नेमणुका / प्रश्नमंजुषा (63)

  • नेमणुका  / प्रश्नमंजुषा (63)

    नेमणुका / प्रश्नमंजुषा (63)

    • 22 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 1137 Views
    • 0 Shares
    2021 च्या प्रजासत्ताक प्रमुख पाहुणे : बोरिस जॉन्सन 
     
     
            ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे 26 जानेवारी 2021 रोजी गणतंत्र दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. 2019 मध्ये बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला होता, त्यानंतरची त्यांची ही सर्वात महत्वाची विदेश भेट आहे.
    • 1947 साली भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य प्राप्त झाले होते. तेव्हापासून 1993 चा अपवाद वगळता कधीही ब्रिटनचा पंतप्रधान गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमास हजर राहिलेला नाही. 1993 साली तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले होते. 
    •  2021 मध्ये ब्रिटनमध्ये होत असलेल्या जी 7 राष्ट्रांची परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. 
     
    भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी
    1950 - इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्णो (1)   
    1951-  नेपाळचे राजे त्रिभुवन विक्रम शाह               
    1952 व 1953 - निमंत्रण नाही                                                                                                                                               
    1954 - भूतानचे राजे जिग्मे दोर्जी वांग्चुक   (1)                                                                                  
    1955 - पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मुहम्मद (1)- राजपथ येथे झालेल्या परेडचे पहिले पाहुणे     
    1956 - ब्रिटनचे अर्थमंत्री आर. ए. बटलर (1) व जपानचे सरन्यायाधीश कोटारो तनाका  
    1957 - सोव्हिएत संघाचे संरक्षण मंत्री जॉर्जीय झुकोव्ह (1)          
    1958 - चीनचे मार्शल ए. जियानयिंंग  
    1958 - ब्रिटनचे ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलीप (2)                             
    1960 - सोव्हिएत संघाचे राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह  (2)                                                                         
    1961 - युनायटेड किंगड्मच्या महाराणी एलिझाबेथ दुसरी (3)       
    1962 - डेन्मार्कचे पंतप्रधान व्हिगो कँपमान                                                                                
    1963 - कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहांनौक    
    1964 - ब्रिटनचे लष्करप्रमुख लॉर्ड लुईस माऊंटबॅटन  (4)                                                                                                                                                        
    1965 - पाकिस्तानचे खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूल हमिद  (2)       
    1966 - निमंत्रण नाही                                                                                                                                               
    1967 - अफगाणिस्तानचे राजे मोहम्म्द झहीर शहा                                                                                                                                                                                  
    1968 - सोव्हिएत संघाचे पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन (3) व युगोस्लाव्हियाचे राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो                                                                                             
    1969 - बल्गेरियाचे पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह    
    1970 - बेल्जियमचे राजे बौदोईन                                                                                                                                                           
    1971 - टांझानियाचे राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे                                                                                       
    1972 - मॉरिशसचे पंतप्रधान शिवसागर रामगुलाम                                                                             
    1973 - झैरेचे राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको 
    1974 - श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके व  युगोस्लाव्हियाचे राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो (2)                                                                              
    1975 - झांबियाचे राष्ट्रपती केनेथ काँडा                                                                                            
    1976 - फ्रान्सचे पंतप्रधान जाक शिराक (1)                                                                                         
    1977 - पोलंडचे प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक                                                                               
    1978 - आयर्लंडचे राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि                                                                                         
    1979 - ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम फ्रेझर                                                                                    
    1980 - फ्रान्सचे राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें (2)                                                                            
    1981 - मेक्सिकोचे राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो                                                                                 
    1982 - स्पेनचे राजे हुआन कार्लोस पहिला                                                                                    
    1983 - नायजेरियाचे राष्ट्रपती शेहु शगारी (1)                                                                                         
    1984 - भूतानचे राजे जिग्मे सिंग्ये वांग्चुक  (2)
    1985 - अर्जेन्टिनाचे राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन                                                                               
    1986 - ग्रीसचे पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु                                                                                    
    1987 - पेरूचे राष्ट्रपती लन गार्शिया                                                                                            
    1988 - श्रीलंकेचे राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने (2)                                                                       
    1989  - व्हिएतनामचे जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह                                                                            
    1990  - मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ (2)                                                                                  
    1991  - मालदीवचे राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम                                                                               
    1992  - पोर्तुगालचे राष्ट्रपती मारिओ सोआरेस                                                                                    
    1993  - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान जॉन मेजर (5)                                                                                       
    1994  - सिंगापूरचे पंतप्रधान कोह चोक थोंग                                                                                     
    1995  - दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला                                                                                     
    1996  - ब्राझीलचे राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो (1)                                                                 
    1997  - त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान बसदेव पांडे                                                                                  
    1998  - फ्रान्सचे राष्ट्रपती जॅक शिराक (3)                                                                                               
    1999  - नेपाळचे राजे वीरेंद्र वीर विक्रम शाह देव  (2)                                                                               
    2000  - नायजेरियाचे राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो (2)                                                                           
    2001  - अल्जीरियाचे राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका                                                                       
    2002  - मॉरिशसचे राष्ट्रपती कस्साम उतीम (3)                                                                                      
    2003  - इराणचे राष्ट्रपती मोहम्मद खातामी                                                                                        
    2004  - ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा (2)                                                              
    2005  - भूतानचे राजे जिग्मे सिंग्ये वांग्चुक   (3)                                                                                    
    2006  - सौदी अरेबियाचे अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद                                               
    2007 - रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन  (4)                                                                                       
    2008  - फ्रान्सचे राष्ट्रपती निकोला सार्कोझी (4)                                                                                     
    2009  - कझाकस्तानचे राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव                                                                           
    2010  - दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली म्युंग बाक                                                                                       
    2011  - इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो (2)                                                                         
    2012  - थायलंडचे पंतप्रधान यिंगलक शिनवात्रा                                                                                 
    2015  - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा 
    2016  - फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद  (5)                                                                                         
    2017  - संयुक्त अरब अमिरातीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान                                            
    2018  - आशियान शिखर परिषदेचे 10 राष्ट्रप्रमुख
    ब्रुनेईचे सुलतान हासनाल बोल्किया
    कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन (2)
    फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो ड्यूटेर्टे     
    इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो (3)  
    लाओसचे पंतप्रधान थाँगलोआन सिसोलिथ 
    मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक
    म्यानमारच्या स्टेट कौन्सेलर आँग सॅन स्यू की  
    सिंगापूरचे पंतप्रधान ली हाएन लूंग (2)                                                                                                                                                                                               
    थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओ चा (2)
    व्हिएतनामचे पंतप्रधान एन्ग्युएन झुआन फुक (2)
    2019 - दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा (2)
    2020 - ब्राझीलचे अध्यक्ष जाएर बोल्सोनारो (3)
    2021 - ब्रिटनचे पंतप्रधान  बोरिस जॉन्सन (6)
     
    अनिवासी भारतीय
    कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चस्थानांवरील  भारतीय वंशाचे लोक -
    1) संदीप कटारिया - ‘बाटा’ या स्विस कंपनीचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)  
    2) गीता गोपीनाथ -  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थशास्त्रज्ञ 
    3) अरविंद कृष्णा -  आयबीएमचे सीईओ 
    4) संदीप मातृनी - ‘वी वर्क’ कंपनीचे सीईओ म्हणून (संचालक मंडळ सदस्य)
    5) सुंदर पिचाई  - गुगलचे सीईओ (अमेरिकेतील सर्वाधिक पगार 2144.53 कोटी रुपये मिळविणारे सीईओ)
    6) सत्या नडेला - मायक्रोसॉफ्टचे सीईओ 
    7) इंद्रा नुई - पेप्सिकोच्या सीईओ
    8) शंतनू नारायण - अ‍ॅडोब सिस्टिम्सचे सीईओ 
    मूळ भारतीय वंशाचे 128 शास्त्रज्ञ जगभरात भारताचे नाव उज्ज्वल करीत आहेत.

    जगभरातील राजकीय पटलावर उच्चस्थानांवरील भारतीय वंशाचे लोक -
    1) लियो वराडकर - आयर्लंडचे पंतप्रधान
    2) कमला प्रसाद बिसेसर - त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील विरोधी पक्षनेत्या (2010-15 दरम्यान  त्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान)
    3) ऋषी सुनक - ब्रिटनचे अर्थमंत्री 
    4) आलोक शर्मा - ब्रिटनचे व्यवसाय, ऊर्जा, औद्योगिक रणनीती विभागाचे राज्य सचिव
    5) प्रीती पटेल - गृहसचिव 
    6) सज्जन - कॅनडाचे संरक्षणमंत्री (त्यांच्यासह अन्य आठ शीख मंत्री कॅनेडियन मंत्रिमंडळात)
    7) अनिता आनंद - कॅनेडियन कॅबिनेटमधील पहिल्या हिंदू महिला (सार्वजनिक सेवा आणि खरेदी खात्याच्या मंत्री)
    8) प्रियंका राधाकृष्णन - न्यूझीलंडच्या भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री 
    9) कमला हॅरिस - अमेरिकेच्या उपराष्ट्रपति
    10) विवेक मूर्ती - अमेरिकेचे आरोग्य सचिव
    11) नीरा टंडन - अमेरिकेच्या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प कार्यालयाच्या संचालिका (ही जबाबदारी सांभाळणार्या टंडन या पहिल्या अश्र्वेत महिला)
    12)  डॉ. गौरव शर्मा - न्यूझीलंडचे सर्वांत तरुण नवनिर्वाचित संसद सदस्य
    13) निक्की हेली - ट्रम्प सरकारमध्ये अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत 
    14) महिंद्र चौधरी - पंतप्रधान  झालेले पहिले इंडो-फिजियन (1999) 
    15) छेदी भरत जगन- आधुनिक गुयानाचे राष्ट्रपिता व पंतप्रधान (1953)- जगन हे 1992 ते 1997 पर्यंत गुयानाचे चौथे राष्ट्रपती होते. 
    16) दादाभाई नौरोजी - 1892 ते 1895 या कालावधीत ब्रिटिश संसदेत मंत्री
    • फिजी आणि सिंगापूर देशांत अनेक भारतीय सरकारमध्ये सामील आहेत.
     
    डॉ. विनय सहस्रबुद्धे
           
     
     
            19 डिसेंबर 2020 - भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची तीन (2023 पर्यंत) वर्षांसाठी फेरनिवड झाली. विनय सहस्रबुद्धे यांचा जन्म नाशिकचा. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात गेल्यानंतर त्यांचा अ. भा. विद्यार्थी परिषदेशी संबंध आला. 
    • आणीबाणीत कारावास भोगल्यानंतर ते अंतर्बाह्य बदलले. 
    • रुईया कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘हवा कॉलेजची’ हे सदर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये चालविले. पुढे ‘मिड डे’ या सायंदैनिकात पत्रकारिता केली. ‘माणूस’मध्ये अस्वस्थ आसाम ही लेखमाला लिहिली होती. 
    • रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील कार्याने त्यांना स्वतंत्र ओळख मिळाली. 
    • राज्यसभा सदस्य व भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ही पदे त्यांच्याकडे असली, तरी त्यांना विद्वान, स्तंभलेखक, तत्त्वचिंतक म्हणूनच ओळखले जाते. 
    • लोकशाहीचे अवमूल्यन व राजकारण्यांच्या घसरत चाललेल्या वृत्तीप्रवृत्तीवर लिहिलेल्या प्रबंधाबद्दल त्यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली आहे. 
     
      जगातील शक्तिशाली महिला 
            ‘फोर्ब्स’च्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीतील पहिल्या पाच महिलांवर जगाचा कोरोनानंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावे जगाचे भविष्य ठरवताहेत.  
    अँजेला मर्केल
     
     
     
    • 2010 मध्ये मिशेल ओबामा जगातल्या सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या होत्या. हे वर्ष वगळता 2006 पासून ‘फोर्ब्स’च्या यादीत पहिल्या क्रमांकावर अँजेला मर्केल यांचं नाव कायम  आहे.
    • अँजेला मर्केल या जर्मनी देशाच्या चान्सलर आहेत. 2005 साली त्या जर्मनीच्या राष्ट्रप्रमुख बनल्या. जर्मनीच्या चान्सलर म्हणून त्या 4 वेळा निवडून आल्या. युरोपमधील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश त्या गेली 15 वर्षे चालवताहेत. 
    • अँजेला मर्केल यांनी केमिस्ट्री विषयात पीएच.डी. मिळवली. 
    • 2020 मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या एका सर्वेक्षणातून 14 युरोपियन देशांतील 75 टक्के लोक इतर कोणत्याही लीडरपेक्षा मर्केल यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात. 
    • त्यांचे समर्थक त्यांना ‘मुट्टी’ असं म्हणतात. मुट्टी म्हणजे जर्मन भाषेत आई. सीरियामधील  लाखो निर्वासितांना जर्मनीमध्ये दिलासा देत त्यांनी जगातल्या सगळ्यात शक्तिशाली महासत्तेच्या म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी पंगा घेतला. 
    • नोव्हेंबर 2018 मध्ये मर्केल यांनी ख्रिश्र्चन डेमोक्रॅटिक युनियनच्या लीडरपदावरून माघार घेतली असून इथून पुढे चान्सलर होणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं. 
     
    ख्रिस्टिन लगार्डे
     
     
    • ख्रिस्टिन लगार्डे 2020 व 2019 मध्ये ‘फोर्ब्स’च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर.
    • युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुखपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. 1 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. कोरोनामुळे युरोपियन देशांचं आणखी नुकसान होऊ नये यासाठी त्या दिवस-रात्र झटताहेत.
    • 2011 पासून त्या इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या प्रमुख होत्या. हे पद भूषवणार्‍या त्या पहिल्या महिला होत्या.
    • ‘आयएमएफ’ची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी फ्रान्स मंत्रिमंडळात वाणिज्य, शेती-मत्स्य आणि अर्थ खातंही त्या सांभाळत होत्या. फ्रान्सच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळालाय.
    • कायद्याचं शिक्षण घेतलेल्या लगार्डे या फ्रान्समधील मोठ्या नेत्या आहेत. 
    • ग्रीस देश कर्जात बुडाला तेव्हा त्यातून त्याला बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 
     
    कमला हॅरिस
     
     
    • भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक कमला हॅरिस यांनी ज्यो बायडन यांच्यासोबत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. 
    • पहिल्यांदाच ‘फोर्ब्स’च्या यादीत येऊनही त्या जगातील तिसर्‍या शक्तिशाली महिला झाल्या. 
    • अमेरिकेला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी ज्यो आणि कमला ही जोडी उपयोगी ठरेल, असा अनेकांना विश्वास वाटतो. कमला यांच्या रूपात अमेरिकेला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळेल, अशीही अनेकांना आशा आहे.
    • अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष, सिनेट म्हणून निवडून येणार्‍या पहिल्या इंडो अमेरिकन आणि कॅलिफोर्नियाचं अटर्नी जनरलपद भूषवणार्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत.
     
    अर्सुला व्हॉन देर लेयेन
     
     
     
    • अर्सुला व्हॉन देर लेयेन यांची युरोपियन युनियनचे महत्त्वाचे अंग असलेल्या युरोपियन कमिशनच्या प्रमुख म्हणून जुलै 2019 मध्ये निवड झाली
    • ‘फोर्ब्स’च्या यादीत त्यांना पहिल्यांदाच स्थान मिळालं. 70 कोटी युरोपियन लोकांवर परिणाम करणारे कायदे बनवण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे.
    ••  त्या मुळात डॉक्टर आहेत. सार्वजनिक आरोग्य या विषयात त्यांनी पदवी घेतली.
    •• त्या जर्मन नेत्या असून 2005 ते 2019 पर्यंत त्यांनी अँजेला मर्केल यांच्या मंत्रिमंडळात काम केलं. इतकी वर्षे काम करणार्‍या त्या एकमेव सदस्य आहेत. 2019 ला हे पद सोडण्याआधी तर त्या जर्मनीच्या संरक्षणमंत्री होत्या. याशिवाय, कामगार आणि सामाजिक कार्यमंत्री, कुटुंब आणि युवामंत्री अशा जबाबदार्याही त्यांनी पार पाडल्या. 
    • सप्टेंबर 2020 मध्ये पोलंड देशाच्या एलजीबीटीक्यू समुदायाविरोधी धोरणांचा त्यांनी कडाडून निषेध केला होता. त्यांच्या या धडाकेबाज भाषणानंतर त्या फार चर्चेत आल्या होत्या.
     
    मेलिंडा गेटस
     
     
    • ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेटस् यांच्या पत्नी मेलिंडा गेटस यांची सामाजिक कार्यात काम करणार्‍या सर्वात शक्तिशाली महिला आहेत. गेली अनेक वर्षे सातत्याने ‘फोर्ब्स’ यादीत पहिल्या पाचात त्यांचा समावेश असतो.
    • बिल अँड मेलिंडा गेटस् फाऊंडेशन या संस्थेच्या त्या प्रमुख आहेत. 2000 मध्ये स्थापन झालेली ही संस्था जगातील सगळ्यात मोठी खासगी चॅरिटेबल संस्था म्हणून ओळखली जाते.
    • बिल आणि मेलिंडा या दोघांनी मिळून संस्थेला 4 हजार कोटी डॉलर एवढी देणगी दिली. या एवढ्या पैशांतून मिळालेल्या पॉवरचा वापर करून मेलिंडा शिक्षणापासून गरिबीपर्यंत सगळे अवघडातले अवघड जागतिक प्रश्र्न सोडवण्याचा प्रयत्न करताहेत. 
    • जगातल्या सगळ्या लोकांना निरोगी, कार्यक्षम आयुष्य जगता यावं हा संस्थेचा मुख्य हेतू; पण संस्थेचं बरचसं काम हे महिल्यांच्या आणि मुलींच्या हक्कांसाठी चालतं. संतती नियमनापासून मासिक पाळीतल्या स्वच्छतेपर्यंत सगळे विषय संस्थेकडून हाताळले जातात. ‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या पुरुष प्रधान कॉम्प्युटरच्या क्षेत्रात जास्तीत जास्त महिला याव्यात यासाठीही मेलिंडा प्रयत्न करतात.
    • 2015 मध्ये भारत सरकारकडून बिल आणि मेलिंडा या दोघांना मिळून ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार देण्यात आला.
    • कोरोनाची लस शोधणार्‍या भारत बायोटेक कंपनीत बिल अँड मेलिंडा फाऊंडेशनची मोठी गुंतवणूक आहे. 
    • ‘द मॉमेंट ऑफ लिफ्ट’ नावाचं त्यांचं एक पुस्तकही फार प्रसिद्ध आहे.
     
    ‘फोर्ब्स’मासिक
     
     • अमेरिकेतल्या व्हेल मीडिया इन्व्हेस्टमेंट आणि फोर्ब्स कुटुंबाकडून हे एक जगप्रसिद्ध बिझनेस मॅगझिन चालविले जाते.
    • ते वर्षातून 8 वेळा प्रसिद्ध होते.
    • अमेरिकेस 28 देशांतून ‘फोर्ब्स’च्या आवृत्त्या प्रकाशित होतात.
    • या मॅगझिनमध्ये आर्थिक, औद्योगिक, गुंतवणूक आणि मार्केटिंग यासोबत तंत्रज्ञान, विज्ञान, राजकारण आणि कायदेविषयक लेख असतात. 
    या मासिकाकडून दरवर्षी वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या जातात-
    1) जगातल्या 100 श्रीमंत व्यक्तींची नावं
    2) 30 वर्षांखालच्या दर्जेदार काम करणार्‍या 30 व्यक्ती
    3) अमेरिकेतील 100 श्रीमंत माणसं
    4) सगळ्यात शक्तिशाली माणसं
    5) 100 शक्तिशाली महिला (2004 पासून)

    भारताचे कृषीमंत्री (1947-2021)
    •
     
    जून 1871 मध्ये ब्रिटिशांनी शेतीशी संबंधित कामकाजासाठी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अँड अ‍ॅग्रीकल्चर अँड कॉमर्स खात्याची स्थापना केली. त्याआधी शेतीशी संबंधित निर्णय गृहविभाग घेत असे.
    • 1923 मध्ये शिक्षण, महसूल, आरोग्य आणि कृषी अशी खाती एकत्र करण्यात आली. 
    • 1945 मध्ये ही खाती स्वतंत्र करण्यात आली. 
    • 1947 साली डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरचं नाव बदलून मिनिस्ट्री ऑफ अ‍ॅग्रीकल्चर असं करण्यात आलं. अन्न खातं कृषी खात्याशी संलग्न करण्यात आलं. 
    • 1956 मध्ये अन्न पुरवठा स्वतंत्र खातं झालं.
    • 1957 मध्ये दोन्ही खाती एकत्र करण्यात आली. 
    • कृषी खात्याचे काही विषय स्वतंत्र खाती म्हणून वेळोवेळी निर्माण करण्यात आले. कृषी खात्याचं कार्यक्षेत्र आणि उद्दिष्टं निश्रि्चत करण्यात आली- कृषी उत्पादन, कृषी संशोधन, शिक्षण आणि वि स्तारीकरण, पशुसंवर्धन, मत्स्य, वने, फळं आणि भाज्या उत्पादन, कृषी अर्थकारण आणि सांख्यिकी, कृषी विकास, संयुक्त राष्ट्र संघटना तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी विभागाशी निगडीत संघटनांच्या बरोबरीने काम खतांची निर्मिती आणि वितरण, जमीन अधिग्रहण, सहकार. मृदसंधारण. 
     
     
     

    डॉ.राजेंद्र प्रसाद (1946-48)
     
     
     
    •• डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटनासमितीचे अध्यक्ष होते. 
    •• स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी स्वातंत्र्याची लढाई अंतिम टप्प्यात असताना जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी हाताळली. 
    •• डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 1950 ते 1962 अशी बारा वर्षं ते राष्ट्रपती पदावर होते.
    •• महात्मा गांधीचे समर्थक असलेल्या राजेंद्र प्रसाद स्वातंत्र्यलढ्यात मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले होते. छोडो भारत आंदोलनातील सहभागासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. 
    •• काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली.
    •• प्राध्यापक व वकील असलेल्या राजेंद्रप्रसाद यांनी बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत योगदान दिलं होतं. 
    •• अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी कायदा क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली. 
    •• 1914 मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
     
    जयरामदास दौलतराम (1948-50)
     
     
     
     
    •• स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री असणारे जयरामदास दौलतराम यांचा जन्म कराचीत झाला होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. 
    •• पेशाने वकील असणार्‍या जयरामदास यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिलं. महात्मा गांधींचे विश्र्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. असहकार आंदोलन, दांडी यात्रा, छोडो भारत अशा आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
    •• 1930 मध्ये कराचीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जयरामदास जखमी झाले होते. 
    •• सिंध प्रांताचं त्यांनी नेतृत्व केलं. अखिल भारतीय सिंधी बोली अन सहित सभा या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते.
    •• घटनासमितीचे ते सदस्य होते.
    •• फाळणीत जयरामदास यांचं मूळ गाव आणि प्रदेश पाकिस्तानात गेलं. मात्र त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. 
    •• त्यानंतर जयरामदास सहा वर्ष आसामच्या राज्यपालपदी होते. बिहारचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
     
    कन्हैयालाल मनेकलाल मुन्शी (1950-52)
     
     
     
    •• घनश्याम व्यास या टोपणनावाने लेखन करणारे कन्हैयालाल मुन्शी यांनी वकिली, शिक्षण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात योगदान दिलं. 
    •• भारतीय विद्या भवन या सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थेचे ते संस्थापक. अनेक पुस्तकं नावावर असणार्‍या मुन्शी यांनी अनेक सामाजिक तसंच शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत योगदान दिलं.
    •• तत्काकीन बॉम्बे प्रेसिडेन्सी प्रांतात त्यांनी अनेक जबाबदार्‍या सांभाळल्या.
    •• हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत संस्थानाचे एजंट जनरल म्हणून काम पाहिलं. 
    •• उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केलं. 
    •• सोमनाथ मंदिराच्या नूतनीकरण प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा. 
    •• काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी अखंड हिंदुस्तान नावाची चळवळ सुरू केली. 
    •• विश्र्व हिंदू परिषदेच्या स्थापनेतही त्यांचा वाटा होता. 
    •• कृषीमंत्रीपदी असताना त्यांनी वन महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली. 
     
    रफी अहमद किडवाई (1952-54)
     
     
    •• खिलाफत चळवळीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश. 
    •• स्वराज पक्षाचे नेते. 
    •• उत्तर प्रदेशात जमीनदारी पद्धत रद्द करण्यात भूमिका. 
    •• स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या निवडणुकांमध्ये ते उत्तर प्रदेशातल्या बहारिच मतदारसंघातून निवडून आले.
    •• इंडियन काऊंसिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च संघटनेतर्फे त्यांच्या स्मरणार्थ रफी अहमद किडवाई पुरस्काराद्वारे कृषी क्षेत्रातील संशोधकांना गौरवण्यात येतं.
     
    कृषी राज्यमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख (1952-62)
     
     
     
            डॉ. पंजाबराव देशमुख हे पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या स्वातंत्र्यानंतरच्या दुसर्‍या व तिसर्‍या मंत्रीमंडळात कृषी खात्याचे (17 एप्रिल 1952 ते 2 एप्रिल 1962), तसेच सहकाराचे राज्यमंत्री (1957-58) होते. या काळात त्यांनी अनेक समित्या स्थापन केल्या. त्यांनी देशभर ़कृषी विद्यापीठांच्या स्थापनेबरोबरच ़कृषी शिक्षण व संशोधनास चालना दिली. त्यांनी कृषिमंत्री म्हणून विविध देशांना भेटी दिल्या.
    •• डॉ. पंजाबराव देशमुखखांनी कापूसबाजार, शेती वगैरे क्षेत्रांत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. 
    •• कृषिउत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ, आफ्रो-आशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना इ. संघटना त्यांनी यशस्वीपणे चालविल्या. 
    •• 1955 साली त्यांनी भारत कृषक समाज स्थापन करुन त्याच्या विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघ’ आणि ‘कृषक सहकारी भारतीय अधिकोश’ स्थापन केला. याच वर्षी त्यांनी फूड फॉर मिल्लीयन्स हा उपक्रम सुरु केला. 
    •• 1958 साली त्यांनी जपानी पद्धतीने भात लावणीचे तंत्र भारतात आणले. जपानी भातशेतीचा प्रयोग देशभर व्हावा म्हणून त्यांनी देशव्यापी मोहिम सुरू केली. 
    •• 1959 साली त्यांच्या पुढाकाराने, भारताच्या कृषिविषयक प्रगतीचे जगाला दर्शन घडावे म्हणून दिल्ली येथे जागतिक ़कृषी  प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उअदघाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनहॉवर यांनी केले होते. लॉर्ड व लेडी माऊंटबॅटन, रशियाचे प्रमुख निकिता क्रुश्चेव्ह यांनीसुद्धा या महोत्सवास भेट दिली होती. 
    •• मूळ आडनाव - कदम (जन्म : पापळ-अमरावती जिल्हा, 27 डिसेंबर 1898; मृत्यू : दिल्ली, 10 एप्रिल 1965)
    •• ’भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’ हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.
    •• पंजाबराव देशमुख(भाऊसाहेब देशमुख)उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. 
    •• 1926 - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
    •• 1927 - शेतकरी संघाची स्थापना. शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ’महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालविले. वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
    •• 18 ऑगस्ट 1928 - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृशयांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह.
    •• 1930 - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
    •• 1932 - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.  याच वर्षी देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले. प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
    •• 1933 - शेतकर्‍यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारित करण्यात मोठा वाटा. ग्रामोद्धार मंडळाची स्थापना. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात. 
    •• 1936 - या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. 
    •• 1950 - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर.
    •• 1952, 1957, 1962 तीन वेळा लोकसभेवर निवड.
    •• 1956 - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
    •• 1959-60 - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
     
    अजित प्रसाद जैन (1954-59)
     
     
     
    •• पेशाने वकील आणि स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग. 
    •• उत्तर प्रदेशच्या राजकारणात विविध जबाबदार्‍या हाताळल्या. 
    •• 1952 आणि 1957 या वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातून लोकसभेवर निवडून गेले. 
    •• पाच वर्ष केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम केल्यानंतर केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं. 
    •• 1967 ते 1975 या कालावधीत राज्यसभेचे सदस्य. 
    •• इरिगेशन कमिशनचे अध्यक्ष. जैन सिंचन आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो. 
    •• सामाजिक क्षेत्रातील सेवा निधी ट्रस्टची स्थापना केली. 
    •• उत्तर प्रदेश पोलीस कमिशनचे अध्यक्षपद भूषवलं. 
    •• भारत-रशिया करार आणि काशमीरसंदर्भात त्यांची दोन पुस्तकं आहेत.
     
    स. का. पाटील (1959-63)
     
     
     
    •• केंद्रीय कृषिमंत्रिपद भूषवणारे पहिले मराठमोळे नेते. 
    •• सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमध्ये जन्म. काँग्रेसचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते. 
    •• बॉम्बे मिल मजदूर युनियनची स्थापना केली. 
    •• स. का. पाटील यांनी महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद तसंच मुंबई महापौर भूषवलं.
    •• 1960 मध्ये दुष्काळ पडल्याने अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. स.का. पाटील कृषीमंत्रीपदी असताना अन्नधान्याची टंचाई होऊ नये यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात पीएल 480 करार झाला. या करारामुळे अन्नधान्याच्या किंमती कमी होतील आणि टंचाई भरून निघेल असं ते म्हणाले होते. 1.6 कोटी टन अमेरिकन गहू आणि 10 लाख टन तांदूळ आयात करण्यासाठी तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष आयसेनहॉवर यांच्या सोबत द्विपक्षीय करार करार केला होता. या करारान्वये भारताने रुपयात पैसे मोजावयाचे होते आणि या रकमेच्या 85% रक्कम भारताला कर्ज आणि देणगीच्या स्वरूपात परत मिळणार होती. 
    •• 1967 साली लोकसभा निवडणुकीत, मुंबईचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे स. का.पाटील आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यात चुरशीचा मुकाबला झाला. या निवडणुकीच्या प्रचारावेळी आचार्य अत्रे यांनी अनेक सभा घेतल्या. अत्रे हे आर. बी. भंडारेंच्या विरोधात उभे होते. स. का. पाटलांना उद्देशून भाषणाची सुरुवात अत्रे अशी करत, ’हा लेकाचा सदोबा, लोकसभेत जायला म्हणतोय, याला मी शोकसभेत पाठवेन. मी 13 ऑगस्टला जन्माला आलो, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मधे एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले.’ त्या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी स. का. पाटलांना हरवलं. जॉर्ज यांची प्रतिमा जायंट किलर अशी रंगवली गेली. 

    स्वर्ण सिंग (1963-64)
     
     
    •• सर्वाधिक काळ सलग कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी हाताळणारे नेते ही स्वर्ण सिंगांची ओळख आहे. 1952 ते 1976 अशा प्रदीर्घ काळासाठी ते केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी होते. 
    •• कृषिमंत्री म्हणून एक वर्ष कारभार पाहिला असला तरी संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, रेल्वे मंत्री अशी महत्त्वाच्या खात्यांचा भार त्यांच्याकडे होता.
    •• वाटाघाटी करणं आणि अमोघ वक्तृत्व या गुणवैशिष्ट्यांसाठी ते ओळखले जात. 
    •• युनेस्कोच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स पदीही ते होते. 
    •• स्वर्ण सिंग यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
     
    चिदंबरम सुब्रमण्यम (1964-67)
     
     
     •• सी. सुब्रमण्यम यांच्या निमित्ताने कृषिमंत्रिपदी दाक्षिणात्य राज्यातल्या नेत्याची निवड झाली. 
    •• भौतिकशास्त्रात पदवी आणि त्यानंतर कायद्याचं शिक्षण घेतलेले सी. सुब्रमण्यम स्वातंत्र्यलढ्यातील अनेक चळवळींमध्ये सहभागी होते. 
    •• कृषिमंत्री म्हणून राबवलेल्या योजना आणि घेतलेल्या निर्णयांसाठी चिदंबरम सुब्रमण्यम यांना हरितक्रांतीचे प्रणेते म्हटलं जातं. एम.एस. स्वामीनाथन, बी. सिवारमण, नॉर्मन बोरलाग या कृषीतज्ज्ञांच्या साह्याने त्यांनी कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणला. देशातल्या कृषी व्यवस्थेला हरितक्रांतीने नवा आयाम दिला. 
    •• अन्नधान्याच्या उत्पादनात घाऊक वाढ होण्याची आवश्यकता होती. कृषीमंत्री म्हणून नव्या गव्हाचं संकरित वाण 18 हजार टन आयात केलं. 
    •• कृषी क्षेत्रात आवश्यक सुधारणा लागू केल्या. कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना या प्रयोगाबद्दल माहिती करून दिली. सिंचनाकरता कालवे तयार करून घेतले. विहिरी खोदल्या.
    •• शेतकर्‍यांना हमीभावाचं आश्वासन दिलं. अन्नधान्य सुरक्षित ठेवण्यासाठी गोदामं उभारण्यात आली. या सगळ्या घुसळणीतून देश आवशयकतेपेक्षा जास्त अन्नधान्य पिकवू लागला. 
    •• हरितक्रांती म्हटलं की नॉर्मन बोरलॉग आणि एम.एस.स्वामीनाथन यांची नावं समोर येतात. कृषिमंत्री सी.सुब्रमण्यम यांना हरितक्रांतीचं श्रेय जातं. 
    •• सी. सुब्रमण्यम यांनी अर्थ तसंच संरक्षण मंत्रिपदही भूषवलं.
    •• नियोजन आयोगाचे ते उपाध्यक्ष होते. 
    •• सी. सुब्रमण्यम 1990 ते 1993 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. 
    •• 1998 मध्ये सी. सुब्रमण्यम यांना देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं.
     
    जगजीवन राम (1967-70 व 1974-77)
     
     
    •• समाजाकडून अस्पृश्य मानलं गेलेल्या लोकांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगची स्थापना करणारे जगजीवन राम बाबूजी नावाने परिचित.
    •• 1934 साली बिहारमध्ये आलेल्या भूकंपात त्यांनी केलेलं काम वाखाणलं जातं. 
    •• सी. सुब्रमण्यम यांनी पेटवलेली हरितक्रांतीची मशाल जगजीवन राम यांनी सर्वसमावेशक कामासह प्रखरपणे तेवत ठेवली.
     
    फख्रुदीन अली अहमद (1970-74) 
     
     
     
    •• पेशाने वकील असणारे फख्रुदीन अली अहमद स्वातंत्र्यचळवळीचा भाग होते. 
    •• आसाममध्ये दशकभर आमदार असणारे फख्रुदीन राज्यसभा खासदारही होते.
    •• 1967 आणि 1971 आसाममधल्या बारपेटा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले. 
    •• 1974 मध्ये फख्रुदीन यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली.
    •• आणीबाणीच्या निर्णयावर त्यांनी स्वाक्षरी केली होती. राष्ट्रपतीपदी असतानाच त्यांचं निधन झालं.
     
    प्रकाश सिंग बादल  (1977)
     
     
    •• कृषिमंत्रिपदी निवड झालेले पहिले बिगरकाँग्रेसी (शिरोमणी अकाली दल) नेते. 1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काही महिने बादल यांच्याकडे पद सोपवण्यात आलं होतं.
    •• शिरोमणी अकाली दलाच्या संस्थापकांपैकी एक. 
    •• पंजाबमधल्या एका गावाच्या सरपंचपदापासून कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या बादल यांनी पंजाबचं मुख्यमंत्रीपद 1970-71, 1977-1980, 1997-2002, 2007-2017 असं 18 वर्ष भूषवलं. 
    •• 2020 च्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला.
    •• एकेकाळी एनडीएचा भाग असणारे प्रकाश सिंग  बादल अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण यांच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक.
     
    सुरजीत सिंग बर्नाला (1977-79)
     
     
    •• कृषीमंत्रीपदी निवड झालेले शिरोमणी अकाली दल पक्षाचे नेते. 
    •• ते लेखक आणि चित्रकार होते. पंतप्रधान होण्यासमीप आलेले कृषीमंत्री. 
    •• तत्कालीन पंतप्रधानमोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते. 
    •• दोन वर्ष पंजाबचं मुख्यमंत्रिपद सांभाळले.
    •• सुरजीत यांनी विक्रमी काळ अनेक राज्यांचं राज्यपालपद भूषवलं - तामिळनाडू, पुदुच्चेरी, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश 
    •• 2018 साली त्यांचं निधन झालं.
     
    चौधरी ब्रह्मप्रकाश (1979-80)
     
     
     
    •• कृषी क्षेत्रात सहकार रुजवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
    •• दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री. 
    •• संघटनात्मक कौशल्य आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या खाचाखोचा माहिती असलेले चौधरी ब्रह्मप्रकाश 34 व्या वर्षी राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. 

    राव बिरेंद्र सिंग (1980-84) 
     
     
    •• हरयाणाचे माजी मुख्यमंत्री.
    •• हरयाणा विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 
    •• हरयाणा पंजाबमध्ये असताना राव बिरेंद्र सिंग आमदार म्हणून कार्यरत होते.
    •• त्यांच्या प्रयत्नांमुळे रेवाडी स्वतंत्र जिल्हा म्हणून निर्माण झाला. 
    •• त्यांनी विशाल हरयाणा पार्टी नावाचा पक्ष काढला होता. काही वर्षांनंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केला.
     
    बुटा सिंग (1984-86) 
     
     
     
    •• जवाहरलाल नेहरू, इंदिरा, राजीव गांधी अशा तीन पिढ्यातील पंतप्रधानांशी सलोख्याचे संबंध असलेले बुटा सिंग लोकसभेवर आठवेळा निवडून गेले. 
    •• ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरीही होते. 
    •• बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहत असताना त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने टीका केली होती.
    •• राष्ट्रीय शेड्युल्ड कास्ट कमिशनचे अध्यक्ष होते. 
    •• एशियन गेम्स स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष होते. 
    •• पंजाबी साहित्य, शीख समाजाचा इतिहास यासंदर्भात एक पुस्तकही लिहिलं.
    •• कला शाखेचे पदवीधर असलेल्या बुटा सिंग यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम विधि क्षेत्राचा पूर्ण केला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकार म्हणून काम केलं.
     
    डॉ. गुरदियाल सिंग धिल्लाँ (1986-88) 
     
    •• दोन वर्ष कृषिमंत्री म्हणून जबाबदारी हाताळली. 
    •• वकिलीचं शिक्षण घेतलेले डॉ. सिंग संसदेला लोकशाहीचं मंदिर मानत असत. 
    •• डॉ. सिंग यांनी लोकसभेचे सभापतीपद भूषवलं होतं. सभागृहाचं कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने चालवण्यात त्यांचा हातखंडा होता.
     
    भजनलाल बिश्नोई (1988-89) 
     
     
    •• हरयाणाचं मुख्यमंत्रीपद तीनवेळा भूषवलं. 
    •• काँग्रेस पक्षातून जनता पक्षात आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने त्यांच्यावर आयाराम गयाराम अशी टीका झाली.
     
    चौधरी देवी लाल  (1989-91) 
     
     
     
    •• कृषीमंत्रीपदी निवड झालेले पहिले उपपंतप्रधान. ते जनता दल पक्षाचे नेते. 
    •• व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात उपपंतप्रधानपद भूषवलं. 
    •• देवी लाल हरयाणाचे मुख्यमंत्रीही होते. 
    •• हरयाणा राज्याच्या निर्मितीतही त्यांचा पुढाकार होता. 
    •• शेतकर्‍यांचा मोठा वर्ग पाठीशी होता. ताऊ या नावाने प्रसिद्ध असं शेतकर्‍यांचे नेते.
     
    बलराम जाखर (1991-96) 
     
     
     
    •• आमदार म्हणून दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश. 
    •• भारत कृषक समाज संस्थेचे आजीवन अध्यक्ष. 
    •• शेतकर्‍यांचं उत्पादन वाढावं यासाठी जाखर यांनी कृषी क्षेत्रात शास्त्रोक्त पद्धती आणल्या. 
    •• हॉर्टिकल्चर योगदानासाठी त्यांना उद्यान पंडित पुरस्काराने राष्ट्रपतींतर्फे गौरवण्यात आलं.
    •• कृषी क्षेत्रातल्या ज्ञानासाठी त्यांना डॉक्टरेट आणि विद्यामार्तंड किताबाने गौरवण्यात आलं. 
    •• लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नऊ वर्ष काम पाहिलं. संसदेच्या कामाचं संगणकीकरण करण्यात त्यांचा पुढाकार होता. संसदेचं ग्रंथालय पुस्तक, संदर्भग्रंथ, संशोधनपुस्तिका यांनी सुसज्ज करण्यात मोलाचा वाटा.
    •• संसदेच्या संग्रहालयाचे ते शिल्पकार होते. इंग्रजी, 
    •• पंजाबी, ऊर्दू, संस्कृत आणि हिंदी इतक्या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. 
    •• मध्य प्रदेश आणि गुजरातचं राज्यपालपदही जाखर यांनी भूषवलं.
     
    जगन्नाथ मिश्रा (1996) 
     
     
    •• तीनवेळा बिहारचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे जगन्नाथ मिश्रा यांच्याकडे काही महिने कृषीमंत्रीपद होतं. 
    •• त्यांचे मोठे बंधू ललित नारायण मिश्रा राजकारणात होते. 
    •• भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआय न्यायालयाने जगन्नाथ मिश्रा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.
     
    सूरज भान (1996) 
     
     
     
    •• अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून जबाबदारी, परंतु सरकार पडल्याने काम करण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही. 
    •• चारवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या भान यांनी लोकसभेचे उपसभापती म्हणूनही काम केलं. 
    •• उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहारचं राज्यपालपदही भूषवलं.
     
    हरदनहळ्ळी देवेगौडा (1996) 
     
     
     •• माजी पंतप्रधान. देशाच्या प्रमुखपदी असताना देवेगौडा यांनी कृषिमंत्रिपद आपल्याकडे ठेवलं होतं.
    •• चारवेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. सध्या राज्यसभेचे खासदार.
    •• शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या देवेगौडा यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. 
    •• आमदार म्हणून कर्नाटक विधिमंडळात सातवेळा निवडून आले. 
    •• कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. 
     
    चतुरानन मिश्रा (1996-98) 
     
     •• कृषीमंत्रीपदी निवड झालेले सीपीआय कम्युनिस्ट पक्षाचे नेते. 
    •• देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कृषीमंत्री. 
    •• ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष.
    •• छोडो भारत आंदोलनात सहभाग. 
    •• काही काळ नेपाळमध्ये वास्तव्य. 
    •• दरभंगा तुरुंगात लाठीमारात गंभीर जखमी.
    •• तीनवेळा आमदारकी भूषवलेले मिश्रा दोनवेळा राज्यसभेवर तर एकदा लोकसभेवर निवडून गेले. 
    •• ट्रेड युनियनसाठी लिखाण. वर्तमानपत्रांमध्ये नियमित स्तंभलेखन. 
    •• मैथिली भाषेत कादंबरी लिखाण. 
     
    अटलबिहारी वाजपेयी (1998-99) 
     
     
    •• पंतप्रधानपदी असताना जी खाती अन्य मंत्र्यांना देण्यात आली नाहीत त्याची सूत्रं वाजपेयींकडे होती, त्यात कृषी खातेही होते.
    •• माजी पंतप्रधान आणि बहुपेडी व्यक्तिमत्व. कवी आणि लेखक. पाच दशकांचा संसदीय कामाचा अनुभव. दहा वेळा लोकसभेवर निवडून तर दोनवेळा राज्यसभा खासदार म्हणून निवड. 
    •• तेरा दिवस, तेरा महिने आणि पाच वर्ष अशा तीन कार्यकाळासाठी देशाच्या प्रमुखपदी.
    •• पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगरकाँग्रेसी नेते. 
    •• स्वातंत्र्यलढ्यात सहभागी. 
    •• राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाईक. 
    •• भारतीय जनसंघ म्हणजे आताच्या भाजपच्या संस्थापकांपैकी एक. 
     
    नितीश कुमार (1999-2000) 
     
     
     
    •• नितीश कुमार यांनी केंद्रीय कृषिमंत्रिपदाची जबाबदारी दोनदा हाताळली. 
    •• केंद्रात आणि राज्यात म्हणजेच बिहारमध्ये सक्रिय असणारे नेते.
    •• 2020 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ
    •• सध्या बिहारचे मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार केंद्रात दोनदा कृषीमंत्रीपदी होते.
    •• विविध प्रश्नांनी वेढलेल्या बिहारची प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्नशील.जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व.
     
    सुंदरलाल पटवा (2000) 
     
     
     
    •• राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. 
    •• जनसंघ आणि त्यानंतर भाजपसाठी आमदार म्हणून मध्य प्रदेशात कार्यरत. 
    •• काँग्रेस नेते कमलनाथ यांना हरवण्याची किमया करणारे नेते. 
    •• दोनदा मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. 
    •• कुशाभाऊ ठाकरे यांनी सुंदरलाल यांच्या वडिलांना मुलाला राजकारणात पाठवण्याची सूचना केली होती. 
    •• सुंदरलाल यांना पद्मविभूषण पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं.
     
    अजित सिंग (2001-03) 
     
    •
     • आयआयटी खरगपूरमधून बीटेकची पदवी आणि इलिनॉईस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमएसची पदवी. 
    •• संगणक क्षेत्रातील अग्रगण्य अशा आयबीएम कंपनीत काम करण्याचा अनुभव असलेले अजित हे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचे चिरंजीव. 
    •• राष्ट्रीय लोकदल पक्षाचे संस्थापक.
     
    राजनाथ सिंह (2003-04)
     
     
    •• राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाईक असलेल्या राजनाथ यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केलं आहे. 
    •• उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
    •• भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषवलं आहे. 
    •• सध्या संरक्षणमंत्री असलेल्या राजनाथ यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कृषिमंत्रिपद हाताळलं होतं. 
    •• कृषिमंत्री असताना किसान कॉल सेंटर आणि शेतकर्‍यांसाठी विमा योजना आणली. कृषी कर्जावरचं व्याज कमी केलं. फार्मर्स कमिशनची स्थापना केली. फार्म्स इन्कम इन्शुरन्स स्कीम राबवली. शेतकरी आंदोलनात केंद्र सरकारच्या वतीने चर्चेत सहभागी.
    •• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात राजनाथ सिंग गृहमंत्री होते. 

    शरद पवार (2004-14) 
     
    •
     
     • सलग दहा वर्षं कृषिमंत्रिपदी राहण्याचा दुर्मीळ विक्रम नावावर अससेले मुरब्बी राजकारणी. 
    •• पन्नासहून अधिक वर्ष राजकारणात असणार्‍या पवार यांनी कृषिमंत्री म्हणून काम करताना उत्पादन, संशोधन आणि विक्री या तिन्ही आघाड्यांवर भर दिला. 
    •• शेतीचं उत्पादन वाढवण्यात आणि पर्यायाने जीडीपीमधला कृषी क्षेत्राचा हिस्सा वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 
    •• तांदूळ, गहू, फळं आणि अन्य पिकांमध्ये भारताला स्वावलंबी करून निर्यातक्षम करण्यात सिंहाचा वाटा. शेतीच्या बरोबरीने अर्थकारण आणि व्यापार यांची जाण. 
    •• भारताला जागतिक स्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे, तांदूळ आयात कराव्या लागणार्‍या भारताला निर्यातदार देश म्हणून तयार केलं.
    •• दिल्लीस्थित सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अ‍ॅग्रीकल्चर अँन्ड अ‍ॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीजच्या (सीटा) उभारणीत योगदान. 
    •• कृषिमंत्री झाल्यानंतर पवारांनी शेतकर्‍यांना मिळणार्‍या एमएसपीमध्ये भरघोस वाढ केली. 
    •• 60,000 कोटी रुपयांची कर्ज माफ केल्याने हजारो शेतकर्‍यांचा फायदा झाला. 
    •• शेती कर्जावरचा व्याजदर 12 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आणला. 
    •• हॉर्टिकल्चर क्रांतीचे जनक असं त्यांचं वर्णन ज्येष्ठ संशोधक एम.एस. स्वामीनाथन यांनी केलं.
    •• महाराष्ट्र राज्याचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान. तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं. 
    •• यशवंतराव चव्हाणांना गुरू मानत राजकारणात प्रवेश. 
    •• राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक. 
    •• सातवेळा लोकसभेवर निवडून तर 2014 पासून राज्यसभेचे खासदार. 
    •• केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी पेलली. 
    •• आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. 
    •• समाजकारण, खेळ, साहित्य, सहकार, शिक्षण अशा विविधांगी क्षेत्रात वावर.
     
    राधामोहन सिंग  (2014-19) 
     
     
     
     
    •• राधामोहन सिंग पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात (2014-19) कृषिमंत्रिपदी होते. खातेनिहाय परीक्षणात राधामोहन यांच्या कृषिखात्याला तळाचं स्थान मिळालं होतं.  या काळात कृषिमंत्र्यांनी एकही नावीन्यपूर्ण उपक्रम, योजना राबवली नाही.
    •• 2018 मध्ये शेतकर्‍यांच्या संपाचं वर्णन त्यांनी पब्लिसिटी स्टंट असं केलं होतं. तामिळनाडूतील शेतकरी जंतरमंतर इथे एकत्र आले होते, त्यावेळी राधामोहन यांनी शेतकर्‍यांची भेट घेतली नाही.
    •• मध्य प्रदेशात मंदसौरला पोलिसांच्या गोळीबारात काही शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसात राधामोहन बाबा रामदेव यांच्या योगशिबिरात ते दिसल्याने वाद निर्माण झाला होता. 
    •• महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांचा मोर्चा मुंबईत थडकला होता. त्यावेळीही राधामोहन फिरकले नाहीत अशी टीका होते आहे.
    •• बिहारमध्ये रस्त्याच्या बाजूला सुरक्षेच्या गराड्यात लघुशंका करतानाचा त्यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
    •• बिहारचे राधामोहन लोकसभेवर सहावेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. 
    •• ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. 
     
    नरेंद्र सिंग तोमर (2019-) 
    •
     
     
    • मध्य प्रदेशात नगरसेवक म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या तोमर यांनी आमदार ते खासदार असा यशस्वी प्रवास केला. 
    •• मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान आणि नरेंद्र तोमर ही जोडी प्रसिद्ध आहे. 
    •• राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पूर्वीपासून परिचय. 

    प्रश्नमंजुषा (63)
    1) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) 1961 साली ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसरी या भारताच्या गणराज्य दिनी प्रमुख पाहुणी होत्या.
    ब) 1993 साली तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर हे भारताच्या गणराज्य दिनी प्रमुख पाहुणे होते. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    2) 2021 साली जी 7 राष्ट्रांची बैटक कोठे होणार अहे?
    1) फ्रान्स
    2) जपान 
    3) इटली
    4) ब्रिटन
     
    3) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (नेतृत्त्व) स्तंभ ब (देश)
    अ. लियो वराडकर  I.   न्यूझीलंडमध्ये भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री
    ब. ऋषी सुनक II.  आयर्लंडचे पंतप्रधान 
    क. अनिता आनंद III.  कॅनडातील पहिल्या हिंदू महिला मंत्री 
    ड. प्रियंका राधाकृष्णन  IV.  ब्रिटनचे अर्थमंत्री 
    पर्यायी उत्तरे :
    1) II IV III I
    2) I IV III II
    3) I II III IV
    4) IV III I II
     
    4) कोणत्या प्रादेशिक सहकार्य गटातील सर्व राष्ट्रप्रमुखाना  गणराज्य दिनी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण करण्यात आलेले होते?
    1) सार्क
    2) ओपेक
    3) आशियान
    4) युरोपियन युनियन
     
    5) भारताच्या गणराज्य दिनी उपस्थित पाहुण्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या :
    अ) भूतानचे राजे जिग्मे दोर्जी वांग्चुक हे सर्वात जास्तवेळा भारताच्या गणराज्य दिनी प्रमुख पाहुणे होते.   
    ब) पाकिस्तान वगळता इतर सर्व सार्क देशांचे प्रमुख भारताच्या गणराज्य दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत.
    क) आशियान देशांच्या सर्व प्रमुखांनी भारताच्या गणराज्य दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली आहे.
    ड) अमेरिकेच्या दोन राष्ट्रपतींनी भारताच्या गणराज्य दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2) ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4) फक्त क बरोबर
     
    6) भारताच्या गणराज्य दिनी आत्तापर्यंत कोणत्या देशाच्या प्रमुखांनी उपस्थिती लावलेली नाही ?
    1) पाकिस्तान 
    2) श्रीलंका
    3) बांगला देश
    4) नेपाळ
     
    7) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (कंपनी )    स्तंभ ब (प्रमुख)
    अ. अ‍ॅडोब सिस्टिम्स चे सीईओ I.   शंतनू नारायण 
    ब. मायक्रोसॉफ्टचे सीईओ II.  सत्या नडेला 
    क. ‘वी वर्क’ कंपनीचे सीईओ III. संदीप मातृनी 
    ड. आयबीएमचे सीईओ IV. रविंद कृष्णा  
    पर्यायी उत्तरे :
    1) II III IV I
    2) I IV III II
    3) I II III IV
    4) IV III I II
     
    8) भारतीय गणराज्य दिनी राजपथ येथे झालेल्या पहिल्या परेडचे पहिले पाहुणे कोण होते ?
    1)  इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्णो 
    2)  ब्रिटनचे लष्करप्रमुख लॉर्ड लुईस माऊंटबॅटन  
    3)  पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मुहम्मद 
    4)  ब्रिटनचे ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलीप 
     
    9) दादाभाई नौरोजी कोणत्या कालावधीत ब्रिटिश संसदेत सदस्य होते ?
    1) 1890 ते 1895 
    2) 1892 ते 1897 
    3) 1892 ते 1895 
    4) 1895 ते 1899
     
    10) ब्रिक्स देशापैकी कोणत्या देशाच्या प्रमुखांना आतापर्यंत गणराज्य दिनी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण करण्यात आलेले आहे?
    अ) चीन 
    ब) रशिया
    क) दक्षिण आफ्रिका
    ड) ब्राझील
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2) ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4) अ, ब क आणि ड बरोबर
     
    11) आँग सॅन स्यू की या कोन आहेत ?
    1) म्यानमारच्या चॅन्सेलर
    2) म्यानमारच्या स्टेट कौन्सेलर
    3) म्यानमारच्या पंतप्रधान
    4) म्यानमारच्या राष्ट्रपती
     
    12) कोणत्या गणराज्य दिनाचे प्रमुखअतिथी म्हणून  परदेशी पाहुण्यांना निमंत्रण करण्यात आले नव्हते ?    
    अ) 1971
    ब) 1952 व 1953
    क) 1966
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त ब आणि क
    4) अ, ब आणि क
     
    13) भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदी कोण आहेत?
    1) डॉ. भालचंद्र मुणगेकर
    2) डॉ. जब्बार पटेल
    3) डॉ. अरुण निगवेकर
    4) डॉ. विनय सहस्रबुद्धे 
     
    14) अँजेला मर्केल यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    अ) अँजेला मर्केल या जर्मनी देशाच्या चान्सलर आहेत. 
    ब) 2006 पासून ‘फोर्ब्स’च्या यादीत पहिल्या क्रमांकावर अँजेला मर्केल यांचं नाव कायम आहे.
    क) त्यांचे समर्थक त्यांना ‘मुट्टी’ असं म्हणतात.
    ड) जर्मनीच्या चान्सलर म्हणून त्या 4 वेळा निवडून आल्या. 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4) अ, क आणि ड बरोबर
     
    15) कोणते गांधीवादी नेते घनश्याम व्यास या टोपणनावाने लेखन करीत ?
    1) ठक्कर बाप्पा
    2) विनोबा भावे
    3) जयरामदास दौलतराम
    4) कन्हैयालाल मुन्शी
     
    16) भारताच्या कृषीमंत्र्यांचा त्यांच्या कारकीर्दीनुसारचा योग्य क्रम लावा : 
    अ) जगजीवन राम
    ब) सी. सुब्रमण्यम 
    क) देवी लाल 
    ड) स. का. पाटील 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ - ब - क - ड
    2) क - अ - ड - ब
    3) ब -  ड - अ - क
    4) ड - ब - अ - क
     
    17) रफी अहमद किडवाई यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    1) उत्तर प्रदेशात जमीनदारी पद्धत रद्द करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती.
    2) इंडियन काऊंसिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च संघटनेतर्फे त्यांच्या स्मरणार्थ रफी अहमद किडवाई पुरस्कार दिले जातात.
    3) ते समाजवादी काँग्रेसचे नेते होते.
    4) त्यांनी खिलाफत चळवळीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. 
     
    18) ख्रिस्टिन लगार्डे यांनी कोणत्या पदावर काम केलेले आहे ?
    अ) फ्रान्सच्या पहिल्या महिला अर्थमंत्री 
    ब) इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या प्रमुख
    क) युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    19) युनेस्कोच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये कोणत्या भारतीय नेत्याने काम केलेले आहे ?
    1) सी. सुब्रमण्यम 
    2) स्वर्ण सिंग 
    3) चतुरानन मिश्रा 
    4) डॉ. गुरदियाल सिंग धिल्लाँ 
     
    20) खालील विधाने विचारात घ्या :
    a) सी. सुब्रमण्यम 1990 ते 1993 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. 
    b) सी. सुब्रमण्यम यांना 1998 मध्ये देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    21) ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगची स्थापना करणारे नेते कोण ?
    1) बुटा सिंग
    2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    3) जगजीवन राम
    4) महर्षी वि. रा. शिंदे
     
    22) लोकसभेचे सभापती व केंद्रीय कृषीमत्री या दोन्ही पदावर कार्य केलेली व्यक्ती कोण ?
    a) बलराम जाखर 
    b)  डॉ. गुरदियाल सिंग धिल्लाँ 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    23) 1967 साली लोकसभा निवडणुकीत, मुंबईचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे स. का. पाटील यांना पराभूत केल्याने कोणत्या नेत्याची प्रतिमा जायंट किलर अशी रंगवली गेली ?
    1) आर. बी. भंडारे
    2) आचार्य प्र. के. अत्रे 
    3) जॉर्ज फर्नांडिस 
    4) डॉ. हेमचंद्र गुप्ते
     
    24) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (संस्थापक )       स्तंभ ब (पक्ष)
    अ. अजित सिंग I.    भारतीय जनसंघ 
    ब. राव बिरेंद्र सिंग  II.   शिरोमणी अकाली दल
    क. अटलबिहारी वाजपेयी III.  विशाल हरयाणा पार्टी
    ड. प्रकाश सिंग बादल IV.  राष्ट्रीय लोकदल 
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II I III IV
    (3) III II IV I
    (4) IV III I II
     
    25) जून 1871 मध्ये ब्रिटिशांनी शेतीशी संबंधित कामकाजासाठी कोणत्य खात्याची स्थापना केली ?
    1) डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर
    2) डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अँड अ‍ॅग्रीकल्चर अँड कॉमर्स 
    3) मिनिस्ट्री ऑफ अ‍ॅग्रीकल्चर 
    4) मिनिस्ट्री ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अँड कोऑपरेटिव्हज
     
    26) डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याशी संबंधीत घटनांचा योग्य क्रम लावा. 
    अ) जपानी पद्धतीने भात लावणीचे तंत्र
    ब) दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित 
    क) फूड फॉर मिल्लीयन्स उपक्रम सुरु 
    ड) कर्ज लवाद कायदा पारित करण्यात मोठा वाटा.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ - ब - क - ड
    2) ड - क - अ - ब
    3) ब -  ड - अ - क
    4) ड - ब - अ - क
     
    27) केंद्र सरकारने नेमलेल्या जैन सिंचन आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो. हे जैन कोण होते ?
    1) अशोक जैन 
    2) लक्ष्मीप्रसाद जैन
    3) तखतमल जैन
    4) अजितप्रसाद जैन
     
    28) डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याशी संबंधीत घटनांचा योग्य क्रम लावा. 
    अ) बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सची स्थापना
    ब) बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत 
    क) मिठाच्या सत्याग्रहात सहभागी
    ड) ब्रिटिश भारताच्या अंतरिम सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ - ब - क - ड
    2) क - अ - ड - ब
    3) ब -  ड - अ - क
    4) ड - ब - अ - क
     
    29) खालीलपैकी कोण घटना समितीचे सदस्य नव्हते ?
    1) डॉ. पंजाबराव देशमुख
    2) जयरामदास दौलतराम
    3) कन्हैयालाल मुन्शी
    4) रफी अहमद किडवाई
     
    30) कन्हैयालाल मुन्शी यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
    अ) हैदराबाद संस्थानाचे एजंट जनरल
    ब) उत्तर प्रदेशचे राज्यपाल 
    क) अखंड हिंदुस्तान नावाची चळवळ
    ड) विश्‍व हिंदू परिषदेच्या स्थापनेत सहभाग
    पर्यायी उत्तरे :
    1)  क आणि ड
    2)  अ आणि ड 
    3)  अ, ब आणि क
    4) वरील सर्व
     
    31) भारत - अमेरिका दरम्यान झालेल्या पीएल 480 करारा संदर्भात अचूक विधाने शोधा : 
    अ) 1.6 कोटी टन अमेरिकन गहू आणि 10 लाख टन तांदूळ आयात करण्याचा हा करार होता.
    ब) अमेरिकी अध्यक्ष आयसेनहॉवर व भारताचे पंतप्रधान नेहरु यांच्यातील हा द्विपक्षीय करार होता.
    क) या करारामुळे अन्नधान्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता होती.
    ड) या करारान्वये भारताने रुपयात पैसे मोजावयाचे होते.
    पर्यायी उत्तरे :
    1)  क आणि ड
    2)  अ, क आणि ड 
    3)  अ, ब आणि क
    4) वरील सर्व
     
    32) फोर्ब्स हे जगप्रसिद्ध बिझनेस मॅगझिन कोणाामर्फत चालविले जाते ?
    1) वॉर्नर ब्रदर्स
    2) व्हेल मीडिया इन्व्हेस्टमेंट आणि फोर्ब्स कुटुंबीय 
    3) रॉकफेलर व फोर्ब्स कुटुंबीय
    4) यापैकी नाही
     
    33) बुटा सिंग यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    अ) ते एशियन गेम्स स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष होते. 
    ब) ते उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते. 
    क) ते राष्ट्रीय शेड्युल्ड कास्ट कमिशनचे अध्यक्ष होते.
    ड) त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ आणि क बरोबर
     
    34) खालीलपैकी कोणास हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात ?
    1) सी. सुब्रमण्यम
    2) एम.एस. स्वामीनाथन
    3) बी. सिवारमण व  नॉर्मन बोरलाग 
    4) डॉ. पंजाबराव देशमुख 
     
    35) बलराम जाखर संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    अ) हॉर्टिकल्चर योगदानासाठी त्यांना उद्यान पंडित पुरस्काराने राष्ट्रपतींतर्फे गौरवण्यात आले होते.
    ब) त्यांनी भारत कृषक समाज संस्थेची स्थापना केली.
    क) ते भारत कृषक समाज संस्थेचे आजीवन अध्यक्ष होते.
    ड) त्यांनी युनोच्या आमसभेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    36) दिल्लीचे पहिले / पहिल्या मुख्यमंत्री कोण ?
    1) सुषमा स्वराज 
    2) डॉ. हर्षवर्धन
    3) शीला दिक्षित
    4) चौधरी ब्रह्मप्रकाश 
     
    37) खालील विधाने विचारात घ्या:
    a) प्रकाश सिंग बादल हे कृषिमंत्रिपदी निवड झालेले पहिले बिगरकाँग्रेसी (शिरोमणी अकाली दल) नेते होते.
    b) जनता दल पक्षाचे नेते देवीलाल हे कृषीमंत्रीपदी निवड झालेले पहिले उपपंतप्रधान होते.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
      2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    38) फख्रुदीन अली अहमद यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) राष्ट्रपतीपदी असतानाच त्यांचं निधन झालं.
    ब) ते भारताचे कृषीमंत्री होते.
    क) आणीबाणीच्या निर्णयावर त्यांनी स्वाक्षरी केली होती.
    ड) ते आसाममधल्या बारपेटा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, ब, क आणि ड बरोबर
     
    39) फोर्ब्स मासिकाकडून दरवर्षी कोणत्या याद्या जाहीर केल्या जातात ?
    अ) अमेरिकेतील 100 श्रीमंत व्यक्ती
    ब) जगातील 100 श्रीमंत खेळाडू
    क) 100 शक्तिशाली महिला
    ड) जगातल्या 100 श्रीमंत व्यक्ती
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2) ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    40) ’भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते ?
    1) गाडगे महाराज 
    2) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
    3) पंजाबराव देशमुख
    4) विनोबा भावे
     
    41) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (नेतृत्त्व)      स्तंभ ब (योगदान)
    अ. कन्हैयालाल मुन्शी I.   स्वराज पक्षाचे नेते.
    ब. स. का. पाटील II.  इरिगेशन कमिशनचे अध्यक्ष
    क. अजित प्रसाद जैन III. वन महोत्सव 
    ड. रफी अहमद किडवाई IV. बॉम्बे मिल मजदूर युनियन
    पर्यायी उत्तरे :
    (1) I III II IV
    (2) II IV III I
    (3) III IV II I
    (4) IV III I II
     
    42) खालीलपैकी कोणी 2005 ते 2019 पर्यंत अँजेला मर्केल यांच्या मंत्रिमंडळात काम केले होते ?
    1) थेरेसा मे
    2) ख्रिस्टिन लगार्डे 
    3) मेलिंडा गेटस
    4) अर्सुला व्हॉन देर लेये
     
    43) बिल अँड मेलिंडा गेटस् फाऊंडेशन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) या संस्थेने कोरोनाची लस शोधणार्या भारत बायोटेक कंपनीत गुंतवणूक केली आहे.
    ब) 2020 मध्ये भारत सरकारने या संस्थेच्या विश्‍वस्तांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार दिला.
    क) संतती नियमनापासून मासिक पाळीतल्या स्वच्छतेपर्यंत सगळे विषय या संस्थेकडून हाताळले जातात.
    ड) बिल गेट्स या संस्थेचे प्रमुख आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    44) सप्टेंबर 2020 मध्ये कोणत्या देशाने एलजीबीटीक्यू समुदायाविरोधी धोरण जाहीर केले ?
    1) जर्मनी
    2) स्वीडन
    3) पोलंड 
    4) नॉर्वे
     
    45) खालील विधाने विचारात घ्या:
    a) चतुरानन मिश्रा हे केंद्रीय कृषीमंत्रीपद भूषविणारे पहिले सीपीआय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होत.
    b)  चतुरानन मिश्रा हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्षपादी कार्यरत होते.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही 
    4) दोन्हीही नाहीत 
     
    46) खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानानी कृषिमंत्रिपद आपल्याकडे ठेवले होते ?
    अ) चंद्र शेखर
    ब) अटलबिहारी वाजपेयी 
    क) चरण सिंग
    ड) हरदनहळ्ळी देवेगौडा
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) ब आणि क बरोबर
    4) अ, ब, क आणि ड बरोबर
     
    47) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (नेतृत्त्व) स्तंभ ब (योगदान)
    अ. राजनाथ सिंग I.   सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अ‍ॅग्रीकल्चर अँन्ड अ‍ॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीज
    ब. रफी अहमद किडवाई II.  फार्म्स इन्कम इन्शुरन्स स्कीम 
    क. के. एम. मुन्शी III.  उत्तर प्रदेशात जमीनदारी पद्धत रद्द 
    ड. शरद पवार IV.  वन महोत्सव 
    पर्यायी उत्तरे :
    (1) I II IV III
    (2) II III IV I
    (3) II I III IV
    (4) IV III I II
     
    48) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) ख्रिस्टिन लगार्डे या युरोपियन कमिशनच्या प्रमुख आहेत.
    ब) अर्सुला व्हॉन देर लेयेन युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    49) ‘द मॉमेंट ऑफ लिफ्ट’ हे पुस्त्क कोणी लिहिले आहे ?
    1) गीता गोपीनाथ
    2) कमला हॅरिस 
    3) मेलिंडा गेटस
    4) इंद्रा नुई 
     
    50) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) : 2020 च्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रकाशसिंग बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला.
    कारण (र) : कृषिमंत्रिपदी निवड झालेले ते पहिले बिगरकाँग्रेसी (शिरोमणी अकाली दल) नेते होते. 
    पर्यायी उत्तरे :
    1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    2)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    3)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    4)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    51) ज्येष्ठ संशोधक एम. एस. स्वामीनाथन यांनी खालीलपैकी कोणत्या नेत्याचे वर्णन, हॉर्टिकल्चर क्रांतीचे जनक असे केलेले आहे ?
    1) शरद पवार
    2) प्रकाशसिंग बादल
    3) डॉ. मनमोहन सिंग
    4) चिदंबरम सुब्रमण्यम
     
    52) सर्वाधिक काळ सलग केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी हाताळणारे नेते क़ोण ?
    1) बुटा सिंग
    2) प्रणव मुखर्जी 
    3) शरद पवार
    4) स्वर्ण सिंग
     
    53) खालीलपैकी कोणती संस्था पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केली होती ?
    अ) 1956 - अखिल भारतीय दलित संघ
    ब) 1950 - लोकविद्यापीठ (पुणे)
    क) 1927 - शेतकरी संघ
    ड) 1955 - भारत कृषक समाज 
    इ) 1955 - कृषक सहकारी भारतीय अधिकोश
    फ) 1932 - श्री शिवाजी शिक्षण संस्था
    ग) 1926 - श्रद्धानंद छात्रालय 
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3)  ब आणि फ वगळता सर्व  
    4) ड, फ, ग वगळता सर्व
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (63)
    1-3
     
    2-4
     
    3-1
     
    4-3
     
    5-4
     
    6-3
     
    7-3
     
    8-3
     
    9-3
     
    10-4
     
    11-2
     
    12-3
     
    13-4
     
    14-4
     
    15-4
     
    16-4
     
    17-3
     
    18-4
     
    19-2
     
    20-3
     
    21-3
     
    22-3
     
    23-3
     
    24-4
     
    25-2
     
    26-2
     
    27-4
     
    28-1
     
    29-4
     
    30-4
     
    31-2
     
    32-2
     
    33-4
     
    34-4
     
    35-1
     
    36-4
     
    37-3
     
    38-4
     
    39-4
     
    40-3
     
    41-3
     
    42-4
     
    43-1
     
    44-3
     
    45-3
     
    46-3
     
    47-2
     
    48-3
     
    49-3
     
    50-1
     
    51-1
     
    52-4
     
    53-1

Share this story

Total Shares : 0 Total Views : 1137