भारताचा प्राकृतिक भूगोल प्रश्नपुस्तिका (3)
- 15 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 1824 Views
- 3 Shares
भारताचा प्राकृतिक भूगोल प्रश्नपुस्तिका (3)
1) अंदमान बेटाच्या पूर्वभागातील मध्यभागी असलेल्या ...... बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे.
1) निकोबार
2) बॅरन
3) मालदीव
4) लक्षद्वीप
2) भारताच्या भू सीमा ...... देशांना भिडतात.
1) सात
2) आठ
3) सहा
4) नऊ
3) जोड्या लावा :
खाडी स्थळ
अ) 10 डिग्री I) लहान अंदमान मोठ्या अंदमान पासून विलग करते
ब) 8 डिग्री II) मिनीकॉय लक्षद्वीप पासून विलग करते.
क) 9 डिग्री III) अंदमान निकोबार पासून विलग करते.
ड) डुंकन बोळ IV) मिनीकॉय मालदीव पासून विलग करते
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) III II IV I
2) III IV II I
3) III IV I II
4) IV III I II
4) जोड्या लावा :
a) दीव i) वाळूच्या दांडावरील बेट
b) सालसेट ii) नौदल स्थानक
c) श्रीहरीकोटा iii) मासेमारीसाठी बेट
d) वेलिंग्टन iv) सात बेटांचा समूह
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (iv) (iii) (ii)
2) (iii) (iv) (i) (ii)
3) (iv) (iii) (ii) (i)
4) (iii) (ii) (i) (iv)
5) जोड्या लावा :
बेटे वैशिष्ट्ये
अ) सालसेट I) रॉकेट उतरण्याचे ठिकाण
ब) श्रीहरीकोटा II) मिसाईल उतरण्याचे ठिकाण
क) वेलिंग्टन III) सात बेटांचा समूह
ड) व्हीलर IV) नौदल स्थानक
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) III II I IV
2) I III IV II
3) III I II IV
4) III I IV II
6) खालील नकाशात पूर्व हिमालय प्रदेशातील चार पर्वत रांगा 1,2,3,4 अंकांनी दाखविलेल्या आहेत. या पर्वत रांगांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणता क्रम बरोबर आहे?
1) बराली, झांतिया, खाशी, गारो
2) गारो, खाशी, झांतिया, बराली
3) झांतिया, खाशी, गारो, बराली
4) खाशी, गारो, बराली, झांतिया
7) खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनार्याचा भाग आहे ?
1) कोकण किनारा
2) मलबार किनारा
3) कोरोमंडल किनारा
4) दक्षिण किनारा
8) चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे.
1) कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
2) गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
3) गंगा व महानदी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
4) महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
9) प्रामुख्याने ‘दंडकारण्य‘ या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता ?
1) छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋृत्य भाग
2) छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिशा राज्याचा पश्चिम भाग
3) कर्नाटकचे पठार
4) गर्हजात डोंगर
10) खालील आकृतीत गडद केलेला प्रदेश त्रिवाथार्र्ंच्या मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शविलेला आहे तो प्रदेश ओळखा.
1) मध्यम शुष्क
2) उप-उष्णकटिबंधीय दमट
3) उष्णकटिबंधीय सॅव्हाना (कोरडे हिवाळे)
4) उष्णकटिबंधीय दमट
11) खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात.
a) उत्तर भारतात कमी तापमान असते.
b) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.
c) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.
d) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1) (a), (b) आणि (c)
2) (a), (c) आणि (d)
3) (a), (b) आणि (d)
4) फक्त (c)
12) ’लू’ हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने ......
1) एप्रिल-मे
2) मे-जून
3) जून-जुलै
4) ऑक्टोबर-नोव्हेंबर
13) खालील विधाने पहा :
a) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.
b) हिवाळ्यात तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वार्यामुळे पाऊस पडतो.
c) बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त विधान (a) बरोबर आहे
2) फक्त विधान (b) बरोबर आहे
3) फक्त विधान (c) बरोबर आहे
4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
14) खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो?
1) प्रत्यावर्त
2) पश्चिमी चक्रवात
3) मान्सूनची माघार
4) नैर्ऋत्य मान्सून
15) भारतात सर्वांत जास्त पाऊस ...... येथे पडतो.
1) कोकण
2) मलबार
3) चेरापूंजी
4) गुजरात
16) ईशान्य मोसमी वार्यांमुळे ...... राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.
1) गोवा
2) पंजाब
3) महाराष्ट्र
4) तामिळनाडू
17) खालील नकाशात 'XY' रेषा मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाची खालीलपैकी कोणत्या तारखेची आहे?
1) 15 ऑक्टोबर
2) 1 नोव्हेंबर
3) 15 नोव्हेंबर
4) 1 डिसेंबर
18) खालीलपैकी बरोबर विधान/ने निवडा :
1) भारतातील मान्सूनचा कालावधी दक्षिण भारतातून उत्तर भारतात कमी होत जातो.
2) भारताच्या उत्तर मैदानातील पर्जन्याचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त 1
2) फक्त 2
3) 1 व 2 दोन्ही
4) 1 किंवा 2 दोन्हीही नाही
19) कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पर्जन्य ...... या नावाने ओळखतात.
1) आम्रसरी
2) कॉफीबहार सरी
3) कालवैशाखी
4) आँधी
20) जोड्या लावा :
ढगफुटीचे ठिकाण ढगफुटीची तारीख
अ) केदारनाथ I) 6 ऑगस्ट 2010
ब) लेह-लडाख II) 15 ऑगस्ट 1997
क) मुंबई III) 16 जून 2013
ड) चिरगाव IV) 26 जुलै 2004
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) III I IV II
2) I III IV II
3) III I II IV
4) II IV I III
21) खालील विधाने पहा :
a) राकापोशी शिखराची उंची कैलास शिखरापेक्षा जास्त आहे.
b) शिमला थंड हवेचे ठिकाण लघू हिमालयामध्ये आहे.
c) नंदादेवी शिखराची उंची 7817 मी. आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त विधान (a) बरोबर आहे.
2) फक्त विधान (b) बरोबर आहे.
3) विधान (a) आणि (c) बरोबर आहेत.
4) विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
22) ज्यावेळी तुम्ही हिमालयापासून प्रवासाला सुरुवात करता त्यावेळेस खालील बाबी आढळतात.....
अ) खोल दर्या
ब) युटर्न घेणार्या नद्या व ओढे
क) समांतर पर्वतरांगा
ड) अणकुचीदार सुळके
वरीलपैकी कोणते घटक हे हिमालय पर्वत हा घडीचा पर्वत आहे हे दर्शवितात त्याबाबत योग्य पर्याय निवडा.
1) फक्त अ व ब
2) अ, ब व ड
3) फक्त क व ड
4) अ, ब क आणि ड
23) हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदीखोर्यांच्या पलीकडे स्थित पर्वत श्रृंखलेला काय म्हणतात ?
1) मुख्य हिमालय (बृहद हिमालय)
2) ट्रान्स हिमालय
3) दुय्यम हिमालय
4) शिवालिक
24) खालील पर्वत रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावून खाली दिलेल्या प्रणालीपैकी कोणती प्रणाली बरोबर आहे, ती निवडा :
अ) काराकोरम रांग
ब) लद्दाख रांग
क) पिरपंजाल रांग
ड) आस्कर रांग
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब, क, ड
2) ब, अ, ड, क
3) ब, अ, क, ड
4) अ, ब, ड, क
25) झासकर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान ........ हिमालयात आहे.
1) कुमाऊं
2) काश्मीर
3) पूर्व
4) मध्य
26) खालील नकाशामध्ये पश्चिम हिमालयातील चार पर्वत रांगा 1, 2, 3, 4 अंकांनी दाखविलेल्या आहेत. या पर्वत रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?
1) झास्कर, लडाख, पिरपांजाळ, काराकोरम
2) पिरपांजाळ, झास्कर, लडाख, काराकोरम
3) काराकोरम, लडाख, झास्कर, पिरपांजाळ
4) लडाख, झास्कर, पिरपांजाळ, काराकोरम
27) जोड्या लावा :
स्तंभ A स्तंभ B
a) पंजाब हिमालय i) काळी आणि तिस्ता नदीमधील हिमालय
b) आसाम हिमालय ii) सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालय
c) नेपाळ हिमालय iii) सतलज आणि काळी नदीमधील हिमालय
d) कुमाऊ हिमालय iv) दिहांग व तिस्ता नदीमधील हिमालय
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (iv) (ii) (iii) (i)
2) (ii) (iv) (i) (iii)
3) (i) (iii) (iv) (ii)
4) (ii) (iv) (iii) (i)
28) खालील विधाने पहा :
अ) नंदादेवी शिखराची उंची 7817 मी. आहे.
ब) हिमालयातील जोजीला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो.
क) बद्रिनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त विधान ब बरोबर आहे.
2) फक्त विधान क बरोबर आहे.
3) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.
4) विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत.
29) पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा :
अ) नंदा देवी
ब) कांचनजंगा
क) गंगोत्री
ड) बद्रीनाथ
इ) नंगा पर्वत
पर्यायी उत्तरे :
1) ब, अ, इ, क, ड
2) ब, इ, अ, क, ड
3) ब, इ, अ, ड, क
4) अ, ब, इ, ड, क
30) जोड्या लावा :
स्तंभ (खिंडी) स्तंभ (जोडतात)
अ) बनीहाल I) जम्मू - श्रीनगर
ब) बारा लाच्या II) अरुणाचल - ल्हासा
क) बोमडी ला III) अरुणाचल - मंडाले
ड) दिहांग IV) मंडी - लेह
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) I IV II III
2) IV I II III
3) I IV III II
4) III I II IV
उत्तरे
1-2
2-1
3-2
4-2
5-4
6-2
7-3
8-4
9-1
10-3
11-3
12-2
13-4
14-2
15-3
16-4
17-4
18-3
19-2
20-1
21-4
22-4
23-2
24-4
25-2
26-3
27-2
28-3
29-2
30-1