आयर्लंड / प्रश्नमंजुषा (31)

  • आयर्लंड / प्रश्नमंजुषा (31)

    आयर्लंड / प्रश्नमंजुषा (31)

    • 28 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 218 Views
    • 0 Shares

    आयर्लंड

     
    25 नोव्हेंबर 2020 - आयर्लंडच्या सरकारने मासिक पाळी आरोग्य उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा मंजूर केला. या विधेयकात प्रमुख भूमिका पार पाडणार्‍या मोनिका लेनॉन  यांनी एप्रिल 2019 मध्ये हे विधेयक प्रथम मांडले होते. 
     
    मासिक पाळी आरोग्य उत्पादने (मोफत उपलब्धता) कायद्यातील प्रमुख तरतुदी -
     
    1) स्थानिक स्वराज्य संस्थातील अधिकार्‍यांना महिलांची मासिक पाळी आरोग्य उत्पादने मोफत उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक.
     
    2) सामाजिक केंद्रे, युवा गट, औषध दुकाने या ठिकाणी ही उत्पादने मोफत उपलब्ध. 
     
    3) ही उत्पादने शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात उपलब्ध.
     
    4) यासाठी 2022 पर्यंत 8.7 दशलक्ष पौंडाचा खर्च. 

    • लिओ अशोक वराडकर हे जून 2017 पासून आयर्लंडचे पंतप्रधान आहेत. त्यांचे वडील मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे आहेत. ते आयर्लंडच्या फिने गेल या राजकीय पक्षाचे नेते आहेत. आयर्लंडमध्ये 2007 साली झालेल्या निवडणुकांमध्ये वराडकर सर्वप्रथम तेथील संसदेत निवडून गेले होते. 2011 मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले होते.


    प्रश्नमंजुषा (31)
     
    1) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) मोनिका लेनॉन यांच्या प्रयत्नामुळे आयर्लंड सरकारने मासिक पाळी आरोग्य उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा मंजूर केला.
    ब) आयर्लंडचे पंतप्रधान लिओ अशोक वराडकर हे मूळचे महाराष्ट्रातील अलीबागचे आहेत. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    2) कोणत्या देशाने जगात स्वर्वप्रथम मासिक पाळी आरोग्य उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा मंजूर केला ? 
    1) भारत
    2) इंग्लंड
    3) आइसलँड
    4) आयर्लंड
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (31)
    1-1
     
    2-4

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 218