पर्यावरण व परिस्थितिकी प्रश्नपुस्तिका (1)

  • पर्यावरण व परिस्थितिकी प्रश्नपुस्तिका (1)

    पर्यावरण व परिस्थितिकी प्रश्नपुस्तिका (1)

    • 02 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 287 Views
    • 0 Shares
    1) बायोम म्हणजे काय ?
    1) विशिष्ट पर्यावरण आणि प्रदेशात आढळणार्‍या विविध जैव समुदायांचे संघटन.
    2) निश्चित भूप्रदेश
    3) दुर्मीळ प्राणी आणि वनस्पतींचा प्रदेश
    4) एखाद्या विशिष्ट प्रदेशात वाढणार्‍या वनस्पतींचा संच

    2) परिसंस्था म्हणजे ...... नात्यांचा  अभ्यास प्रांत.
    1) सजीवांच्या सभोवतालच्या वातावरणाशी 
    2) सजीवांच्या सभोवतालच्या वातावरणाशी नसलेल्या   
    3) सजीवांचा नाश होण्याचा  
    4) यांपैकी एकही नाही

    3) विशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात?
    1) मेटेरिऑलॉजी
    2) ऑटइकॉलॉजी
    3) सिनेकॉलॉजी
    4) टर्मिनॉलॉजी

    4) प्राकृतिक पर्यावरणात स्वयंनियमन करणार्‍या अंतररचित (inbuilt) व्यवस्थेला म्हणतात.
    1) होमियोस्टॅटिक मेक्यानिजम
    2) प्रकाशसंश्लेषण
    3) जैवरासायनिक प्रक्रिया
      4) नैसर्गिक प्रक्रिया

    5) सजीवांच्या समुदायामध्ये एखाद्या सजीवाने व्यापलेला भौतिक अवकाश, तसेच त्याच्या प्रकार्यात्मक भूमिकेचे वर्णन करण्यासाठी कोणती संज्ञा वापरतात ?
    1) संक्रमिका (इकोटोन) 
    2) पारिस्थितिक कर्मता (इकॉलॉजिकल निश)
    3) अधिवास
    4) अधिवास क्षेत्र (होम रेंज)

    6) 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली?
    1) अ. व्हॉन हंबोल्ट
    2) अ. वेबर
    3) अ. वेगनर
    4) कार्ल रिश्टर

    7) आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते?
    1) गोंडवाना  
    2) लॉरेशिया   
    3) पँजिया  
    4) टेथिस

    8) इकोलॉजिकल फूटप्रिंट हे पर्यावरण प्रवाहाचे मापन मानले जाते ते कशाच्या संदर्भात ?
    1) अन्न, वनोत्पादने आणि इतर साधनांचा उपभोग
    2) निर्वनीकरण
    3) रस्ते, इमारती, ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचा वापर
    1) फक्त 1 बरोबर
    2) 1 आणि 3 बरोबर
    3) 1 आणि 2 बरोबर
    4) 1, 2 आणि 3 बरोबर

    9) परपोषी जीवांमधील मुख्यत: सूक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना ........ म्हणतात.
    1) स्वयंपोषी  
    2) विघटक   
    3) भक्षक
    4) मिश्रहारी   

    10) परिस्थितिकीची उत्पादकता या संदर्भात मरीन अपवेलिंग झोन्स महत्त्वाचे आहेत कारण त्यांच्यामुळे सागरी उत्पादकता वाढते आणि त्यासाठी ........ ही प्रक्रिया कारणीभूत ठरते.
    1) विघटन करणारे सूक्ष्म जीव पाण्याच्या पृष्ठभागावर येतात.     
    2) पोषण द्रव्ये पृष्ठ भागावर येतात.
    3) समुद्राच्या तळाशी राहणारे सूक्ष्म जीव वरच्या पातळीवर येतात.
    1) 1 आणि 2 बरोबर
    2) फक्त 2 बरोबर
    3) 2 आणि 3 बरोबर
    4) 3 बरोबर

    11) पर्यावरणातील विविध थरांच्या विश्लेषणासाठी पर्यावरण मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम ...... या ब्रिटिश पर्यावरणतज्ञाने मांडली.
    1) चार्ल्स एल्टन (1927)
    2) लिंडमन् (1942)
    3) ई. पी. ओडूम (1971)
    4) वरीलपैकी नाही

    12) विशिष्ट विभागातील प्राणी आणि वनस्पतींचे जीवन हे त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते त्याला ....... म्हणतात.
    1)  बायोटा
    2) बायोमा
    3) बायोमास
      4) ब्लॉच

    13) पृथ्वीवरील जीवसृष्टी असणारा प्रदेश म्हणजेच “बायोस्फिअर” होय. याचे अनेक जीवभौगोलिक भागांत विभाजन आढळते. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.
    1) युरोप व आशिया खंड - पोलिओआर्टिक प्रदेश
    2) दक्षिण अमेरिका खंड - निओट्रॉपिकल प्रदेश
    3) उत्तर अमेरिका खंड - निआर्टिक्ट प्रदेश
    4) वरील सर्व जोड्या योग्य

    14) खालीलपैकी कोणता पर्याय परिसंस्थेचा कायम घटक दर्शवितो?
    अ) अन्नसाखळी  
    ब) उत्पादक घटक
    क) सेंद्रिय संयुग
    ड) ऊर्जाचक्र  
    इ) उत्क्रांती प्रक्रिया  
    1) अ व क
    2) अ, ड, इ
    3) फक्त ड
    4) फक्त ब, इ 

    15) ज्यावेळी 30 पेक्षा जास्त कर्ब/नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्या दरम्यान नत्राचे ......... होते.
    1) इममोबिलायझेशन 
    2) मिनरलायझेशन
    3) अमोनिफिकेशन
    4) नायट्रीफिकेशन 

    16) कीड-रोग नाशकांचा अधिक वापर केल्यास होणारे परिणाम-
    1) युट्रॉफिकेशन
    2) जैवसंचय (बायो अ‍ॅक्युमिलेशन), जैव विस्तृतीकरण (बायोमॅग्निफिकेशन)
    3) आंधळेपणा
    4) वरील सर्व

    17) काही वनस्पतींमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरुपात पाण्याचा हृास होतो. या प्रक्रियेला .......... म्हणतात. 
    1) अ‍ॅबसॉर्पशन (शोषण)
    2) अ‍ॅडसॉर्पशन
    3) ऑसमॉसीस (परासरण) 
    4) गटेशन 

    18) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
    a) वनस्पती वितरण हे प्रामुख्याने मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर मर्यादित आहे.
    b) इकॉलॉजी हा शब्द ऑइकॉसवरून आला ज्याचा अर्थ राहण्याचे ठिकाण. हा शब्द लॅटिन आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) केवळ (a)
    2) केवळ (b)
    3) दोन्ही
    4) एकही नाही

    19) पिकांची पाण्याची गरज कशाशी संबंधित असते?
    1) इव्हॅपोट्रान्सपिरेशन
    2) सॉईल मिनरॉलॉजी
    3) पोटेंशियल अ‍ॅब्सॉर्बशन कोईफिशीएन्ट
    4) ड्राय मॅटर कन्टेट ऑफ द प्लँट

    20) परिसंस्था बद्दल खालील कोणती विधाने बरोबर आहेत?
    a) परिसंस्था ही जैविक व भौतिक पर्यावरणाची बेरीज असते.
    b) परिसंस्था एक निर्धारीत क्षेत्र व्याप्त करते.
    c) सौर ऊर्जा परिसंस्थेचा प्रमुख स्रोत आहे.
    d) परिसंस्थेचे ऊर्जा, जैविक, भौतिक हे तीन प्रमुख घटक आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त (c) व (d) बरोबर आहेत
    2) फक्त (a), (c) व (d) बरोबर आहेत
    3) फक्त (b), (c) व (d) बरोबर आहेत
    4) सर्व बरोबर आहेत

    21) परिस्थितिकी शास्त्र ही संज्ञा :
    a) ‘पर्यावरण जीवशास्त्र‘ अशीही ओळखली जाते.
    b) सर्वप्रथम अर्नेस्ट हॅकेल ने प्रस्तुत केली. 
    c) oikos (घर) व logos (अभ्यास/शास्त्र) या दोन ग्रीक शब्दांपासून आली आहे. 
    d) oikos (घर) व logos (अभ्यास/शास्त्र) या दोन लॅटिन शब्दांपासून आली आहे. 
    वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
    1) फक्त (a) व (b)
    2) (a), (b) व (c) 
    3) (a), (b) व (d)
    4) वरीलपैकी एकही नाही

    22) परिसंस्थेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
    a) हा संपूर्णपणे जीवशास्त्रीय भाग आहे.
    b) हा एक एकत्र/एक संघ भाग आहे.
    c) हा प्राकृतिक पर्यावरण आणि जैविक घटकांमधील आंतरक्रियेचा अभ्यास होय. 
    d) हा रचनात्मक आणि कार्यात्मक पैलूंचा अभ्यास होय. 
    1) फक्त (a)
    2) (b) आणि  (c)
    3) (b), (c) व  (d)
    4) वरील सर्व 

    23) परिस्थितिकी (Ecology) ही संकल्पना कोणी सांगितली ?
    1) Arthur Tansley
    2) Jagdishchandra Bose
    3) Hanns Reiter
    4) Mike Arthur

    24) कार्बन ग्रामण म्हणजे ....... मध्ये कार्बनचे प्रमाण वाढवणे.
    1) हिरवळ
    2) मृदा  
    3) मृदा व हिरवळ  
      4) मृदा,हिरवळ व वातावरण 

    25) खालीलपैकी कोणते मायक्रोफॉना आहे?
    1) बॅक्टेरिया
    2) निमॅटोडस्
    3) अ‍ॅक्टिनोमायसेटस
    4) फंगी

    26) ’Saprpohytes’ म्हणजे काय ?
    1) जे प्राणी समुद्रातील जिवंत प्राणी अन्न म्हणून उपयोगात आणतात.
    2) अशा वनस्पती ज्यांचा बुंधा फार टणक, जाड असतो.
    3) जे प्राणी स्वत:चे अन्न स्वत: निर्माण करतात.
    4) जे प्राणी मृत घटकांचा स्वत:चे अन्न म्हणून उपयोग करतात.

    27) अ) ’Biomass’ (जीवित घटक) ची निर्मिती फक्त वनस्पतीच करु शकतात.
    ब) परिसंस्थेची उत्पादकता म्हणजे - एका विशिष्ट दराने, विशिष्ट कालावधीत, विशिष्ट प्रदेशात ’Biomass’ निर्मिती करणे.   
    1) फक्त अ बरोबर
      2) फक्त ब बरोबर 
    3) दोन्ही बरोबर 
    4) यापेक्षा वेगळे उत्तर 

    28) ‘बायोस्फिअर‘ मध्ये जलानंतर दुसर्‍या क्रमांकाचा महत्त्वाचा घटक कोणता ?
    1) कार्बन
      2) कॅल्शिअम
    3) फॉस्फरस
    4) क्लोरीन 

    29) परिसंस्थेतील ऊर्जा संदर्भात खालील विधाने अभ्यासा.
    अ) ऊर्जेचे वहन हे चक्रीय गतीत असते.
    ब) पदार्थ  हा एकाच दिशेने  वहन करतो
    क) ऊर्जा निर्माण ही करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही फक्त तिचे एका प्रकारातून दुसर्‍या प्रकारात रूपांतर होते. 
    वरीलपैकी कोणते विधान असत्य नाही ?
    1) फक्त ब
    2) फक्त क  
    3) अ, क
    4) यापैकी नाही 

    30) खालीलपैकी कोणते उदाहरण भू परिसंस्था या प्रकारात मोडत नाही ?
    अ) डबके
    ब) त्रिभुज प्रदेश  
    क) जंगल
    ड) नदी
    इ) वाळवंट
    1) अ, ब, क
    2) अ, ब, ड
    3) ब, ड, इ 
    4) वरील सर्व 

    उत्तरे

    1-1

    2-1

    3-2

    4-1

    5-4

    6-3

    7-3

    8-4

    9-2

    10-2

    11-1

    12-1

    13-4

    14-2

    15-1

    16-2

    17-4

    18-3

    19-1

    20-4

    21-2

    22-3

    23-1

    24-3

    25-2

    26-4

    27-3

    28-3

    29-2

    30-2

Share this story

Total Shares : 0 Total Views : 287