष होतो.

         6 जानेवारी 2021 - प्रतिनिधींच्या मतांची मोजणी

         1)   सर्व राज्यांतील मतपत्रिका वॉशिंग्टनमध्ये आणल्या जातात.

     

         2)   उपाध्यक्षांसमोरच मतमोजणी होते. यानंतर नव्या अध्यक्षांचे नाव अधिकृतरीत्या जाहीर होते.

    * 20 जानेवारी 2021 - अध्यक्षपदाचा शपथविधी

    इलेक्टोरल कॉलेज मतांची लोकमतांवर मात

    इलेक्टोरल कॉलेज प्रक्रियेद्वारे अमेरिकेचा अध्यक्ष निवडला जातो. लोकमता द्वारे नाही. लोकशाहीमध्ये लोकमतास प्राधान्य असते व ज्या उमेदवारास सर्वाधिक लोकमत, म्हणजेच बहुमत मिळेल, तो उमेदवार निवडणूक जिंकतो. खरे पाहता लोकशाहीचे हेच मूलभूत तत्त्व आहे. पण अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या बाबतीत ते विधान खरे नाही.

    1) अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत अध्यक्षीय उमेदवारास नागरिकांनी केलेल्या मतदानात बहुमत मिळवून देखील तो उमेदवार अध्यक्षपद हरू शकतो. अमेरिकन लोकशाहीत केवळ लोकमताचे बहुमत मिळाले म्हणून त्या उमेदवारास अध्यक्षपद बहाल करण्यात येत नाही. त्याचे कारण अध्यक्षपद जिंकण्याकरिता इलेक्टोरल कॉलेजचे बहुमत मिळणे जरुरी आहे, लोकमताचे नाही.

    2) अमेरिकन लोकशाहीत अध्यक्षपद जिंकण्याकरिता 270 इलेक्टोरल कॉलेज मते प्राप्त करणे आवश्यक आहे. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेज मते, लोकमतांवर मात करते.

    3) 2016 मधील चुरसीत हिलरी क्लिटंनला ट्रम्पपेक्षा 2,868,686 जास्त लोकमते मिळाली. लोकमते जास्त मिळुन देखील 2000 मध्ये अल गोर व 2016 मध्ये हिलरी क्लिटंनला अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव पत्करावा लागला... कारण त्या दोघांना 270 पेक्षा कमी इलेक्टोरल कॉलेज मते वाट्याला आली. इलेक्टोरल कॉलेज मते, लोकमतांवर मात करते.

    4) जॉर्ज बुश ह्यांना 271 तर अल गोर ना 266, आणि डोनाल्ड ट्रम्प ना 304 तर हिलरी क्लिटंनला 227 इलेक्टोरल कॉलेज मते प्राप्त झाली होती.

    5) डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल्बर्ट ऊर्फ अल गोर आणि रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार जॉर्ज डब्लू बुश ह्यांच्या चुरसीत गोरना बुश पेक्षा 5,43,895 जास्त लोकमते मिळाली होती. 

       इलेक्टोरल कॉलेज -

    1) 6 जुलै 1776 मध्ये अमेरिकेची प्रस्थापना झाली. जॉर्ज वॉशिंग्टन व त्यांचे 9 सहकारी ज्यांना अमेरिकेचे संस्थापक म्हणजेच फॉऊंडिंग फादर्स संबोधतात त्यांनी विचारविनिमय करून अमेरिकन लोकशाही कशी असावी, निवडणुकीच्या कोणत्या प्रक्रिया असाव्यात त्या विषयी अमेरिकन घटनेत तरतुदी केल्या. त्या पैकी इलेक्टोरल कॉलेज हि एक तरतूद आहे.

     

    2) अमेरिकेच्या संस्थापकांना केवळ लोकमातांनीच अध्यक्ष निवडून यावा हे मान्य नव्हते त्याच प्रमाणे सिनेटर्स व काँग्रेसमन्स ने अध्यक्षाची निवड करावी हे पण मान्य नव्हते. अध्यक्ष निवडायच्या प्रक्रियेत प्रत्येक राज्याचे योगदान असावे म्हणून त्यांनी इलेक्टोरल कॉलेज ची घटनेत तरतूद केली.

    3) इलेक्टोरल कॉलेज प्रक्रिये मुळे प्रत्येक राज्यास अध्यक्षीय निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळते. अमेरिका हा 50 राज्यांचा (स्टेट्स) समूह आहे. म्हणूनच अमेरिकेस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका संबोधतात.

    4) इलेक्टोरल कॉलेजमध्ये 538 प्रतिनिधींचा समावेश आहे. ह्या प्रतिनिधींना इलेक्टोर्स संबोधतात. प्रतिनिधींचे विभाजन प्रत्येक राज्यातील सिनेटर्स व काँग्रेसमन्स च्या संख्ये प्रमाणे केलेले जाते. उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया राज्यात 53 काँग्रेसमन्स व 2 सिनेटर्स आहेत. तेव्हा कॅलिफोर्निया राज्यास 55 इलेक्टोरल कॉलेज प्रतिनिधी प्राप्त आहेत.

    5) ही पद्धत वापरून प्रत्येक राज्याला त्या राज्यातील सिनेटर्स व काँग्रेसमन्स च्या संख्ये प्रमाणे इलेक्टोरल कॉलेजचे प्रतिनिधी म्हणजेच इलेक्टोर्स मिळतात. अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास 270 प्रतिनिधींची (इलेक्टोर्सची) मते प्राप्त करावी लागतात.

         इलेक्टोरल कॉलेज प्रक्रिया -

         1) इलेक्टोर्स म्हणजेच प्रतिनिधी निवडणे

     

         2) जनरल इलेक्शन नंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणे

         3) अंतिम निवड शिक्कामोर्तब करिता सिनेटर्स आणि काँग्रेसमन्स च्या महासभेकडे पाठवणे  

    1) इलेक्टोर्स म्हणजेच प्रतिनिधी निवडणे 

       इलेक्टोर्स निवडण्याचे कामकाज प्रत्येक राज्यावर सोपवलेले आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय पक्ष, राज्याच्या नियमांनुसार प्रतिनिधी (इलेक्टोर्स) निवडतात आणि पक्षाच्या अधिवेशनात सार्वजनिक निवडणुकी करिता प्रतिनिधी (इलेक्टोर्स) म्हणून त्यांची नेमणूक करतात.

     

    2) जनरल इलेक्शन नंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणे

       सार्वजनिक निवडणुकीनंतर दहा दिवसांच्या कालावधीत सर्व 538 प्रतिनिधी (इलेक्टोर्स) बैठकी (मिटिंग) मध्ये एकत्रित येतात व ज्या उमेदवारांचे ते प्रतिनिधित्व करतायेत त्या उमेदवारास मत देतात. त्या नंतर प्रत्येक स्टेट त्यांच्या इलेक्टोरल कॉलेज मतदानांचे सर्टिफिकेशन सिनेटर्स व काँग्रेसमन्स च्या महासभेकडे अंतिम शिक्कामोर्तब करण्या करिता वॉशिंग्टनला पाठवून देतात.

    4) निवडणुकीचे अंतिम शिक्कामोर्तब

       इलेक्टोरल कॉलेजच्या प्रतिनिधींचे (इलेक्टोर्सचे) मतदान पूर्ण झाल्या नंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सिनेटर्स आणि काँग्रेसमन्स च्या महासभेत इलेक्टोर्स ने केलेल्या मतांची मोजणी केली जाते. ज्या उमेदवारास 270 इलेक्टोरल मते प्राप्त झालेली आहेत, त्या उमेदवारास अधिकृतरीत्या विजयी घोषित केले जाते. विजयी उमेदवार जानेवारी 20 रोजी अध्यक्ष पदाची शपथविधी घेतो आणि व्हाईट हाऊस मध्ये प्रवेश करतो.

    6) इलेक्टोरल कॉलेज प्रतिनिधी (इलेक्टोर्स) कसे मतदान करतात?

      लोकमत (पॉप्युलर व्होट्स) व इलेक्टोरल कॉलेज व्होट्स ह्यांचे एकमेकांचे नातं आहे. लोकमतांचे (पॉप्युलर व्होट्स) रूपांतर इलेक्टोरल कॉलेज मतां मध्ये केले जाते. उमेदवारास इलेक्टोरल कॉलेजच्या मतांचे वाटप त्याला प्रत्येक राज्यातील मिळालेल्या लोकमतां नुसार करतात.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 635