नौदल दिन : 4 डिसेंबर / प्रश्‍नमंजुषा (42)

  • नौदल दिन : 4 डिसेंबर / प्रश्‍नमंजुषा (42)

    नौदल दिन : 4 डिसेंबर / प्रश्‍नमंजुषा (42)

    • 07 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 548 Views
    • 0 Shares

     नौदल दिन : 4 डिसेंबर

              भारतीय नौदलातर्फे 4 डिसेंबर हा प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा देशभरात नौदल सप्ताह म्हणून विविध उपक्रमांनी साजरा होतो. या सार्‍याला पार्श्र्वभूमी आहे ती 1971 साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाची.
    1)   1971 मध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात कराची बंदरावर केलेला यशस्वी हल्ला, विशाखापट्टणवरचा हल्ला परतवण्यात मिळवलेले यश आणि पूर्व पाकिस्तान नेव्हीचे उच्चाटन करण्यात बजावलेली महत्त्वपूर्ण कामगिरी याच्या स्मरणार्थ नौदल दिन साजरा केला जातो. 
     
    2)   भारताच्या भौगोलिक रचनेनुसार, देशातील 9 राज्ये ही समुद्र किनार्‍याला लागून आहेत. 
     
    3)   जगातील जवळपास 80 टक्के व्यापार हा हिंदी महासागरातून होते. 
     
    4)   भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाचे आहे. 
     
    5)   जगातील सर्वोत्तम नौदलामध्ये भारतीय नौसेना पाचव्या क्रमांकावर आहे.  
     
    6)   नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
     
    7)   भारतीय नौदलाच्या आयएनए. विराट, डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी नौदलाची ताकद वाढवतात. 
     
    8)   1934 मध्ये ब्रिटीशांनी ’रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) स्थापन केली होती.
     
    ऑपरेशन ट्रायडंट 
     
     
     
    1)   1971 साली भारताने पाकिस्तान विरुद्धची मोहिम आखली होती त्याला ऑपरेशन ट्रायडंट असे नाव देण्यात आले होते.  त्या काळात तत्कालीन पूर्व पाकिस्तानातून (सध्याचा बांगला देश) भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाईदल सातत्याने घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही त्यात फारसा फरक पडला नव्हता. 
     2)   1971 च्या एप्रिल महिन्याच्या सुमारास युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळेस युद्धाच्या निर्णयासंदर्भात बोलावलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी खंबीर भूमिका घेत आताचा ऋतू आणि एकूणच परिस्थिती ही आपल्याला परवडणारी नाही, अशी ठाम भूमिका घेतली. बांगलादेश युद्धाच्या मुळाशी हा धाडसाचा पाया होता. पंतप्रधानांनी नोव्हेंबरपर्यंत थांबवण्याचा सल्ला दिला व तो मान्य करण्यात आला.
     3)   3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्रि्चम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याचवेळेस भारताची ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका या युद्धात सागरतळाला धाडण्याची योजनाही पाकने आखली. ते लक्षात घेऊन भारतीय नौदलाने चुकीचे संदेश पाठवून पाकिस्तानच्या ‘पीएनएस गाझी’ची दिशाभूल केली आणि डाव साधला. भारतीय नौदलाने चढविलेल्या हल्ल्यात ‘गाझी’ या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. त्यानंतर ‘आयएनएस विक्रांत’ने बंगालच्या उपसागरात पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले. विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोके वर काढू दिले नाही. 
    4)   4 डिसेंबर 1971 ला भारतीय नौदलाने पाकिस्तानात घूसून कराची नौदलाच्या तळावर हल्ला केला. पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करून लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत कराची बंदरावर हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुड्या त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरून गेल्या. 
     5)   गुजरातमधील ओखा बंदरातून आयएनएस निपत, आयएनएस निरघाट आणि आयएनएस वीर या युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला करुन पाकिस्तानच्या पीएनएस खैबर, पीएनएस शाह जहाँ आणि पीएनएस मुहाफिज यांना जलसमाधी दिली. या युध्दात पहिल्यांदाच जहाजविरोधी क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. कराची बंदरातील इंधनाचा साठ्याला मोठं नुकसान पोहचवलं गेलं. 500 हून अधिक पाकिस्तानी नौदलाच्या सैनिका मृत्युमुखी पडले.
     6)   ऑक्टोबर 1971 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्यासाठी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल एस एम नंदा भेटले होते. नौदलाच्या तयारीबद्दल माहिती दिल्यानंतर नंदा यांनी पंतप्रधानांना विचारले की, नौदलाने जर कराचीवर हल्ला केला तर यात सरकारचा राजनयिक तोटा होईल का?  इंदिरा गांधींनी नंदा यांना, तुम्ही हे का विचारत आहात, असा सवाल केला. नंदा म्हणाले की, 1965 मध्ये नौदलाला भारतीय सागरी सीमेबाहेर कोणतीही कारवाई न करण्यास सांगण्यात आले होते. यावर इंदिरा गांधींनी नंदा यांना  सांगितले की, ’वेल एडमिरल, इफ देयर इज अ वार, देअर इज अ वार.’  पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर नंदा यांना योग्य तो संदेश मिळाला आणि भारतीय नेव्हीने योग्य ती कारवाई केली. 
     
    भारतीय नौदलाची ताकद (युद्धनौका आणि पाणबुड्या)
    • 1953 -  भारतीय नौदलात हवेत मारा करणारी शस्त्रे समाविष्ट करण्यात आली.
    •• 1966 - युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशात हवा या अनुषंगाने लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. आजतागायत 80 युद्धनौकांची बांधणी करण्यात आली. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचा समावेश आहे.
    •• 1967 -  पाणबुडया नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या.
     
    1)  विमानवाहू युद्धनौका -
    1) आयएनएस विक्रमादित्य
    2) आयएनएस विराट

    2) विनाशिका
    1) दिल्ली श्रेणी
    2) राजपूत श्रेणी
    3) कोलकाता श्रेणी

    3) फ्रिगेट
    1) शिवालिक श्रेणी - शिवालिक, सातपुड़ा, सह्याद्रि
    2) तलवार श्रेणी - तलवार, त्रिशूल, तबर, तेग, तरकश, त्रिकंड
    3) ब्रह्मपुत्र श्रेणी - ब्रह्मपुत्र, ब्यास, बेतवा
    4) गोदावरी श्रेणी - गोदावरी, गोमती, गंगा
    5) निलगिरी श्रेणी (लिएण्डर) 

    4) कॉर्वेट
    1) कोरा श्रेणी - कोरा, किर्च, कुलिश, कर्मुक
    2) खुकरी श्रेणी - किरपाण, कुठार, खंजर, खुकरी
    3) वीर श्रेणी - वीर, निर्भीक, निपट, निःशंक, निर्घट, विभूति, विपुल, विनाश, विद्युत, नाशक, प्रलय, प्रबल,
    4) अभय श्रेणी - अभय, अजय, अक्षय, अग्रय,
    5) योजना 28- कामोर्ता

    5) पाणबुड्या
    1) सिंधुघोष श्रेणी - सिंधुघोष, सिंधुध्वज, सिंधुराज, सिंधुवीर, सिंधुरत्न, सिंधुकेसरी, सिंधुकीर्ति, सिंधुविजय, सिंधुरक्षक, सिंधुराष्ट्र
    2) शिशुमार श्रेणी - शिशुमार, शंकुश, शाल्की, शंकुल
    3) फॉक्सट्रॉट श्रेणी
    4) स्कोर्पीन श्रेणी
    अणुइंधनावरच्या पाणबुड्या -
    1) अकुला श्रेणी - चक्र
    2) आय.एन.एस अरिहन्त
    6) अत्याधुनिक तंत्रज्ञानाची नौका (ए टी वी)

    6) उभयचर युद्ध नौका
    1) ऑस्टिन श्रेणी- जलाश्व
    2) शार्दूल श्रेणी - शार्दूल, केसरी
    3) मगर श्रेणी - मगर, घड़ियाल, ऐरावत
    4) कुम्भीर श्रेणी - चीता, महिष, गुलदार, कुम्भीर
    5) पॉलनोक्लनी श्रेणी
    6) निकोबार श्रेणी
    7) एलसीयू- एलसीयू 33, एलसीयू 35, एलसीयू 36, एलसीयू 37, एलसीयू 38, एलसीयू 39

    7) गस्ती नौका / छोट्या युद्ध नौका
    1) सुकन्या श्रेणी - सुकन्या, सुभद्रा, सुवर्णा, सावित्री, शारदा, सुजाता, सरयू, सुनयना, सुमेधा
    2) बंगरम श्रेणी - बंगरम, बित्र, बट्टी मल्व, बरतंग
    3) त्रिंकट श्रेणी - त्रिंकट, तरस
    4) सुपर द्वोरा-खख श्रेणी त्वरित आक्रमण नौका (फास्ट अटॅक क्राफ्ट) - एफएसी टी-80, टी-81, टी-82, टी-83, टी-84
    5) कार निकोबार श्रेणी’ त्वरित आक्रमण नौका (फास्ट अटॅक क्राफ्ट)

    8) सर्वेक्षण नौका
    मकर श्रेणी, संधयक श्रेणी- निरूपक, इन्वेस्टीगेटर, जमुना, सतलज, संधयक, निर्देशक, दर्शक, सर्वेक्षक

    9) माईनस्वीपर  युद्धनौका
    1) पॉण्डिचेरी श्रेणी - अलेप्पी
    2) कारवाड़ श्रेणी - कारवाड़, कण्णनौर, कुड्डलौर, काकीनाड़ा, कोझिक्कोड़, कोंकण
    3) आयएनएस माहे

    10) सहायक नौका
    1) टैंकर- दीपक, ज्योति, आदित्य
    2) तारपीडो रिकवरी पोत- अस्त्रवाहिनी (टीआरवी 71), टीआरवी 72
    3) अन्य- मातंग, गज, निरीक्षक

    11) ट्रेनिंग/शोधकार्य  नौका- 
    1) तीर
    2) तरंगिनी
    3) सुदर्शिनी
    4) महादयी  
    5) सागरध्वनी

    नौदलाची रचना
    • ऑपरेशनल कमांड
    1) पश्रि्चम नौदल कमांड
    2) पूर्व नौदल कमांड
    3) दक्षिण नौदल कमांड

    • संयुक्त कमांड
     
    4) अंदमान निकोबार कमांड
    5) सामरिक शक्ती कमांड

    1) पश्रि्चम नौदल कमांड
    1) आय.एन.एस द्वारका
    2) आय.एन.एस सरदार पटेल
    3) आय.एन.एस कदंब
    4) आय.एन.एस वज्रकोश
    5) आय.एन.एच.एस पतंजली
    6) आय.एन.एस गोमंतक
    7) आय.एन.एस हंसा
    8) आय.एन.एच.एस जीवंती
    9) आय.एन.एस आंग्रे
    10) आय.एन.एस अभिमन्यू
    11) आय.एन.एस अग्नीबाहू
    12) आय.एन.एच.एस अश्रि्वनी
    13) आय.एन.एस कुंजाई
    14) आय.एन.एस शिकरा
    15) आय.एन.एस तानाजी
    16) आय.एन.एस ट्रॅटा
    17) आय.एन.एस तुनिर
    18) आय.एन.एस वज्रबहू
    19) आय.एन.एस हंमला
    20) आय.एन.एस शिवाजी

    2) पूर्व नौदल कमांड
    1) आय.एन.एस सिरकारस
    2) आय.एन.एस देगा
    3) आय.एन.एस वीरबाहू
    4) आय.एन.एच.एस कल्याणी
    5) आय.एन.एस कलिंगा
    6) आय.एन.एस एकसिला
    7) आय.एन.एस कर्ना
    8) आय.एन.एस अड्यार
    9) आय.एन.एस पारूंडु
    10) आय.एन.एस कट्टाबोम्मान
    11) आय.एन.एस तुतीकोरीन
    12) आय.एन.एस नेताजी सुभाष
    13) आय.एन.एस परादिप
    14) आय.एन.एस भुबनेश्वर
    15) आय.एन.एस वर्षा

    3) दक्षिण नौदल कमांड
    1) आय.एन.एस द्वीपरक्षक
    2) आय.एन.एस मिनिकॉय
    3) आय.एन.एस ऐनड्रोत
    4) आय.एन.एस बित्रा**
    5) आय.एन.एस गरुडा
    6) आय.एन.एच.एस संजिवनी
    7) आय.एन.एस वेंदुरूथी
    8) आय.एन.एस द्रोणाचार्य
    9) आय.एन.एस चिकला
    10) आय.एन.एच.एस निवंरानी
    11) आय.एन.एस मानडोवी
    12) आय.एन.एस सातवाहन
    13) आय.एन.एस विश्‍वकर्मा
    14) आय.एन.एच.एस कस्तुरी
    15) आय.एन.एस वालसुरा
    16) आय.एन.एस राजली
    17) आय.एन.एस अग्रानी
    18) आय.एन.एस झामोरीन

    4) अंदमान निकोबार कमांड
    1) आय.एन.एस कारदिप
    2) आय.एन.एस जारावा
    3) आय.एन.एस उत्क्रोश
    4) आय.एन.एस बाझ
    5) आय.एन.एस कॅम्पबेल बाय
    6) आय.एन.एस कोहासा
     
    प्रश्‍नमंजुषा (42)
    1) भाारतीय नौदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय शोधा :
    अ) जगातील सर्वोत्तम नौदलामध्ये भारतीय नौसेना चौथ्य्या क्रमांकावर आहे.  
    ब) भाारतीय नौदलाचे 5 ऑपरेशनल कमांड आहेत.
    क) 1934 साली ब्रिटीशांनी ’रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) स्थापन केली होती.
    ड) ‘आयएनएस विक्रांत’ ही भारतची पहिली विमानवाहू युद्धनौका होय.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    2) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने  क आणि ड बरोबर
     
    2) खालील विधाने विचारात घ्या:
    a) भारताच्या 10 राज्ये ही समुद्र किनार्‍याला लागून आहेत. 
    b) जगातील जवळपास 80  टक्के व्यापार हा हिंदी महासागरातून होते. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही 
    4) दोन्हीही नाहीत 
     
    3) खालील जोड्या जुळवा :
    स्तंभ अ (कमांड) स्तंभ ब (नौदलाचा तळ)
    अ. पूर्व नौदल कमांड I. आय.एन.एस नेताजी सुभाष
    ब. दक्षिण नौदल कमांड II. आय.एन.एस द्रोणाचार्य
    क. अंदमान निकोबार कमांड III. आय.एन.एस कॅम्पबेल बाय
    ड. पश्रि्चम नौदल कमांड IV. आय.एन.एस ट्रॅटा
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III IV I
    (2) I III II IV
    (3) I II III IV
    (4) IV III I II
     
    4) खालीलपैकी कोणत्या भारताच्या पाणबुड्या आहेत ?
    a) आयएनएस शाल्की
    b) आयएनएस केसरी
    c) आयएनएस चक्र
    d) आयएनएस ऐरावत
    e) आयएनएस खुकरी
    f) आयएनएस अरिहन्त
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b), (c)
    2) (b), (c), (e)
    3) (a), (d), (e), (f)
    4) (a), (c), (f)
     
    5) कोणत्या युद्धातील कामगिरीची आठवण म्हणून  भारतीय नौदलातर्फे 4 डिसेंबर हा प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो ?
    1) भारत - पाकिस्तान युद्ध 1965
    2) भारत - पाकिस्तान युद्ध 1998
    3) भारत - पाकिस्तान युद्ध 1971
    4) भारत - चीन युद्ध 1962
     
    6) 1971 च्या युद्धात खालीलपैकी कोणत्या पाकिस्तानी युद्धनौका / पाणबुड्यांचा विनाश भारतीय नौदलाने केला होता ?
    अ) पीएनएस मुहाफिज 
    ब) पीएनएस गाझी
    क) पीएनएस टिपू सुलतान
    ड)  पीएनएस खैबर
    इ) पीएनएस बाबर
    फ) पीएनएस शाह जहाँ 
    ग) पीएनएस गझनी
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) क, इ आणि ग वगळता सर्व  
    3) ब वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व
     
    7) खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
    विधान (अ) : 4 डिसेंबर 1971 ला भारतीय नौदलाने पाकिस्तानात घूसून कराची नौदलाच्या तळावर हल्ला केला. 
    कारण (र) : 1971 च्या युद्धात भारताची ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका सागरतळाला धाडण्याची योजना पाकिस्तानने आखली होती.
    पर्यायी उत्तरे :
    1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (42)
    1-4
     
    2-2
     
    3-3
     
    4-4
     
    5-3
     
    6-3
     
    7-2

Share this story

Total Shares : 0 Total Views : 548