राजकीय व्यवस्था प्रश्नपुस्तिका (2)
- 11 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 526 Views
- 1 Shares
1) भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे?
1) सत्ता विभाजन
2) पक्षविरहित लोकशाही
3) न्यायालयीन स्वातंत्र्य
4) लोकशाही विकेंद्रीकरण
2) संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात?
a) अस्थिर शासन
b) मंत्रिमंडळाची हुकूमशाही
c) जुलूमशाही
d) कौशल्यहिनांचे शासन
e) सत्ता विभाजनाच्या विरुद्ध
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c)
2) (c), (d), (e)
3) (a), (b), (c), (d), (e)
4) (a), (b), (d), (e)
3) भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यास ः
a) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत.
b) घटकराज्यांना अधिक अधिकार दिले आहेत.
c) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत.
d) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
1) (a) फक्त
2) (b) फक्त
3) (b) आणि (c) फक्त
4) (c) आणि (d) फक्त
4) घटकराज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
a) घटक राज्यांचे केंद्रासोबतचे संबंध हे संघराज्यीय स्वरूपाचे आहेत. केंद्रशासित प्रदेशांचे केंद्राशी असलेले संबंध एकात्म स्वरूपाचे आहेत.
b) घटक राज्य आणि केंद्र यांच्यात अधिकारांचे वाटप झालेले आहे. केंद्रशासित प्रदेशावर मात्र केंद्र सरकारचेच नियंत्रण असते.
c) केंद्रशासित प्रदेश व घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत/त ?
1) फक्त (a)
2) (a) आणि (c)
3) (a) आणि (b)
4) फक्त (c)
5) खालीलपैकी भारतीय संघराज्यांसंदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे ?
1) दुहेरी नागरिकत्व
2) दुहेरी शासनव्यवस्था
3) लिखित राज्यघटना
4) सत्ता विभाजन
6) खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यघटनेतील केंद्र-राज्ये यांच्यातील प्रशासकीय संबंध (अनुच्छेद 256) आणीबाणी विषयक तरतुदी (अनुच्छेद - 352, 353, 356) या 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणार्या आहेत.
ब) राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारा संबंधीच्या तरतुदी देखील 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते, त्याच्याशी जुळणार्या आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) विधान अ बरोबर आहे, ब चुकीचे आहे.
2) विधान ब बरोबर आहे, अ चुकीचे आहे.
3) दोन्हीही विधाने बरोबर आहेत.
4) दोन्हीही विधाने चुकीची आहेत.
7) भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 371 (2) खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांशी संबंधीत आहे ?
1) जम्मू आणि काश्मीर
2) महाराष्ट्र आणि गुजरात
3) नागालँड आणि मणिपूर
4) आंध्र प्रदेश आणि तेलंगणा
8) भारतातील संसदीय शासनपद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे.
ब) तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो.
क) राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतो.
ड) मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरीत्या जबाबदार असते.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब, क
2) ब, क, ड
3) अ, क, ड
4) अ, ब, ड
9) भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा -
A) संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य I) सर आयव्हर जेनिंग्ज
B) पूर्णपणे संघराज्यही नाही पूर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले II) ग्रॅनव्हीले ऑस्टीन
C) प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य III) दुर्गा दास बसू
D) एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य IV) के. सी. व्हिअर
पर्यायी उत्तरे :
A B C D
1) IV III I II
2) I II III IV
3) III IV II I
4) II I IV III
10) भारतीय संघराज्यातील राज्ये व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवा ः
अ (राज्य) ब (स्थापना वर्ष)
a) नागालँड i) 2000
b) मणिपूर ii) 1987
c) गोवा iii) 1972
d) झारखंड iv) 1963
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (iv) (iii) (ii) (i)
2) (i) (ii) (iii) (iv)
3) (iii) (iv) (i) (ii)
4) (ii) (i) (iv) (iii)
11) राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा :
अ) हरियाणा
ब) मेघालय
क) तेलंगणा
ड) झारखंड
इ) गुजरात
पर्यायी उत्तरे :
1) (इ), (अ), (ब), (ड), (क)
2) (अ), (इ), (ब), (ड), (क)
3) (ब), (अ), (इ), (ड), (क)
4) (इ), (ब), (अ), (ड), (क)
12) गटात न बसणारा शब्द ओळखा -
दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड, हरियाणा
1) दिल्ली
2) लक्षद्वीप
3) चंदीगड
4) हरियाणा
13) खालील विधाने विचारात घ्या :
अ) 1975 साली 36 वी घटनादुरुस्ती करून सिक्कीमला भारतीय पूर्ण घटकराज्याचा दर्जा देण्यात आला.
ब) भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 (क) नुसार सिक्कीम विधानसभेची सदस्य संख्या 30 पेक्षा कमी असणार नाही असे ठरविण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
1) फक्त (अ)
2) फक्त (ब)
3) (अ) आणि (ब)
4) वरीलपैकी नाही
14) खालील विधाने विचारात घ्या :
अ) 1953 मध्ये केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली.
ब) 2014 मध्ये भारतीय संसदेने आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याला मंजुरी दिली.
क) तेलंगणा हे भारतातील 29 वे राज्य आहे.
ड) तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014 रोजी झाली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) फक्त अ आणि ब
2) फक्त ब आणि क
3) फक्त क आणि ड
4) अ, ब, क आणि ड
15) खालील विधाने विचारात घ्या :
अ) 1947 पर्यंत सिक्कीम हे भारतीय संस्थापिक राज्य होते.
ब) 1974 साली 35 व्या घटनादुरुस्तीने सिक्कीम हे भारतीय संघराज्याचे “सोबती/संगत (असोसिएट) राज्य“ बनले.
क) सिक्कीम राज्याची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात आहे.
ड) 1975 मध्ये 36 व्या घटनादुरुस्तीने सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/त ?
1) (अ), (ब) आणि (ड)
2) (अ), (ब) आणि (क)
3) (ब), (क) आणि (ड)
4) (अ), (क) आणि (ड)
16) खाली नमूद केलेली राज्ये निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे?
a) नागालँड
b) आंध्र प्रदेश
c) हरियाणा
d) महाराष्ट्र
योग्य पर्याय निवडा :
1) (a), (b), (c) व (d)
2) (a), (b), (d) व (c)
3) (b), (a), (d) व (c)
4) (b), (d), (a) व (c)
17) समवर्ती सूचीमध्ये ...... विषयांचा समावेश आहे.
1) 35
2) 47
3) 66
4) 97
18) केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या .......... भागामध्ये आहेत.
1) नवव्या
2) अकराव्या
3) तेराव्या
4) सोळाव्या
19) भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 6 मध्ये ...... या चार घटकराज्य क्षेत्रामधील जनजाती (जमाती) क्षेत्रांची प्रशासनाबाबत तरतूद आहे.
1) अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोराम आणि मेघालय
2) मणिपूर, नागालँड, मेघालय आणि आसाम
3) आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा
4) आसाम,मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम
20) आज भारतात एकूण राज्ये व केंद्रप्रशासीत प्रदेश तेवढीच आहेत जेवढे महाराष्ट्र राज्यात जिल्हे आहेत.
आता सांगा की :
1) वरील विधान योग्य आहे
2) आकडेवारी बिलकुलच जुळत नाही
3) भारतात एक राज्य/केंद्रप्रशासीत प्रदेश अधिक आहे
4) महाराष्ट्रात एक जिल्हा अधिक आहे.
21) द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती ......... या दिवशी झाली.
1) 1 मे 1960
2) 1 नोव्हेंबर 1956
3) 1 मे 1966
4) 1 जून 1975
22) खालील विधाने विचारात घ्या :
अ) जम्मू आणि काश्मीर राज्याला 370 च्या कलमान्वये विशेष दर्जा देण्यात आला आहे.
ब) जम्मू आणि काश्मीर राज्याची राज्यघटना 26 जानेवारी, 1957 पासून अंमलात आली.
क) जम्मू आणि काश्मीर राज्याच्या राज्यघटनेत 258 कलमे आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) अ आणि ब
2) ब आणि क
3) अ आणि क
4) अ, ब आणि क
23) खालील कारणांसाठी केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली जातेः
a) प्रशासकीय दृष्ट्या
b) सांस्कृतिक वेगळेपण
c) व्यूहनीतीच्या दृष्टीने
d) केंद्राच्या मर्जीनुसार
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c)
2) (b), (c), (d)
3) (c), (d), (a)
4) वरील सर्व
24) खालील विधाने विचारात घ्या :
a) केंद्र आणि राज्ये यामधील कायदेविषयक संबंध राज्य-घटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-245 ते 255 मध्ये सांगितलेले आहेत.
b) केंद्र आणि राज्ये यामधील आर्थिक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-256 ते 263 मध्ये सांगितलेले आहेत.
c) केंद्र आणि राज्ये यामधील प्रशासकीय संबंध राज्यघटनेच्या बाराव्या भागातील अनुच्छेद-268 ते 293 मध्ये सांगितलेले आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त विधान (a) बरोबर
2) विधाने (a) आणि (b) बरोबर
3) विधाने (a), (b) आणि (c) बरोबर
4) विधाने (b) आणि (c) बरोबर
25) राज्यघटनेतील केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्तावाटप कोणत्या कायद्यातील तरतुदीवर आधारीत आहेत?
1) मॉर्लेमिंटो सुधारणा कायदा 1908-09
2) माँटेग्यू चेल्म्सफोर्ड कायदा 1919
3) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935
4) इंडियन इनडिपेंडन्स अॅक्ट 1947
26) खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढमताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती.
ब) राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडीयन पद्धत स्वीकारली.
क) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे. परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1) अ आणि ब
2) ब आणि क
3) अ आणि क
4) अ, ब आणि क
27) युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणार्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत ?
योग्य पर्याय निवडा.
a) केंद्र व राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदींमध्ये केंद्र बदल करू शकते.
b) राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते.
c) राज्य सूचीमध्ये अंतर्भूत कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते.
d) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचार्यांना पगारात कपात करण्याचे आदेश देऊ शकते.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (c), (d)
2) (a), (b), (d)
3) (a), (b), (c)
4) (b), (c), (d)
28) आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय संसद संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या काही भागासाठी कायदा करू शकते -
1) सर्व राज्य सरकारांच्या सहमतीने
2) बहुसंख्य राज्य सरकारांच्या सहमतीने
3) संबंधित राज्य सरकारांच्या सहमतीने
4) कोणत्याही राज्य सरकारच्या सहमतीशिवाय
29) विभागीय परिषदांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाहीत ?
अ) विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत.
ब) 1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे.
क) केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो.
ड) भारतात एकूण सात विभागीय परिषदा देशातील एकूण सात विभागांसाठी निर्माण करण्यात आल्या आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि क
2) फक्त अ आणि ड
3) फक्त अ, क आणि ड
4) वरीलपैकी सर्व
30) खालील विधाने लक्षात घ्या :
अ) कलम 3 नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे.
ब) वरील बदल करण्यासाठी जे विधेयक संसदेसमोर मांडले जाईल त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची गरज नाही.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहे/आहेत?
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्हीही
4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तरे
1-4
2-4
3-1
4-3
5-1
6-1
7-2
8-1
9-1
10-1
11-1
12-1
13-3
14-4
15-1
16-4
17-2
18-2
19-4
20-1
21-2
22-1
23-1
24-1
25-3
26-4
27-4
28-4
29-2
30-1