महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल प्रश्नपुस्तिका (5)
- 26 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 517 Views
- 0 Shares
महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल प्रश्नपुस्तिका (5)
1) रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते ?
1) दख्खनचा पठारी प्रदेश
2) कोकणातील डोंगराळ प्रदेश
3) कोकण किनार पट्टीची चिंचोळी मैदाने
4) भामरागडचा डोंगरी प्रदेश
2) लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?
1) काळी मृदा
2) गाळाची मृदा
3) जांभी मृदा
4) पिवळसर मृदा
3) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन-चतुर्थांश भागात ......... मृदा आढळते.
1) गाळाची मृदा
2) रेगूर मृदा
3) वन मृदा
4) जांभी मृदा
4) काळी मृदा सुपीक असते, कारण -
अ) ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त
ब) चुन्याचे प्रमाण अधिक
क) चिकण मातीचे प्रमाण जास्त
ड) पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ब
2) फक्त ब आणि क
3) फक्त अ, ब आणि क
4) अ, ब, क आणि ड
5) कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते ?
1) गाळाची मृदा
2) रेगूर मृदा
3) तांबडी मृदा
4) काळी मृदा
6) तांबड्या मृदेसंदर्भातील विधाने पहा :
अ) ह्यूमसचे प्रमाण जास्त असते.
ब) सेंद्रीय द्रव्याचे प्रमाण कमी असते.
क) अॅल्युमिनियम ऑक्साइडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो.
पर्यायी उत्तरे :
1) विधान अ आणि ब बरोबर आहेत.
2) विधान ब आणि क बरोबर आहेत.
3) विधान अ आणि ब बरोबर नाहीत.
4) विधान अ आणि क बरोबर नाहीत.
7) महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे ?
1) 35%
2) 80%
3) 40%
4) 60%
8) महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे?
1) वनक्षेत्र
2) ओसाड जमीन
3) मशागत योग्य पडीक जमीन
4) कायम कुरणे
9) महाराष्ट्रातील पिकांचा त्यांच्या 2011-12 मधील लागवडी खालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा :
a) कापूस
b) ऊस
c) ज्वारी
d) गहू
e) तांदूळ
पर्यायी उत्तरे :
1) (c),(a),(b),(d),(e)
2) (a),(c),(e),(b),(d)
3) (a),(e),(c),(d),(b)
4) (e),(c),(d),(a),(b)
10) महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे?
1) पश्चिम महाराष्ट्र
2) विदर्भ आणि मराठवाडा
3) कोकण
4) उत्तर महाराष्ट्र
11) महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात ?
1) ईशान्य भागात
2) पश्चिम भागात
3) आग्नेय भागात
4) मध्य भागात
12) हापूस आंब्याची झाडे ...... जिल्ह्यात आढळतात.
1) सिंधुदुर्ग
2) रत्नागिरी
3) रायगड
4) वरील सर्व जिल्ह्यात
13) खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणते?
a) महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन रायगड जिल्ह्यात होते.
b) कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गहू पिकविला जात नाही.
c) भारतात सर्वात जास्त केळी उत्पादन महाराष्ट्रात होते.
d) महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात कमी क्षेत्र अकोला-वाशिम जिल्ह्यात आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (d) फक्त
3) (a), (b) आणि (c)
4) (b), (c) आणि (d)
14) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
1) सिंधुदुर्ग
2) कणकवली
3) राजेवाडी
4) वसई
15) कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता ?
1) यवतमाळ
2) अमरावती
3) पुणे
4) जळगाव
16) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे ?
1) लोणंद
2) पाडेगाव
3) शेखमिरेवाडी
4) कागल
17) जोड्या लावा
यादी-I (पिके) यादी-II (प्रमुख सुधारित जाती)
a) गहू i) सुवर्णा
b) ज्वारी ii) बन्सी
c) तांदूळ iii) लक्ष्मी
d) कापूस iv) चिनोर
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (ii) (iii) (iv)
2) (ii) (iv) (iii) (i)
3) (ii) (i) (iv) (iii)
4) (iii) (ii) (i) (iv)
18) जोड्या लावा :
पीक प्रमुख जात
a) टोमॅटो i) कोकण तारा
b) वांगी ii) कालीकत
c) आले iii) मांजरी गोटा
d) कारले iv) धनश्री
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (ii) (iii) (iv)
2) (iv) (iii) (ii) (i)
3) (i) (iv) (iii) (ii)
4) (iv) (i) (ii) (iii)
19) पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
a) रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्ने येथे आहे.
b) दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a) योग्य आहे
2) केवळ (b) योग्य आहे
3) (a) व (b) दोन्ही योग्य आहेत.
4) (a) व (b) दोन्ही योग्य नाहीत
20) जोड्या लावा :
पीक जात
a) ज्वारी i) कैलास
b) बाजरी ii) श्रद्धा
c) गहू iii) टेकुरपेटा
d) हळद iv) निळवा
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (iv) (ii) (i) (iii)
2) (ii) (iii) (iv) (i)
3) (iv) (i) (iii) (ii)
4) (i) (ii) (iii) (iv)
21) कोकण कृषी विद्यापीठ हे प्रामुख्याने ...... च्यावर विशेष संशोधन कार्य करते.
1) ऊस आणि गहू
2) कापूस आणि तेलबिया
3) ज्वारी व डाळी
4) तांदूळ, नाचणी फळपिके
22) हरभरा पिकाची बीडीएनजी-797 ही जात ....... ला दाद न देणारी किंवा प्रतिकारक आहे.
1) घाटे अळी
2) पाने खाणारी अळी
3) करपा
4) मर आणि मुळ कुज
23) उस्मानाबादी शेळी संबंधित सत्य वाक्य लिहा.
अ) लातूर, तुळजापूर, उदगीर तालुक्यात आढळते.
ब) मटण आणि दूधासाठी उपयोगी
क) बहुतेक तपकिरी रंगात आढळते.
ड) शरीराचे वजन 22-24 किलो.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) व (ड)
2) (अ), (ब) व (क)
3) (अ) व (ब)
4) वरील सर्व
24) जोड्या लावा :
गायीचे नाव आढळस्थान
a) देवणी i) अहमदनगर
b) डांगी ii) नागपूर
c) गौळाउ iii) उस्मानाबाद
d) सोरटी iv) रायगड
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (iv) (iii) (ii) (i)
2) (iii) (iv) (i) (ii)
3) (i) (ii) (iii) (iv)
4) (iii) (iv) (ii) (i)
25) ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशासंबंधी आहे ?
1) पूरनियंत्रण
2) पूरव्यवस्थापन
3) वाढीव दूध उत्पादन व संकलन
4) वाढीव अन्न उत्पादन
26) खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे?
1) बांगडा
2) झिंगा
3) बोंबील
4) कोळंबी
27) महाराष्ट्रातील मासेमारीबद्दल काय खरे नाही ?
a) महाराष्ट्रात मासेमारीसाठी 75000 पेक्षा अधिक चौ.कि.मी. क्षेत्र उपयुक्त आहे.
b) महाराष्ट्रात मासेमारी खार्या, निमखार्या व गोड्या पाण्यावर चालते.
c) अधिक मासेमारी गोड्या पाण्यावर चालते.
d) सुमारे अर्धे पकडलेले मासे सुकविले जातात.
e) तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b)
2) (c), (d)
3) (c), (e)
4) (a), (d)
28) खालील जोड्या लावा :
जिल्हा मासेमारी केंद्र
अ) मुंबई I. श्रीवर्धन
ब) ठाणे II. वेंगुर्ला
क) रायगड III. वर्सोवा
ड) रत्नागिरी IV. सातपाटी
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) I II III IV
2) IV I II III
3) III IV I II
4) II III IV I
29) ‘जायकवाडी मत्स्य बीज केंद्र‘ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) परभणी
2) लातूर
3) भंडारा
4) औरंगाबाद
30) आदिवासी सुधार योजनेंतर्गंत खालीलपैकी कोणत्या व्यवसायास प्रोत्साहन दिले जाते ?
1) मत्स्यशेती
2) लाकूडतोड
3) फळबागा
4) खाणकाम
उत्तरे
1-1
2-3
3-2
4-4
5-3
6-4
7-x
8-1
9-2
10-2
11-2
12-4
13-2
14-3
15-3
16-2
17-3
18-2
19-2
20-1
21-4
22-4
23-3
24-4
25-3
26-4
27-3
28-3
29-4
30-1