सार्वजनिक धोरण प्रश्नपुस्तिका (4)

  •  सार्वजनिक धोरण प्रश्नपुस्तिका (4)

    सार्वजनिक धोरण प्रश्नपुस्तिका (4)

    • 08 Mar 2021
    • Posted By : Study Circle
    • 1020 Views
    • 1 Shares

    सार्वजनिक धोरण प्रश्नपुस्तिका (4)


    1) खालीलपैकी कोणी ’सामाजिक अभियांत्रिकी’ (सोशल इंजिनिअरिंग) चा सिद्धांत मांडला ज्यानुसार कायद्याचे उद्दिष्ट हे समाजातील व्यक्तींमधील हित कलह सोडविणे तसेच त्यांचे व्यक्तिगत हित संबंध सुसंवादित करणे असे होय?
          1) रोस्को पाउंड
          2) केल्सन
          3) हुगो ग्रोशिअस
          4) लिऑन डगीट

    2) भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले?
          1) आर्टिकल 36
          2) आर्टिकल 46
          3) आर्टिकल 39
          4) वरीलपैकी एकही नाही

    3) भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या तरतुदी या शिक्षणाशी संबंधित आहेत ?
          अ) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे.
          ब) ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था.
          क) पाचवे परिशिष्ट
          ड) सहावे परिशिष्ट
          इ) सातवे परिशिष्ट
          पर्यायी उत्तरे :
          1) फक्त अ व ब
          2) फक्त क, ड व इ
          3) फक्त अ, ब व इ
          4) अ, ब, क, ड व इ

    4) खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम “सेझ“ विषयक धोरण रद्द केले ?
          1) गुजरात
          2) पश्चिम बंगाल
          3) महाराष्ट्र 
          4) गोवा

    5) पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे?
          अ) भारतातील बहुतांशी भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगीशिवाय घरी दारू बनविणे बेकायदेशीर आहे.
          ब) भारतात केवळ स्वतःच्या वापराकरिता (परवानगीशिवाय) घरी दारू तयार केली जाऊ शकते.
          1) केवळ अ योग्य आहे.
          2) केवळ ब योग्य आहे.
          3) कोणतेही योग्य नाही.
          4) दोन्ही योग्य आहेत

    6) महाराष्ट्र मानव विकास मिशन मध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही ?
          1) परभणी
          2) हिंगोली
          3) कोल्हापूर  
          4) यवतमाळ

    7) खुली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोणत्या निविदा ई-निविदा पद्धतीने काढाव्यात ?
          1) सर्व प्रकारच्या
          2) ज्यांचे अंदाजित मूल्य रु. 1 लाख आहे.
          3) ज्यांचे अंदाजित मूल्य रु. 2 लाख आहे.
          4) ज्यांचे अंदाजित मूल्य रु. 3 लाख पेक्षा जास्त आहे.  

    8) खालील विधाने विचारात घ्या ः
          अ) 2015-16 हे वर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष होते.
          ब) 2015-16 हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरा करण्यात आले.
          क) 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
          वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त ?
          1) फक्त अ
          2) फक्त अ आणि ब
          3) फक्त ब आणि क
          4) सर्व विधाने बरोबर आहेत

    9) सार्वजनिक संस्थांच्या प्रमुख समस्या कोणत्या?
          a) सार्वजनिक उत्तरदायित्व
          b) व्यवस्थापनाची स्वायत्तता
          c) संचालक मंडळाची रचना
          पर्यायी उत्तरे :
          1) फक्त (a)
          2) (b) आणि (c) दोन्हीही
          3) फक्त (c)
          4) (a), (b) आणि (c)

    10) आधुनिक प्रतिसाद प्रशासन प्रक्रियेत .....
          1) प्रशासन जनतेस उतरंड (hierarchical) संरचनेमार्फत जबाबदार आहे.
          2) प्रशासन जनतेस लोक प्रतिनिधींच्यामार्फत जबाबदार आहे.
          3) प्रशासन जनतेला थेट शासन प्रक्रियेत भाग घेण्यासाठी सक्षम करते.
          4) प्रशासन सरकारी कार्यक्रम व मोहिमांमध्ये जनतेने दिलेल्या विचारांना (inputs) महत्त्व देते.

    11) संपूर्ण भारतात चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगान वाजविणे अनिवार्य आहे हा आदेश भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केव्हा दिला ?
          1) ऑक्टोबर, 2015
          2) जानेवारी, 2015
          3) नोव्हेंबर, 2016
          4) नोव्हेंबर, 2014

    12) कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबिर आयोजित करण्यात आले ?
          1) महाराष्ट्र 
          2) गुजरात   
          3) आंध्र प्रदेश
          4) राजस्थान 

    13) भारत-आसियान युवा परिषद -2017, भारतात कोणत्या शहरात भरविण्यात आली ?
          1) कलकत्ता
          2) मुंबई  
          3) भोपाल  
          4) चेन्नई

    14) महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण (सुधारणा) बिल 1995 ज्याला राष्ट्रपतींची मान्यता एक महिन्यापूर्वी मिळाली. हे बिल खालील कोणत्या प्राण्यांना वगळते,जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते?
          1) बैल व सांड
          2) गायी व वासरे
          3) म्हैस व तिचे बछडे
          4) वरील एकही नाही

    15) महाराष्ट्रात दारू पिऊन गाडी चालवणे बेकायदेशीर आहे. पुढील बाबींसाठीही परवाना लागतो -
          a) अधिकृत दुकानातून दारू विकत घेण्यासाठी
          b) हॉटेल वा ‘बार‘मध्ये दारू पिण्यासाठी
          c) आपल्या घरात दारू ठेवण्यासाठी
          d) एका जागेवरून दुसरीकडे दारू नेण्यासाठी
          वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे/चुकीची आहे/आहेत?
          1) (a) आणि (c)
          2) (b)
          3) (c)
          4) कोणतेही नाही

    16) ध्वनी प्रदूषण (विनियम व नियंत्रण) नियम, 2000 नुसार दिवसाचे वेळी रहिवास क्षेत्रासाठी सभोवतालच्या वायू गुणवत्तेप्रमाणे आवाजाची मर्यादा
          1) 20 डेसिबल्स (ए) लैक
          2) 85 डेसिबल्स (ए) लैक
          3) 70 डेसिबल्स (ए) लैक
          4) 55 डेसिबल्स (ए) लैक

    17) सरकारमार्फत घेतल्या जाणार्‍या पुढील बाबी लक्षात घ्या-
          अ) देशांतर्गत चलनाचे अवमूल्यन     
          ब) निर्यात अनुदान कमी करणे
          क) मोठ्या प्रमाणावर एफडीआय आणि एफआयआयला चालना देणार्‍या धोरणांचा स्वीकार
          वरीलपैकी कोणती कारवाई चालू खात्यावरील तूट कमी करण्यासाठी उपयुक्त आहे ?
          1) फक्त अ बरोबर
          2) फक्त अ आणि ब बरोबर       
          3) अ आणि क बरोबर
          4) अ, ब आणि क

    18) आम आदमी विमा योजनेबाबत विधाने लक्षात घ्या -
          अ) या योजनेखाली असलेल्या लाभार्थी हा एखाद्या कुटुंबाचा प्रमुख पाहिजे किंवा ग्रामीण भूमिहीन  कुटुंबातील कमवता सदस्य पाहिजे.
          ब) लाभार्थीचे वय 30 ते 65 वर्षा दरम्यान हवे.
          क) लाभार्थीच्या घरातील इयत्ता 9 ते 12 दरम्यान शिकणार्‍या दोन मुलांना मोफत स्कॉलरशीप देण्याची तरतूद आहे. 
          यापैकी योग्य विधाने शोधा.
          1) फक्त अ
          2) ब आणि क
          3) अ आणि क
          4) अ, ब आणि क

    19) राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा (FRBM) याचे हे उद्दिष्ट होय :
          a) दीर्घकालीन समग्रलक्षी स्थैर्य
          b) आदर्श ऋण व्यवस्थापन
          c) सेवा कराचा घटलेला दर
          पर्यायी उत्तरे :
          1) (a) फक्त
          2) (a) व (b) फक्त
          3) (b) व (c) फक्त
          4) वरील सर्व

    20) खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्त्वाची खूण म्हणून मानले जाते; जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली ?
          1) 1973
          2) 1971 
          3) 1972
          4) 1974 

    21) भारताच्या राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्यसेवा कायद्याला ......... साली मान्यता दिली. 
          1) 2006
          2) 2007
          3) 2012 
          4) 2017 

    22) ‘अपंग एकात्म शिक्षण योजना‘ महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली ?
          1) 1976
          2) 1978 
          3) 2001
          4) 2005 

    23) मानव संसाधन विकास मंत्रालयाने माध्यमिक शिक्षण योजनेच्या विस्तारासाठी कोणत्या वित्त आयोगात राष्ट्रीय ‘माध्यमिक शिक्षा अभियान‘ योजनेचा समावेश केला ?  
          1) 9 वा वित्त आयोग
          2) 10 वा वित्त आयोग
          3) 11 वा वित्त आयोग
          4) 12 वा वित्त आयोग

    24) कोणत्या शासन निर्णयानुसार राज्यात इयत्ता पहिली ते आठवी करिता सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू केली आहे? (प्राथमिक स्तर)
          1) 20 ऑगस्ट 2010
          2) 23 जून 2015
          3) 4 सप्टेंबर 2016
          4) 5 जुलै 2017 

    25) कोणत्या अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने बी. एड्. अभ्यासक्रम एक वर्षा ऐवजी दोन वर्षाचा केला आहे?
          1) 7 सप्टेंबर 2005
          2) 1 जानेवारी 2012
          3) 1 डिसेंबर 2014
          4) 10 डिसेंबर 2015 

    26) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम 1987 च्या तरतुदीचे किंवा त्या अन्वये तयार करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीस कोणत्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ?
          1) 5 वर्षे मुदतीचा कारावास व रुपये पाच हजार द्रव्य दंड
          2) 10 वर्षे मुदतीचा कारावास व रुपये दहा हजार द्रव्य दंड
          3) 1 ते 3 वर्षे मुदतीचा कारावास व रुपये 5 हजार द्रव्य दंड
          4) 7 वर्षे मुदतीचा कारावास व रुपये सात हजार द्रव्य दंड. 

    27) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 अन्वये विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी कोणती उच्च वयोमर्यादा आहे ?
          1) 6 वर्षे
          2) 14 वर्षे  
          3) 18 वर्षे
          4) 21 वर्षे 

    28) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 अन्वये इयत्ता पहिली ते पाचवी यामध्ये शिकणार्‍या बालकांबाबत किमान किती बालके उपलब्ध असेल तेथे शाळा सुरू केली जाईल ?
          1) किमान 10 बालके
          2) किमान 20 बालके
          3) किमान 30 बालके
          4) बालकांच्या किमान संख्येची अट नाही  

    29) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011, कलम 25 नुसार, कलम 34 च्या प्रयोजनार्थ राज्य सल्लागार परिषदेचे अध्यक्ष कोण असते ?
          1) मुख्यमंत्री
          2) शालेय शिक्षण मंत्री
          3) शिक्षण राज्य मंत्री
          4) सचिव शालेय शिक्षण 

    30) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009, कलम 29 अन्वये अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ?
          1) शिक्षण संचालक (प्राथमिक)
          2) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद)
          3) आयुक्त शिक्षण
          4) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) 

    उत्तरे

    1-1

    2-2

    3-3

    4-4

    5-4

    6-3

    7-4

    8-4

    9-4

    10-3

    11-3

    12-2

    13-3

    14-3

    15-4

    16-4

    17-4

    18-3

    19-2

    20-3

    21-4

    22-2

    23-3

    24-1

    25-3

    26-3

    27-3

    28-2

    29-2

    30-2

Share this story

Total Shares : 1 Total Views : 1020