सरस्वती सन्मान पुरस्कार 2020 / प्रश्नमंजुषा (123)

  • सरस्वती सन्मान पुरस्कार 2020 / प्रश्नमंजुषा (123)

    सरस्वती सन्मान पुरस्कार 2020 / प्रश्नमंजुषा (123)

    • 10 Apr 2021
    • Posted By : Study Circle
    • 523 Views
    • 0 Shares

    प्रश्नमंजुषा (123)

    1) 2020 सरस्वती सन्मान पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना मिळाला. त्यांनी  पुढीलपैकी कोणती साहित्यकृती लिहिलेली नाही?
    अ) ज्ञानगंगा घरोघरी
    ब) राणीमाशी
    क) दलित पँथर
    ड) हिंदू
    इ) ओ
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब, क, ड, इ
    2) ब, क आणि ड
    3) ब, क अणि इ
    4) यापैकी नाही

    2) खालीलपैकी कोणते विधान शरणकुमार लिंबाळे यांच्याबाबत असत्य आहे?
    1) त्यांचे साहित्य भारतातील अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
    2) ते मराठीतील ज्येष्ठ  कवी, आत्मकथनकार, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक व विचारवंत आहेत. 
    3) भारतीय परिप्रेक्ष्यातील ग्रामीण लेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. 
    4) 2021 पर्यंत त्यांच्या नावावर 40 पेक्षाही जास्त पुस्तके आहेत. 

    3) सरस्वती सन्मान प्राप्त मराठी व कोकणी भाषेतील पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
    a) आवठण 
    b) सनातन
    c) कन्यादान 
    d)  युगांत 
    पर्यायी उत्तरे :
    1) (d),  (a), (b), (c)
    2) (d),  (b), (c), (a)
    3) (c),  (d), (a), (b)
    4) (a), (c), (b), (d)

    4) सरस्वती सन्मान पुरस्कारा पुरस्कार ...... संस्थापित झाला. 
    1) 1981
    2) 1991
    3) 2001 
    4) 1971

    5) ‘ सरस्वती सन्मान पुरस्कारा‘ बाबतीत खालील विधाने विचारात घ्या ः
    a) पुरस्काराचे स्वरूप 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह आहे. 
    b) त्यास भारताचा साहित्यांसाठी असलेला दुसरा सर्वोच्च सन्मान असे समजले जाते.
    c) प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनाच्या निमित्ताने 5 एप्रिल रोजी तो दिला जातो.
    वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
    1) फक्त (a)
    2) (a) आणि (b)
    3) (b) आणि (c)
    4) (a), (b) आणि (c)

    6) पहिला सरस्वती सन्मान पुरस्कार ...... यांना देण्यात आला होता.
    1) रमाकांत रथ
    2) विजय तेंडुलकर
      3) हरिवंशराय बच्चन
    4) शम्सुर्रहमान फारुकी

    7) पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा ः
    अ) डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी 2004 मध्ये इचलकरंजी येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
    ब) त्यावेळी त्यांचे अक्करमाशी हे आत्मचरित्र प्रचंड गाजले होते.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्हीही
    4) वरीलपैकी एकही नाही

    8) युगांत या साहित्य कृतीसाठी महेश एलकुंचवार यांना 2002 साली सरस्वती सन्मान पुरस्कार देऊन गौरविले गेले होते. ही साहित्यकृती कोणत्या प्रकारातील आहे ?
    1) आत्मचरित्र
    2) कथासंग्रह
    3) कादंबरी
    4) नाटक

    9) ‘सनातन’ या कादंबरी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
    1) ही कांदबरी मुघल व ब्रिटीश कालखंडातील इतिहासावर प्रकाश टाकते. 
    2) ही कांदबरी रायनाक महार, सिदनाक महार, गोविंद महार यांची यशोगाथा आहे.
    3) ही कांदबरी संशोधनपर असल्याने शरणकुमार लिंबाळे यांनी त्यावर पीएच.डी. केली. 
    4) 2020 मध्ये ही कादंबरी दिलीपराज प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रसिद्ध झाली. 

    10) विजय तेंडुलकर यांना 1993 साली खालीलपैकी कोणता बहुमान देऊन सन्मानित करण्यात आले होते?
    1) सरस्वती सन्मान पुरस्कार 
    2) ज्ञानपीठ पुरस्कार
      3) मूर्तीदेवी पुरस्कार
      4) साहित्य अकादमी पुरस्कार

    11) जोड्या जुळवा.
    a) रामानुजार                        i)  तामीळ नाटक
    b) रामायण माहनेस्वरम        ii) कन्नड कविता संग्रह
    c) युगांत                        iii) मराठी नाटक
    d) भगीरथी                      iv) संस्कृत कविता संग्रह
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c)   (d)
    1)   (i)   (ii)   (iii)   (iv)
    2)   (ii)   (i)   (iii)   (iv)
    3)   (iv)   (iii)   (ii)   (i)
    4)   (iii)   (iv)    (i)   (ii)

    12) 2019 चा ‘सरस्वती सन्मान पुरस्कार’ वासदेव मोही यांना त्यांच्या चेकबुक या लघुकथा संग्रहाला मिळाला होता. त्यांनी तो कोणत्या भाषेत लिहिला आहे?
    1) अनिल धारेकर
    2) सिंधी
      3) अमिताव घोष 
    4) किरण नगरकर

    13) डॉ. शरण कुमार लिंबाळे यांच्या संदर्भात काय खरे आहे?
    a) त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे प्राध्यापक व विविध केंद्रांचे संचालक म्हणून केले.
    b) त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा आविष्कृत होते.
    c) सनातन कादंबरीचे लेखन त्यांनी कोरगाव-भीमाच्या लढाईच्या शतकमहोत्सवी टप्प्यावर केले आहे. 
    d) ’अक्करमाशी’ हे त्यांचे आत्मकथन आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b), (c) फक्त
    2) (b), (c), (d) फक्त
    3) (a), (b), (d) फक्त
    4) (a), (b), (c) आणि (d)

    14) ‘सरस्वती सन्मान‘ हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ...... फाउंडेशन तर्फे दिला जातो.
    1) आकांक्षा
    2) के. के. बिर्ला
    3) अमृत
    4) जे. सी. बी. साहित्य 

    15) जोड्या जुळवा.
    a) रमाकांत रथ                        i)  श्रीराधा 
    b) विजय तेंडुलकर                    ii) कन्यादान
    c) हरिभजन सिंह                     iii) रुख ते ऋषी 
    d) श्रीमती बालामणि अम्मा       iv) निवेदिम
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c)   (d)
    1)   (iii)   (iv)   (i)   (ii)
    2)   (iv)   (iii)   (ii)   (i)
    3)   (i)   (ii)   (iii)   (iv)
    4)   (ii)   (i)   (iv)   (iii)

    16) दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनने साहित्यिक पुरस्कार देण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमधील  किती भाषांना मान्यता दिलेली आहे ?
    1) 20
    2) 24
    3) 22 
    4) 21

    17) जोड्या लावा :
            (लेखक)                                            (पुस्तके)
    अ) सुरजीत पातर                  I)  इअरमा कथाउम इरामयाकुलम
    ब) एस. एल. भैरप्पा              II)  मनलयझुथु 
    क) ए. ए. मानवालन             III) लफ्जों की दरगाह 
    ड) सुगथा कुमारी IV) मन्द्र
    पर्यायी उत्तरे :
      अ   ब   क   ड
    1)   IV   III   II   I
    2)   IV   II   III   I
    3)   III   IV   II   I
    4)   III   IV     I   II

    18) डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ग्रंथसंपदेबाबत चुकीची जोडी ओळखा.
    1) कथासंग्रह -‘उत्पात’, ‘श्र्वेतपत्रिका’
    2) समीक्षा ग्रंथ - ‘बारामाशी’ आणि ‘राणीमाशी’ 
    3) संपादने - ‘शतकातील दलित विचार’, ‘दलित प्रेमकविता’
    4) कादंबर्या -‘उचल्या’, ‘भिन्नलिंगी’

    19) पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे ?
    a)  त्यांनी अहमदपूर (जि. लातूर) येथे टेलिफोन खात्यात नोकरी केली होती.
    b) ‘दलित साहित्याच्या समीक्षेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधनासाठी त्यांना  पीएच.डी. प्राप्त झाली. 
    c) ऑक्सफर्ड पब्लिकेशनने त्यांच्या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद ‘द आऊट कास्ट’ या नावाने केला आहे. 
    d) 2019 मध्ये त्यांना ’प्रा. रा.ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार’ दिला गेला.
    पर्यायी उत्तरे :
    1) लक्ष्मण गायकवाड
    2) लक्ष्मण माने
    3) नामदेवराव ढसाळ
    4) शरणकुमार लिंबाळे

    20) खालीलपैकी कोणत्यासाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. शरणकुमार लिंबाळे  यांनी  भूषविले होते ?
    1) 12 वे अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन नांदेड, 2011
    2) अस्मितादर्श साहित्य संमेलन इचलकरंजी, 2004
    3) राज्यस्तरीय अंकुर मराठी साहित्य संमेलन, बार्शी 2010
    4) वरील सर्व

    21) खालील जोड्या अचूक जुळवा :
             स्तंभ अ (साहित्य प्रकार)                स्तंभ ब (पुस्तक)
    अ. कादंबरी                                    I. श्र्वेतपत्रिका
    ब. कथासंग्रह                                  II. वादंग
    क. कवितासंग्रह                             III. रथयात्रा
    ड. समीक्षा ग्रंथ                              IV. रामराज्य
    पर्यायी उत्तरे :
      अ   ब   क   ड
    1)   II   III   I   IV
    2)   II   I   III   IV
    3)   III   II   IV    I 
    4)   IV   III   I   II  

    22) ’आवठण‘  या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
    1)  वीरप्पा मोइली
    2)  महाबलेश्र्वर साईल
    3)  डॉ. शरण कुमार लिंबाळे 
    4)  शीतानंशु यशचन्द्र

    23) पुढीलपैकी कोणत्या पुस्तकांचे लेखन डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी केले आहे ?
    a) भिन्नलिंगी
    b) उचल्या
    c) बहुजन
    d) गावकुसाबाहेरील कथा
    e) रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (c) आणि (e) फक्त
    2) (b), (c), (d) आणि (e) फक्त
    3) (a), (b), (c) आणि (d) फक्त
    4) (a), (b), (c), (d) आणि (e)

    24) ‘सरस्वती सन्मान‘ प्राप्त ’कुरुक्षेत्र ‘ या पुस्तकाच्या लेखक/लेखिका कोण आहेत ?
    1) मधु भटनागर
    2)  वंदना शिवा
      3)  डॉ इंदिरा पार्थसारथी
    4)  मनुभाई पाँचोली दर्शक 

    25) ’सरस्वती सन्मान ’ पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या ः
    अ) हा पुरस्कार दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशन द्वारा 1991 पासून दिला जातो
    ब) दरवर्षी हा पुरस्कार फक्त एकाच लेखकास दिला जातो.
    क) हा पुरस्कार लेखकाच्या साहित्यातील एकूण योगदानाबद्दल दिला जातो.
    ड) 2019 चा पुरस्कार वासदेव मोही यांना घोषित झाला होता.
    वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
    1) अ, ब आणि क
    2) ब, क आणि ड
    3) अ, ब आणि ड
    4) अ, ब, क आणि ड

    26) 2019 च्या भोसरी (पुणे) येथे भरलेल्या 20 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
    1) प्रा. रा.ग. जाधव
    2) डॉ. अक्षयकुमार काळे
    3) डॉ. शरणकुमार लिंबाळ
    4) यापैकी नाही 

    27) 2020 च्या सरस्वती सन्मान पुरस्कार विजेत्या शरणकुमार लिंबाळे  यांचा जन्म 1956 साली ”हन्नूर” या गावी झाला. हे गाव कोठे आहे ?
    1)  कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात 
    2) जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात 
    3) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात 
    4) बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात 

    28) के. के. बिर्ला फाउंडेशनचा, 2020 चा सरस्वती सन्मान पुरस्कार  कोणाला देण्यात आला होता?
    1) डॉ. रंगनाथ पाठारे
    2) डॉ. मिलिंद जोशी
    3) डॉ. शरणकुमार लिंबाळे 
    4) डॉ. अशोक कामत 

    29) मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या कोणत्या कादंबरीतील ” गो हत्या केली म्हणून ज्यांची हत्या केली त्यांना... ” या अर्पणपत्रिकेतील वाक्यातून समकालातील सांस्कृतिक दहशतवाद अभिव्यक्त होतो ?
    1) उचल्या
    2) सनातन
      3) झुंड
    4) दंगल

    30) 2017 साहित्याचे नोबेल पारितोषिक काझुओ इशिगुरो यांना मिळाले होते. त्यांनी  पुढीलपैकी कोणती साहित्यकृती लिहिलेली नाही?
    अ) द रिमेन्स ऑफ द डे
    ब) ए पेल व्हू ऑफ हिल्स
    क) अॅंन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड
    ड) नॉर्वेजियन वुड
    इ) काफ्का ऑन द शोअर
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब, क, ड, इ
    2) ब, क आणि ड
    3) ब, क अणि इ
    4) ड आणि इ

    31) ’ज्ञानपीठ’ पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या ः
    अ) हा पुरस्कार भारत सरकार द्वारा 1952 पासून प्रायोजिक आहे.
    ब) 1982 च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता.
    क) आता लेखकाच्या जीवनातील योगदानाबद्दल दिला जातो.
    ड) 2017 चा पुरस्कार कृष्णा सोबती यांना घोषित झाला आहे.
    वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
    1) अ, ब आणि क
    2) ब, क आणि ड
    3) अ आणि ड
    4) अ, ब, क आणि ड

    32) 2017 च्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कृष्णा सोबती यांचा जन्म 1925 साली, आता पाकिस्तान मध्ये असलेल्या पूर्वीच्या पंजाबच्या ...... जिल्ह्यांमध्ये झाला.
    1) गुजरात
    2) गुजरानवाला
    3) झेलम 
    4) लाहोर 

    33) महाराष्ट्र शासनाचा, यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार  कोणाला देण्यात आला होता?
    1) डॉ. रंगनाथ पाठारे
    2) डॉ. मिलिंद जोशी
    3) डॉ. अविनाश बिनीवाले
    4) डॉ. अशोक कामत 

    34) “ऑल द लाईव्ज वी नेव्हर लिव्हड्“ या ...... यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा समावेश 2018 च्या जेसीबी साहित्य पुरस्काराच्या दहा पुस्तकांच्या मोठ्या निवड यादीत (लाँगलिस्ट) करण्यात आला होता.
    1) नयनतारा सेहगल
    2) अनुराधा रॉय
      3) चंद्रहास चौधरी 
    4) शुभांगी स्वरूप 

    35) 2017 चा ‘टाटा लिटरेचर लाईव्ह ! लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड (जीवन गौरव पुरस्कार) कोणाला मिळाला होता?
    1) अनिल धारेकर
    2) गिरीश कर्नाड
      3) अमिताव घोष 
    4) किरण नगरकर

    36) 2018 च्या बडोदा येथील अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
    1) लक्ष्मीकांत देशमुख
    2) डॉ. अक्षयकुमार काळे
    3) डॉ. श्रीपाल सबनीस
    4) डॉ. सदानंद मोरे

    37) जोड्या जुळवा.
    a) गोविंदाग्रज          i)  रामचंद्र वि. टिकेकर
    b) बालकवी            ii)  द्वारकानाथ मा. पितळे
    c) धनुर्धारी            iii)  राम गणेश गडकरी
    d) नाथमाधव        iv)  त्र्यंबक बा. ठोंबरे
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c)   (d)
    1)   (iii)   (iv)   (i)   (ii)
    2)   (iv)   (iii)   (ii)   (i)
    3)   (i)   (ii)   (iii)   (iv)
    4)   (ii)   (i)   (iv)   (iii)

    38) अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात काय खरे आहे?
    a)  त्यांनी ’लाल बावटा कलापथक’ स्थापन केले.
    b)  त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
    c)  फकिरा कादंबरीत त्यांनी वास्तव, आदर्श व स्वप्नरंजन यांचे मिश्रण केले.
    d) ’माझा अमेरिका प्रवास’ हे त्यांचे प्रवासवर्णन आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b), (c) फक्त
    2) (b), (c), (d) फक्त
    3) (a), (b), (d) फक्त
    4) (a), (b), (c) आणि (d)

    39) ‘व्यास सन्मान‘ हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ...... फाउंडेशन तर्फे दिला जातो.
    1) आकांक्षा
    2) के. के. बिर्ला
    3) अमृत
    4) जे. सी. बी. साहित्य 

    40) साहित्य अकादमीने साहित्यिक पुरस्कार देण्यासाठी 24 भाषांना मान्यता दिली आहे. त्या भाषा म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमधील 22 भाषा अधिक इंग्रजी अधिक ......
    1) भोजपुरी
    2) भोटी
    3) राजस्थानी 
    4) तुळू 

    41) जोड्या लावा :
            (लेखक)       (पुस्तके)
    अ) शशी थरूर                      I) घाचर घोचर
    ब) रघुराम राजन                  II)  द एण्ड ऑफ कर्मा
    क) सोमीनी सेनगुप्ता           III) आय डू व्हॉट आय डू
    ड) विवेक शानबाग              IV) द ईरा ऑफ डार्कनेस
    पर्यायी उत्तरे :
      अ   ब   क   ड
    1)   IV   III   II    I
    2)   IV   II   III   I
    3)   III   IV   II    I
    4)   III   IV    I   II

    42) ’दि कोएलिशन ईअर्स‘ (The Coalition Years)   या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
    1)  प्रणव मुखर्जी
    2) पी. चिदंबरम
    3) डॉ. मनमोहन सिंग 
    4) कपिल सिब्बल 

    43) ........... हे/ह्या ‘ग्रीन सिग्नल्स : इकॉलॉजी, ग्रोथ अॅुन्ड डेमोक्रसी इन इंडिया‘ या पुस्तकाच्या लेखक/लेखिका आहेत.
    1) मधु भटनागर
    2) वंदना शिवा
      3) चांडी प्रसाद भट्ट 
    4) जयराम रमेश  

    44) पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
    a) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री
    b) द डिस्कव्हरी ऑफ इंडिया
    c) अॅलन ऑटोबायोग्राफी
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b), (c)
    2) (b), (c), (a)
    3) (c), (a), (b)
    4) (a), (c), (b)

    45) जोड्या जुळवा.
    a) लोलींबराजा         i)  शशिसेना काव्य
    b) जगन्नाथ           ii)  रत्नकला चरित्र
    c) जीवन               iii)  अनुभवलहरी
    d) अनामकवी        iv)   सावकार आख्यान
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c)   (d)
    1)   (i)  (ii)   (iii)   (iv)
    2)   (ii)  (i)   (iii)   (iv)
    3)   (iv)  (iii)   (ii)   (i)
    4)   (iii)  (iv)   (i)   (ii)

    46) जोड्या जुळवा.
    a) श्रीराम करुणा             i)  नरहरी
    b) श्री समर्थ करुणा         ii)  गिरिधर
    c) गंगारत्नमाला           iii)  श्रीधर
    d) नवरत्नमाला            iv)  दिनकरस्वामी
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c)   (d)
    1)   (iv)   (ii)   (i)   (iii)
    2)   (i)   (iii)   (ii)   (iv)
    3)   (ii)   (iv)   (iii)   (i)
    4)   (i)   (ii)   (iii)   (iv)

    47) जोड्या जुळवा.
    a) हिरण्यकश्यपू           i)   नृसिंहाने याचा वध केला.
    b) बली                       ii)  विष्णूच्या वामनावताराने याचा वध केला.
    c) नरकासूर                iii)  शिवपत्नी पार्वतीने याचा वध केला.
    d) महिषासुर               iv)  श्रीकृष्णाने याचा वध केला.
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c)   (d)
    1)   (i)   (ii)   (iv)   (iii)
    2)   (ii)   (i)   (iii)   (iv)
    3)   (ii)   (iii)   (i)   (iv)
    4)   (iii)   (iv)   (ii)   (i)

    48) पुढील वाक्ये कोणत्या भाषेविषयीची आहेत?
    ही भाषा एक खास आहे.
    ही भाषा भारतातील सर्वाधिक अल्पसंख्याकांची आहे.
    ही भाषा बोलणारे लोक उ. प्र. बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आहेत.
    1) हिंदी
    2) भोजपुरी
    3) उर्दू
    4) हिंदुस्थानी
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (123)
    1-4
     
    2-3
     
    3-3
     
    4-2
     
    5-1
     
    6-3
     
    7-1
     
    8-4
     
    9-3
     
    10-1
     
    11-1
     
    12-2
     
    13-4
     
    14-2
     
    15-3
     
    16-3
     
    17-4
     
    18-2
     
    19-4
     
    20-4
     
    21-4
     
    22-1
     
    23-4
     
    24-4
     
    25-3
     
    26-4
     
    27-3
     
    28-3
     
    29-2
     
    30-4
     
    31-2
     
    32-1
     
    33-3
     
    34-2
     
    35-2
     
    36-1
     
    37-1
     
    38-1
     
    39-2
     
    40-3
     
    41-1
     
    42-1
     
    43-4
     
    44-4
     
    45-2
     
    46-1
     
    47-1
     
    48-3
     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 523