बेसिक न्यूमरसी प्रश्नपुस्तिका (2)

  •  बेसिक न्यूमरसी प्रश्नपुस्तिका (2)

    बेसिक न्यूमरसी प्रश्नपुस्तिका (2)

    • 04 Feb 2021
    • Posted By : Study Circle
    • 1020 Views
    • 3 Shares
    बेसिक न्यूमरसी प्रश्नपुस्तिका (2)


    1) एका समाजसेवी संघटनेने 43.7 किलो तांदूळ 12 रु. प्रति किलो या दराने विकत घेतला. त्यांनी तो 152 गरीब लोकांमध्ये समप्रमाणात वाटला. तर प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या तांदुळाची किंमत किती ?
    1) 30.40 रु.
    2) 3.45 रु. 
    3) 12.60 रु.
    4) 16.80 रु.

    2) 15 सायकलींची किंमत 16,500/- रु. आहे, तर 11 सायकलींची किंमत काढा.
    1) 12,200/- रु.
    2) 12,100/- रु.
    3) 13,300/- रु.
    4) 12,400/- रु.

    3) मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल  750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे ...... आहे.
    1) 100, 525
    2) 125, 450
    3) 100, 500
    4) 125, 500

    4) तेलाच्या 10 लीटर डब्याची किंमत  1000 आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लीटर किती होईल?
    1) 70
    2) 75
    3) 80
    4) 85

    5) संतोषने रु. 2.75 प्रती समोसा प्रमाणे 50 समोसे खरेदी केले जर त्याने त्याऐवजी 68.75 प्रती किलोप्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती किलो मिठाई मिळाली असती?
    1)   1   किलो   
          2          
    2) 1 किलो
    3)   1   किलो   
          2
    4 ) 2 किलो 

    6) एका अप्रामाणिक व्यापारी 1 कि.ग्रॅ. वजनाऐवजी 900 ग्रॅम वजन वापरतो. या फसवणुकीतील शेकडा नफा काढा ?
    1) 9%
    2) 10%
    3) 1%
    4) 100%

    7) राज अंजूने एक जुनी कार रु. 60,000 ला घेतली. एक वर्षानंतर त्याने ती रु. 45,000 ला विकली, तर शेकडा तोटा किती?
    1) 15
    2) 20
    3) 30
    4) 25

    8) सदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला. त्याने 100 रुपयांची फळे खरेदी करून सदाला 500 रुपयांची नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला त्याने केळी खरेदी करून सदाला शंभराची नोट दिली व वीस रुपये परत घेतले. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदीइतकाच असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील, तर त्याला झालेले नुकसान दर्शवणारा पर्याय निवडा.
    1) 510
    2) 600
    3) 420
    4) 470

    9) दीपक, रु. 36,000 किंमत असलेली स्कूटर विकतो. तो पहिल्या 20,000 रुपयांवर 8% सूट देतो. आणि नंतरच्या 10,000 रुपयांवर 5% सूट देतो. पूर्ण रकमेवर 7% सूट देऊन मिळणार्‍या रकमेइतकी रक्कम मिळविण्यासाठी राहिलेल्या 6,000 रुपयावर त्याने किती सूट द्यावी ?
    1) 5%
    2) 6%
    3) 7%
    4) 8% 

    10) एक विक्रेता ट्रान्झिस्टर रु. 2500 ला खरेदी करतो आणि दुसर्‍या व्यापार्‍याला रु. 2700 ला विकतो. दुसरा विक्रेता ग्राहकाला रु. 2800 ला विकतो. प्रत्येक विक्रीच्या वेळी 12.5% मूल्यवर्धित कर भरावा लागल्यास एकूण मूल्यवर्धित कर -
    1) 350
    2) 365
    3) 895
    4) 1000

    11) 10% नफा घेऊन एक पुस्तक रुपये 27.50 ला विकले. जर ते पुस्तक रुपये 25.75 ला विकले, तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असता ?
    1) 3% तोटा
    2) 2.5% नफा
    3) 3% नफा 
    4) 2.5 तोटा 

    12) 5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत रु. 650 आहे. 3 ताटे व 8 वाट्या यांची किंमत रु. 425 आहे. तर 5 ताटांची किंमत किती ?
    1) रु. 75
    2) रु. 375
    3) रु. 125 
    4) रु. 400 

    13) फक्त काही 500 रुपये किंमतीच्या व काही 2000 रुपये किंमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30500 रुपये आहेत; तर त्या पिशवीत खालील पर्यायांपैकी 500 रुपये किंमतीच्या किती नोटा असू शकतील  ?
    1) 31
    2) 27 
    3) 51
    4) 37 

    14) सिमाकडे असलेल्या 540 आंब्यापैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले. 23 आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत?
    1) 339
    2) 439
    3) 239
    4) 387

    15) दुकानदाराने एका वस्तूची किंमत 50% ने वाढवली तर नंतर 50% ने कमी करून विकली तर दुकानदाराला शेकडा किती नफा किंवा तोटा झाला ?
    1) तोटा 25%
    2) नफा 25%
    3) ना नफा ना तोटा
    4) नफा 50%

    16) एक माणसाने घोडा व घोडागाडी 3,000 रुपयेला खरेदी केली. त्याने घोडा 20% फायद्याने व घोडागाडी 10% तोट्याने विकली तेव्हा त्यास सर्वासाठी 2% फायदा झाला तर घोड्याची खरेदीची किंमत किती ?
    1)  1,200
    2)  2,000
    3)  2,400
    4)  1,500 

    17) एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 एवढा नफा होतो, तर खरेदीची किंमत किती ?
    1) 90
    2) 95
    3) 100
    4) 110

    18) जर खरेदीची किंमत विक्रीच्या किंमतीच्या 80% असेल, तर किती टक्के फायदा होईल?
    1) 20%
    2) 25%
    3) 30%
    4) 50%

    19) एका व्यापार्‍याने एक पेन 75 रुपयाला खरेदी केला व 105 रुपयास विकला, तर त्यास किती टक्के नफा झाला?
    1) 100%
    2) 50%
    3) 40%
    4) 125%

    20) जर सात टेबल व बारा खुर्च्यांची किंमत  48,250 आहे, तर 21 टेबल व 36 खुर्च्यांची किंमत किती?
    1) 96,500
    2) 1,25,500
    3) 1,44,750
    4) 70,250

    21) एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मत मिळून त्याने 1100 मतांनी दुसर्‍या उमेदवारांचा पराभव केला, तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते?
    1) 21,000  
    2) 23,500  
    3) 22,000 
    4) 27,500

    22) एका परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिंदी या विषयात अनुत्तीर्ण झाले, 45% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत. तर एकूण विद्यार्थ्यांच्या शेकडा किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले?
    1) 10
    2) 20
    3) 30
    4) 40

    23) एका नगराच्या वाहतूक विभागाने त्यातील वाहनांची माहिती गोळा केली आहे. याच खाजगी वाहनांच्या तिप्पट सार्वजनिक वाहने आहेत. 20 टक्के सार्वजनिक वाहने पर्यायी इंधनावर धावतात; पैकी 40 टक्के जैविक इंधनावर धावतात, 20 टक्के हायड्रोजन वापरतात आणि उरलेली नैसर्गिक वायूचा उपयोग करतात. 25 टक्के खाजगी वाहने 5 पेक्षा कमी वर्षे  वापरात आहेत आणि हेच प्रमाण नैसर्गिक वायूचा वापर करणार्‍या सार्वजनिक वाहनांच्या बाबतीत निम्मे आहे. या नगरातील किमान 5 वर्षे वापरात असलेल्या व नैसर्गिक वायूवर चालणार्‍या सार्वजनिक वाहनांची टक्केवारी दर्शवणारा पर्याय निवडा ः
    1) 3
    2) 6
    3) 12 
    4) 15 

    24) अमिबा हा आकारहीन एकपेशीय प्राणी आहे. अमिबाचे प्रजोत्पादन साध्या एका पेशीच्या दोन अमिबात विभाजन होण्याच्या पद्धतीने घडते. प्रत्येक विभाजन प्रक्रिया 3 मिनिटांत पूर्ण होते. मध्यान्ही पेट्रिडिशच्या 0.1% भाग अमिबांनी व्यापला होता. कोणत्या वेळी पेट्रिडिश पूर्ण व्यापली जाईल?
    1) 13.00
    2) 13.20
    3) 12.30
    4) 12.45

    25) फळबागेतील 150 झाडांपैकी 12% झाडे आंब्याची आहेत, तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत?
    1) 132
    2) 138
    3) 18
    4) 24

    26) A शहरात 52000 लोकांपैकी 0.30% व्यक्तींकडे मोटार कार आहे. B शहरात 48000 लोकांपैकी 0.25% व्यक्तींकडे मोटार कार आहे. C शहरात 50000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहेत. तर खालील कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शविता येईल?
    1) A > B > C
    2) B < A < C
    3) C < A < B
    4) B < C < A

    27) आशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची गरज असते. तिला 210 गुण मिळतात. तिला पास होण्यासाठी लागणार्‍या गुणांपेक्षा 10 गुण अधिक मिळतात, तर परीक्षेतील अधिकाधिक गुण किती ?
    1) 1000
    2) 500
    3) 250
    4) 300

    28) 14 तास 30 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे ?
    1) 58, 5/12%
    2) 64, 5/12%
    3) 62, 5/12%
    4) 60, 5/12%

    29) 2100 चे 16% = ......
    1) 363
    2) 336
    3) 633
    4) 900

    30) जिग्नेशने एका कंपनीचे 100 शेअर्स प्रत्येकी 1288.55 रु. या दराने घेतले व त्याच दिवशी प्रत्येकी 1338.45 रु. या दराने विकले. जर दलालाचे कमिशन 0.001% खरेदी किंमत व विक्री किंमत या दोहोंवर असेल, तर  जिग्नेशला किती नफा झाला ?
    1) 3827.25 रुपये
    2) 4827.25 रुपये
    3) 4727.30 रुपये
    4) 4527.25 रुपये


    उत्तरे
     
    1-2

    2-2

    3-4

    4-3

    5-4

    6-2

    7-4

    8-1

    9-3

    10-1

    11-3

    12-2

    13-4

    14-1

    15-1

    16-1

    17-3

    18-2

    19-3

    20-3

    21-4

    22-4

    23-1

    24-2

    25-1

    26-2

    27-2

    28-4

    29-2

    30-3

Share this story

Total Shares : 3 Total Views : 1020