सौदी अरेबिया व जी-20 शिखर संमेलन

  • सौदी अरेबिया व जी-20 शिखर संमेलन

    सौदी अरेबिया व जी-20 शिखर संमेलन

    • 03 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 46 Views
    • 0 Shares

    सौदी अरेबिया व जी-20 शिखर संमेलन

    1 नोव्हेंबर 2020 - जी 20 समिटचे आयोजन सदैव स्मरणात राहावे म्हणून 24 ऑक्टोबर रोजी सौदी सरकारने 20 रियाल किमतीची एक बँक नोट (चलनी नोट) जारी केली. या नोटेत समोरील बाजूला सौदी राजे राजकुमार सलमान बिन अब्दुल अजीझ यांचे छायाचित्र आहे. मागील बाजूला जगाचा नकाशा आहे. त्यात जी-20 देश नानाविध रंगांत दाखविले आहेत. नकाशातून पाकव्याप्त काश्मीरसह गिलगिट आणि बाल्टिस्तान हे भाग वगळण्यात आले आहेत.

    1) 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी रियाधमध्ये जी-20 शिखर संमेलन नियोजित

    2) राजकुमार सलमान समिटच्या अध्यक्षस्थानी

    3) पॅलेस्टाईन आणि काश्मीबाबत पाकिस्तानचे धोरण समान आहे; पण सौदी अरेबिया आणि इस्रायलचे भारताशी जवळचे संबंध आहेत. राजकुमार सलमान यांच्यालेखी भारताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

    4) पाक दिवाळखोरीच्या वाटेवर असताना ऑगस्टमध्ये कर्जफेड करावी म्हणून पाकच्या मागे सौदीने तगादा लावला होता. काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केले तेव्हा सौदी सरकारने भारताविरुद्ध कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पाकिस्तान म्हणून चीन आणि तुर्कस्तानच्या गोटात आहे.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 46