हिंदी भाषा / प्रश्नमंजुषा (56)

  • हिंदी भाषा / प्रश्नमंजुषा (56)

    हिंदी भाषा / प्रश्नमंजुषा (56)

    • 16 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 229 Views
    • 0 Shares

    हिंदी जगातील तिसर्‍या क्रमांकाची भाषा

            12 डिसेंबर 2020 - ‘इथनोलॉग’2020 अहवालानुसार जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये हिंदी तिसर्‍या क्रमांकावर आहे. जगभरात 63.7 कोटी लोक हिंदी बोलतात. 10 भाषांच्या या यादीत बंगाली भाषा 7 व्या स्थानावर आहे.

    • ‘इथनोलॉग’ अहवाल 2020 -
     1) जगभरात 7,117 भाषा बोलल्या जातात. 
    2) भारतात 456 भाषा बोलल्या जातात. 
    3) 23 भाषेत जगातील निम्मी लोकसंख्या बोलते.
    4) ‘नेटिव्ह’ (स्थानिक) आणि ‘नॉन नेटिव्ह स्पीकर’ म्हणून पाहिल्यास इंग्रजी ही सर्वात मोठी भाषा आहे. 
    5) नेटिव्ह भाषेच्या रूपात पाहिल्यास चीनची मेंडरिन पहिल्या क्रमांकावर आहे. 
    6) नेटिव्ह भाषांमध्ये हिंदी चौथ्या स्थानावर आहे. 
    7) जगातील सर्वाधिक लोकांकडून बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये हिंदी तिसर्‍या क्रमांकावर आहे.
    8) जगभरातील 2,926 भाषांचे अस्तित्व धोक्यात आहे. 

    •• ‘इथनोलॉग’2020 नुसार जागतिक भाषांचा क्रम-
     1) इंग्रजी 126.8 कोटी 
    2) मेंडरिन 112 कोटी
    3) हिंदी 63.7 कोटी 
    4) स्पॅनिश 53.8 कोटी 
    5) फ्रेंच 27.7 कोटी
    7) बंगाली 26.5 कोटी

    •• ‘इथनोलॉग’2020 नुसार जगातील भाषांची संख्या -
     1) आशिया 2,294
    2) आफ्रिका 2,144
    3) पॅसेफिक क्षेत्र 1,313 
    4) अमेरिका 1,061 

    •• ‘इथनोलॉग’2020 नुसार भारतीय भाषांचा क्रम-
     1) हिंदी 63.7 कोटी 
    2) बंगाली 26.5 कोटी
    3) मराठी 9.5 कोटी
    4) तेलगू 9.3 कोटी
    5) तामिळ 8.4 कोटी
    6) पंजाबी 8.3 कोटी 

    प्रश्नमंजुषा (56)
     1) ‘इथनोलॉग’ अहवाल 2020 नुसार जगातील जास्त संखेने बोलल्या जाणार्‍या भाषांचा योग्य चढता क्रम लावा. 
    अ) फ्रेंच
    ब) इंग्रजी 
    क) मेंडरिन
    ड) हिंदी 
    इ) स्पॅनिश 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ - ब - क - ड - इ
    2)  अ -  इ -  ड -  क - ब
    3) ब -  क -ड - अ - इ
    4) इ - ड - ब - अ - क
     
    2) जगात सर्वाधिक भाषा कोणत्या खंडात बोलल्या जातात ?
    1) आशिया 
    2) आफ्रिका 
    3) युरोप
    4) अमेरिका 
     
    3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये हिंदी तिसर्‍या क्रमांकावर आहे.
    ब) जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये बंगाली भाषा 7 व्या स्थानावर आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    4) ‘इथनोलॉग’ अहवाल 2020 नुसार भारता जास्त संखेने बोलल्या जाणार्‍या भाषांचा योग्य उतरता  क्रम लावा. 
    अ) बंगाली
    ब) मराठी
    क) तेलगु
    ड) हिंदी 
    इ) तामिळ
    पर्यायी उत्तरे :
    1) अ - ब - क - ड - इ
    2) अ - इ- ड - क - ब
    3) ब - क -ड - अ - इ
    4) इ - क - ब - अ - ड
     
    5) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या नेटिव्ह भाषेत चीनची मेंडरिन पहिल्या क्रमांकावर आहे. 
    ब) जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या नेटिव्ह भाषेत हिंदी तिसर्‍या क्रमांकावर आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (56)
    1-2
     
    2-1
     
    3-3
     
    4-4
     
    5-1

Share this story

Total Shares : 0 Total Views : 229