चालू घडामोडी / प्रश्‍नमंजुषा (105)

  • चालू घडामोडी / प्रश्‍नमंजुषा (105)

    चालू घडामोडी / प्रश्‍नमंजुषा (105)

    • 22 Mar 2021
    • Posted By : study circle
    • 99 Views
    • 0 Shares

    चालू घडामोडी : प्रश्‍नमंजुषा (105)

    1) खालील जोड्या अचूक जुळवा :

            स्तंभ अ ( पद )                                   स्तंभ ब (व्यक्ती)
    अ) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश      1) के. के. वेणूगोपाल 
    ब) महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल                       2) तुषार मेहता 
    क) भारताचे सॉलिसिटर जनरल                          3) दीपंकार दत्ता
    ड) भारताचे अ‍ॅटर्नी जनरल                                   4) आशुतोष कुंभकोणी
    पर्यायी उत्तरे :
    1) 4 2 3 1
    2) 3 4 2 1
    3) 3 3 1 4
    4) 2 3 1 4
     
    2) सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यापासून 2021 दरम्यान  कितीवेळा 11 न्यायमूर्तींच्या पूर्ण घटनापीठाची स्थापना झालेली आहे ? 
    1) तीनवेळा
    2) चाारवेळा
    3) पाचवेळा 
    4) सहावेळा
     
    3) ‘हुकूमशाहीत दमनाची भीती असते, तर लोकशाहीत प्रलोभनाची भीती असते,’ हे उदगार कोणी काढले होते?
    1) राष्ट्रपिता महात्मा गांधीजी
    2) गुरुदेव रविंद्रनाथ टागोर
    3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    4) पंडित जवाहरलाल नेहरु
     
    4) स्वीडनस्थित ‘व्हरायटीज् ऑफ डेमॉक्रसी’ (व्ही- डेम) या संस्थेच्या अहवालानुसार  सध्या भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
    1) सदोष लोकशाही (फ्लॉड डेमॉक्रसी) 
    2) आभासी लोकशाही (स्यूडो डेमॉक्रसी) 
    3) निवडणुकाधारित एकाधिकारशाही (इलेक्टेड ऑटोक्रसी) 
    4) झुंडग्रस्त लोकशाही (माब्ॅड डेमॉक्रसी) 
     
    5) खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत लोकशाही निर्देशांक अहवाल प्रकाशित केला जातो ?
    1) आंतरराष्ट्रीय पत्रकार संघट
    2) स्वीडनस्थित ‘व्हरायटीज् ऑफ डेमॉक्रसी (व्ही- डेम) 
    3) इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ईआययू)
    4) द वॉशिंग्टन पोस्ट हे वृत्तपत्र
     
    6) खालीलपैकी कोणत्या  चिनी हॅकर्स गटाने सायबर हल्ला करून भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्या लसीसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती, लसींच्या सप्लाय चेनसंदर्भातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता ?
    1) स्टोनपांडा 
    2) रेड इकू
    3) झेनहुआ 
    4)  झेडटीई
     
    7) ‘लोकशाही निर्देशांक अहवाल’ या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) ‘इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट’ (ईआययू) या संस्थेद्वारे  तो प्रकाशित होतो.
    ब)  2014 ते 2020 दरम्यान भारताचा लोकशाही निर्देशांक 27 व्या वरून 53 व्या स्थानापर्यंत घसरला.
    क) भारतामधील अधिकार पदावरील व्यक्ती लोकशाही मूल्यांकडे दुर्लक्ष करते.
    ड) भारतात ‘सदोष लोकशाही’ (फ्लॉड डेमॉक्रसी) आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, ब, क आणि ड बरोबर
     
    8) खालीलपैकी कोणत्या देशात  हिफाजत-ए-इस्लाम  ही संघटना कार्यरत आहे?
    1) अफगाणिस्तान
    2) मलेशिया
    3) टर्की
    4) बांग्लादेश
     
    9) मादागास्कर देशासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) युरोपीय लोक मादागास्करला ‘सेंट लॉरेन्स’ या नावाने ओळखत होते.
    ब) आग्नेय आफ्रिकेची भूमी मादागास्करपासून 100 किमीवर असल्याने मादागास्करचे लोक स्वत:ला आफ्रिकी समजतात. 
    क) जगातल्या चौथ्या क्रमांकाचे मोठे द्वीपराष्ट्र आहे.
    ड) ‘ग्रेट रेड आयलँड’ या नावानेही ते ओळखले जाते.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3)  विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    10) अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी कंपनीच्या अहवालानुसार चीनमधील कोणत्या हॅकर्स गटाने  12 ऑक्टोबर 2020 रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये ‘ब्लॅकआऊट’ करण्याचा प्रयत्न केला होता ?
    1) स्टोनपांडा 
    2) रेड इकू
    3) झेनहुआ 
    4)  झेडटीई
     
    11) जगात सर्वाधिक तेल आयात करणार्‍या देशांचा योग्य चढता क्रम लावा. 
    अ) भारत
    ब) अमेरिका
    क) चीन 
    ड)  जपान 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ - ब - क - ड
    2) क - अ - ड - ब
    3) ब -  ड - अ - क
    4) क - ब - अ -  ड
     
    12) चीनच्या विस्तारवादाला लगाम घालण्याच्या इच्छेतून  2007 मध्ये सर्वप्रथम ”क्वाड” या संघटनेची संकल्पना कोणी मांडली ?
    1) ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान माल्कम टर्नबिल 
    2) भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग
    3) अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा
    4) त्यावेळचे जपानचे पंतप्रधान शिंझो अबे
     
    13) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) चीनच्या विस्तारवादाला पायबंद घालण्यासाठी जपानने डेमोक्रॅटिक सिक्युरिटी डायमंड व्यासपीठाचा पुरस्कार केला.
    ब) 12 मार्च 2021 ला क्वाड”ची पहिली शिखर परिषद पार पडली. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    14) भारताच्या खनिज तेल आयातीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. 
    ब) भारतात सध्या आयात होणार्‍या तेलापैकी 60 टक्के तेल हे ओपेक देशांमधून येते
    क)  सर्वाधिक तेल आयात करणार्‍या देशांच्या यादीमध्ये भारत दुसर्‍या स्थानी आहे. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    15) कोणत्या सागरी क्षेत्रातील नाईन-डॅश लाईनपर्यंतच्या भागावर चीनने दावा केलेला आहे ?
    1) अंदमान सी
    2) साऊथ चायना सी
    3) ईस्ट चायना सी
    4) पर्शियन गल्फ
     
    16) भारताचे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हस (साठे) कोठे आहेत ?
    अ) मँगलोर (कर्नाटक)
    ब) थळ वायशेत (महाराष्ट्र)
    क) विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)  
    ड) पदुर (कर्नाटक)
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    17) कोणत्या देशात चीनने पहिला समुद्रपार आरमारी तळ उभारलेला आहे ?
    1) हिंदी महासागर - श्रीलंकेत
    2) अरबी समुद्रात - पाकिस्तानात
    3) आफ्रिकेतील - जिबूटी देशात 
    4) बंगालच्या उपसागरात - म्यानामारात
     
    18) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) राज्यघटनेच्या कलम 342 ए नुसार एसईबीसी यादीत एखाद्या समाजाचा समावेश करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींच्या अखत्यारित येतो. 
    ब) मागास वर्गीयांच्या यादीत काही बदल करायचा झाला तर त्याचा कायदा संसदेने पारित करावा लागतो.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    19) राजधानी दिल्लीतील प्रशासकीय रचने संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) दिल्ली पोलिस हे थेट केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारीत येतात.
    ब) दिल्लीत 5 महानगरपालिका आहेत. 
    क) दिल्लीत पुद्दुचेरीप्रमाणे नायब राज्यपालांच्या हाती सर्वाधिकार  आहेत.
    ड) दिल्लीत पोलीस यंत्रणा, सार्वजनिक व्यवस्था आणि भूमी वगळता सर्व प्रशासकीय निर्णयाचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  अ, ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ आणि ड बरोबर
     
    20) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 1991 मध्ये पंतप्रधान नरसिंहराव आणि वित्तमंत्री मनमोहनसिंग यांनी खासगी बँकांना परवानगी दिली होती.
    ब) सध्या देशात 12 राष्ट्रीयीकृत बँका कार्यरत आहेत.
    क) स्वातंत्र्यानंतर 1969 पर्यंत भारतातील बँका खासगी क्षेत्र चालवित होते.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (105)
    1-2
     
    2-3
     
    3-1
     
    4-3
     
    5-3
     
    6-1
     
    7-4
     
    8-4
     
    9-4
     
    10-2
     
    11-4
     
    12-4
     
    13-3
     
    14-1
     
    15-2
     
    16-4
     
    17-3
     
    18-3
     
    19-4
     
    20-4

Share this story

Total Shares : 0 Total Views : 99