पुरस्कार / प्रश्‍नमंजुषा (58)

  •  पुरस्कार / प्रश्‍नमंजुषा (58)

    पुरस्कार / प्रश्‍नमंजुषा (58)

    • 16 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 234 Views
    • 0 Shares

    टाइम पर्सन ऑफ द इअर 2020

            टाइम मॅग्झिनने पर्सन ऑफ द इयर 2020 म्हणून अमेरिकी राजकारणातील परिवर्तनाबद्दल नवनिर्वाचित 78 वर्षीय राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व  56 वर्षीय उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची निवड केली. जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना 2020 च्या निवडणुकीत हरवलं, तर कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी बसलेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. बायडन यांना 306 इलेक्टोरल व्होट्स तर ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल व्होट्स प्राप्त झाले होते. यंदा पर्सन ऑफ द इयरच्या शर्यतीत अमेरिकी फिजिशियन डॉक्टर अँथनी फौसी, रेसियल जस्टिस मूव्हमेंट व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील होेते.  
    • बिझनेस पर्सन ऑफ द इयर म्हणून व्हिडिओ चॅट अ‍ॅप झूमचे सीईओ एरिक युआन यांची निवड झाली. मनोरंजन क्षेत्रासाठी कोरियन बॉय बँड बीटीएसचा गौरव झाला. अ‍ॅथलिट म्हणून लेब्रॉन जेम्सची निवड झाली.

    •• 2016 मध्ये टाइम मॅगझीनने डोनाल्ड ट्रम्प यांची निवड टाइम पर्सन ऑफ द इअर साठी केली होती.
    •• 1927 पासून टाइम मॅग्झिन पर्सन ऑफ द इयरची निवड करते. 
    •• 1998 मध्ये त्यासाठी पहिल्यांदा ऑनलाइन पोलिंग सुरू झाले.

    1) पर्सन ऑफ द इयर : ज्यो बायडेन-कमला हॅरिस
    2) बिझनेस पर्सन ऑफ द इयर : एरिक युआन 
    3) एंटरटेनर ऑफ द अयर : कोरियन बॉय बँड बीटीएस
    4) अ‍ॅथलिट ऑफ द इयर : लेब्रॉन जेम्स

    •• टाइमचे मुख्य संपादक एडवर्ड फेल्सेंथल - बायडेन व हॅरिस यांनी अमेरिकेचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. लोकांमध्ये फूट निर्माण करण्याऐवजी त्यांच्याबद्दल सहवेदना दाखवण्यात जास्त शक्ती असते हेच या द्वयीने दाखवून दिले. दोघांनीही दु:खात बुडालेल्या जगाच्या जखमांवर मलम लावण्याची दृष्टी दिली. 
     
    टाइम डिसेंबर 2020 मुखपृष्ठ : रेड क्रॉस
            टाइम नियतकालिकाने डिसेंबर 2020 च्या मुखपृष्ठावर एखाद्या मोठ्या हस्तीच्या छायाचित्राऐवजी 2020 वर रेड क्रॉस ‘एक्स’ असे दर्शवले. त्याखाली वर्स्ट इयर ऑफ द एव्हर - म्हणजेच सार्वकालिक वाईट वर्ष. 93 वर्षांचा इतिहास असलेल्या या नियतकालिकात असे करण्याची ही पाचवी वेळ आहे. 
    1) 1945 मध्ये पहिल्यांदा जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या मृत्यूला अशाच प्रकारे मांडण्यात आले होते. 
    2) 2003 इराक युद्धाची सुरुवात झाल्यानंतरदेखील रेड क्रॉसचा प्रयोग झाला होता. 
    3) 2006 मध्ये अमेरिकी सैन्याने इराकमध्ये अल-कायदा दहशतवादी अबू मौसम अल जरकावीची हत्या केल्या नंतर तिसर्‍यांदा रेड क्रॉसचा वापर केला होता. 
    4) 2011 मध्ये चौथ्यांदा ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्यावर रेड क्रॉसचा मुखपृष्ठावर वापर झाला होता.
     
    फोर्ब्स पॉवर लिस्ट 2020
            8 डिसेंबर 2020 - फोर्ब्सने दरवर्षीप्रमाणे जगातील सर्वांत सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर केली. फोर्ब्सच्या 17 व्या वार्षिक ’फोर्ब्स पॉवर लिस्ट’मध्ये 30 देशांतील महिलांचा समावेश आहे. या यादीत जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावरील स्थान टिकवून आहेत. त्यांच्याशिवाय या यादीत अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार-शॉ तसेच एचसीएल एन्टरप्रायझेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडार-मल्होत्रा यांचा समावेश आहे.
    1) जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना सर्वांत पहिलं स्थान
    2) न्यूझीलंडच्या जेसिंडा आर्डन या यादीत दुसर्‍या स्थानावर 
    3) अमेरिकेच्या नवीन उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना तिसरं स्थान 
    4) भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 41 वे स्थान 
    5) एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा या 55 व्या स्थानावर
    6) किरण मजूमदार शॉ या 68 व्या स्थानावर 
    7) लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी या 98 व्या स्थानावर 

    •• फोर्ब्सच्या या यादीत 10 देशांतील प्रमुख महिला, 38 मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोरंजन क्षेत्राशी निगडीत 5 महिलांचा समावेश आहे. या महिलांनी 2020 मध्ये वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करताना मिळालेल्या व्यासपीठाचा तसेच संधीचा वापर योग्यरित्या केला आहे.
    •• या यादीत 10 महिला राष्ट्रप्रमुख आहेत. कोविड-19 समस्या हाताळताना त्यांनी आखलेली धोरणे आणि अंमलबजावणीतली करुणा - सहानुभूती जगभरात वेगळी ठरली. या यादीत असलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन, नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी ‘पॅण्डेमिक पॉलिटिक्स’ची व्याख्याच बदलून टाकली. जगभरातील नेतृत्व महामारीच्या काळात देशांतर्गत जनतेच्या असंतोषाचा कमी-अधिक सामना करत असताना या महिलांनी थेट जनतेला समोर गेल्या आणि त्यांनी समाजोपयोगी राजकारणाची नवी परिभाषा मांडली.
    •• या यादीत भारतीय उपखंडातल्या 4 महिला आहेत - अर्थमंत्री निर्मला सीतारामन, एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ आणि कार्यकारी संचालक रोशनी नाडर-मल्होत्रा, बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझमदार - शॉ आणि  बांग्लादेशच्या नेत्या शेख हसिना वाजेद. 

    •• एन्जेला मार्केला - या युरोपातील एक प्रमुख नेत्या आहेत. जर्मनीसारख्या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून त्या एका मोठ्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व यशस्वीपणे करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करुन जर्मनीमध्ये 10 लाख निर्वासितांना राहण्याची परवानगी देणार्‍या मार्केल या एक खंबीर नेतृत्व आहेत. 

    एशियन ऑफ दी इयर 2020
            4 डिसेंबर 2020 - जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून दिल्या जाणार्‍या ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    •• कोरोनावरील लशीसाठी ‘सीरम’ने’ ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश औषध कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्याशी करार करुन त्यांच्या सहकार्याने ‘कोव्हिशिल्ड’ नावाने लस विकसित केली. डिसेंबर 2020 मध्ये या लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरु झाली होती. 

    ‘एशियन ऑफ दी इयर 2020’ पुरस्काराचे मानकरी -
    1) भारताचे अदर पुनावाला 
    2) चीनचे मेजर जनरल चेन वेई
    3) जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा 
    4) सिंगापूरचे प्रा. ओई एंग इओंग 
    5) दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन  
    6) चिनी संशोधक झँग योंगझेन - त्यांनी ‘सार्स - सीओव्ही-2’ या विषाणूचा जिनोम सर्वप्रथम शोधून काढून त्याची माहिती ऑनलाइन प्रसिद्ध केली.
    •• वरील सर्वांनी लस निर्मितीत उल्लेखनीय काम केले असून या सर्वांचा एकत्रित उल्लेख ‘व्हायरस बस्टर्स’ असा करण्यात आला.
     
    आशियाई कुबेर
            ब्लूमबर्गच्या यादीनुसार आशियातील 20 श्रीमंत कुटुंबांकडे सुमारे 34.26 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात 3 भारतीय कुटुंबे आहेत. या 20 कुटंबांच्या संपत्तीत वर्षभरात 74 हजार कोटी रुपयाची वाढ झाली.
    1) प्रथम क्रमांकावर मुकेश अंबानी कुटुंब - संपत्ती - 5.62 लाख कोटी रुपये. 2019 मध्येही पहिल्याच क्रमांकावर संपती- 3.73 लाख कोटी रुपये. कोरोनाच्या उद्रेकातही अंबानी यांच्या संपत्तीत 1.85 लाख कोटी रुपयाची वाढ झाली.
    2) क्वॉक कुटुंब, हाँगकाँग- संपत्ति - 2.44 लाख कोटी रुपये
    3) चेरावेनाँट कुटुंब, थायलंड - संपत्ति - 2.35 लाख कोटी रुपयेव्
    4) 8 व्या स्थानी शापूरजी पालनजी मिस्त्री कुटुंब - त्यांची संपत्ती 1.63 लाख कोटी रुपये
    5) 16 व्या स्थानी हिंदुजा कुटुंब -  संपत्ती सुमारे 1.12 लाख कोटी रुपये
    प्रश्‍नमंजुषा (58)
     
    1) जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
    1) त्या फोर्ब्सच्या 17 व्या वार्षिक ’फोर्ब्स पॉवर लिस्ट’मध्ये  पहिल्या क्रमांकावर आहेत. 
    2) त्यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्वासिताबाबत धोरणांना विरोध होता.
    3) त्या गेली 10 वर्षे जर्मनीच्या चान्सलरपदी आहेत
    4) त्यांनी जर्मनीमध्ये 10 लाख निर्वासितांना राहण्याची परवानगी दिली.
     
    2) खालीपैकी कोणाचा उल्लेख ‘व्हायरस बस्टर्स’ असा केला जातो ?
    अ) ‘सार्स - सीओव्ही-2’ या विषाणूचा शोध लावणारे शास्त्रज्ञ
    ब)  कोव्हिड लस निर्मितीत उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्ती
    क) ‘पॅण्डेमिक पॉलिटिक्स’ची व्याख्या बदलणारे नेतृत्त्व
    ड) ‘एशियन ऑफ दी इयर 2020’ पुरस्काराचे मानकरी
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2) ब, क आणि ड बरोबर
    3) ब आणि ड बरोबर
    4) अ, क आणि ड बरोबर
     
    3) अदर पुनावाला यांच्या संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) ते ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
    ब) त्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ नावाने लशीच शोध लावला
    क) त्यांना ‘एशियन ऑफ दी इयर 2020’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    4) ‘एशियन ऑफ दी इयर 2020’ पुरस्काराचे मानकरी बाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (देश) स्तंभ ब (व्यक्ती)
    अ. चीन I.      मेजर जनरल चेन वेई
    ब. दक्षिण कोरिया II.     सिओ जुंग जिन 
    क. सिंगापूर II.     प्रा. ओई एंग इओंग 
    ड. जपानचे IV.     डॉ. रुईची मोरिशिटा 
    पर्यायी उत्तरे :
    1) II III IV I
    2) II I III IV
    3) I II III II
    4) IV III I II
     
    5) जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी कोठे आहे ?
    1) अहमदाबाद
    2) हैद्राबाद
    3) बंगळुरु
    4) पुणे
     
    6) ‘पॅण्डेमिक पॉलिटिक्स’ची व्याख्या बदलणारे प्रभावी नेतृत्त्व ओळखा :
    अ) अमेरिकेच्या नवीन उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस 
    ब) न्यूझीलंडच्या जेसिंडा आर्डन 
    क) तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन
    ड) जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा  
    इ) नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग 
    फ) जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल
    ग) चिनी संशोधक झँग योंगझेन
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त ब, क आणि इ
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) अ, ब आणि ग वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व
     
    7) खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
    1) 2016 मध्ये टाइम मॅगझीनने डोनाल्ड ट्रम्प यांची निवड टाइम पर्सन ऑफ द इअर साठी केली होती.
    2) 2008 मध्ये टाइम पर्सन ऑफ द इअर साठी पहिल्यांदा ऑनलाइन पोलिंग सुरू झाले.
    3) 2020 च्या टाइम पर्सन ऑफ द इअर साठी अमेरिकी फिजिशियन डॉक्टर अँथनी फौसी, रेसियल जस्टिस मूव्हमेंट व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शर्यतीत होते
    4) 1927 पासून टाइम मॅग्झिन पर्सन ऑफ द इयरची निवड करते. 
     
    8) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (व्यक्ती)               स्तंभ ब ( कंपनी)
    अ. रोशनी नाडार-मल्होत्रा    I.     एचसीएल
    ब. किरण मजूमदार शॉ       II.    बायोकॉन
    क. रेणुका जगतीयानी       III.    लँडमार्क समूह
    ड. हिना नागराजन        IV.     युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड
    पर्यायी उत्तरे :
          अ
    1)  II III I IV
    2) I IV III II
    3) IV III II I
    4) I II III I  V
     
    9) ’सार्स - सीओव्ही-2’ या विषाणूचा जिनोम सर्वप्रथम शोधून काढला ?
    1) सिंगापूरचे संशोधक प्रा. ओई एंग इओंग 
    2) दक्षिण कोरियाचे सिओ जुंग जिन  
    3) चिनी संशोधक झँग योंगझेन
    4) जपानचे संशोधक डॉ. रुईची मोरिशिटा 
     
    10) योग्य वर्ष व घटना ओळखा :
    अ) 2001 : इराक युद्धाची सुरुवात
    ब) 2006 :  अल-कायदा दहशतवादी अबू मौसम अल जरकावीची हत्या
    क) 2011 : ओसामा बिन लादेन ठार
    ड) 2020 :  जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतली. 
    इ) 1945  : अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या मृत्यू
      पर्यायी उत्तरे :

    1) विधाने अ, ब आणि क बरोबर

    2) विधाने ब, क आणि इ बरोबर
    3) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
    4) वरील सर्व बरोबर
     
    11) ‘कोव्हिशिल्ड’ लस विकसित करण्यात कोणत्या कंपनीचे योगदान नाही ? 
    1) अ‍ॅस्ट्राझेनेका
    2) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
    3) ऑक्सफर्ड विद्यापीठ 
    4) बायोकॉन
     
    12) खालील जोड्या अचूक जुळवा :
         स्तंभ अ (व्यक्ती) स्तंभ ब ( टाइमचा बहुमान 2020)

    अ. ज्यो बायडेन-कमला हॅरिस I.      पर्सन ऑफ द इयर 

    ब. एरिक युआन II.     अ‍ॅथलिट ऑफ द इयर 
    क. लेब्रॉन जेम्स III.    एंटरटेनर ऑफ द अयर 
    ड. कोरियन बॉय बँड बीटीएस IV.    बिझनेस पर्सन ऑफ द इयर 
      पर्यायी उत्तरे :
           अ ब    
    1) II III I IV
    2) I IV III II
    3) I III I    V II
    4) II III I    V I
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (58)
    1-3
     
    2-3
     
    3-3
     
    4-3
     
    5-4
     
    6-1
     
    7-2
     
    8-4
     
    9-3
     
    10-2
     
    11-4
     
    12-3

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 234