उतार्‍यावरील प्रश्‍न / प्रश्नमंजुषा (114)

  • उतार्‍यावरील प्रश्‍न / प्रश्नमंजुषा (114)

    उतार्‍यावरील प्रश्‍न / प्रश्नमंजुषा (114)

    • 02 Apr 2021
    • Posted By : study circle
    • 918 Views
    • 0 Shares

     राज्यसेवा पूर्व परीक्षा, २१ मार्च २०२१  पेपर (२)

    सीसॅट पेपरमधील उतार्‍यावरील प्रश्‍न

    पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नश क्र. १ ते ५ प्रश्नां ची उत्तरे द्या.
     
            गैर-संभाव्यता नमुना ही अशी नमुना निवडपद्धती आहे की, जिच्यामध्ये लक्ष्य-समूहातील प्रत्येक घटकाचा नमुना निवडीमध्ये समावेश होण्याच्या संभाव्यतेचा कोणत्याही आधारावर अंदाज वर्तविणे शक्य नसते. गैर-संभाव्यता नमुना हा मुद्दाम नमुना, हेतुमूल्य नमुना आणि निर्णय नमुना अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अशा प्रकारच्या नमुन्यामध्ये संशोधकाने नमुन्यातील घटकांची निवड जाणीवपूर्वक केलेली असते; घटकासंबंधी त्याची निवड ही अंतिम असते. दुसर्या  शब्दांत सांगायचे झाल्यास, गैर-संभाव्यता नमुना चौकशीचे रचनाकार लक्ष्य-समूहातील विशिष्ट घटकांची नमुन्यासाठी हेतुपूर्वक निवड, प्रचंड वस्तुमानातून छोट्या वस्तुमानाची ते संपूर्ण लक्ष्यसमूहाचे नमुनेदार उदाहरण असेल किंवा प्रतिनिधित्व करेल अशा आधारावर करतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या राज्यामध्ये राहणार्याी लोकांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करायचा असेल, तर सखोल अभ्यासासाठी त्या राज्यातील काही शहरे आणि खेड्यांची प्रातिनिधीक तत्त्वावर हेतुपूर्वक निवड केली जाऊ शकते. अशा प्रकारे अभ्यासाच्या रचनाकारांचा निर्णय या नमुना आराखड्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
            अशा आराखड्यांमध्ये वैयक्तिक घटकाला नमुना निवडीमधील प्रवेशास खूपच संधी असते. संशोधक त्याच्या दृष्टिकोनास अनुकूल निष्कर्ष देणार्याी नमुन्याची निवड करू शकतो आणि जर असे घडले तर संपूर्ण चौकशीचाच विचका होऊ शकतो. अशा रितीने या प्रकारच्या नमुना तंत्रामध्ये पूर्वग्रहदूषिततेला स्थान मिळण्याचा धोका संभवतो. पण जर संशोधक निःपक्षपातीपणे, पूर्वग्रहदृषिततेविना कार्यरत असतील आणि अचूक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारा अनुभव त्यांच्या पदरी असेल तर जाणीवपूर्वक निवडलेल्या नमुन्याच्या विश्ले षणातून मिळालेले निष्कर्षसुद्धा सुसह्य होण्याइतपत विश्वयसनीय असू शकतात. असे असले तरी या प्रकारच्या नमुन्यांमध्ये प्रत्येक घटकाला काही प्रमाणात का असेना समाविष्ट होण्याची स्पष्टीकरणात्मक संधी मिळतेच याची खात्री देता येत नाही. या नमुना प्रकारामध्ये नमुना त्रुटींचा अंदाज व्यक्त केला जाऊ शकत नाही. पण पूर्वग्रहदूषित घटक कमी-अधिक प्रमाणात नेहमीच आढळतो. त्यामुळे, महत्त्वपूर्ण मोठी व्याप्ती असलेल्या चौकशांमध्ये या नमुना आराखड्याचा क्वचितच वापर केला जातो. असे असले तरी, कमी व्याप्ती असलेल्या चौकशा आणि वैयक्तिक संशोधनांमध्ये या आराखड्याचा स्वीकार केला जाऊ शकतो. कारण या नमुना पद्धतीमध्ये उपजतच वेळ आणि पैशांची तुलनात्मक बचत होते. कोटा नमुना हे सुद्धा गैर-संभाव्यता नमुन्याचे उदाहरण आहे. कोटा नमुन्यामध्ये मुलाखतदारांना सुलभपणे त्यांचा वाटा, माहिती भरण्याच्या काही निर्बंधासह विविध स्तरातील माहिती भरण्यासाठी दिला जातो. दुसर्याभ शब्दांत सांगायचे झाल्यास, नमुन्यातील घटकांची प्रत्यक्ष निवड ही मुलाखतदारांच्या विवेकावर सोडलेले असते. ही नमुना पद्धती अतिशय सोईस्कर आणि तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चीक आहे. परंतु अशा प्रकारे निवडलेल्या नमुन्यांमध्ये यादृच्छिक नमुन्याचे गुणधर्म निश्चिुतपणे नमतात. कोटा नमुने हे खरेतर निर्णय नमुने असतात आणि त्या आधारावर काढलेले निष्कर्ष औपचारिक-मार्गाने काढलेल्या सांख्यिकीय उपचाराच्या कक्षेत राहणारे नसतात.

    १) मुद्दाम निवडलेल्या नमुन्याच्या विश्ले षणावर आधारित निष्कर्ष विश्विसनीय असू शकतात. जर :
    a) संशोधक पूर्वग्रहदूषित नसतील तर.
    b) संशोधक अनुभवी असतील तर.
    c) संशोधकांनी अनुकूल नमुना निवडला तर.
    d) संशोधकांनी सांख्यिकी पद्धती वापरल्या तर.
    पर्यायी उत्तरे :
    १) वरील सर्व पर्याय योग्य आहेत.
    २) फक्त (a), (b) आणि (c) हे योग्य पर्याय आहेत.
    ३) फक्त (a) आणि (b) हे योग्य पर्याय आहेत.
    ४) वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही.
     
    २) या उतार्याकत पुढीलपैकी कोणते विधान केलेले आहे ?
    १) गैर-संभाव्यता नमुन्यामध्ये संशोधकाची निवड खूप महत्त्वपूर्ण असते.
    २) गैर-संभाव्यता नमुन्यामुळे संशोधनाचा विचका होतो.
    ३) गैर-संभाव्यता नमुन्यामुळे नमुन्यातील त्रुटींचा आपल्याला अंदाज येतो.
    ४) कोटा नमुन्यांचे सांख्यिकी विश्लेेषण केल्यास अचूक निष्कर्ष मिळतात.
     
    ३) गैर-संभाव्यता नमुना आराखड्यामध्ये संशोधकाच्या निवडीचं स्थान महत्त्वपूर्ण का असतं ?
    १) नमुना निवडताना संशोधकाचा निर्णय अंतिम असतो.
    २) संशोधकाला सांख्यिकी विश्लेिषणाशिवाय काम करावे लागते.
    ३) संशोधक पूर्वग्रहदूषित नसतात.
    ४) हा आराखडा सोईस्कर आणि कमी खर्चाचा असतो.
     
    ४) गैर-संभाव्यता नमुना पद्धती कोणत्या नावाने ओळखले जात नाही ?
    १) हेतुमूल्य नमुना
    २) निर्णय नमुना
    ३) यादृच्छिक नमुना
    ४) मुद्दाम नमुना
     
    ५) उतार्‍यावरील मध्यवर्ती कल्पना पुढीलपैकी कोणती आहे ?
    १) संभाव्यता नमुना
    २) सांख्यिकी विश्ले्षण
    ३) यादृच्छिक नमुना
    ४) गैर-संभाव्यता नमुना

    पुढील उतारा वाचून त्यावर आधारित ६ ते १० प्रश्नां ची उत्तरे द्या.
    जैवइंधन
     
            हेन्री फोर्ड आणि रुडॉल्फ डिझेल या दोन व्यक्तींनी मोटार काय उद्योगात क्रांती घडवून आणली. आपल्या मोटारी वनस्पतींपासून तयार केलेल्या इंधनावर धावल्या पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा होती, पण त्या काळात अतिशय स्वस्त असलेल्या खनिज इंधनाने बाजी मारून नेली. पेट्रोल हेच इंधन लोकप्रिय झाले आणि फोर्ड व डिझेल यांचे स्वप्न हवेत विरून गेले. एका शतकानंतर फोर्ड आणि डिझेल यांची इच्छा फलद्रुप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वर्तमानकाळी आकाशाला भिडत जाणार्या  पेट्रोलियमच्या किमतींनी जैवइंधनाला पुन्हा एकदा चालना दिली आहे. हळूहळू कार, ट्रक आणि विमाने यांच्यासाठी जैवइंधन लोकप्रिय होत झालेले आहे.
            जैवइंधनाच्या क्षेत्रात ब्राझील या देशाने आघाडी घेतली आहे. आजच त्या देशात चारशेपेक्षा जास्त इथेनॉल उत्पादन केंद्रे आहेत. त्यामध्ये निव्वळ ऊसापासून इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. वाहनांसाठी शुद्ध गॅसोलीन न वापरता त्यात २५ टक्के इथेनॉल मिसळले जाते. नजीकच्या काळात केवळ इथेनॉलवर धावणारी वाहने त्या देशात निर्माण केली जातील. ऊस आणि इथेनॉल देणार्यान अन्य वनस्पतींच्या लागवडीखाली अधिकाधिक भूमी आणली जात आहे. ङ्गगॅसोलिनकार हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.फ असा त्या देशातील तंत्रज्ञांचा दावा आहे.
            अमेरिकेत मक्यापासून इथेनॉल हस्तगत केले जाते. युरोपातील जर्मन हा देश बायोडिझेलचा सर्वात मोठा उत्पादक आहे. भारतासह अन्य ३० देशांत निरनिराळ्या वनस्पतींपासून इथेनॉलचे उत्पादन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नारळ, सोयाबीन, भुईमूग, पाम, द्राक्षे, बीट अशा अनेक वनस्पतींपासून इथेनॉलचे उत्पादन करता येते.
    महत्त्वाची गोष्ट अशी की, पारंपरिक कार इंजिन्स जैवइंधनावर चालू शकतात. याशिवाय गॅसोलीन किंवा डिझेल यामध्ये योग्य प्रमाणात इथेनॉल मिसळून ते मिश्रण इंधन म्हणून वापरता येते. पारंपरिक डिझेल इंजीन २० टक्के जैवइंधनावर उत्तम प्रकारे चालते. अर्थात जैवइंधनासाठी वाहनांची इंजिने बदलण्याचे कारण नाही. जैवइंधनातून कार्बन-डाय-ऑक्साइड निर्माण होत नाही, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट आहे.
            खनिज तेल निर्माण करण्यासाठी निसर्गाला कोट्यावधी वर्षे लागतात. याउलट अनेक जिवंत वनस्पतींपासून जैवइंधन प्राप्त करता येते. जैवइंधनामधून केवळ कार्बन-डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी असते, असे नाही, तर नायट्रोजन ऑक्साइडसारखे अन्य विषारी वायूही अशा इंधनातून उत्सर्जित केले जात नाहीत. वनस्पतींची वर्धनक्षमता आणि त्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध जमीन यांवरच केवळ जैवइंधनाचे उत्पादन अवलंबून राहील. याशिवाय अनेक प्रकारच्या कचर्याउपासूनही जैवइंधनाचे उत्पादन करता येईल.

    ६) जैवइंधन वापराचे खालीलपैकी कोणते फायदे बरोबर आहेत ?
    a) जैवइंधन वनस्पतीपासून तयार करता येते.
    b) जैवइंधनामुळे प्रदूषण कमी होईल.
    c) जैवइंधनामुळे खनिजतेल वाचविता येते.
    d) जैवइंधन स्वस्त आहे.
    पर्यायी उत्तरे ः
    १) (a) आणि (b)
    २) (b) आणि (c)
    ३) (a), (b) आणि (c)
    ४) वरील सर्व
     
    ७) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    a) पारंपरिक कार इंजीन जैवइंधनावर चालू शकतात.
    b) गॅसोलीन कार नामशेष होतील.
    c) जैवइंधनामुळे प्रदूषण कमी होऊ शकते.
    d) जैवइंधनामुळे वाहनांचे इंजीन बदलण्याचे कारण नाही.
    पर्यायी उत्तरे ः
    १) (a) आणि (b) बरोबर
    २) (a), (b) आणि (c) बरोबर
    ३) (a), (c) आणि (d) बरोबर
    ४) वरील सर्व बरोबर
     
    ८) खालीलपैकी कोणते इंधन मोटारीत वापरल्यामुळे फोर्ड आणि डिझेल यांचे स्वप्न हवेत विरून गेले ?
    १) बायोडिझेल
    २) डिझेल
    ३) इथेनॉल
    ४) पेट्रोल
     
    ९) खालील विधान व निष्कर्ष यावरून योग्य पर्याय निवडा.
    विधान ः जैवइंधन हे खनिज तेलाला पर्याय ठरू शकते.
    निष्कर्ष   (A) ः खनिज तेल निर्मितीला कोट्यावधी वर्ष लागतात.
         (B) ः खनिज तेलाच्या उत्सर्जनामुळे विषारी वायूंची निर्मिती होते.
    पर्यायी उत्तरे ः
    १) निष्कर्ष (A) बरोबर व (B) चूक
    २) निष्कर्ष (A) आणि (B) बरोबर
    ३) निष्कर्ष (A) आणि (B) चूक
    ४) निष्कर्ष (A) चूक व (B) बरोबर
     
    १०) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    a) ब्राझीलने जैवइंधन उत्पादनात आघाडी घेतली.
    b) अमेरिकेत ऊसापासून इथेनॉल हस्तगत केले जाते.
    c) युरोपातील जर्मन हा देश बायोडिझेलचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
    पर्यायी उत्तरे ः
    १) फक्त (a) बरोबर आहे
    २) फक्त (a) आणि (b) बरोबर
    ३) फक्त (a) आणि (c) बरोबर आहेत
    ४) सर्व बरोबर आहेत

    पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्र. क्र. ११ ते १५ प्रश्नां ची उत्तरे द्या.

    बलप्रयोग, फौजदारीपात्र बलप्रयोग आणि हमला याविषयी
    [Force, Criminal Force and Assault]
     
            ३४९. बलप्रयोग [Force] - एखाद्याने जर अन्य व्यक्तीच्या ठायी गती निर्माण केली किंवा गतीबद्दल अगर गतिविराम घडवून आणला अथवा ज्यायोगे एखाद्या पदार्थाच्या त्या अन्य व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी किंवा त्या अन्य व्यक्तीने परिधान केलेल्या किंवा जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूशी संपर्क घडेल किंवा अशा संपर्कामुळे त्या अन्य व्यक्तीचा स्पर्श संवेदनेवर परिणाम होईल अशाप्रकारे स्थित असलेल्या कोणत्याही वस्तूशी संपर्क घडेल अशा तर्हेअने त्या पदार्थाच्या ठायी अशी गती निर्माण केली किंवा असा गतिबदल अगर गतिविराम घडवून आणला तर तो त्या अन्य व्यक्तीच्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग करतो असे म्हटले जाते. मात्र, गती निर्माण करणार्या  किंवा गतिबदल अगर गतिविराम घडवून आणणार्या, व्यक्तीने, यात यापुढे वर्णन करण्यात आलेल्या तीन प्रकारापैकी एका प्रकारे गती निर्माण केली असली पाहिजे किंवा गतीबद्दल अगर गतिविराम घडवून आणला असला पाहिजे.
     
    एक : स्वतःचे शारीरिक सामर्थ्य वापरणे.
    दोन : एखादा पदार्थ अशा स्थितीत ठेवणे, की जेणेकरून स्वतःला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला आणखी काही कृती करावी न लागता गती निर्माण होईल किंवा गतीबद्दल अगर गतिविराम घडून येईल.
    तीन : कोणत्याही प्राण्याला गतिमान होण्यास, गतीबद्दल करण्यास किंवा गतिविराम करण्यास प्रवृत्त करणे.

    ३५०. फौजदारी पात्र बलप्रयोग - जर कोणी कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय उद्देशपूर्वक बलप्रयोग केला आणि तो कोणत्याही अपराध करण्याच्या प्रयोजनार्थ असेल अथवा ज्या व्यक्तीच्या बलप्रयोग करण्यात आला त्या व्यक्तीस अशा बलप्रयोगाद्वारे क्षती (नुकसान) पोचावी किंवा भीती वाटावी किंवा त्रास व्हावा असा त्याचा उद्देश असेल अथवा अशा बलप्रयोगामुळे तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, तो त्या अन्य व्यक्तीच्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग करतो असे म्हटले जाते.
     
    ३५१. हमला - जर कोणी कोणताही हावभाव किंवा कसलीही तयारी केली आणि असा हावभाव किंवा तयारी यामुळे जो कोणी तो हावभाव किंवा तयारी करील तो समक्ष हजर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत फौजदारीपात्र स्वरूपाचा बलप्रयोग करण्याच्या बेतात आहे अशी धास्ती त्या व्यक्तीच्या मनात निर्माण व्हावी असा त्यामागे उद्देश असेल किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, तो हमला करतो असे म्हटले जाते.
     
    स्पष्टीकरण - केवळ उच्चारलेले शब्द हे ’हमला’ या सदरात मोडत नाहीत. पण एखादी व्यक्ती जे शब्द उच्चारील त्यामुळे, ज्यायोगे तिचे हावभाव किंवा तयारी ही हमला म्हणून गणता येईल अशा प्रकारचा अर्थ त्या हावभावांना किंवा तयारीला प्राप्त होऊ शकेल.

    ११) ” अ” हा ” य” ला रस्त्यामध्ये ” य” ला इजा व्हावी या उद्देशाने त्याच्या (” य” च्या) संमतीशिवाय धक्का मारतो ही ” अ”  ची कृती .......... आहे.
    १) बलप्रयोग
    २) फौजदारीपात्र बलप्रयोग
    ३) हमला
    ४) यापैकी एकही नाही
     
    १२) ” बल प्रयोगात”  समावेश होतो :
    a) स्वतःचे शारीरिक सामर्थ्य वापरणे.
    b) एखादा पदार्थ अशा स्थितीत ठेवणे, की जेणेकरून स्वतःला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला आणखी काही कृती करावी न लागता गती निर्माण होईल किंवा गतीबद्दल अगर गतिविराम घडून येईल.
    c) कोणत्याही प्राण्याला गतिमान होण्यास, गतिबदल करण्यास किंवा गतिविराम करण्यास प्रवृत्त न करणे.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a)
    २) (a) आणि (b)
    ३) (a), (b) आणि (c)
    ४) वरीलपैकी एकही नाही
     
    १३) ” य” नान करीत आहे, ” अ”, ”य”च्या संमतीशिवाय आंघोळीच्या पाण्यामध्ये उकळते पाणी, ते उकळते आहे हे माहीत असूनही ओततो, त्यामागे त्याचा वाईट हेतू आहे तर ”अ”  ची ही कृती ......... आहे.
    १) फौजदारीपात्र बलप्रयोग
    २) हमला
    ३) बलप्रयोग
    ४) वरीलपैकी एकही नाही
     
    १४) दिलेल्या परिच्छेदाच्या अनुषंगाने पुढील विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?
    a) मी तुला झोडपून काढील असे ” अ”, ” य” ला म्हणतो - ही बाब ” हमला” या सदरात मोडते.
    b) ”अ”  एका स्त्रीचा बुरखा उद्देशपूर्वक ओढतो. तिला भीती वाटेल किंवा त्रास होईल याची जाणीव असताना त्याने तिच्या संमतीवाचून तसे केले - ” अ”  ने तिच्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग केला आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) बरोबर आहे
    २) (b) बरोबर आहे
    ३) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत
    ४) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत
     
    १५) ” अ”  एका चावर्याय कुत्र्याची मुसकी सोडू लागतो, ”अ” हा कुत्र्याला ” य” वर हल्ला चढवायला लावण्याच्या बेतात आहे अशी त्यामुळे ” य” ची समजूत व्हावी असा ” अ” चा उद्देश आहे तर ” अ”  च्या या कृतीला काय म्हणता येईल ?
    १) बलप्रयोग
    २) फौजदारीपात्र बलप्रयोग
    ३) हमला
    ४) वरीलपैकी एकही नाही

    पुढील उतारा वाचून त्यावर आधारित १६ ते २० प्रश्नां ची उत्तरे लिहा.
    पी. एम. किसान योजनेतील अडथळे
     
            मोदी शासनाने शेतकर्यांसाठी रोख रक्कम ही योजना सुरू केली आहे. परंतु संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार सन २०१९-२० या वर्षाच्या लक्षात १४० दशलक्ष शेतकर्यां पैकी केवळ अर्धे शेतकरी यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहचला आहे. पुढचा हप्ता देय असताना ज्या शेतकर्यांपनी त्यांचे बँक खाते १२ अंकी आधार क्रमांकाशी जोडलेले नाही ते यापासून वंचित राहणार आहेत.
          दर चार महिन्यातून एकदा रु.२ हजार असे वर्षाकाठी रु.६ हजार रोख स्वरूपात या योजनेत शेतकर्यां ना देऊन त्यांचा उत्पन्न स्तर उंचावला जातो. दि. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिला हप्ता देऊन या योजनेस प्रारंभ झाला.
       सध्याच्या विस्तारवेगाने सन २०१९-२० साठी अर्थसंकल्पीय रु.७५,००० कोटी शासन खर्च करू शकणार नाही. ऑक्टोबर. २१, २०१९ पर्यंत शासनाने रु.३२,५७७ कोटी म्हणजेच ४३ टक्के रक्कम खर्च केली आहे.
        आधार नोंदणी, रोख हस्तांतरण आणि कमी वेगाचे इंटरनेट तसेच ग्रामीण भागातील किचकट भू-दस्त नोंदणी यामुळे या योजनेची गती मंदावली आहे - असे निवेदन कृषी मंत्रालयाने संसदेत दिले आहे.
          डिसेंबर ते मार्च, एप्रिल ते जुलै आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत या योजनेत रोकड हस्तांतरण होत असते. पहिल्या हप्त्यावेळी २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान जवळपास ७०.२ दशलक्ष शेतकर्यां ना रु.१४,०५५ कोटी प्राप्त झाले. दुसर्याण हप्त्यात एप्रिल २०१९ ते जुलै २०१९ दरम्यान केवळ ५९.२ दशलक्ष शेतकर्यां ना एकूण रु.११,८४५ कोटी वितरित करण्यात आले. तिसर्याी हप्त्यात तर ३३.३ दशलक्ष शेतकर्यांनाच रु.६,६७७ कोटी वितरित करण्यात आले.
         या आकडेवारीमागे काही निश्चिकत कारणे आहेत. जर पहिल्या हप्त्यात ७०.२ दशलक्ष शेतकर्यां ना लाभ झाला तर दुसरा हप्ता केवळ ५९.२ दशलक्ष आणि तिसरा हप्ता केवळ ३३.३ दशलक्ष शेतकर्यां नाच का मिळाला ?
         कृषी मंत्रालय दुसर्या कालावधीत अदा केलेली रक्कम ही पहिलाच हप्ता मानते कारण काहींनी नोंदणी उशिरा केली होती. अर्थात एप्रिल-जुलै, २०१९ दरम्यान नोंदणी केलेल्या आणि लाभ मिळालेल्या शेतकर्यांनाही प्रथम लाभार्थी मानले जाते. त्यामुळे पहिल्या हप्त्यातील शेतकरी लाभार्थी संख्या फुगलेली दिसते.
         मंत्रालयाने संसदीय तज्ञगटापुढे हे निवेदन केले आहे की, एकूण लक्षित १४० दशलक्ष यापैकी १ दशलक्ष शेतकर्यांना रक्कम देण्यात आली आहे. संसदेत सादर अहवालानुसार लाभार्थी संख्या ७,१७,४२,९५९ एवढी आहे. म्हणजेच आणखी ६९ दशलक्ष शेतकरी मार्चपर्यंत लाभार्थी व्हावे लागतील.
        या आकडेवारीनुसार या योजनेमध्ये डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान ३३.३ दशलक्ष शेतकर्यां ना लाभ झाला आहे. त्यांना तीन हप्ते मिळाले आहेत. आणखी २५.९ दशलक्ष (एप्रिल-जुलै दरम्यान) व ११ दशलक्ष (ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान) दशलक्ष शेतकरी मार्चपर्यंत लाभार्थी व्हावे लागतील.
        या आकडेवारीनुसार या योजनेमध्ये डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान ३३.३ दशलक्ष शेतकर्यां ना लाभ झाला आहे. त्यांना तीन हप्ते मिळाले आहे. आणखी २५.९ दशलक्ष (एप्रिल-जुलै दरम्यान) व ११ दशलक्ष (ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान) असे जास्तीचे लाभार्थी आढळून येतात.
    योजनेच्या आकृतिबंधानुसार ज्या शेतकर्यांआनी पहिल्या टप्प्यात योजनेत नोंदणी केली आहे, त्यांना प्रारंभीपासून आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत. तर ज्यांनी दुसर्याब टप्प्यात नोंदणी केली आहे, त्यांना दोन हप्ते मिळाले असणार, कारण या योजनेतील लाभ पूर्वलक्षी नाहीत.

    १६) पी. एम. किसान योजनेबाबत डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यानच्या पहिल्या हप्त्यात शेतकर्यांजना एवढ्या रुपयांची रोकड हस्तांतरण करण्यात आले ः
    १) रु.१४,०५५ कोटी
    २) रु.११,८४५ कोटी
    ३) रु.६,६७७ कोटी
    ४) रु.७५,००० कोटी
     
    १७) प्रस्तुत उतार्‍यात उल्लेख केलेल्या योजनेचा मुख्य हेतू हा आहे :
    a) शेतकर्यांतची आधार नोंदणी
    b) शेतकर्यांतना इंटरनेट सुविधा पुरविणे.
    c) शेतकर्यांतचा उत्पन्न स्तर उंचावणे.
    d) जमिनीच्या नोंदी अद्यावर करणे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त
    २) (a) आणि (b) फक्त
    ३) (c) फक्त
    ४) (c) आणि (d) फक्त
     
    १८) खालील विधाने विचारात घ्या ः
    a) पी.एम. किसान योजनेअंतर्गत शेतकर्यां ना आर्थिक मदत रु.६,००० (अक्षरी रुपये सहा हजार) मात्र दिली जाते
    b) ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त बरोबर आहे
    २) (b) फक्त बरोबर आहे
    ३) (a) व (b) दोन्ही चूक आहेत
    ४) (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत
     
    १९) खालील विधाने विचारात घ्या ः
    a) पी.एम. किसान योजनेच्या अंमलबजावणीत मूलभूत त्रुटी आहे.
    b) आधार- भूमी (जमिनींचे) अभिलेख जोडणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त बरोबर आहे
    २) (b) फक्त बरोबर आहे
    ३) (a) व (b) दोन्ही चूक आहेत
    ४) (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत
     
    २०) पी.एम. किसान योजनेच्या अंमलबजावणीत हे अडथळे आहेत ः
    a) आधार वर आधारित नोंदणी
    b) अपुरे जमीन अभिलेख
    c) इंटरनेटच्या अपुर्याण सुविधा
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) व (b) फक्त
    २) (b) व (c) फक्त
    ३) (a) व (c) फक्त
    ४) वरील सर्व

    पुढील उतारा वाचून त्यावर आधारित २१ ते २५ प्रश्नां ची उत्तरे द्या.
    भौतिकशास्त्र उतारा
     
         न्यूटनच्या गतीविषयक दुसर्याा नियमाच्या सहाय्याने पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे प्रचंड वस्तूंच्या गतीची समीकरणे सोडविता येतात. गुरुत्वाकर्षण बल हे पुढील समीकरणाने दाखवले जाते.
     
    F =  GmMe
           R2
    येथे G म्हणजे वैश्वि क गुरुत्वाकर्षण स्थिरांक, m म्हणजे पदार्थाचे वस्तुमान, Me म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान आणि R म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून पदार्थापर्यंतचे अंतर. ह्या विश्लेीषणानुसार पृथ्वीभोवती फिरणार्याू उपग्रहांबाबतचे गतीचे नियम केपलर यांनी जे ग्रहगतीचे नियम शोधले तसेच लागू होतात. जोहान्स केप्लर (१५७१-१६३०) यांनी ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्याच्या निरीक्षणांवरून जे ग्रह-गतीबाबत तीन नियम शोधून काढले, तेच पृथ्वी आणि तिच्या उपग्रहांबाबत मांडले तर ते खालीलप्रमाणे देता येतील :
     
    (I) सर्व उपग्रह पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत गतिमान असतात व या लंबवर्तुळाच्या एका केंद्राशी पृथ्वी असते.
    (II) उपग्रह पृथ्वीभोवती फिरताना उपग्रह आणि पृथ्वीचे केंद्रस्थान यांना जोडणारा अक्ष या कक्षेमधील समक्षेत्र समवेळेत पार करतो.
    (III) कोणत्याही उपग्रहाचा आवर्तनकालाचा (परिभ्रमण कालाचा) वर्ग हा त्याच्या कक्षेच्या अर्ध-दीर्घांशाच्या (माध्य-अंतराच्या) घनाच्या समप्रमाणात असतो.
     
    पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील वस्तूंसाठी गणितामध्ये गुरुत्वाकर्षण बल हे अंदाजे स्थिर मानले जाते. समजा R = Re + h, येथे Re म्हणजे पृथ्वीची त्रिज्या, h म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूचे अंतर, तर गुरुत्वाकर्षण बल असेल :
     
    F =    GmMe    
           (Re + h2)
     
    हे अंदाजे F =   GmMe   या बरोबर असेल जेव्हा h<<Re.
                             R2

    हे स्थिर बल नेहमीप्रमाणे mg इतके असते. यातील g म्हणजे मुक्त पतन त्वरण.
    (टीप : वैश्विीक गुरुत्वाकर्षण स्थिरांक : G = 6.67 x 10-11 N.m2/kg2 , पृथ्वीचे वस्तुमान : Me = 5.98 x 1024 kg आणि पृथ्वीची त्रिज्या : Re = 6.37 x 106 m)

    २१) खालीलपैकी कोणती पदावली ही गुरुत्वीय त्वरण व पदार्थाची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची याचा संबंध दर्शविते ?
    १) G(Re + h)
     
    २) 2G(Re + h)2
    ३)       GMe    .
          (Re + h) 
     
    ४)      GMe    .
          (Re + h)2 

    २२) पृथ्वीच्या केंद्रापासून m = GmMe (1/Re - 1/R) इतक्या अंतरावर ... इतक्या वस्तुमानाच्या एका अग्निबाणाला गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा ..... इतकी आहे. तर ह्या अग्निबाणाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रापासून पूर्णतः निसटण्यासाठी कमीत कमी किती वेग दिला पाहिजे ?

    १) (  2 GM )1/2
            Re 

    २) (  2 GMe  )1/2
             Re 
    ३) (2 gh)1/2

    ४) (2 mGRe)1/2

    23) पृथ्वीच्या केंद्रापासून R या अंतरावर एक उपग्रह गोलाकार कक्षेत फिरत आहे. उपग्रह f या कोनातून फिरताना व्यापले जाणारे क्षेत्र A = R2f/2 आहे. केपलरच्या दुसर्‍या नियमानुसार असे सूचित होते की, उपग्रहाला 2f कोनाइतका जाण्यासाठी लागणारा वेळ :
    1) f कोनातून जाण्याच्या दुप्पट वेळ लागेल.
    2) f कोनातून जाण्याच्या अर्धा वेळ लागेल.
    3) f कोनातून जाण्याच्या वेळेच्या वर्गाइतका वेळ लागेल.
    4) f कोनातून जाण्या इतकाच समान वेळ लागेल.
     
    २४) पृथ्वीच्या केंद्रापासून R इतक्या अंतरावर m इतक्या वस्तुमानाचा एक उपग्रह गोलाकार कक्षेमध्ये फिरत आहे. जर R हे अंतर ४ पटीने वाढवले, तर त्या कक्षेचा आवर्तकाल ः
    १) बदलणार नाही
    २) ४ पटीने वाढेल
    ३) ८ पटीने वाढेल
    ४) ६४ पटीने वाढेल
     
    २५) सारख्याच उंचीवरून दोन असमान वस्तुमानाचे गोळे खाली टाकले. गुरुत्वाकर्षण बल हे स्थिर आहे असे समजले, तर उपपत्तीच्या भाकितानुसार दोन्ही गोळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकाच वेळेस आदळतील. पण जर वास्तविक बल गृहीत धरले तर ः
    १) जास्त वस्तुमान असलेला गोळा प्रथम आदळेल.
    २) कमी वस्तुमान असलेला गोळा प्रथम आदळेल.
    ३) दोन्ही गोळे एकाच वेळेत आदळतील.
    ४) वरीलपैकी काहीही नाही, कारण गती समीकरणे हे स्थिर बल अंदाजित केल्याशिवाय सोडविता येणार नाहीत.

    पुढील उतारा वाचून त्यावर आधारित खालील प्रश्न. क्रमांक २६ ते ३० प्रश्नां ची उत्तरे द्या.
     
            वनस्पती सृष्टीमध्ये शेवाळे, ब्रायोफाईटस, टेरेडोफाईटस अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी ह्या गटांचा समावेश असतो. शेवाळे ही हरितद्रव्ये असलेली, साधी, स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारी आणि बहुतेकवेळा पाण्यात जगणारी वनस्पती असते. ह्या वनस्पतीमध्ये असणार्याद रंगद्रव्यानुसार आणि संग्रहीत होणार्या् अन्नप्रकारानुसार त्यांचे तीन गटात वर्गीकरण होते. जसे की, क्लोरोफायसी, फियोफायसी आणि र्होकडोफायसी. शेवाळांमधील पुनरुत्पादन हे बहुतेकवेळा बाह्यवृद्धी विखंडनामुळे, अलैंगिक ही विविध प्रकारच्या बिजाणुंमुळे आणि लैंगिक ही विविध प्रकारचे गॅमेटस जे एकसारखे किंवा विविध आकाराचे अथवा ओगॅमिक असतात.
            ब्रायोोफाईटस ही वनस्पती मातीमध्ये जगू शकते, परंतु लैंगिक पुनरुत्पादनासाठी ती पाण्यावर अवलंबून असते. ह्या वनस्पतीचे शरीर हे शेवाळापेक्षा अधिक विकसित असते. हे थॅलेसप्रमाणे चपटे अथवा उभे आणि खालील बाजूस मुळांनी चिकटलेले असते. त्यामध्ये मुळांप्रमाणे, पानांप्रमाणे आणि खोडांप्रमाणे अवयव असतात. ब्रामोफाईटस हे मॉस आणि लिव्हरवॉर्टस ह्या दोन गटांत विभागलेले असतात. लिव्हरवॉर्टस चे शरीर हे थॅलेसप्रमाणे चपटे वाढणारे असते. तर मॉस हे उभे वाढणारे, अरुंद खोडावर आवर्त पद्धतीने वाढणार्याा पानांचे असते. ब्रामोफाईटस चे मुख्य अंग हे गॅमेंटस तयार करणारे असते, म्हणून त्याला गॅमेटोफाईट असे म्हणतात. त्यावर अॅॅन्थे्रडिआ हे पुरुष लिंग आणि अरचेगोनिआ हे स्त्रीलिंग असते. पुरुष आणि स्त्री बीजे यांचे संयोग होऊन झायगोट तयार होते. जे स्पोरोफाईट नावाचे अनेक पेशींचे अंग तयार करते. ते हप्लोइड बीजे तयार करतात. जी परत गॅमेंटोफाईटस मध्ये अंकुरीत होतात.
            टेरेडोफाईटस मध्ये मुख्य शरीर हे स्पोरोफायटीक असते. जे मूळ, खोड आणि पानांत विभागलेले असते. ह्या सर्व अवयवांमध्ये पूर्ण वाढ झालेले ऊतक असतात. स्पोरोफाईटस वर बीजे तयार करणारी स्पोरांजीआ असतात. बीजे थंड, ओलसर जागी अंकुरीत होऊन त्यातून गॅमेंटोफाईटस तयार होतात. ह्या गॅमेटोफाईटस वर पुरुष लिंग-अन्थे्रडिआ आणि स्त्रीलिंग-आरचेगोनिआ वाढतात. पुरुष बीजे ही पाण्याच्या सान्निध्यात आरचेगोनिआवर येऊन त्यांच्या संयोगातून झायगोट तयार होते. हे झायगोट पुनःश्चआ स्पोरोफाईटस मध्ये अंकुरीत होते.
            अनावृत्तबीजी ह्या वनस्पतीमध्ये अंडे (ओव्ह्युल) हे कोणत्याही प्रकारच्या आवरणामध्ये बंदिस्त नसते. संयोगीकरणानंतर तयार होणारी बीजे ही अनावृत्त असतात, म्हणून त्यांना अनावृत्त बीजधारी वनस्पती असेही म्हणतात. ही जिम्नोस्पर्मस त्यांच्या स्पोरोफीलस मध्ये अतिसूक्ष्म बीजे आणि मोठी बीजे ही अनुक्रमे मायक्रोस्पोरान्जीया आणि मेगॅस्पोरान्जीया मध्ये तयार करतात. ही सूक्ष्मस्पोरोफीलस आणि मोठी स्पोरोफीलस खोडावर आवर्तप्रमाणे रचलेले असतात. जी अनुक्रमे पुरुष शंकू आणि स्त्री शंकू तयार करतात. परागकण अंकुरीत होऊन पुरुष बीज हे परागनळीमधून स्त्रीबीजावर सोडले जाते. जेथे त्याचे स्त्री बीजाशी संयोग होऊन झायगोट तयार होते. झायगोट हे गर्भात तर ओव्ह्युल हे बीजात अंकुरते.

    २६) हरित द्रव्ये खालीलपैकी कोणत्या वनस्पतींमध्ये आढळून येतात ?
    a) शेवाळ
    b) ब्रायोफाईटस
    c) टेरोडोफाईटस
    d) अनावृत्त बीजधारी झाडे
    पर्यायी उत्तरे ः
    १) फक्त (a) 
    २) (a) आणि (b)
    ३) (c) आणि (d)
    ४) (a), (b), (c) आणि (d)
     
    २७) .......... ह्या वनस्पतींमध्ये पूर्ण वाढ झालेली ऊतक असतात परंतु योग्य बिया नसतात.
    १) शेवाळ
    २) ब्रामोफाईटस
    ३) अनावृत्त बीजधारी वनस्पती
    ४) वरीलपैकी एकही नाही
     
    २८) ब्रामोफाईटस मध्ये हॅप्लोईड बीजे .............. ह्यामध्ये तयार होतात.
    १) अनेक पेशींचे स्पोरोफाईटस
    २) अनेक पेशींचे गॅमेटोफाईटस
    ३) एक पेशीचे गॅमेटोफाईटस
    ४) एक पेशीचे स्पोरोफाईटस
     
    २९) शेवाळ वनस्पती ही अन्नासाठी परावलंबी असतात आणि त्यामध्ये अनेक प्रकारची रंगद्रव्ये आढळतात.
    a) वरील विधान पूर्णपणे बरोबर आहे.
    b) वरील विधानातील पूर्वार्ध बरोबर आहे.
    c) वरील विधान पूर्णपणे चूक आहे.
    d) वरील विधानातील पूर्वार्ध चूक आहे.
    पर्यायी उत्तरे ः
    १) फक्त (a)
    २) (a) आणि (b)
    ३) फक्त (d)
    ४) (b) आणि (c)
     
    ३०) अनावृत्त बीजधारी वनस्पतींमध्ये अतिसूक्ष्म बीजे ............... ह्यामध्ये तयार होतात.
    १) मेगस्पोरान्जीआ जे सूक्ष्मस्पोरोफिलवर वाढते
    २) माय्क्रोस्पीरान्जीआ जे सूक्ष्मस्पोरोफिलवर वाढते
    ३) मेगॅस्पोरान्जीआ जे मेगॅस्पोरोफिलवर वाढते
    ४) माय्क्रोस्पीरान्जीआ जे मेगॅस्पोरोफिलवर वाढते

    पुढील उतारा वाचून त्यावर आधारित ३१ ते ३५ प्रश्नां ची उत्तरे द्या ः
     
            जेव्हा सांडपाणी जमिनीवर पडते तेव्हा मातीत असणारे जिवाणू त्यावर आक्रमण करतात आणि सांडपाण्यातील घटकांचे वनस्पतींना उपयुक्त अन्नात रूपांतर करतात. वनस्पती नंतर ते आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात. सांडपाण्यात असणारे सेंद्रिय पदार्थ एरोबिक आणि नॉनएरोबिक जिवाणू द्वारे अपघटीत होतात, परंतु जमिनीमार्फत होणारी एरोबिक अपघटन क्रिया अधिक फायदेशीर असते. एरोबिक अपघटनासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन हा जमिनीच्या विविध थरांमध्ये उपलब्ध असतो. अपघटनामुळे तयार होणारा कार्बनडायऑक्साइड हा जमिनीकडून वातावरणास दिला जातो व त्या बदल्यात वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेतला जातो. ही ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साइडची देवाणघेवाण वार्या चे वहन, तापमानातील बदल, बदलणारा दाब, मातीचे गाळप इत्यादी प्रक्रियांमुळे होते. जेव्हा सांडपाणी जमिनीवर टाकले जाते तेव्हा ऑक्सिडेशन रासायनिक प्रक्रिया सुरू होते. त्यामध्ये सांडपाण्यातील सेंद्रिय घटकांचे जमिनीतील जिवाणू ऑक्सिडेशन करतात. गाळणाचे तत्त्व हे भौतिक प्रक्रियेचे जमिनीमार्फत होणार्याी सांडपाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेचे मुख्य तत्त्व आहे. जेव्हा सांडपाणी जमिनीच्या विविध थरातून संक्रमित होते, तेव्हा त्याचे विविध कण जमिनीच्या थरांमधील सूक्ष्म छिद्रांमध्ये अडकवून ठेवले जातात. नंतर पुरेशा हवेच्या सान्निध्यात एरोबिक जिवाणू त्यांचे ऑक्सिडेशन करतात. ही भौतिक प्रक्रिया मुख्यत्वे जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. सरंध्र मोकळ्या, कणीदार, मृदू जमिनीमध्ये ही गाळण प्रक्रिया अधिक उत्तम आणि समाधानकारक असते. जड आणि चिकट माती ही गाळण प्रक्रियेसाठी फारशी उपयुक्त नसते तर खडकाळ जमीन ही गाळण प्रक्रियेसाठी पूर्णतः निरुपयोगी असते.
            सांडपाण्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते जे सिंचन प्रक्रियेसाठी वापरले जाते. सांडपाण्यामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फेटस आणि सेंद्रिय आम्ले इत्यादी असतात. म्हणूनच त्यांचे पोषणमूल्य जास्त असते, या घटकांमुळेच सांडपाण्याचा वापर वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी त्वरित करू शकतात. याचाच अर्थ सांडपाण्यामुळे जमिनीचे पोषणूल्य वाढते व तिचा पोत सुधारतो. सदर जमिनीवर कोणते पिक घ्यायचे हे प्रामुख्याने त्यामध्ये असणार्या. सांडपाण्याच्या प्रमाणावर आणि दर्जावर निर्धारित असते.

    ३१) सांडपाण्याचे वनस्पती खाद्यामध्ये रूपांतर ....... मुळे होते.
    a) भौतिक प्रक्रिया
    b) रासायनिक क्रिया
    c) कार्बन डायऑक्साइड
    d) जिवाणू
    पर्यायी उत्तरे ः
    १) (a), (c)
    २) (b), (c)
    ३) (b), (d)
    ४) (b), (c), (d)
     
    ३२) खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
    a) गाळणे ही भौतिक क्रिया आहे
    b) मातीमध्ये तयार झालेल्या ऑक्सिजनची वातावरणातील कार्बन डायऑक्साइड बरोबरची अदलाबदल तापमानावर अवलंबून असते.
    c) सांडपाणी, जमिनीची सुपीकता वाढवते
    d) सेंद्रिय पदार्थाचे अपघटन हे एरोबिक किंवा नॉनएरोबिक जिवाणूंद्वारे होते.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a) आणि (c)
    २) फक्त (a) आणि (d)
    ३) फक्त (b) आणि (d)
    ४) (a), (c) आणि (d)
     
    ३३) खालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत य
    a) जिवाणूंच्मा नॉनएरोबिक अपघटनाला, एरोबिक अपघटनापेक्षा प्राधान्य दिले जात नाही.
    b) सरंध्र मातीला गाळण क्रियेत प्राधान्य दिले जात नाही.
    c) मातीत असलेले सेंद्रिय आम्ल मातीची सुपीकता कमी करतात.
    d) खडकाळ जमीन, गाळण प्रक्रियेला आणि नॉनएरोबिक अपघटनाला उपयुक्त नाही
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (b) आणि (c)
    २) फक्त (c) आणि (d)
    ३) (a), (b), (c)
    ४) (b), (c), (d)
     
    ३४) सांडपाण्याच्या जिवाणू मार्फत होणार्या) एरोबिक अपघटनाच्या प्रक्रियेत .......
    a) आवश्यक असलेला ऑक्सिजन हा सरळ वातावरणातून घेतला जातो.
    b) तयार झालेल्या कार्बन डामऑक्साईडची अदलाबदल वातावरणातील ऑक्सिजन बरोबर होते.
    c) मातीच्या विविध थरात उपलब्ध असलेला कार्बन डायऑक्साइड वापरला जातो.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (b)
    २) (b)
    ३) (b) आणि (c)
    ४) वरीलपैकी कोणतेही नाही
     
    ३५) सांडपाण्यामध्ये प्रमुख हिस्सा ......... ह्याच/ह्यांचा असतो.
    a) सेंद्रिय पदार्थ
    b) नायट्रोजन
    c) कण पदार्थ
    d) पाणी
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (d)
    २) (b) आणि (d)
    ३) (c) आणि (d)
    ४) (d)

    पुढील उतारा वाचून त्यावर आधारित ३६ ते ४० प्रश्नां ची उत्तरे द्या :
     
            राजकीय शिक्षण म्हणजे माहितीपूर्ण व जबाबदार नागरिक निर्माण करणे होय आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक उद्दिष्टांच्या परिपूर्णतेसाठी राष्ट्रीय संघर्षात सहभागी होण्याची शाश्व्ती कृती होय. विद्यमान पारंपारिक, सरंजामी, श्रेणीबद्ध आणि विषमतावादी समाजाच्या ऐवजी लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी समाज निर्मिती करणे व दारिद्य्र निर्मूलन करणे, ही भारतातील सामाजिक-आर्थिक उद्दिष्टे आहे.
           ब्रिटिश सत्तेच्या काळात काँग्रेस नेत्यांचे असे म्हणणे होते की, राजकीय शिक्षण हे शिक्षणाचे महत्त्वाचे एक अंग आहे. शिक्षण आणि राजकारण यांचे मिश्रण करू नये, ह्या ब्रिटिश दृष्टिकोनास स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. परंतु १९४७ मध्ये जेव्हा काँग्रेस नेते सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांनी ब्रिटिश धोरणाचा मात्र स्वीकार केला आणि म्हणू लागले की, राजकारणाद्वारे शिक्षणाला अशुद्ध करू नये. राजकीय पक्षांना ”शिक्षणापासून दूर व्हा” असे आवाहन करण्यात आले. परंतु या ऐवजी शिक्षण व्यवस्थेमध्ये राजकीय घुसखोरीची वृद्धी होत गेली, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मन व मेंदू काबीज करण्याकरिता राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली. बुद्धिमान शिक्षण तज्ञांना राजकीय हस्तक्षेपाशिवाय राजकीय नेत्यांचा पाठिंबा हवा होता. वास्तवामध्ये काय प्राप्त झाले, तर असीमीत राजकीय हस्तक्षेपासह अल्प शुद्ध राजकीय पाठिंबा. राजकीय पक्षाद्वारे शैक्षणिक व्यवस्थेत हस्तक्षेपाचा अदृश्य हेतू होता की, कोणतेही, कोणालाही राजकीय शिक्षण मिळू नये. आणि अभिजन वर्गाचा सर्वांगीण विकास व्हावा. ही आश्चीर्यजनक बाब आहे की, आजचे राजकीय शिक्षण हे (खरे म्हणजे, सामाजिक परिवर्तनाची बांधीलकी निर्माण करणे) स्वातंत्र्यपूर्व काळातील शैक्षणिक व्यवस्थेतील शिक्षणापेक्षा कमकुवत दर्जाचे ठरले आहे.
            एकाचवेळी, स्वातंत्र्यप्राप्ती साठीचा संग्राम संपला आणि राजकीय शिक्षण देणार्यार मोठ्या अनौपचारिक संस्था सुद्धा अदृश्य झाल्या. वृत्तपत्रे, संचार माध्यमांनी काही अंशी राजकीय शिक्षण प्रदान केले परंतु ते संधीचा संपूर्णपणे उपयोग करू शकले नाही आणि निहित हितसंबंधाची गळचेपी करून त्यावर वर्चस्व मिळवू शकले नाही. शाळा व्यवस्था बाह्य कार्य करणार्याप संस्था, संघटना, ज्यांच्याकडून राजकीय शिक्षण प्रदान करण्याची अपेक्षा होती, त्याचबरोबर पक्षांबाबतही हे म्हणणे लागू पडते.
          स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण खरे राजकीय शिक्षण प्रदान करण्यामध्ये प्रगती करू शकलो नाही उलट मागेच पडलो, असे म्हटले तरी हरकत नाही. उदाहरणार्थ, शिक्षण व्यवस्था ही अधिक रूपाने अभिजन केंद्रित झाली आहे. देशभक्ती ही पहिली दुर्घटना बनली आहे. सरकारचे जर चुकत असेल तर त्याला शिस्तबद्ध पद्धतीने, तत्त्वांवर आधारित विरोध करण्याचे धैर्य गांधींनी आपल्याला दिले. त्यांचा विश्वा्स होता की, साध्य एवढेच साधनही महत्त्वाचे आहे आणि गरिबांना कृतिशील आणि संघटित करण्याचे कार्य त्यांनी शिकविले. आज आपण मूलभूत प्रश्नांचवर शिस्तबद्ध पद्धतीने विरोध करण्याचे धैर्य गमावले आहे. व्यक्तीसाठी, समूहासाठी किंवा पक्ष वृद्धीसाठी आंदोलने, अनाकलनीय राजकारण करणे सामान्य बाब झाली आहे. आजची शिक्षण व्यवस्था ही प्रतिष्ठित वर्गाच्या वर्चस्वाला सतत पाठिंबा देत आहे आणि वंचितांना पाळीव प्राणी बनवत आहे. पुरेशा प्रमाणात खरे राजकीय शिक्षण देणारे मजबूत पाऊल जोपर्यंत आपण उचलत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. आज मोठ्या शैक्षणिक सुधारणेची गरज आहे आणि जर ही सुधारणा झाली नाही तर औपचारिक शिक्षणाच्या विद्यमान व्यवस्थेत केवळ रेषीय वृद्धी होईल जी केवळ जैसे थे वादी स्थितीस पाठिंबा देईल आणि मूलगामी सामाजिक परिवर्तनास अडथळा ठरेल.

    ३६) राजकीय शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे ?
    १) अभिजनवादाच्या सर्वांगीण विकासास उत्तेजन देणे.
    २) समतामूलक समाज निर्माण करणे.
    ३) विद्यार्थ्यांमध्ये उच्च बौद्धिक कौशल्ये तयार करणे.
    ४) शैक्षणिक संस्थांना शुद्ध/खरा पाठिंबा उपलब्ध करून देणे.
     
    ३७) स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक संस्थेसोबत राजकारणाचे संबंध कसे होते ?
    १) त्यांना राजकीय हस्तक्षेपाशिवाय राजकीय पाठिंबा प्राप्त झाला.
    २) त्यांना राजकीय हस्तक्षेपासह राजकीय पाठिंबा मिळू शकला नाही.
    ३) त्यांना राजकीय हस्तक्षेपासह अल्प राजकीय पाठिंबा प्राप्त झाला.
    ४) त्यांना राजकीय हस्तक्षेपाशिवाय अल्प राजकीय पाठिंबा प्राप्त झाला.
     
    ३८) विद्यमान शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मुख्य समस्या कोणती आहे ?
    १) ती शिक्षणाच्या ब्रिटिश मॉडेल वर आधारित आहे.
    २) ती विद्यार्थ्यांच्या मनावर मूल्ये बिंबवीत नाही.
    ३) ती अत्यंत श्रेणीबद्ध आणि विषमतावादी स्वरूपाची आहे.
    ४) ती काही प्रतिष्ठांचे वर्चस्व कायम ठेवते.
     
    ३९) खालीलपैकी कोणते कथन खरे नाही ?
    १) स्वातंत्र्य संग्रामाने लोकांना राजकीय शिक्षण देण्यास मदत केली.
    २) राजकीय पक्षांनी योग्य राजकीय शिक्षण उपलब्ध करून दिले.
    ३) सामाजिक परिवर्तनासाठी राजकीय शिक्षण आवश्यक आहे.
    ४) राजकीय शिक्षण हे व्मक्तीचे साध्य आणि साधन आहे.
     
    ४०) उतार्याषनुसार राजकीय शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा गांधींचे मुख्य योगदान काय आहे ?
    १) त्यांनी अनौपचारिक राजकीय शिक्षणाद्वारे लोकांमध्ये ”राजकीय साक्षरतेचा” प्रसार केला.
    २) त्यांनी राजकीय हस्तक्षेप मुक्त शिक्षणाच्या आवश्यकतेवर भर दिला.
    ३) त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला आंदोलन आणि अनाकलनीय राजकारण शिकविले.
    ४) त्यांनी असा विश्वा्स निर्माण केला की, आपले राजकीय साध्य हे साधनाच्या सुसंगत असावे.

    पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्र. क्र. ४१ ते ४५ यांची उत्तरे लिहा.
     
           माऊलीने पसायदान कशासाठी मागितले आहे ? सगळ्या मानवांची प्रकृती हळूहळू संस्कृतीकडे वळावी. लोककल्याणाचा, काहीतरी चांगले घडवायचा मार्ग त्यांना दिसावा म्हणून पसायदान मागितलेले आहे. जावे ते सन्मार्गाकडे जावे, जावे ते आत्मकल्याणाच्या मार्गाकडे जावे, जावे ते सात्विकतेच्या मार्गाकडे जावे आणि म्हणावे, ”आमच्या हातून कृत्ये अशी घडोत, आमच्या हातून कर्मे अशी घडोत की ती परोपकारार्थ केलेली असोत” आणि म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाची धडपड सज्जन व्हावे यासाठी असावी. मग आमची प्रकृती कशी असावी ? आमचा प्रवृत्तिधर्म कसा असावा ? तर प्रसिद्धिपराङ्मुख असावा. तो रावणासारखा कधीही नसावा. तो रामासारखा असावा!  तो कृष्णासारखा असावा! तो संतांच्यासारखा असावा! तसा पिंड आपला घडावा म्हणून या प्रार्थना सातत्याने आपण केल्या पाहिजेत. मानवाच्या मनामध्ये जोपर्यंत अहंकार असतो ना तो अहंकार जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत प्रयत्न आवश्यक आहे. एकदा अहंकार जिरला की ”अवघे देणे रघुनाथाचे” हीच संकल्पना. म्हणून मग अहंकार असावा पण ज्ञानजन्य निरहंकाराकडे त्याला झेपावता आले पाहिजे. म्हणून अहंकाराचे चार स्तर आपल्याकडे सांगितले आहेत ना, ते थोडे समजावून घेतले पाहिजेत.
          ज्याला आपल्या व्मक्तिमत्त्वाचा परिचय नाही त्यांचा अहंकार हा अज्ञानजन्य अहंकार आहे. म्हणजे तो ज्ञानजन्य नाही. पण ज्यांना आपली ओळख पटायला लागली आहे त्यांचा व्यक्तिगत अहंकार आहे. ज्यांना आणखी व्यापक दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यांचा व्यापक अहंकार आहे. ज्यांना आत्मतत्त्व प्राप्त झाले त्यांचा अहंकार हा ज्ञानजन्य निरहंकारामध्ये रूपांतरित झालेला आहे. कारण त्याला ज्ञानाची बैठक प्राप्त झालेली आहे. असा ज्ञानजन्य निरहंकार प्राप्त करणे हेच एका दृष्टीने प्रत्येक मानवाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे. तोच मोक्ष आहे. त्यालाच सायुज्यता असे म्हणतात, ङ्गयाचि देही याचि डोळाफ परमतत्वाचा गोमटा लाभ आपण करून घेतलेला आहे, कारण तिथे ज्ञानजन्य निरहंकार प्राप्त झालेला आहे, त्या स्वानंद सुखाची ठेव ही प्रत्येकाला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना ज्ञानेश्व र महाराजांनी केली आहे. आणि म्हणून त्यागाकडून आणखी वरच्या त्यागाकडे आपल्याला झेपावता आले पाहिजे. आपल्याला स्वार्थत्यागाकडून सामान्य त्यागाकडे, सामान्य त्यागाकडून मध्यम त्यागाकडे, मध्यमाकडून सर्वोच्च त्यागाकडे झेपावता आले पाहिजे कारण सगळ्या व्मक्तिमत्त्वाचा पाया जर कोणता असेल तर तो त्यागाचा आहे. आणि हे त्यागाचे लेणे, हे त्यागेच मोठेपण, या त्यागाची सूक्ष्म भूमिका, या त्यागाचे जीवनमूल्य आम्हाला कुठे मिळेल तर आई-वडिलांच्या सहवासामध्ये मिळेल. कुटुंब संस्थेमध्ये मिळेल. हे संस्कार करायला कधीही आळशीपणा करू नका. आपण दूरदर्शन पाहात बसावे आणि मुलांनी मात्र अभ्यास करावा अशी भूमिका चित्तात कधीही ठेवू नका. स्वतः त्यागा म्हणजे मुले  अभ्यास करतील. स्वतः ज्ञानेश्वारी म्हणायला बसा म्हणजे मुले बसतील. स्वतः गीता म्हणायला बसा म्हणजे मुले बसतील. स्वतः पसायदान म्हणा मुलांच्याकडून म्हणवून घ्या. जेवढा त्याग कराल ना तितके उंच उंच होत जाल!
           ”अरे ! तू स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होशील” असे आश्वा सन ज्ञानोबांनी दिले आहे. मला सांगा आणखी कुठले आश्वा सन द्यायचे ज्ञानेश्वार महाराजांनी ? याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला सांगा. जर तुम्हाला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती व्हायचे असेल तर काय केले पाहिजे ? ”ज्ञानजन्य निरहंकार” वृत्तीचा स्वीकार केला पाहिजे हेच माऊलीने पसायदानातून सांगितले आहे.

    ४१) अज्ञानजन्य अहंकाराचे लक्षण कोणते?
    १) स्वतःची ओळख पटायला लागणे
    २) व्यापकदृष्टी प्राप्त होणे.
    ३) आपल्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय नसणे.
    ४) आत्मतत्त्वाचे ज्ञान होणे.
     
    ४२) सर्वोच्च त्यागाचे जीवनमूल्य कोठे प्राप्त होते?
    १) ’याचि देही याचि डोळा’ परमतत्त्वाचा लाभ झाल्यावर
    २) स्वार्थत्यागाकडून सामान्य त्यागाकडे गेल्यावर
    ३) आईवडिलांच्या सहवासात
    ४) प्रार्थनेद्वारा संतासारखा प्रवृत्तिधर्म स्वीकारल्यावर
     
    ४३) अहंकार वृत्ती व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या जुळवा :
    a) अज्ञानजन्य अहंकार i) स्वानंद सुखाची ठेव
    b) व्यक्तिगत अहंकार ii) दृष्टिकोन विशाल करणे
    c) व्यापक अहंकार iii) स्वतःची ओळख पटविणे
    d) ज्ञानजन्य निरहंकार iv) व्यक्तिमत्त्वाचा परिचय नसणे
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iv) (iii) (ii) (i)
    २) (iii) (i) (iv) (ii)
    ३) (ii) (iv) (i) (iii)
    ४) (i) (ii) (iii) (iv)
     
    ४४) उतार्या्स योग्य शीर्षक कोणते देता येईल?
    १) अवघे देणे रघुनाथाचे!
    २) आमचा प्रवृत्तिधर्म
    ३) पसायदान : श्रेष्ठ प्रार्थना
    ४) स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती कोण?
     
    ४५) योग्य जोड्या लावून पर्याय ओळखा -
    a) संस्कृतीकडे वळणारी i) लोककल्याणासाठी
    b) पसायदानाची मागणी ii) आत्मकल्याणासाठी
    c) सन्मानाने वागणे iii) परोपकारार्थ कृती
    d) चांगली कर्मे iv) मानवाची प्रकृती
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iv) (i) (ii) (iii)
    २) (iii) (ii) (iv) (i)
    ३) (i) (iv) (iii) (ii)
    ४) (ii) (iii) (i) (iv)

    Read the given passage carefully and answer the question S. No. 46 to 50 on the basis of the content of the passage.
     
            The richness of great books shows itself in the many levels of meaning they contain. They lend themselves to a variety of interpretation. This does not mean they are ambiguous or that their integrity is compromised. The different interpretations complement one another and allow the reader to discover the unity of the work from a variety of perspectives. We need not read other books more than once to get all that they have to say. But we can always go deeper into great books. As sources of enlightenment, they are inexhaustible.
           The interest in many good books that are written is limited to a definite period of history. They do not exhibit the universal appeal that results from dealing with the fundamental questions which confront men in all times and places and in a way that men in all times and places can understand. Great books, on the contrary, transcend the provincial limits of their origin. They remain as world literature. The ones we are sure are great, are the once men everywhere turn to again and again through the centuries.
           In view of this, it is often said that great books must pass the test of time. This is quite true. But it is not the passage of time that makes the books great. They were great when they were written. An enduring interest in a book merely confirms its greatness. We may consider some contemporary books great, but we cannot be sure. Their excellence still remains to be proved before the tribunal of the ages.
    Mark Twain once remarked that “the great books are the books that everyone wishes he had read, but no one wants to read.” People wish they had read them because they are the indispensible material of a liberal education. They shy away from reading them because these books require thought. And thinking is hard. It is probably one of the most painful things that human beings are called upon to do.
    The great books are not easy to read. No one should expect to understand them very well on a first reading, no even to master them fully after many readings. I have often said that they are the books which are over everyone’s head all of the time. That is why they must be read and re-read. That is also why they are good for us. Only the thing which are over our head can lift us up.
     
    46) Choose the best option :
    The great books ...... provincial limits.
    1) consider
    2) justify
    3) illustrate
    4) rise above
     
    47) Choose the best option/s :
    The richness of great books shows itself in the many levels of meaning they ......
    1) control
    2) envelop
    3) prevent
    4) have 
     
    48) Which of the following statements are true in the context of the given passage?
    a) Great books require thought.
    b) Good books are world literature.
    c) Hard thinking is not painful for man.
    d) Great books do not have universal appeal.
    e) Long lasting interest in books make them great.
    1) (a) and (e)
    2) (a), (b) and (c)
    3) (d) and (e)
    4) (b) and (d)
     
    49) Choose the best option according to the passage :
    The difference between good books and great books is that ......
    a) great books are read quite often but good books are read rarely.
    b) good books are read all over the world while great book are not.
    c) great books have universal appeal and the deal with all time basic issues related to human beings but good books have limited time appeal.
    d) great books pass the test of time but good books may not.
    1) (a) and (b)
    2) (c) and (d)
    3) (b) and (c)
    4) Only (d)
     
    50) Choose the best options/s :
    ‘Great books must pass the test of time.’
    Which of the following statement is the closest in meaning to the above statement?
    a) Great books must pass our time.
    b) Great books must be considered great over a long period.
    c) Great books must be ready to test time.
    d) Great books should pass the test conducted from time to time.
    1) (a) and (d)
    2) (b)
    3) (d)
    4) (c) and (d)
     
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (११४)
    १-३
    २-१
    ३-१
    ४-३
    ५-४
    ६-४
    ७-३
    ८-४
    ९-२
    १०-३
    ११-२
    १२-२
    १३-१
    १४-२
    १५-३
    १६-१
    १७-३
    १८-४
    १९-४
    २०-४
    २१-४
    २२-२
    २३-१
    २४-३
    २५-३
    २६-४
    २७-४
    २८-१
    २९-३
    ३०-२
    ३१-३
    ३२-४
    ३३-१
    ३४-२
    ३५-४
    ३६-३
    ३७-३
    ३८-३
    ३९-३
    ४०-४
    ४१-३
    ४२-३
    ४३-१
    ४४-४
    ४५-१
    ४६-४
    ४७-२
    ४८-१
    ४९-२
    ५०-२
     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 918