मानवी हक्क : प्रश्नपुस्तिका (5)

  • मानवी हक्क : प्रश्नपुस्तिका (5)

    मानवी हक्क : प्रश्नपुस्तिका (5)

    • 09 Apr 2021
    • Posted By : vaishali
    • 1525 Views
    • 1 Shares

     मानवी हक्क : प्रश्नपुस्तिका (5)


    1) संविधानाच्या तिसर्या भागात कशाबद्दल तरतुदी आहेत?
    a) मूलभूत हक्क
    b) मूलभूत कर्तव्य
    c) राज्य धोरणाची निदेशक तत्त्वे
    d) नागरिकत्व
    पर्यायी उत्तरे : 
    1) फक्त
    2) (a) व (c)
    3) यापैकी काहीही नाही
    4) केवळ (a)

    2) भारतीय नागरिकांच्या ...... अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.
    1) समतेचा 
    2) स्वातंत्र्याचा 
    3) धर्माचा 
    4) संपत्तीचा

    3) ‘कायद्यापुढील समानता‘ (Equality before Law) हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत? 
    a)  भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत.
    b)  संसद सदस्य आणि राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधीमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही. 
    c)  परदेशी दूत आणि राजनीतीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत.
    d) अनुच्छेद 31-C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे.
    पर्यायी उत्तरे : 
    1) (a), (b) आणि (c)
    2) (b), (c) आणि (d)
    3) (a), (b), (c) आणि (d)
    4) (a), (b) आणि (d)

    4) भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे ती कलमे कोणती?
    1) कलम 13 ते 17
    2) कलम 14 ते 18
    3) कलम 15 ते 19
    4) कलम 16 ते 20

    5) खालील जोड्या लावा :
    अ) कलम 14 I) शोषणविरुद्धचा अधिकार 
    ब) कलम 21 A II) पदव्यांची समाप्ती
    क) कलम 23 III) कायद्यासमोर समानता
    ड) कलम 18 IV) 6 ते 14 वर्षाच्या सर्व मुलामुलींना मोफत व अनिवार्य शिक्षण
    पर्यायी उत्तरे : 
    1) IV    II I III
    2) III     IV      I      II
    3) I II       III IV
    4) II      III      IV I

    6) मूलभूत हक्कांबाबत खालील जोड्या जुळवा :
    अ (कलम क्र.)                                                             ब (हक्क)
    अ) कलम-14 I) धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य
    ब) कलम-21 II) जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षण
    क) कलम-23 III) कायद्यासमोर समता
    ड) कलम-26 IV) मानवी व्यापारास प्रतिबंध
    पर्यायी उत्तरे : 
    (a) (b) (c) (d)
    1) I II III    IV
    2) III II      IV    I
    3) II I IV III
    4) IV III I II

    7) संविधानाच्या अनुच्छेद 16 नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्तिंच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असली तरी या अनुच्छेदातील कोणत्या खंडाद्वारे कोणत्याही मागासवर्गाकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्याची तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध नाही ?
    1) खंड 2
    2) खंड 3
    3) खंड 4
    4) खंड 5

    8) मूलभूत अधिकार अनुच्छेद 18 नुसार
    a) भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून किताब स्वीकारणार नाही.
    b) सेवाविषयक व विद्याविषयक असलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही.
    वरील वाक्यांसाठी खालील पर्याय निवडा :
    1) दोन्ही वाक्ये चुकीची आहेत.
    2) दोन्ही वाक्ये बरोबर आहेत.
    3) केवळ पहिले वाक्य बरोबर आहे.
    4) केवळ दुसरे वाक्य बरोबर आहे.

    9) भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य हे :
    1) विशेषत्वाने राज्यघटनेच्या कलम 19 (1) (a) यामध्ये दिलेले आहे.
    2) राज्यघटनेच्या कलम 19 (1) (a) अन्वये व्यापक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीतून सूचित होते.
    3) राज्यघटनेच्या कलम 361 (A) मधील तरतूद अन्वये हमी देण्यात आली आहे.
    4) देशातील कायद्याच्या अधिराज्याच्या (Rule of Law) अंमलातून निर्माण होते.

    10) आणीबाणीच्या काळात संविधानाचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद स्थगित करता येत नाही?
    1) अनुच्छेद 14
    2) अनुच्छेद 20
    3) अनुच्छेद 16
    4) अनुच्छेद 19

    11) कोणत्याही आरोपीस स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती करण्यास मनाई संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे?
    a) कलम 17
    b) कलम 20
    c) कलम 22 
    d) यापैकी नाही
    पर्यायी उत्तरे :
    1) (b)
    2) (c)
    3) (a) व (b)
    4) (d)
     
    12) कोणताही पेशा आचारण्याकरिता तंत्रविषयक अर्हता ठरविण्यास राज्यास निर्बंध असणार नाही याबाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?
    a) कमल 17
    b) कलम 18
    c) (a) व (b)
    d) यापैकी नाही
    पर्यायी उत्तरे : 
    1) (a) 
    2) (b)
    3) (c)
    4) (d)

    13) प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद कोणत्या कलमात आहे?
    a) कलम 21
    b) कलम 18
    c) कलम 19 
    d) यापैकी काहीही नाही
    पर्यायी उत्तरे : 
    1) (a)
    2) (b) व (c)
    3) (c)
    4) (d)

    14) भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे ?
    1) कलम 21-सी
    2) कलम 21-ए
    3) कलम 51-ए
    4) कलम 25-सी

    15) ’जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा’ अधिकार (अनुच्छेद-21) हा ......
    1) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात.
    2) सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात.
    3) सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्व मंजुरीने राष्ट्रपती केव्हाही निलंबित करू शकतात.
    4) कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही.

    16) मूलभूत हक्क अनुच्छेद .......... नुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना कायद्याने ठरविल्यानुसार शिक्षण देण्यात येते.
    1) अनुच्छेद 21 अ
    2) अनुच्छेद 22 क
    3) अनुच्छेद 21
    4) अनुच्छेद 22

    17) जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या (अनुच्छेद-21) अधिकाराच्या व्याप्तीमध्ये ...... यांचा समावेश होतो.
    अ) चांगल्या पर्यावरणाचा अधिकार
    ब) कामाचा अधिकार
    क) खाजगी-एकांततेचा अधिकार
    ड) चांगल्या आरोग्याचा अधिकार
    पर्यायी उत्तरे : 
    1) (अ), (ब), (क)
    2) (अ), (क), (इ)
    3) (ब), (क), (ड)
    4) (ब), (ड), (इ)

    18) घटनेच्या कलम 22 अंतर्गत, काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते?
    1) 2 महिने 
      2) 3 महिने 
    3) 4 महिने
    4) 6 महिने  

    19) धोकादायक व्यवसायात 14 वर्षाखालील बाल कामगारास प्रतिबंध करणारे राज्यघटनेतील कलम कोणते?
    1) कलम 24
    2) कलम 15 (3) 
    3) कलम 45
    4) कलम 51 

    20) परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क व त्या संदर्भातील राज्यघटनेतील कलम यांच्या जोड्या जुळवा :
    अ (मूलभूत हक्क)                      ब (कलम
    a)  कायद्यासमोर समानता (i) कलम 28
    b) जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण (ii) कलम 14
    c) धार्मिक स्वातंत्र्य (iii) कलम 25
    d) शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण (iv) कलम 21
    पर्यायी उत्तरे : 
    (a) (b) (c) (d)
    1) (i) (ii) (iii) (iv)
    2) (ii) (iv) (iii) (i)
    3) (iii) (i) (iv) (ii)
    4) (iv) (ii) (i) (iii)

    21) राज्याकडून चालविल्या जाणार्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवल धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही, असे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे?
    1) 26
    2) 29
    3) 28
    4) 27

    22) मूलभूत हक्क अनुच्छेद 29 नुसार -
    a) भारतातील कोणत्याही नागरिकास आपली भाषा, लिपी वा संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे.
    b) सार्वजनिक प्रयोजनाकरिता सेवा करावयास लावताना केवळ धर्म, वंश, जात वा वर्ग या कारणावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
    वरील वाक्यांसाठी पुढील पर्याय निवडा.
    1) वरील दोन्ही वाक्ये अनुच्छेद क्र. 29 शी संबंधित आहेत.
    2) वरील केवळ पहिले वाक्य अनुच्छेद क्र. 29 शी संबंधित आहे.
    3) वरील दोन्ही वाक्ये अनुच्छेद क्र. 29 शी संबंधित नाहीत.
    4) वरील सर्व पर्याय चुकीचे आहेत.

    23) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 32 नुसार मूलभूत अधिकारांचा भंग झाल्यास कुठे दाद मागता येते?
    1) उच्च न्यायालय
    2) सर्वोच्च न्यायालय
    3) जिल्हा न्यायालय
    4) ग्रामीण न्यायालय

    24) शिक्षणाचा अधिकार : सकारात्मक अधिकार :: भाषणस्वातंत्र्य : ?
    1) घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार
    2) माहितीचा अधिकार
    3) मानव अधिकार
    4) नकारात्मक अधिकार

    25) शासकीय कर्मचार्यांच्या संघटनेच्या ‘संघटना नियमांना‘ कोणाच्या मान्यतेची आवश्यकता असते ?
    1) संबंधित प्राधिकरण
    2) उच्च न्यायालय
    3) संबंधित विभाग
    4) शासन

    26) मूलभूत अधिकारातील ‘खाजगीपणाचा अधिकार‘ कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे ?
    1) जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार
    2) समानतेचा अधिकार
    3) शोषणाविरुद्धचा अधिकार
    4) धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार

    27) काही अधिकार सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असतात परंतु काही अधिकार हे फक्त नागरिकांसाठी असतात. ते अधिकार कोणते आहेत ?
    a) कायद्यासमोर समानता
    b) शासकीय नोकरीमध्ये संधीची समानता
    c) जीविताचे संरक्षण व वैयक्तिक स्वातंत्र्य
    d) भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य
    पर्यायी उत्तरे : 
    1) फक्त (a), (b), (c)
    2) फक्त (b), (c), (d)
    3) फक्त (a), (c)
    4) फक्त (b), (d)

    28) मूळ घटनेत ‘संपत्तीचा अधिकार‘ मूलभूत अधिकार होता.  कोणत्या वर्षी कोणत्या घटनादुरुस्तीने हा अधिकार मूलभूत अधिकाराच्या प्रकरणातून वगळण्यात आला ?
    1) 1971, 25 वी घटनादुरुस्ती
    2) 1976, 42 वी घटनादुरुस्ती
     3) 1978, 44 वी घटनादुरुस्ती
    4) 1993, 74 वी घटनादुरुस्ती

    29) भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. गणपती उत्सव आणि मोहरम एकदम आले आहेत. प्रशासनाने गणपती उत्सव मंडळे आणि मोहरम ताबूत मंडळे या दोन्हीवर बंधने घातली. ही कृती
    अ) धार्मिक स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे.  
    ब) घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारी आहे. 
    क) सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि स्वास्थ्य रक्षणाकरिता घटनेने शासनाला बंधने घालण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची कृती बरोबर आहे. 
    वरील कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त ब
    2) फक्त क  
    3) फक्त अ आणि क 
    4) फक्त अ आणि ब

    30) भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत? अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा.
    a) मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात.
    b) मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकते.
    c) संसद दोन तृतीयांश बहुमताने (जे संपूर्ण सभासद संख्येच्या अर्ध्या पेक्षा जास्त असेल), घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकतो.
    d) सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचे अधिकार संसद देऊ शकते.
    पर्यायी उत्तरे : 
    1) (a), (b), (c)
    2) (a), (b), (d)
    3) (a), (c), (d)
    4) (b), (c), (d)

    उत्तरे 

    1-4

    2-1

    3-4

    4-2

    5-2

    6-2

    7-3

    8-3

    9-2

    10-2

    11-1

    12-4

    13-4

    14-2

    15-4

    16-1

    17-2

    18-4

    19-1

    20-2

    21-2

    22-2

    23-2

    24-1

    25-4

    26-1
    27-4
    28-3
    29-2
    30-2

Share this story

Total Shares : 1 Total Views : 1525