सुएझ कालवा / प्रश्‍नमंजुषा (110)

  • सुएझ कालवा / प्रश्‍नमंजुषा (110)

    सुएझ कालवा / प्रश्‍नमंजुषा (110)

    • 31 Mar 2021
    • Posted By : study circle
    • 334 Views
    • 0 Shares

    प्रश्‍नमंजुषा (110)

    1) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) :  सुएझ कालव्यात रुतलेले एव्हरगिव्हन जहाज बाहेर खेचण्यासाठी 29 मार्च 2021 रोजीच्या स्प्रिंग टाईडची अभियंत्यांना मोठी मदत झाली.
    कारण (र) : स्प्रिंग टाईडच्या दिवशी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते.
    पर्यायी उत्तरे :
    (1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    (2)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    (3)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    (4)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    2) खालीलपैकी कोणत्या महाकाय मालवाहू जहाजास झालेल्या दुर्घटनेमुळे  सुएझ कालव्यातील वाहतूक पूर्णत: रोखली गेली होती ( मार्च 2021) ?
    1) एमव्ही एव्हर ग्रीन
    2) एचएमएस यलो ग्रीन
    3) एव्हर गिव्हन
    4) एमव्ही रेड सी
     
    3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ)1859 मध्ये फ्रान्सने सुएझ कालवा बनवण्यासाठी सुरुवात करण्यात आली. 
    ब) 1869 मध्ये ब्रिटनने केलेल्या आर्थिक तांत्रिक मदतीमुळे सुएझ कालवा बनून तयार झाला.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    4) खालीलपैकी कोणी तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र जोडण्याचा विचार मांडला होता ?
    1) ब्रिटनचा सम्राट एडवर्डने 
    2) इजिप्तचा राजा नेतीपितीने 
    3) ब्रिटनची सम्राज्ञी व्हिक्टोरियाने 
    4) फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टने 
     
    5) सुएझ कालव्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) दुसर्‍या महायुद्धादरम्यान जर्मनी आणि इटलीने या कालव्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
    ब) दुसर्‍या महायुद्धादरम्यान हा कालवा फ्रान्स आणि ब्रिटनच्या ताब्यात होता.
    क) 1967 ते 1973 दरम्यान हा कालवा इस्राईलच्या ताब्यात होता.
    ड) सध्या हा कालवा इजिप्तच्या ताब्यात आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    6) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    1) 2020 साली इजिप्त सरकारने सुएझ कालव्याद्वारे 5 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न कमावले होते. 
    2) इजिप्तला दररोज टोल टॅक्सच्या रूपातून 67,200 कोटी रुपये मिळतात.
    3) इजिप्तच्या जीडीपीचा 4 टक्के हिस्सा हा सुएझ कालव्यातून जाणार्‍या जहाजांमधून येतो.
    4) 1969 साली इजिप्तने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
     
    7) कोणत्या देशासोबत 99 वर्षांचा करार करत इजिप्तने कालव्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती ?
    अ) फ्रान्स
    ब) ब्रिटन
    क) ऑटोमन साम्राज्य
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    8) नाईल नदी आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा पश्‍चिम आणि पूर्व कालवा कोणी काढलेला होता ?
    1) व्हेनेशियानांनी
    2) पहिला नेपोलियन  याने
    3) इजिप्तच्या राजाने 
    4) फर्डिनान्ड द लेसेप्स याने
     
    9) खालील जोड्या अचूक जुळवा :
         स्तंभ अ (सामुद्रधुनी/खाडी)         स्तंभ ब (सागर)
    अ. बोसपोरस I.      प्रशांत आणि हिंद महासागर  
    ब. बाब-एल-मंदेब II.     एजियन आणि काळा समुद्र
    क. मलाक्का III.    अरेबियन समुद्र व पर्शियन आखात
    ड. होर्मूझ IV.    अरेबियन द्विपकल्प
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II IV I III
    (3) III II IV I
    (4) IV III I II
     
    10) खालीलपैकी कोणते विधान एमव्ही एवर गिव्हन संदर्भता चुकीचे आहे?
    1) एव्हर गिव्हन हे जहाज एव्हरग्रीन मरिन कॉर्पोरेशनचे आहे.
    2) ते जगातील सर्वांत मोठ्या मालवाहू जहाजांपैकी एक असून, एकावेळी 20,000 कंटेनर्स वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
    3) ते सुएझ कॅनोलमध्ये मँशेट रुगोला गावाजवळ रुतून बसले होते.
    4) यापैकी नाही
     
    11) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) जगाच्या नकाशाच्या मध्यठिकाणी सुएझ कालवा निर्माण करण्यात आला आहे.  
    ब) सुवेझ कालव्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्याला ’चोक पॉइंट’ म्हणून ओळखलं जातं.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    12) 1869 साली सुवेझ कालवा सुरु झाल्याने लंडन आणि मुंबई यांच्यातील अंतर  कितीने कमी झाले ?
    1) 9,000 किलोमीटरने 
    2) 7,178 किलोमीटरने 
    3) 9,178 किलोमीटरने 
    4) 7,000 किलोमीटरने 
     
    13) सुएझ कालव्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) सुएझ कालव्याचं उत्तरेचं टोक बुर सैद शहराजवळ आहे.
    ब) सुएझ कालव्याचं दक्षिणेकडील टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ आहे.
    क) पोर्ट सैद बंदराला सुएझ कालव्याचं प्रवेशद्वार मानले जाते.
    ड) हुरगाडा बंदर हे सुएझ कालव्यास लागून इस्राईलच्या किनारपट्टीवर आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ आणि ब बरोबर
     
    14) 1975 मध्ये सुएझ कालवा वाहतुकीसाठी सुरू झाला त्यावेळी इजिप्तचे राष्ट्रपती कोण होते ?
    1) गमाल अब्दुल नासर 
    2) होस्नी मुबारक
    3) अनवर अल-सादत 
    4) यापैकी नाही.
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (110)
    1-1
     
    2-3
     
    3-1
     
    4-4
     
    5-3
     
    6-4
     
    7-1
     
    8-3
     
    9-2
     
    10-4
     
    11-3
     
    12-2
     
    13-4
     
    14-3
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 334