महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल प्रश्नपुस्तिका (2)

  • महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल प्रश्नपुस्तिका (2)

    महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल प्रश्नपुस्तिका (2)

    • 09 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 2806 Views
    • 4 Shares
    1) खालील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    अ) महाराष्ट्राच्या उत्तर भागातून 200  300 उत्तर हे अक्षवृत्त जाते.
    ब) महाराष्ट्राच्या पूर्व भागातून 800 पूर्व हे रेखावृत्त आहे.
    क) कळसुबाई हे 1646 मी. उंचीचे अतिउच्च शिखर उत्तर सह्याद्रीमध्ये महाराष्ट्रात स्थित आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ आणि ब
    2) ब आणि क
    3) अ आणि क
    4) वरील सर्व

    2) ’खलाटी’ हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
    1) कोकण किनार्‍यावरील वाळूचे दांडे    
    2) कोकणचा पश्चिमेकडील सागर किनार्‍यालगतचा सखल भाग
    3) कोकण किनार्‍यावरील पुळण          
    4) कोकणातील भाताचे शेत

    3) खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?
    1) वसई, जैतापूर, देवगड, जयगड
    2) वसई, जयगड, जैतापूर, देवगड
    3) वसई, जैतापूर, जयगड, देवगड
    4) वसई, जयगड, देवगड, जैतापूर  

    4) त्रिवार्थी ने केलेल्या हवामानाच्या वर्गीकरणानुसार विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील हवामान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
    1) Af
    2) Am
    3) Aw
    4) As

    5) येथील हवामान उष्ण आणि शुष्क आहे. अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे साधारणत: 65 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. या तालुक्यात जिल्ह्यातील महत्त्वाचे गिरिस्थान सुद्धा आहे.
    वरील वर्णन कोणत्या जिल्ह्याला लागू पडते ?
    1) ठाणे जिल्हा
    2) अकोला जिल्हा
    3) अहमदनगर जिल्हा
    4) परभणी जिल्हा 

    6) तापी खोर्‍यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे ?
    1) किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
    2) पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
    3) किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण
    4) फक्त पठारी अंतर्भागातील हवामान 

    7) खालील विधाने पहा :
    अ) महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
    ब) 1901 मध्ये मालेगाव येथे 1.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त विधान (अ) बरोबर आहे.
    2) फक्त विधान (क) बरोबर आहे.
    3) विधान (अ) आणि (ब) बरोबर आहेत.
    4) विधान (अ) आणि (क) बरोबर आहेत.
     
    8) उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही सर्व वैशिष्ट्ये कोणाची आहेत ?
    1) मुंबई विभाग
    2) मराठवाडा विभाग
    3) नागपूर विभाग
    4) नाशिक विभाग 

    9) खालील महाराष्ट्राच्या नकाशातील दोन समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण दर्शवितात ?


    1) जानेवारी
    2) एप्रिल
    3) जुलै
    4) ऑक्टोबर 

    10) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?
    1) अलिबाग
    2) पुणे
    3) कोल्हापूर
    4) नागपूर

    11) कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते?
    1) जास्त पर्जन्य
    2) सागर किनारा
    3) उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने
    4) पश्चिम घाट

    12) कोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत जाते.
    1) उत्तरेकडून दक्षिणेकडे
    2) दक्षिणेकडून उत्तरेकडे
    3) पश्चिमेकडून पूर्वेकडे
    4) वरीलपैकी एकही नाही

    13) सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? 
    1) अति पर्जन्याचा प्रदेश
    2) ओल्या दुष्काळाचा प्रदेश 
    3) पर्जन्य छायेचा प्रदेश
    4) तराई

    14) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?
    1) सांगली
    2) अहमदनगर
    3) सोलापूर
    4) वरील सर्व

    15) महाराष्ट्रातील दुष्काळ प्रवण प्रदेशात ...... मि.मी. वार्षिक पाऊस पडतो.
    1) 1000 ते 1500 मि.मी.
    2) 750 ते 850 मि.मी.
    3) 600 ते 750 मि.मी.
    4) 850 ते 950 मि.मी.

    16) जोड्या जुळवा :
    अति पर्जन्याची ठिकाणे जिल्हे
    अ) आंबोली i) रायगड
    ब) माथेरान ii) कोल्हापूर
    क) खंडाळा iii) सिंधुदुर्ग
    ड) गगनबावडा iv) पुणे
    पर्यायी उत्तरे :
    (अ) (ब) (क) (ड)
    1) (I) (II) (III) (IV)
    2) (II) (III) (IV)   (I)
    3)  (III) (I)   (IV)   (II)
    4) (IV) (III)   (II) (I)

    17) मान्सूनपूर्व पडणार्‍या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात ...... म्हणतात.  
    1) चेरी-ब्लॉझम-शॉवर्स
    2) कालबैसाखी
    3) नार्वेस्टर
    4) आम्रसरी

    18) खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?
    1) माथेरान
    2) आंबोली
    3) रामटेक
    4) लोणावळा

    19) महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वार्‍यापासून पडणार्‍या पावसाचे प्रमाण किती आहे?
    1) 65%
    2) 50%
    3) 85%
    4) 100%

    20) औरंगाबाद विभागातील पर्जन्यमानासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
    1) नांदेडमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त पाऊस पडतो.
    2) बीडमध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडतो.
    3) बहुतांश जिल्ह्यांमध्ये, जून महिन्यातील पाऊस जवळजवळ शून्य असतो.
    4) उस्मानाबाद जिल्ह्यात विभागातील सर्वात कमी पाऊस.

    21) खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते ?
    1) स्थलीय विविधता   
    2) कालीय विविधता
    3) स्थल-कालीय विविधता 
    4) यापैकी नाही  

    22) महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वार्‍यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो ?
    1) मराठवाडा
    2) कोकण
    3) खानदेश
    4) विदर्भ

    23) मोसमी पावसाचे प्रमाण व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा.
    a) 40 ते 50 से.मी. i) लातूर
    b) 50 ते 75 से.मी ii) नागपूर
    c) 75 ते 100 से.मी iii) सांगली
    d) 100 ते 150 से.मी. iv) बुलढाणा
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    1) (ii) (i) (iv) (iii)
    2) (i) (iii) (ii) (iv)
    3) (iii) (iv) (i) (ii)
    4) (iv) (ii) (iii)  (i)

    24) खालील विधाने पहा :
    a) मुंबईमध्ये 26 जुलै 2005 रोजी 900 मि. मी. पेक्षा जास्त पाऊस पडला होता.
    b) मावळ प्रदेशात पूर्वेकडे पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते.
    c) दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते.
    पर्यायी उत्तरे -
    1) विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.
    2) विधान (a) आणि (c) बरोबर आहेत.
    3) विधान (b) आणि (c) बरोबर आहेत.
    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

    25) कोकण प्रदेशामध्ये जास्त पर्जन्य आणि जास्त तापमान असल्यामुळे :
    a) तेथे जांभी मृदा आढळते
    b) तेथील मातीचा पी.एच. 7 ते 7.5 असतो.
    c) तेथे रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणावर होते.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त विधान (a) बरोबर आहे.
    2) फक्त (a) आणि (b) बरोबर आहेत.
    3) फक्त (b) आणि (c) बरोबर आहेत.
    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

    26) सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस, पूर्व-पश्चिम पसरलेल्या पर्वत रागांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलपैकी कोणत्या क्रमाने आहे?
    अ) शंभूमहादेव डोंगर
    ब) सातमाळा अंजठा डोंगर
    क) हरिश्चंद्र बालाघाट डोंगर
    ड) तोरणमाळ
    पर्यायी उत्तरे :
    1) (अ), (ब), (क) आणि (ड)
    2) (ड), (ब), (अ) आणि (क)
    3) (अ), (क), (ड) आणि (ब)
    4) (अ), (क) आणि (ब)

    27) रायरेश्वर शिखराची उंची ...... मीटर आहे.
    1) 1173
    2) 1273
    3) 1373
    4) 1473

    28) खालील पर्वत शिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा ः
    अ) साल्हेर
    ब) सप्तश्रृंगी
    क) महाबळेश्वर 
    ड) कळसूबाई
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब, क, ड
    2) ड, अ, क, ब
    3) ड, क, अ, ब
    4) ब, क, ड, अ

    29) खालील ठिकाणांचा त्यांच्या उंची प्रमाणे चढता क्रम लावा :
    अ) कळसूबाई
    ब) हरिश्चंद्रगड 
    क) कुंभार्ली
    ड) फोंडाघाट
    पर्यायी उत्तरे :
    1) क,  ब,  अ,  ड
    2) ड,  क,  ब,  अ
    3) क,  ड,  ब,  अ 
    4) ब,  क,  ड,  अ 

    30) खालील जोड्या लावा.
    जिल्हा                 डोंगर
    A) औरंगाबाद I) गाळणा डोंगर
    B) नांदेड II) वेरूळ डोंगर
    C) गडचिरोली III) मुदखेड डोंगर
    D) धुळे IV) सुरजगड डोंगर 
    पर्यायी उत्तरे :
    A B C D
    1)  II I III IV
    2) II III IV  I
    3) I III II IV
    4) III  I II IV


    उत्तरे

    1-4

    2-2

    3-2

    4-3

    5-3

    6-3

    7-1

    8-2

    9-2

    10-4

    11-2

    12-2

    13-3

    14-4

    15-3

    16-3

    17-4

    18-2

    19-3

    20-2

    21-3 

    22-4

    23-3

    24-4

    25-4

    26-4

    27-3

    28-2

    29-2

    30-2

Share this story

Total Shares : 4 Total Views : 2806