चालू घडामोडी / प्रश्‍नमंजुषा (111)

  • चालू घडामोडी / प्रश्‍नमंजुषा (111)

    चालू घडामोडी / प्रश्‍नमंजुषा (111)

    • 01 Apr 2021
    • Posted By : study circle
    • 545 Views
    • 1 Shares

     राज्यसेवा पूर्वपरीक्षा, २१ मार्च २०२१ : चालू घडामोडीवरील प्रश्न

    (अ) जागतिक घटना
     
    १) राजकीय घडामोडी
     
    १) खालील कथने लक्षात घ्या :
    a) डिसेंबर २०१७ मध्ये इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते छाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
    b) मोक्याच्या छाबहार बंदराच्या कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली. सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनविण्याची ही भारताची पहिली वेळ असेल.
    वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहेत ?
    १) फक्त (a)
    २) फक्त (b)
    ३) (a) आणि (b) दोन्ही
    ४) (a) आणि (b) दोन्ही नाही
     
    २) खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भात २०१९ मध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ?
    १) फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार.
    २) मतदानाचा अधिकार
    ३) कुटुंबाच्या मालमत्तेचा अधिकार
    ४) घटस्फोटाचा अधिकार
     
    ३) ”आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ” बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
    १) युती १२१ सौर संसाधन समृद्ध देशांची आहे.
    २) हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्तामध्ये अंशत: व पूर्ण समाविष्ट आहेत.
    ३) भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे युती सुरू केली होती.
    ४) युती ३० नोव्हेंबर २०१५ साली पॅरिस येथे सुरू केली गेली.

    २) आर्थिक घडामोडी
     
    १) खालील शास्त्रज्ञांनी दिलेल्या ”इष्टतम लोकसंख्येच्या” व्याख्येशी संदर्भित शास्त्रज्ञांच्या जोड्या लावा.
    a) बॉलडींग (i) जास्तीत जास्त आर्थिक परतावा
    b) डॅल्टन (ii) राहणीमानाचा दर्जा उंचावणे
    c) पीटरसन (iii) जास्तीत जास्त समाज कल्याण
    d) कार सॉन्डर्स (iv) प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iv)   (iii)   (ii)    (i)
    २) (ii) (iv) (i) (iii)
    ३) (ii)    (iii)   (iv)   (i)
    ४) (iii) (i) (iv) (ii)
     
    २) खालील विधाने विचारात घ्या :
    a) मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे.
    b) राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केले जाते.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त बरोबर आहे.
    २) (b) फक्त बरोबर आहे.
    ३) (a) आणि (b) दोन्हीही बरोबर आहेत.
    ४) (a) आणि (a) दोन्हीही चूक आहेत.
     
    ३) ” भारत-अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान ” उपक्रम कोणत्या वर्षी सुरू (Launch) करण्यात आला?
    १) २००४
    २) २०००
    ३) २००९
    ४) २००५
     
    ४) GATT (जनरल अॅरग्रीमेंट ऑन ट्रेड अॅ ण्ड टॅरिफ्स) संबंधात पुढील विधाने विचारात घ्या.
    a) गॅट (GATT) ची स्थापना १९४८ साली झाली.
    b) सुरुवातीच्या काळात गॅट (GATT) चे २३ देश सदस्य होते.
    c) WTO गॅट (GATT) चे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे.
    d) द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे ”गॅट ” हे प्रशासन करते.
    वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    १) (a) आणि (d)
    २) (a), (b) आणि (d)
    ३) (a), (b) आणि (c)
    ४) वरीलपैकी सर्व
    ३) वैज्ञानिक व तांत्रिक घडामोडी
    १) खालील जोड्या जुळवा (योग्य पर्याय निवडा) :
    a) अॅजरिस्टॉटल i) औषधशास्त्राचा जनक
    b) थिओफ्रास्टस ii) अनुवंशिकशास्त्राचा जनक
    c) हिप्पोक्रेट्स iii) वनस्पतिशास्त्राचा जनक
    d) ग्रेगर जोहान मेंडेल iv) जीवशास्त्राचा जनक
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (ii)    (i) (iv) (iii)
    २) (iii) (ii) (iv) (i)
    ३) (iv) (iii) (i) (ii)
    ४) (i) (ii) (iv) (iii)

    २) पुढील विधानांचा विचार करा :
    a) दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते.
    b) म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते.
    पर्यायी उत्तरे :
    १) दोन्ही विधाने चूक आहेत.
    २) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमीमांसा आहे.
    ३) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमीमांसा नाही.
    ४) (a) बरोबर परंतु (b) चूक आहे.
     
    ३) जोड्या लावा :
    स्तंभ-I (प्राणी जाती)   स्तंभ-II (महत्त्व)
    a) कीटक i) कीटकांना खातो
    b) सर्प ii) पीक परागकण वाहक
    c) बेडूक iii) जमिनीची सुपीकता
    d) गांडूळ iv) उंदरांपासून संरक्षण
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (ii) (iv) (i) (iii)
    २) (ii) (iv) (iii) (i)
    ३) (iii) (iv) (i) (ii)
    ४) (iv) (i) (iii) (ii)
     
    ४) खालीलपैकी कोणता प्रोटोझुआन रोग/आजार ”त्से त्से /टिसी टिसी ” माशी चावल्यामुळे होतो?
    १) स्लिपिंग सिकनेस
    २) दिल्ली बोली
    ३) काला आजार
    ४) चागास् रोग
     
    ५) जोड्या लावा :
    मनुष्याच्या कार्यांवर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम.
      स्तंभ-I (आवाजाची पातळी)        स्तंभ-II (कार्य)
    a) १०० dB i) झोपेत अडथळा
    b) ४० dB ii) कार्यक्षमतेची हानी
    c) ७० dB iii) कायमची श्रवण क्षमतेची हानी
    d) ९० dB iv) भाषणात व्यत्यय
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iii) (i) (ii) (iv)
    २) (iii) (i) (iv) (ii)
    ३) (i) (iii) (iv) (ii)
    ४) (iv) (ii) (iii) (i)
     
    ६) ”सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारांत वाढत्या प्रमाणांत मागणी आहे. ”
    वरील विधान निम्न निर्देशित संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक ” वरील विधानाच्या ”संदर्भाने संयुक्तिक नाही. संयुक्तिक नसलेले कारण ओळखा.
    १) फुलांमध्ये नैसर्गिकरीत्या अॅ्न्टीऑक्सीडंट व अपमार्जन (ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची क्षमता) कार्यक्षमता असते.
    २) फुलांमध्ये ”अन्थोसायनीन ” प्रचुर प्रमाणात असते.
    ३) फुलं आकर्षक असून परागण प्रक्रियेत सहाय्य करतात.
    ४) फुलं महत्त्वाची जीवनसत्त्वे व खनिजांचा (मिनरल्स) स्रोत आहे.
     
    ४) भौगोलिक व पर्यावरण घडामोडी
    १) अॅलमेझॉन जंगला विषयी योग्य विधान शोधा.
    a) हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगले आहे.
    b) या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे.
    c) या जंगलांनी इक्वेडोरचा ४०% भाग व्यापला आहे.
    d) ह्या जंगलात मकाऊ, ट्युकन्स आणि ब्लॅक स्कीमर्स आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (c), (d)
    २) (a), (b), (c)
    ३) (a), (d)
    ४) (a), (b), (d)
     
    २) जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहिन प्राणी ............... आहे.
    १) ऑक्टोपस
    २) कटल फिश
    ३) कोलोस्सल स्क्वीड
    ४) जायंट स्क्वीड
     
    ३) जोड्या लावा.
    स्तंभ - । (शहर) स्तंभ - ॥ (नदीच्या काठावर)
    a)  पॅरिस (i) र्हासईन
    b)  जिनिव्हा (ii) र्हो‍न
    c)  बॉन (iii) निपर
    d)  किव्ह (iv) सिन (Seine)
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iv) (ii) (i) (iii)
    २) (iv) (ii) (iii) (i)
    ३) (ii) (iv) (i) (iii)
    ४) (iii) (iv) (i) (ii)
     
    ४) योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा.
    a) संपुष्टात न येणारी संसाधने i) मानवनिर्मित कृत्ये
    b) स्ट्रॅटोस्फिअर ii) जीवाश्म इंधन जसे कोळसा, पेट्रोल
    c) अपुनरावर्ती/पुनर्नुतनीकरणास अयोग्य iii) सौर ऊर्जा
    संसाधने किंवा अनुतनावर्ती संसाधने
    d) क्लोरोफ्लुरोकार्बन्स iv) ओझोनचा दाट थर
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iv) (iii) (ii) (i)
    २) (iv) (ii) (iii) (i)
    ३) (iii) (iv) (ii) (i)
    ४) (ii) (iii) (iv) (i)
     
    ५) नेमणुका व पुरस्कार
    १) टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने ”टाईम पर्सन ऑफ द इर, २०१९” साठी खालीलपैकी कोणाची निवड केली ?
    १) ग्रेटा थनबर्ग
    २) मलाला युसूफजाई
    ३) ऋषी जोशी
    ४) केट विन्सलेट
     
    ६) सामान्यज्ञान
    १) पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा.
    a) बायोस्फिअर i) महासागर, समुद्र, नद्या, तळे इ.
    b) लिथोस्फिअर ii) वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इ.
    c) हायड्रोस्फिअर iii) पृथ्वीच्या सभोवतालचे, वायू आवरण
    d) अॅयटमॉसफिअर iv) पृथ्वीचा घन (खडकांचा) घटक
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iii) (ii) (i) (iv)
    २) (iv) (iii) (ii) (i)
    ३) (ii) (iv) (i) (iii)
    ४) (iii) (ii) (iv) (i)
     
    (ब) राष्ट्रीय घटना
     
    १) राजकीय घडामोडी
    १) भारतातील प्रतोद विषयी योग्य विधाने निवडा :
    a) कायदे मंडळातील सभागृहात पक्षांतील सदस्यांचे शिस्त आणि वर्तन यासाठी प्रतोद जबाबदार असतो.
    b) भारताने ही संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतली आहे.
    c) अतिरिक्त प्रतोदाच्या सहाय्यकासह एक मुख्य प्रतोद असतो.
    d) राष्ट्रपतींच्या निवडणुकीवेळी प्रतोद खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रितीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (c), (d)
    २) (a), (b), (c)
    ३) (a), (c)
    ४) (a), (b), (d)
     
    २) ”राष्ट्रीय युवक धोरणा”बाबत खालील विधाने विचारात घ्या.
    a) राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार १९८६ मध्ये करण्यात आला.
    b) २००३ मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या १५-३५ वयोगटातील व्यक्ती अशी केली गेली.
    c) २०१४ मधील धोरणानुसार युवकाचा वयोगटाची व्याख्या १५-२९ वर्षे अशी केली आहे.
    वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
    १) फक्त (a)
    २) (a) आणि (b)
    ३) (b) आणि (c)
    ४) फक्त (c)
     
    ३) खालील तरतुदी विचारात घ्या.
    a) शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत.
    b) अधिकारांची विभागणी ही घटक राज्ये आणि केंद्र शासनामध्ये केली आहे.
    c) राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकांवर निर्णायक (संपूर्ण) नकाराधिकार वापरतात.
    d) केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते.
    वरीलपैकी कोणत्या तरतूद/तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती ?
    १) फक्त (a)
    २) (a), (c) आणि (d)
    ३) (b), (c) आणि (d)
    ४) वरील सर्व
     
    ४) ............ या परिस्थितीमुळे ”न्यायिक सक्रियतेला” चालना मिळते.
    a) जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात.
    b) अधांतरी (Hung) विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते.
    c) जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरते.
    d) जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतात.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (c)
    २) (b), (c), (d)
    ३) वरील सर्व
    ४) फक्त (b) आणि (c)
     
    ५) खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
    १) अनुच्छेद २०० अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात.
    २) राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठविण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात.
    ३) जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्ती शिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतींकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते.
    ४) राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेने कोणतीच कालमर्यादा घातलेली नाही.
     
    २) आर्थिक घडामोडी
    १) भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्टे आहेत :
    a) कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांचे समर्थन करणे.
    b) सर्व क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे.
    c) विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे.
    d) उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a), (b), (c)
    २) फक्त (b), (c), (d)
    ३) फक्त (a), (b), (d)
    ४) फक्त (a), (c), (d)
     
    २) सन २०१८ चा भारताचा SDG निर्देशांक हे दर्शवितो :
    a) भारताचा सरासरी निर्देशांक ५७ आहे.
    b) महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटात समाविष्ट आहे.
    c) उत्तर प्रदेश राज्याचा समावेश मउत्तमफ या गटात होतो.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a) बरोबर
    २) फक्त (b) बरोबर
    ३) फक्त (a) आणि (b) बरोबर
    ४) फक्त (b) आणि (c) बरोबर
     
    ३) खालील विधाने विचारात घ्या :
    a) भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी २०१५ पासून घेतली आहे.
    b) प्रमाणक स्थापक (नॉर्मेटीव्ह) नियोजन हे किती आयोगाचे मार्गदर्शक तत्त्व आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त बरोबर
    २) (b) फक्त बरोबर
    ३) (a) आणि (b) दोन्ही बरोबर
    ४) (a) आणि (b) दोन्ही चूक
     
    ४) ”संसद आदर्श ग्राम योजना ” बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
    १) सप्टेंबर २०१६ मध्ये सादर करण्यात आली.
    २) खासदार २०१९ पर्यंत २ किंवा अधिक मॉडेल व्हिलेज विकसित करू शकतात.
    ३) यामध्ये भारतातील २,५०० पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत.
    ४) वरीलपैकी एकही नाही.
     
    ५) ”प्रधानमंत्री जन धन योजना” यासाठी सुरू केली गेली.
    a) वित्तीय समावेशन
    b) वित्तीय साक्षरता
    c) विम्याचे कवच
    d) पीक विमा
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) व (b) फक्त
    २) (b) व (c) फक्त
    ३) (a), (b) व (c) फक्त
    ४) (b), (c) व (d) फक्त
     
    ६) पुढील विधाने विचारात घ्या :
    a) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २००७-२००८ मध्ये सुरू करण्यात आले.
    b) तांदूळ, गहू आणि डाळी यांचे उत्पादन वाढविणे हा त्याचा हेतू आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a) बरोबर आहे.
    २) फक्त (b) बरोबर आहे.
    ३) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
    ४) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
     
    ७) नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार (तज्ज्ञ गट पद्धती) लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या या संदर्भात खालीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत?
    a) १९८३-८४ मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य ४६.६ टक्के इतके होते.
    b) १९९३-९४ मध्ये ३६.० टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती.
    c) १९९०-९१ मध्ये ३५.० टक्के लोकसंख्या शहरी भागात दारिद्र्य रेषेखाली होती.
    d) १९८७-८८ मध्ये भारतात एकूण ३७.० टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (c)
    २) (b) आणि (d)
    ३) (a) आणि (b)
    ४) (c) फक्त
     
    ८) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे/ची (PMUY) उद्दिष्ट्य/ष्ट्ये :
    a) महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा
    b) महिला सक्षमीकरण
    c) अतिरिक्त रोजगारनिर्मिती
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b) फक्त
    २) (b), (c) फक्त
    ३) (a) फक्त
    ४) वरीलपैकी तीनही
     
    ९) पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
    a) राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प २०१५ मध्ये सुरू करण्यात आला.
    b) त्याअंतर्गत वय ९ वर्षे - १४ वर्षे दरम्यानच्या श्रमिक/मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.
    c) त्याअंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त
    २) (b) फक्त
    ३) (a) आणि (b) फक्त
    ४) वरील सर्व
     
    १०) जोड्या लावा :
    गट -अ (आर्थिक सुधारणा)           गट-ब (उद्दिष्ट्ये)
    a) विमुद्रीकरण i) काळ्या पैशाचे नियंत्रण
    b) नवा बेनामी कायदा ii) खोटे चलन निष्कासित करणे
    c) दिवाळखोरी कायदा iii) अनुदानांचे तर्काधिष्टीकरण
    d) आधार कायदा iv) व्यवसाय सरलतेस प्रवर्तित करणे
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iv) (iii) (ii) (i)
    २) (ii) (i) (iv) (iii)
    ३) (ii) (i) (iii) (iv)
    ४) (i) (ii) (iii) (iv)
     
     
    ३) वैज्ञानिक व तांत्रिक घडामोडी
    १) भारताच्या गगनयान मोहिमे विषयी अयोग्य विधाने शोधा.
    a) गगनयान साठी भारतीय हवाई सेनेच्या चार वैमानिकांची निवड अंतराळवीर प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे.
    b) त्यांचे प्रशिक्षण रशिया येथे युरी गागारीन कॉस्मोनॉट सेंटर येथे होणार आहे.
    c) या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी २०१४ मध्ये केली होती.
    d) याचे नियोजन २०२२ साठी पाच सदस्यांचे चमू एक महिन्याचे अंतराळातील वास्तव्य यासाठी करण्यात आले आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (c), (d)
    २) (b), (c), (d)
    ३) (c), (d)
    ४) (b), (c)

    ४) भौगोलिक व पर्यावरण घडामोडी
    १) भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांका विषयी योग्य विधाने शोधा :
    a) हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतो.
    b) जेवढा हा निर्देशांक अधिक तेवढी हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक असते.
    c) भारतात ५०० गुणांचा/बिंदूंचे प्रमाण वापरतात.
    d) हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (c), (d)
    २) (a), (b), (c)
    ३) (b), (c)
    ४) (b), (c), (d)

    २) खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती १९५२ च्या फार पूर्वी नष्ट होणार्याद आहेत असे जाहीर करण्यात आले?
    १) आशियातील चित्ता
    २) आशियातील हत्ती
    ३) वाळवंटातील कोल्हा
    ४) गंगेतील डॉल्फिन
     
    ३) जोड्या लावा :
    स्तंभ-I (नॅशनल पार्क) स्तंभ-II (राज्य)
    a) नरमधाफा i) गोवा
    b) भगवान महावीर ii) उत्तराखंड
    c) सिमलीपाल iii) अरुणाचल प्रदेश
    d) दुधवा iv) ओडिशा
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (ii) (iv) (iii) (i)
    २) (i) (iii) (iv) (ii)
    ३) (iii) (i) (ii) (iv)
    ४) (iii) (i) (iv) (ii)
     
    ५) नेमणुका व पुरस्कार
    १) योग्य कथन/ने ओळखा - (१५ वा वित्त आयोगा बाबत) :
    a) एन्. के. सिंग हे आयोगाचे अध्यक्ष आहेत.
    b) अरविंद मेहता हे आयोगाचे सदस्य आहेत.
    c) डॉ. अनुप सिंग हे आयोगाचे सचिव आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a)
    २) फक्त (a) आणि (b) 
    ३) फक्त (b) आणि (c)
    ४) फक्त (c)
     
    ६) क्रीडा घडामोडी
    १) कोणत्या भारतीय गोलंदाजांनी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट-ट्रिक प्राप्त केली ?
    a) कुलदीप यादव
    b) मोहम्मद शमी
    c) जसप्रीत बुमराह
    d) रवींद्र जडेजा
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (c)
    २) (b), (c), (d)
    ३) (a), (b), (d)
    ४) (a), (c), (d)
     
    ७) सामान्यज्ञान
    १) इ.स. ७५ मध्ये ........ यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला ”नॅचरल हिस्ट्री ” हा ग्रंथ लिहिला.
    १) प्लिनी
    २) हेरॉडॉटस
    ३) मेगॅस्थेनीस
    ४) पेरिप्लस

    (क) प्रादेशिक घटना
     
    १) राजकीय घडामोडी
    १) महाराष्ट्र व कर्नाटक यांतील सीमा विवादा विषयी अयोग्य विधाने शोधा.
    a) बेळगाव वर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे.
    b) बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैद्राबाद संस्थानाचा भाग होते.
    c) सध्या बेळगाव हा कर्नाटक मधील जिल्हा आहे.
    d) गेली अनेक वर्षापासून बेळगावचा सीमा प्रश्नस विवाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (c), (d)
    २) (b), (c)
    ३) (b), (d)
    ४) (a), (b), (d)
     
    २) आर्थिक घडामोडी
    १) आरे दुग्ध वसाहती विषयी योग्य विधाने शोधा :
    a) ही वसाहत १९४६ मध्ये तयार झाली.
    b) आरे वसाहतीचे उद्घाटन पं. जवाहरलाल नेहरूंनी केले होते.
    c) आरे जंगलातून १९७० नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली.
    d) याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (c), (d)
    २) (b), (c), (d)
    ३) (b), (c)
    ४) (b), (d)
     
    २) महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे (तुकडीकरण) काय झाले?
    a) शेतकरी स्वत:च्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही.
    b) शेतजमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
    c) आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही.
    d) शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त विधान (a) बरोबर आहे.
    २) विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.
    ३) विधान (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.
    ४) विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.

    ३) भौगोलिक व पर्यावरण घडामोडी
    १) नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम ओळखा.
    १) शहादा, धडगाव, अक्कलकुवा
    २) धडगाव, तळोदा, नंदुरबार
    ३) नवापूर, नंदुरबार, धडगाव
    ४) अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार
     
    २) खालील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर जनगणना २०११ प्रमाणे बरोबर आहे ?
    जिल्हा घनता लिंग गुणोत्तर
    a)  ठाणे ८८६ ९८६
    b) नाशिक ३९३ ९३४
    c) नांदेड ३१९ ९४३
    d)  औरंगाबाद ३६६ ९२०
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (d)
    २) (a), (c), (d)
    ३) (b), (c)
    ४) (b), (c), (d)
     
    ४) नेमणुका व पुरस्कार
    १) राष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१९ साठी बालक अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे याला ”नाळ” या मराठी सिनेमासाठी गौरवण्यात आले. खालीलपैकी या सिनेमाचे दिग्दर्शन कोणी केले आहे ?
    १) अंकुश चौधरी
    २) नागराज मंजुळे
    ३) सुधाकर रेड्डी एक्कंती
    ४) गार्गी कुलकर्णी
     
    २) पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा :
    a) २३ भागांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार २०१९ देण्यात आले.
    b) हे पुरस्कार चरित्र लेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाहीत.
    c) मराठी लेखिका अनुराधा पाटील यांना त्यांच्या लघुकथा लेखनासाठी पुरस्कार २०१९ मध्ये मिळाला.
    d) इंग्रजी मध्ये श्री. शशी थरूर यांच्या पुस्तकास २०१९ मध्ये पुरस्कार मिळाला.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (b), (c), (d)
    २) (a), (b)
    ३) (b), (c)
    ४) (a), (b), (c)

    सीसॅट पेपरमधील चालू घडामोडीसंबंधीचा उतारा
    पी.एम.  किसान योजनेतील अडथळे
     
           मोदी शासनाने शेतकर्‍यांसाठी रोख रक्कम ही योजना सुरू केली आहे. परंतु संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार सन 2019-20 या वर्षाच्या लक्षात 140 दशलक्ष शेतकर्‍यांपैकी केवळ अर्धे शेतकरी यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहचला आहे. पुढचा हप्ता देय असताना ज्या शेतकर्‍यांनी त्यांचे बँक खाते 12 अंकी आधार क्रमांकाशी जोडलेले नाही ते यापासून वंचित राहणार आहेत.
              दर चार महिन्यातून एकदा रु.2 हजार असे वर्षाकाठी रु.6 हजार रोख स्वरूपात या योजनेत शेतकर्‍यांना देऊन त्यांचा उत्पन्न स्तर उंचावला जातो. दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी पहिला हप्ता देऊन या योजनेस प्रारंभ झाला.
            सध्याच्या विस्तारवेगाने सन 2019-20 साठी अर्थसंकल्पीय रु.75,000 कोटी शासन खर्च करू शकणार नाही. ऑक्टोबर. 21, 2019 पर्यंत शासनाने रु.32,577 कोटी म्हणजेच 43 टक्के रक्कम खर्च केली आहे.
          आधार नोंदणी, रोख हस्तांतरण आणि कमी वेगाचे इंटरनेट तसेच ग्रामीण भागातील किचकट भू-दस्त नोंदणी यामुळे या योजनेची गती मंदावली आहे - असे निवेदन कृषी मंत्रालयाने संसदेत दिले आहे.
           डिसेंबर ते मार्च, एप्रिल ते जुलै आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत या योजनेत रोकड हस्तांतरण होत असते. पहिल्या हप्त्यावेळी 2018 ते मार्च 2019 दरम्यान जवळपास 70.2 दशलक्ष शेतकर्‍यांना रु.14,055 कोटी प्राप्त झाले. दुसर्‍या हप्त्यात एप्रिल 2019 ते जुलै 2019 दरम्यान केवळ 59.2 दशलक्ष शेतकर्‍यांना एकूण रु.11,845 कोटी वितरित करण्यात आले. तिसर्‍या हप्त्यात तर 33.3 दशलक्ष शेतकर्‍यांनाच रु.6,677 कोटी वितरित करण्यात आले.
           या आकडेवारीमागे काही निश्‍चित कारणे आहेत. जर पहिल्या हप्त्यात 70.2 दशलक्ष शेतकर्‍यांना लाभ झाला तर दुसरा हप्ता केवळ 59.2 दशलक्ष आणि तिसरा हप्ता केवळ 33.3 दशलक्ष शेतकर्‍यांनाच का मिळाला ?
          कृषी मंत्रालय दुसर्‍या कालावधीत अदा केलेली रक्कम ही पहिलाच हप्ता मानते कारण काहींनी नोंदणी उशिरा केली होती. अर्थात एप्रिल-जुलै, 2019 दरम्यान नोंदणी केलेल्या आणि लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांनाही प्रथम लाभार्थी मानले जाते. त्यामुळे पहिल्या हप्त्यातील शेतकरी लाभार्थी संख्या फुगलेली दिसते.
          मंत्रालयाने संसदीय तज्ञगटापुढे हे निवेदन केले आहे की, एकूण लक्षित 140 दशलक्ष यापैकी 1 दशलक्ष शेतकर्‍यांना रक्कम देण्यात आली आहे. संसदेत सादर अहवालानुसार लाभार्थी संख्या 7,17,42,959 एवढी आहे. म्हणजेच आणखी 69 दशलक्ष शेतकरी मार्चपर्यंत लाभार्थी व्हावे लागतील.
            या आकडेवारीनुसार या योजनेमध्ये डिसेंबर 2018 ते मार्च 2019 दरम्यान 33.3 दशलक्ष शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. त्यांना तीन हप्ते मिळाले आहेत. आणखी 25.9 दशलक्ष (एप्रिल-जुलै दरम्यान) व 11 दशलक्ष (ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान) दशलक्ष शेतकरी मार्चपर्यंत लाभार्थी व्हावे लागतील.
           या आकडेवारीनुसार या योजनेमध्ये डिसेंबर 2018 ते मार्च 2019 दरम्यान 33.3 दशलक्ष शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. त्यांना तीन हप्ते मिळाले आहे. आणखी 25.9 दशलक्ष (एप्रिल-जुलै दरम्यान) व 11 दशलक्ष (ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान) असे जास्तीचे लाभार्थी आढळून येतात.
          योजनेच्या आकृतिबंधानुसार ज्या शेतकर्‍यांनी पहिल्या टप्प्यात योजनेत नोंदणी केली आहे, त्यांना प्रारंभीपासून आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत. तर ज्यांनी दुसर्‍या टप्प्यात नोंदणी केली आहे, त्यांना दोन हप्ते मिळाले असणार, कारण या योजनेतील लाभ पूर्वलक्षी नाहीत.

    १) पी. एम. किसान योजनेबाबत डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यानच्या पहिल्या हप्त्यात शेतकर्यांलना एवढ्या रुपयांची रोकड हस्तांतरण करण्यात आले :
    १) रु.१४,०५५ कोटी
    २) रु.११,८४५ कोटी
    ३) रु.६,६७७ कोटी
    ४) रु.७५,००० कोटी

    २) प्रस्तुत उतार्‍यात उल्लेख केलेल्या योजनेचा मुख्य हेतू हा आहे :
    a) शेतकर्‍यांची आधार नोंदणी
    b) शेतकर्‍यांना इंटरनेट सुविधा पुरविणे.
    c) शेतकर्‍यांचा उत्पन्न स्तर उंचावणे.
    d) जमिनीच्या नोंदी अद्यावर करणे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त
    २) (a) आणि (b) फक्त
    ३) (c) फक्त
    ४) (c) आणि (d) फक्त
     
    ३) खालील विधाने विचारात घ्या :
    a) पी.एम. किसान योजनेअंतर्गत शेतकर्यां ना आर्थिक मदत रु.६,००० (अक्षरी रुपये सहा हजार) मात्र दिली जाते
    b) ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त बरोबर आहे
    २) (b) फक्त बरोबर आहे
    ३) (a) व (b) दोन्ही चूक आहेत
    ४) (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत
     
    ४) खालील विधाने विचारात घ्या :
    a) पी.एम. किसान योजनेच्या अंमलबजावणीत मूलभूत त्रुटी आहे.
    b) आधार- भूमी (जमिनींचे) अभिलेख जोडणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त बरोबर आहे
    २) (b) फक्त बरोबर आहे
    ३) (a) व (b) दोन्ही चूक आहेत
    ४) (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत
     
    ५) पी.एम. किसान योजनेच्या अंमलबजावणीत हे अडथळे आहेत :
    a) आधार वर आधारित नोंदणी
    b) अपुरे जमीन अभिलेख
    c) इंटरनेटच्या अपुर्याण सुविधा
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) व (b) फक्त
    २) (b) व (c) फक्त
    ३) (a) व (c) फक्त
    ४) वरील सर्व
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (104)
    (अ) जागतिक घटना
    1) राजकीय घडामोडी
    1-4
    2-1
    3-2
     
    2) आर्थिक घडामोडी
    1-2
    2-1
    3-1
    4-3
     
    3) वैज्ञानिक व तांत्रिक घडामोडी
    1-3
    2-2
    3-1
    4-1
    5-2
    6-3
     
    4) भौगोलिक व पर्यावरण घडामोडी
    1-4
    2-3
    3-1
    4-3
     
    5) नेमणुका व पुरस्कार
    1-1
     
    6) सामान्यज्ञान
    1-3
     
    (ब) राष्ट्रीय घटना
    1) राजकीय घडामोडी
    1-1
    2-4
    3-2
    4-3
    5-3
     
    2) आर्थिक घडामोडी
    1-1
    2-1
    3-3
    4-1
    5-3
    6-3
    7-3
    8-3
    9-4
    10-2
     
    3) वैज्ञानिक व तांत्रिक घडामोडी
    1-3
     
    4) भौगोलिक व पर्यावरण घडामोडी
    1-1
    2-1
    3-4
     
    5) नेमणुका व पुरस्कार
    1-1
     
    6) क्रीडा घडामोडी
    1-1
     
    7) सामान्यज्ञान
    1-1

    (क) प्रादेशिक घटना
    1) राजकीय घडामोडी
    1-3
     
    2) आर्थिक घडामोडी
    1-2
    2-4
     
    3) भौगोलिक व पर्यावरण घडामोडी
     
    1-2
    2-3
     
    4) नेमणुका व पुरस्कार
    1-3
    2-3

    सीसॅट पेपरमधील चालू घडामोडीसंबंधीचा उतारा
    पी.एम.  किसान योजनेतील अडथळे
    1-1
    2-3
    3-4
    4-4
    5-4

Share this story

Total Shares : 1 Total Views : 545