महाराष्ट्राचा इतिहास : (1) मुंबई प्रांताचा इतिहास - प्रश्‍नपुस्तिका (129)

  •  महाराष्ट्राचा इतिहास : (1) मुंबई प्रांताचा इतिहास - प्रश्‍नपुस्तिका (129)

    महाराष्ट्राचा इतिहास : (1) मुंबई प्रांताचा इतिहास - प्रश्‍नपुस्तिका (129)

    • 13 May 2021
    • Posted By : study circle
    • 6017 Views
    • 19 Shares
     महाराष्ट्राचा इतिहास
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर भरती आयोगाच्या परीक्षात महाराष्ट्रराज्याच्या इतिहासावर विविध प्रश्‍न विचारले जातात. येथे महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले गेलेले प्रश्‍न पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमातील महाराष्ट्राच्या इतिहासाशीसंबंधित विषय आणि उपविषय (राज्यसेवा मुख्य परीक्षा, दुय्यम सेवा, गट- क संवर्ग  पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित) -
     
    (१) महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेची सुरुवात
    (२) ब्रिटिशांच्या धोरणांचा समाजावरील परिणाम (१७५७-१८५७) 
    (३) महाराष्ट्रातील प्रबोधनाचा काळ 
    (४) वसाहत शासनकालीन अर्थव्यवस्था
    (५) महाराष्ट्रात राष्ट्रवादाचा उदय आणि विकास
    (६) ब्रिटिश शासनविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव
    (७) गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ
    (८) ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास 
    (९) सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी
    (१०) सत्तेच्या हस्तांतरणाकडे
    (११) स्वातंत्र्योत्तर महारष्ट्र
    (१२) महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, त्यांची विचारप्रणाली व कार्य
    (१३) महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन व आधुनिक)
     
    (१) मुंबई प्रांताचा इतिहास
    १)  मराठेशाही
    २)  इंग्रज-मराठे संघर्ष
    ३)  मुंबई प्रांताचे प्रशासन
    ४)  १८५७ चा उठाव
    ५)  आदिवासींचे उठाव
     
    मराठेशाही
     
    १)  खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज ‘छत्रपती’ झाले ?
        १) १६३०
        २) १६७३
        ३) १६७४
        ४) १६७६
    २)  छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते सार्‍या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होतेअसे कोणी म्हटले आहे ?
        १) महात्मा ज्योतीबा फुले
        २) लाला लजपतराय
        ३) पं. जवाहरलाल नेहरू
        ४) रविंद्रनाथ टागोर
     
    ३)  भारतीय आरमाराचे जनक कोणाला मानतात ?
        १) टिपू सुलतान
        २) नवाब सिराजउद्दौला
        ३) सम्राट अकबर
        ४) राजा शिवछत्रपती
     
    ४)  जोड्या जुळवा :
        अ) मराठ्यांचा सेनापती            I) मराठी आरमारचा प्रमुख
        ब) कान्होजी आंग्रे                                    II) हंबीरराव मोहिते
        क) बुंदेलखंडचा राजा              III) निजामाचा पराभव
        ड) राक्षस भुवनची लढाइर्          IV) छत्रसाल
                      
        १)  I    II    III    IV
        २)  II   I    IV   III
        ३)  I    III   II    IV
        ४)  IV   III   II    I
     
    ५)  आदिलशाहाने ‘सरलष्कर’ हा किताब कोणाला दिला?
        १) मलिक अंबर
        २) फतेहखान
        ३) शरिफजी
        ४) शहाजी राजे
     
    ६)  कोणत्या मराठा शासकाने गोरिल्ला तंत्राने मुगलांना हरवले ?
        १) हैदर अली
        २) बाजीराव
        ३) छत्रपती शिवाजी
        ४) छत्रपती  संभाजी
     
    ७)  अफझलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ?
        १) कृष्णाजी भास्कर
        २) मेसाती कंक
        ३) संभाजी कावजी
        ४) पेताजी गोपीनाथ
     
    ८)  ‘कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत.‘ या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील ?
        १) धनाजी जाधव
        २) राणोजी शिंदे  
        ३) हंबीराव मोहिते
        ४) बजाजी नाईक-निंबाळकर
     
    ९)  स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामीनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती?
        १) शायिस्ताखान - फिरंगोजी नरसाळा
        २) दौलतखान - मुरारबाजी
        ३) बहलोलखान - प्रतापराव गुर्जर
        ४) सिद्दी मसऊद - बाजीप्रभू देशपांडे
     
    १०) दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
        ....... राणी। भद्रकाली कोपली॥
        अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे?
        १) झाशीची राणी लक्ष्मीबाई
        २) अहिल्याबाई होळकर
        ३) चांदबिबी
        ४) महाराणी ताराबाई
     
    ११) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकप्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती?
        १) होन
        २) दाम
        ३) शिवराई
        ४) टंका
     
    १२) छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या संदर्भातील खालील घटना कालक्रमानुसार लावा?
        अ) छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेवर स्वारी  
        ब) पुरंदराचा तह
        क) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक        
        ड) छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यास बादशहाच्या भेटीस गेले.
        वरील पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
        १) (क), (ब), (ड) आणि (अ)
        २) (क), (अ), (ड) आणि (ब)
        ३) (अ), (ब), (ड) आणि (क)
        ४) (अ), (ब), (क) आणि (ड)
     
    १३) शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा/साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश/ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता ?
        १) बर्‍हाणपूर व तुळजापूर
        २) कारवार व धारवाड
        ३) तामिळनाडूतील वेल्लोर
        ४) कर्नाटकातील बेळगाव
     
    १४) छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले ?
        १) प्रतापगड
        २) प्रचंडगड
        ३) रायगड
        ४) सिंहगड
     
    १५) बाजीराव पेशव्याचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला होता ?
        १) पालखेड
        २) माळवा
        ३) भोपाळ
        ४) खारगांव
     
    १६) छत्रपती संभाजी राजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
        १) राजगढ
        २) शिवनेरी
        ३) किल्ले पुरंदर
        ४) विशालगड
     
    १७) छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणार्‍या मिठावर मोठी जकात बसविली कारण ......
        १) त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते.
        २) त्यांना पोर्तुगिजांना धडा शिकवायचा होता.
        ३) त्यांना जकातीतून मिळणारे उत्पन्न वाढवायचे होते.
        ४) हा एक लष्करी निर्णय होता.
     
    १८) मराठा साम्राज्यात मुलत: काही उणिवा होत्या ज्यामुळे त्यांचा अध:पात झाला. पुढीलपैकी कोणती त्यातील एक नव्हती ?
        १) मराठ्यांच्या राजकीय पद्धतीमुळे बर्‍याच लोकांची सहानुभूती त्यांनी घालवली व ते लोक मराठ्यांपासून दूर गेले.
        २) इतर राज्यांवर मराठ्यांनी टाकलेल्या धाडींमुळे नवीन शत्रू निर्माण झाले.
        ३) त्यांनी लावलेल्या करांमुळे सर्वसाधारण माणसांचा जाच वाढला विशेषत: शेतकर्‍यांचा व व्यापार्‍यांचा 
        ४) वरीलपैकी एकही नाही.
     
    १९) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?
        a) चौथ : मराठ्यांनी त्यांच्या राज्याच्या बाहेरील क्षेत्रातून मिळवलेला कर मुघल साम्राज्याला दिल्या जाणार्‍या महसुलाच्या एक चतुर्थांश
              b) सरदेशमुखी : मराठ्यांनी जमीन महसुलाच्या एक दशांश लावलेला कर.
              c) मिसल : राजपुतांतील राजकीय घटक प्रत्येक केवळ आपल्या पुढार्‍याला मानणारे.
        पर्यायी उत्तरे :       
        १) फक्त (a)
        २) (b) (c)
        ३) फक्त (c)
        ४) एकही नाही
     
    इंग्रज-मराठे संघर्ष
     
    १)  ‘नायब वकील-ए-मुतलक’ हा किताब ........ यांना मिळाला.
        १) मल्हारराव होळकर
        २) महादजी शिंदे
        ३) रघुजी भोसले
        ४) खंडेराव दाभाडे
     
    २)  अठराव्या शतकाच्या दुसर्‍या पन्नास वर्षांच्या कालावधीतील या घटनांना वाचा.
        १) प्रथम अँग्लो मराठा युद्ध       
        २) प्रथम अँग्लो म्हैैसूर युद्ध
        ३) तृतीय कर्नाटक युद्ध
        ४) रोहिला युद्ध
        वरीलपैकी घटनाचा अचूक क्रम आहे
        पर्यायी उत्तरे -
        १) ३-१-२-४
        २) २-३-१-४
        ३) ३-४-२-१
        ४) ३-२-४-१
     
    ३)  खालीलपैकी कोणत्या करारामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांची सत्ता खिळखिळी केली?
        १) (i) वसईचा तह    (ii) पंढरपूरचा तह     (iii) पुणे करार
        २) (i) नागपूर तह    (ii) कोल्हापूर तह      (iii) खडकी तह
        ३) (i) कल्याणचा तह  (ii) मुंबई करार       (iii) सातारा तह
        ४) (i) पुणे करार     (ii) सातारा तह        (iii) नागपूर तह
     
    ४)  इंग्रज-महादजी यांच्यात सालबाईचा तह होऊन ’पहिले इंग्रज-मराठे’ युद्धाची समाप्ती झाली. या तहात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या ?
              a) इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये.
        b) पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा.
        c) वसई मराठ्यांकडे तर साष्टी, भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजांकडे राहतील.
        d) मराठ्यांनी इंग्रजाशिवाय अन्य सत्ताबरोबर संबंध ठेवावेत.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (c) फक्त
        २) (b), (c) आणि (d) फक्त        
        ३) (a), (c) आणि (d) फक्त
        ४) (c) आणि (d) फक्त
     
    ५)  जोड्या जुळवा :
        a) लॉर्ड वेलस्ली         i) शिंद्यांवर युद्ध पुकारले
              b) आर्थर वेलस्ली     ii) दख्खनच्या सैन्याचे प्रमुख
              c) जनरल लेक          iii) दिल्ली काबीज केली
              d) भोसले                     iv) देवगावचा तह
        पर्यायी उत्तरे :
                        (a)     (b)       (c)        (d)                       
              १)     (iv)    (iii)      (ii)        (i)                        
              ३)     (ii)     (iv)      (i)         (iii)
              २)     (i)      (ii)       (iii)       (iv)                      
              ४)     (iii)    (i)        (iv)       (ii)
     
    ६)  संत ल्यूबीन कोण होता?
        १) फ्रेंच संत
        २) नाना फडणीसांनी सत्कार केलेला फ्रेंच दुत
        ३) फ्रेंच सरसेनापती
        ४) फ्रेंच प्रवासी
     
    ७)  तिसरे इंग्रज-मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता ?
        १) त्रिबंकजी डेंगळे
        २) गंगाधर शास्त्री
        ३) बापू गोखले
        ४) यशवंतराव होळकर
     
    मुंबई प्रांताचे प्रशासन
     
    १)  पुढील वाक्यात वर्णन केलेले ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कोण ते ओळखा ?
        ते मुंबईचे गव्हर्नर होते.
        त्यांनी पुण्यात रेसिडेंट म्हणून काम केले होते.
        ते दक्षिणेत कमिशनर होते.
        मराठी भाषिकांचे गुणदोष त्यांना माहिती होते.
        रेसिडेंट म्हणून पुण्याला असताना पेशवाईचा कारभार त्यांनी जवळून पाहिला होता.  
        पर्यायी उत्तरे ;
        १) माऊंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन (१८१९-२७)
        २) चॉर्ल्स मेटकाफ
        ३) थॉमस मन्रो
        ४) वॉरन हेस्टिंग्ज
     
    २)  इ.स. १८१८ नंतर महाराष्ट्रात माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी विविध भागामध्ये अधिकारी नियुक्त केले होते. ते भाग व अधिकारी यांच्या जोड्या जुळवा.
        a) खानदेश      i) पॉर्टींजर
        b) धारवाड       ii) हेन्री रॉबर्टसन
        c) पुणे          iii) थॅकरे
        d) अहमदनगर    iv) कॅ. ब्रिग्ज
        पर्यायी उत्तरे ;
                       (a)      (b)       (c)        (d)
        १)  (iv)     (iii)      (ii)        (i)
        २)  (iii)     (ii)       (i)         (iv)
        ३)  (ii)      (i)        (iv)       (iii)
        ४)  (i)       (iv)      (iii)       (ii)
     
    ३)  माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने खानदेशाचा कलेक्टर म्हणून ...... यांची नेमणूक केली.
        १) एच. डी. रॉबर्टसन
        २) कॅ. जॉन ब्रिग्ज
        ३) विल्यम चॅपलीन
        ४) हेन्री पॉन्टीज
     
    ४)  एलफिन्स्टनने सातार्‍याचा ’पॉलिटिकल एजंट’ म्हणून कोणाची नेमणूक केली होती?
        १) एडमंड बक
        २) क्लाईव्ह
        ३) ग्रँड डफ
        ४) वॉरन हेस्टिंग्ज
     
    ५)  खालीलपैकी मुंबई इलाख्याचे गव्हर्नर कोण होते?
        a) एल्फिन्सटन, सर जॉन माल्कम
        b) थॉमस मन्रो, चॅप्लीन रॉबर्टसन
        c) ग्रँट, पॉन्टीन्जर
        d) डफ, मार्शमेन
        पर्यायी उत्तरे ;
        १) (a) आणि (c) फक्त
        २) (b), (c) आणि (d) फक्त         
        ३) (b) आणि (c) फक्त
        ४) (a), (b) आणि (c) फक्त
     
    ६)  मुंबई प्रांताचे चार विभाग होते व त्या प्रत्येकावर एकेक महसूल कमिशनर होता. हे चार विभाग ...... असे होते.
        १)  सिंध, उत्तर, मध्य, दक्षिण
        २) सिंध, पश्‍चिम, मध्य, पूर्व
        ३) सिंध, उत्तर, पश्‍चिम, दक्षिण
        ४) सिंध, उत्तर, पूर्व, दक्षिण
     
    ७)  जुलै १८१२ मध्ये जहागीरदार आणि एलफिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता ?
        १) पंढरपूर
        २) कोल्हापूर
        ३) नागपूर
        ४) सोलापूर
     
    ८)  मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहूने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ?
        अ) बंगाल, बिहार
        ब) ओरिसा
        क) डेक्कन, साउथ सातारा
        ड) मालवा, गुजरात
        पर्यायी उत्तरे :
        १) वरील सर्व
        २) फक्त क
        ३) फक्त ब
        ४) फक्त अ आणि ब
     
    ९)  रॉबर्ट क्लाइव्हने ....... शाह आलमला दिले होते. परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षीस म्हणून त्याने ते मराठ्यांना देऊन टाकले.
        १) अलाहाबाद व कोरा
        २) दिवाणी हक्क
        ३) अवध व बनारस
        ४) राजपुताना व दोआब
     
    १०) ’दत्तक वारस नामंजूर’ या तत्त्वानुसार लॉर्ड डलहौसीने महाराष्ट्रातील कोणते संस्थान सर्वात प्रथम खालसा केले?
        १) नागपूर
        २) सातारा
        ३) कोल्हापूर
        ४) सावंतवाडी
     
    १८५७ चा उठाव
     
    १)  इ.स. १८५७ च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?
        १) १ डिसेंबर १८५९
        २) १ डिसेंबर १८५८
        ३) १ नोव्हेंबर १८५७
        ४) १ नोव्हेंबर १८५८
     
    २)  १८५७ च्या संग्रामाची ....... ही तारीख निश्‍चित करण्यात आली होती.
        १) ३० जून
        २) १० मे
        ३) ३१ मे
        ४) १० जून
     
    ३)  इ.स. १८५७ च्या ‘मे‘ महिन्यात कोणत्या तारखेस  मीरत येथे हिंदी शिपायांनी आपल्या अधिकार्‍यांविरुद्ध बंड पुकारले?
        १) २९
        २) १०
        ३) ३१
        ४) ०३
     
    ४)  १८५७ च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण ...... होते.
        १) १ :
        २) १ :
        ३) १ :
        ४) १ :
     
    ५)  १८५७ मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले?
        १) तात्या टोपे
        २) नानासाहेब पेशवे
        ३) बहादूर शाह जफर
        ४) अझीमुल्लाह
     
    ६)  कानपूर येथील १८५७ च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ?
        १) राणी लक्ष्मीबाई
        २) राजा कुंवरसिंह
        ३) नानासाहेब
        ४) मंगल पांडे 
     
    ७)  १८५७ क्रांतीच्या कोणत्या नेत्यानी नेपाळमध्ये आश्रय घेतला ?
        १) झाशीच्या राणी लक्ष्मीबाई
        २) नानासाहेब
        ३) तात्या टोपे
        ४) कुँवर सिंह
     
    ८)  १८५७ च्या उठावातील दोन प्रमुख नेत्यांची नावे सांगा.
        १) झाशीची राणी/नानासाहेब पेशवा
        २) म. गांधी/वि. दा. सावरकर
        ३) लोकमान्य टिळक/तात्या टोपे
        ४) नामदार गोखले/सुभाषचंद्र बोस
     
    ९)  जोड्या जुळवा -
        (a) राणी लक्ष्मीबाई       (i) जगदीशपूर
        (b) खार्जासिंग           (ii) झाशी
        (c) तात्या टोपे          (iii) खानदेश
        (d) कुवर सिंह                        (iv) कानपूर
        पर्यायी उत्तरे -
                  (a)      (b)       (c)        (d)
        १)  (iv)     (iii)      (i)         (ii)
        २)  (iii)     (ii)       (iv)       (i)
        ३)  (i)       (iv)      (iii)       (ii)
        ४)  (ii)      (iii)      (iv)       (i)
     
    १०) इंग्रज सैन्याबरोबर झाशीच्या राणीच्या वेषात लढताना कोणते दाम्पत्य मारले गेले?
        १) सुंदर व सुंदरी
        २) काशी व पुरनचंद
        ३) झलकारी व पुरचंद
        ४) झलकारी व सुंदर
     
    ११) मध्य भारतात झांशीची राणी लक्ष्मीबाई, ............. यांची विधवा हिने ब्रिटिशांच्या विरोधात लढा चालू ठेवला.
        १) नारायण राव
        २) गंगाधर राव
        ३) जयसिंग राजे
        ४) कमलाकर राव
     
    १२) १८५७ च्या उठावात खालीलपैकी कोण सहभागी होते?
        a) सावंतवाडीचे रामजी शिरसाट
        b) झीनत महाल बेगम
              c) खान बहादूरखान रोहिला
              d) नसरत शाह
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (c) फक्त
        २) (b), (c) आणि (d) फक्त
        ३) (a) आणि (c) फक्त
        ४) (c) आणि (d) फक्त
     
    १३) १८५८ मध्ये अंदमानला पाठविलेल्या व्यक्ती व त्यांची राहण्याची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा.         
              a) अण्णू नथू                                               i) पंढरपूर
              b) बबन जुमाल खान             ii) नगर
              c) यदूू बागल                   iii) मुंबई
              d) पांडू भोरजी                  iv) सातारा
        पर्यायी उत्तरे :
                       (a)      (b)       (c)        (d)
        १)   (i)      (ii)       (iii)      (iv)
        २)   (ii)     (iii)      (iv)       (i)
        ३)   (iii)    (iv)       (i)        (ii)
        ४)     (iv)      (i)        (ii)       (iii)
     
    १४) नागपूरजवळ कामटी व टाकळी येथे कंपनीच्या फौजा होत्या. त्यातील काही शिपायांनी १३ जून १८५७ रोजी बंड पुकारण्याचे ठरविले. त्या बंडाचे सूत्रधार कोण होते ?
        १) बापूराव व वेंकटराव                          
        २) सीतारामपंत व बाकाबाई
        ३) इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान आणि दीदार खान
        ४) सीतारामपंत, वेंकटराव आणि बाकाबाई
     
    १५) १८५७ च्या उठावात ........
        अ) इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान व दीदार खान यांना फाशी झाली.
        ब) बापूराव या जमीनदारास इंग्रजांनी फाशी दिली.
        क) रंगो बापूजी गुप्ते यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.
        पर्यायी उत्तरे :
        १) अ आणि ब चूक आहेत, क बरोबर आहे.
        २) अ आणि ब बरोबर आहेत, क चूक आहे.
        ३) ब आणि क चूक आहेत, अ बरोबर आहे.
        ४) ब आणि क बरोबर आहेत, अ चूक आहे.
     
    १६) महाराष्ट्रातील १८५७ च्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते?
        a) भगवंतराव कोळी
        b) नानासाहेब पेशवे
        c) रंगो बापूजी गुप्ते
        d) रामजी शिरसाठ
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (c) फक्त
        २) (b) आणि (c) फक्त
        ३) (b), (c) आणि (d) फक्त
        ४) वरील सर्व
     
    १७) सातार्‍याचे राजे प्रतापसिंहाचे वकील या नात्याने ......... इंग्लंडला १५ वर्षे राहिले, परंतु काही उपयोग न झाल्याने १८५४ ला भारतात परतले.
        १) सार्वजनिक काका
        २) रंगो बापूजी
        ३) वासुदेव बळवंत फडके
        ४) बाबासाहेब भावे
     
    १८) रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्‍वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले?
        अ) कृष्णाजी सदाशिव सिंदकर
        ब) व्यंकटराव व बापूजी
        क) रामजी सिरसाळ
        ड) बाबासाहेब शिर्के
        पर्यायी उत्तरे :
        १) अ आणि ब
        २) फक्त अ
        ३) ब आणि क
        ४) ड आणि अ
     
    १९) ...... हे १८५७ च्या उठावाच्या वेळेस भारताचे गव्हर्नर जनरल होते.
        १) लॉर्ड डलहौसी
        २) लॉर्ड कॉर्नवॉलीस
        ३) थॉमस मुन्रो
        ४) लॉर्ड कॅनिंग
     
    २०) १८५७ च्या कोल्हापुरातील उठाव खालीलपैकी कोणत्या अधिकार्‍याने दडपून टाकला होता ?
              a) जेकब
              b) ग्लासपुल
              c) मेजर डॅनियल
              d) रॉबर्टसन
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) फक्त
        २) (a) आणि (b) फक्त
        ३) (c) फक्त
        ४) (a),(c) आणि (d) फक्त
     
    २१) जोड्या लावून योग्य पर्याय निवडा -
        a) कानपूर        i) ह्यू रोज
              b) झांसी         ii) कर्नल नील
              c) बनारस        iii) कँपबेल
              d) दिल्ली        iv) विल्यम हॉडसन
        पर्यायी उत्तरे :
                (a)      (b)       (c)        (d)
        १) (i)       (ii)       (iiii)     (iv)
        २) (ii)      (i)        (iv)       (iii)
        ३) (iii)     (i)        (ii)        (iv)
        ४)  (iv)     (iii)      (ii)        (i)
     
    २२) खालीलपैकी कोणता इंग्रज अधिकारी १८५७ च्या घटनेमध्ये सहभागी नव्हता?
        १) लॉरेन्स
        २) कॅनिंग
        ३) वेलस्ली
        ४) हॅवलॉक
     
    २३) १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? योग्य पर्याय निवडा.
        १) आऊटरॅम
        २) हॅवलाक
        ३) हेन्री लॉरेन्स
        ४) कॅम्पबेल
     
    २४) लखनौ येथील १८५७ च्या उठावाचे नेतृत्त्व ...... यांनी केले होते.
        १) अवधच्या बेगम
        २) बडी बेगम
        ३) बेगम साहिबा
        ४) बेगम ताज
     
    २५) १८५७ च्या उठावास ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असे कोणी संबोधिले ?
        १) प्रा. न. र. फाटक
        २) पी. ई. रॉबर्टस
        ३) डॉ. आर. सी. मुजुमदार
        ४) वि. दा. सावरकर
     
    २६) १८५७ ची घटना स्वातंत्र्ययुद्ध नव्हतेहे ............ यांनी म्हटले आहे.
        १) एन. आर. फाटक
        २) के. एम. पणिक्कर
        ३) डॉ. ताराचंद
        ४) जवाहरलाल नेहरू
     
    २७) १८५७ च्या उठावाबद्दल ‘पहिले स्वातंत्र्य युद्ध’ असे उद्गार कोणी काढले ?
        १) वि. दा. सावरकर
        २) सुरेंद्र बॅनर्जी
        ३) अशोक मेहता
        ४) एस. एन. सेन
     
    २८) सन १८५७ च्या बंडावर ’द ग्रेट रिबेलियन’ हे पुस्तक कोणी लिहिले?
        १) व्ही. डी सावरकर
        २) एन. आर. फाटक
        ३) एस. एन. सेन
        ४) अशोक मेहता
     
    २९) १८५७ च्या संघर्षाच्या स्वरूपाबाबत कितीही मतभेद असले तरी हा केवळ लष्करी उठाव नव्हता. तो एक महान सामाजिक उद्रेक होता व त्यामुळे भारतीय समाजाच्या रचनेत आमूलाग्र बदल झाला असे कोणाला वाटते?
        १) फिरोजशहा मेहता
        २) अशोक मेहता
        ३) जयंत मेहता
        ४) अमित मेहता
     
    ३०) १८५७ च्या उठावाच्या स्वरूपाविषयीच्या जोड्या लावा.
              a) बेंजामिन डिझरायली    i) ‘सत्तावन सालचा क्षोभ‘
        b) स्टॅन्ले वॉलपर्ट        ii) ‘धार्मिक संघर्षाचे रूप घेऊन सुरू झालेला उठाव   पुढे स्वातंत्र्यसंग्राम बनला’
        c) गो. स. सरदेसाई               iii) ‘ही घटना लष्करी बंडापेक्षा काही अधिक होती परंतु प्रथम स्वातंत्र्यापेक्षा बरीच कमी होती‘
        d) डॉ. सेन                                iv) ‘राष्ट्रीय उत्थान’
                  (a)       (b)        (c)         (d)
              १)     (iii)      (i)         (iv)        (ii)
              २)     (iii)      (iv)       (i)          (ii)
              ३)     (ii)       (iv)       (iii)        (i)
              ४)     (iv)      (iii)       (i)          (ii)
     
    ३१) संस्कृती आणि टोळीवाद असा संघर्ष म्हणजे १८५७ चा उठाव असा ........... यांचा दृष्टिकोन होता.
        १) डब्ल्यू. टेलर
        २) बेंजामिन डिझरायली
        ३) व्ही. डी. सावरकर
        ४) टी. आर. होल्म्स
     
    ३२) खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की १८५७ चा उठाव सैनिकी  विद्रोह नसून ‘राष्ट्रीय उठाव‘ होता :
        १) लॉर्ड डलहौसी
        २) लॉर्ड कॅनिंग
        ३) विल्यम ग्लॅडस्टोन
        ४) बेंजामिन डिझ्रायली
     
    ३३) तात्या टोपे यांना फाशी देण्यात आलेले ठिकाण कोणते?
        १) काल्पी
        २) शिप्री
        ३) झांसी
        ४) ग्वाल्हेर
     
    ३४) ‘एनफिल्ड रायफल’ वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ........... ही केंद्रे निवडली होती.
        १) डमडम, अंबाला आणि सियालकोट
        २) पानिपत, अंबाला आणि पठाणकोट
        ३) बराकपूर, दिल्ली आणि डमडम
        ४) सियालकोट, कोलकाता आणि डमडम
     
    ३५) इ. स. १८५७ च्या उठावाचे तात्कालिक कारण ठरलेल्या ‘एनफिल्ड‘ बंदुका कंपनी सरकारने कोठून मागवल्या होत्या आणि त्या कोठे तयार केलेल्या होत्या ?
        अ) इंग्लंड मधील लँकेशायर
        ब) लंडन शस्त्र कारखाना
        क) भारतातील कलकत्ता
        ड) डमडम कारखाना
        पर्यायी उत्तरे -
        १) (अ) व (ब) योग्य
        २) (ब) आणि (ड) योग्य          
        ३) (क) आणि (ड) बरोबर         
        ४) (ड) आणि (अ) बरोबर
     
    ३६) १८५७ च्या उठावाच्या चार प्रमुख केंद्रांची नावे लिहा.
        १) झाशी, मेरठ, कानपूर, लखनौ
        २) अवध, बनारस, बाणपूर, कालिकत
        ३) पाटणा, मेरठ, दिल्ली, अमृतसर 
        ४) पुणे, अलाहाबाद, लाहोर, ग्वाल्हेर
     
    ३७) १८५७ च्या उठावात खालीलपैकी कोण सहभागी होते?
        a) सावंतवाडीचे रामजी शिरसाट
        b) झीनत महाल बेगम
              c) खान बहादूरखान रोहिला
        d) नसरत शाह
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (c) फक्त
        २) (b), (c) आणि (d) फक्त
        ३) (a) आणि (c) फक्त
        ४) (c) आणि (d) फक्त
     
    ३८) इ. स. १८५७ च्या उठावात होळकर तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे केली होती ?        
        a) भोपाळ
              b) महू
        c) इंदौर
              d) महिदसी
        पर्यायी उत्तरे :  
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (b) आणि (c) फक्त
        ३) (c) आणि (d) फक्त
        ४) (a), (c), (d) फक्त
     
    ३९) ...... हे ब्रिटिशांसोबत प्रामाणिक राहिले व त्यांना १८५७ चा उठाव दडपण्यासाठी मदत केली.
        १) ग्वालियरचे शिंदे
        २) जोधपूरचा राजा
        ३) जगदीशपुरचे कन्वर सिंग
        ४) औंधचे नवाब
     
    ४०) १८५७ च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी  भाग घेतला नाही  ?
        अ) शिंदे, होळकर
        ब) हैद्राबाद निजाम
        क) पतियाला जिंद, ग्वाल्हेर
        ड) कपूरशहा
        १) अ व ब
        २) अ, ब व क
        ३) ब,क व ड
        ४) वरील सर्व 
     
    ४१) पुढीलपैकी कोणती व्यक्ती/कोणत्या व्यक्ती १८५७ च्या उठावाशी संबंधित नाही/नाहीत?
        अ) पेठचा राजा भगवंतराव        
        ब) अजीजन नर्तिका
        क) गुलमार दुबे
        ड) काश्मीरचा राजा गुलाबसिंह
        १) अ आणि ब फक्त
        २) ब आणि ड फक्त
        ३) अ, ,
        ४) ड फक्त
     
    ४२) सन १८५७ च्या काळात हिंदुस्थानाच्या कोणत्या भागात फारसे उठाव झाले नाहीत ?
        १) उत्तर हिंदुस्थान
        २) पूर्व हिंदुस्थान
        ३) मध्य हिंदुस्थान
        ४) दक्षिण हिंदुस्थान 
     
    ४३) वर्ष १८५७ च्या क्रांती मध्ये कोणते क्षेत्र सर्वात कमी प्रभावित क्षेत्रात होते ?
        १) बुंदेलखंड
        २) पश्‍चिम बिहार
        ३) पश्‍चिम पंजाब
     
    ४४) १८५७ च्या क्रांती संबंधी खालील प्रमुख विद्रोहासंबंधी वक्तव्य वाचा.
        १) नानासाहेब यांनी कधीच आत्मसमर्पण केले नाही आणि नेपाळला पळून गेले.
        २) अवधची बेगम, हजरत महल यांना ब्रिटिशांकडून अटक करुन मारून टाकण्यात आले.
        ३) तात्या टोपे यांना जमीनदाराने काढून टाकले आणि त्याने त्यावर विजय मिळवला.
        वरीलपैकी कोणते वक्तव्य अचूक आहे ?
        पर्याय :
        १) १ आणि २ फक्त
        २) २ आणि ३ फक्त
        ३) १ आणि ३ फक्त
        ४) १,२ आणि ३
     
    ४५) १८५७ च्या उठावाचे प्रतीक म्हणून कोणते चिन्ह होते ?
        १) चपाती व तलवार
        २) लाल कमळ व चपाती
        ३) लाल गुलाब व चपाती
        ४) लाल कमळ व तलवार
     
    ४६) इ.स. १८५७ च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे ........... ऐक्य होय.
        १) हिंदू-मुस्लीम
        २) मराठा-शीख
        ३) इंग्लिश-मुस्लीम
        ४) इंग्लिश-मराठा
     
    ४७) १८५७ च्या उठावास काय कारणीभूत झाले?
        a) डलहौसीचे आक्रमक धोरण
        b) सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप
        c) सैनिकांतील असंतोष
        d) कंपनी काळातील राज्यविस्तार
        १) (a) व (b)
        २) (b) व (c)
        ३) (a), (b) व (c)
        ४) (a), (b), (c) व (d)
     
    ४८) १८५७ च्या उठावास काय कारणीभूत झाले नाही ?
        i) बंगालची लूट
        ii) कंपनीची व्यापारात मक्तेदारी
        iii) चरबीयुक्त काडतुसे            
              iv) वाढती बेकारी
              v) धार्मिक बंधने
        vi) कोणताही पर्याय योग्य नाही
        १) (i)
        २) (ii)
        ३) (iii)
        ४) कोणताही पर्याय योग्य नाही
     
    ४९) खाली दिलेल्या घटना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शेवटच्या मुगल बादशहाबाबतचे धोरण दर्शवितात. या घटना तार्किक व कालानुक्रमाने लावा.
        a) मानाची वस्त्रे देण्याची बादशहाची प्रथा कंपनीने बंद केली.
        b) गव्हर्नर - जनरलकडून ’विनित सेवक’ असा उल्लेख.
        c) लाल किल्ल्यातील निवासस्थान सोडण्याबाबत बादशहावर दबाव.
        d) बादशहाने दरबार भरविण्यावर कंपनीने बंदी आणली.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b), (c), (d)
        २) (a), (d), (b), (c)
        ३) (b), (a), (d), (c)
        ४) (b), (d), (a), (c)
     
    ५०) इ.स. १८५७  च्या उठावाचे तात्कालिक कारण होते...........
        १) गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग      
        २) अनेक संस्थाने खालसा करणे
        ३) ख्रिश्‍चन धर्म प्रसार करणे
        ४) पदव्या, वतने आणि पेन्शन रद्द करणे.
     
    ५१) सन १८५७ चा उठाव उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर झाला. तसा मुंबई किंवा मध्य प्रांत वर्‍हाडात का झाला नाही?
        अ) दुसर्‍या बाजीरावाच्या मनमानी कारभारामुळे अनेक जण दुखावले होते.
        ब) स्वराज्याविषयी जनतेत आत्मीयता राहिली नव्हती.
        क) परत पेशव्यांचे राज्य येईल ही भिती होती.
        ड) उठावात एकसूत्रीपणा नव्हता.
        १) अ) फक्त
        २) अ), ब) आणि क)
        ३) अ) आणि ड)
        ४) अ), ब), क) आणि ड)
     
    ५२) इ.स. १८५७ च्या उठावा दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट्य कोणते होते?
        १) इंग्रजांना समूळ नष्ट करणे
        २) इंग्रजांना सहकार्य करणे
        ३) इंग्रजांना विरोध करणे
        ४) वरीलपैकी कोणतेही नाही.
     
    ५३) १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाला भारतीय समाजसुधारकांचा पाठिंबा का नव्हता ?
        १) त्यांना ब्रिटिशांकडून सर्व साहाय्य मिळत होते
        २) इंग्रजांच्या मदतीने समाजघातक रूढींना कायद्याने बंदी घालण्याचा प्रयत्न करणे शक्य होते
        ३) संस्थानिकांना समाजाच्या प्रगतीसाठी काही कारणे करणे शक्य नव्हते
        ४) स्वातंत्र्ययुद्ध हे प्रामुख्याने धार्मिक कारणांनी सुरू झाले होते
     
    ५४) स्वा. वि. दा. सावरकर आपल्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर‘ या ग्रंथात १८५७ च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध असे का संबोधतात. ?                
        १) त्यांच्या मते या घटनेची स्वधर्म व स्वराज्य ही दोन महत्त्वाची कारणे आहेत.
        २) या उठावात भारतीय लष्कराचा सहभाग होता.     
        ३) या उठावास सर्व भारतीयांचा पाठिंबा होता.
        ४) हा उठाव देशव्यापी होता. 
     
    ५५) डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची ...... कारणे होती.
        १) सामाजिक
        २) राजकीय
        ३) आर्थिक
        ४) लष्करी
     
    ५६) विधान A : मेरठ येथील शिपायांनी बंड केले.
        विधान B : मंगल पांडेला फाशी देण्यात आली.
        १) A R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे बरोबर स्पष्टीकरण नाही.
        २) A R दोन्ही बरोबर आहेत व R हे A चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
        ३) A बरोबर आहे, R चुकीचे आहे.
        ४) A चुकीचे आहे, R बरोबर आहे.
     
    ५७) १८५७ च्या उठावास काय कारणीभूत झाले?
        a) डलहौसीचे आक्रमक धोरण
        b) सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप
        c) सैनिकांतील असंतोष
        d) कंपनी काळातील राज्यविस्तार
        १) (a) व (b)
        २) (b) व (c)
        ३) (a), (b) व (c)
        ४) (a), (b), (c) व (d)
     
    ५८) सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेला रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसविण्याचा कट रचला ?
        १) जमीनदार
        २) शेतकरी
        ३) आदिवासी
        ४) सैनिक
     
    ५९) इ.स. १८५७ चा उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला ? त्याचे महत्त्वाचे कारण कोणते ?
        १) नागपूर येथे राष्ट्रवादी भावनेचा अभाव होता.      
        २) ब्रिटिशांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती.
        ३) नागपूरकरांमध्ये एकवाक्यता नव्हती.            
        ४) नागपूरची राणी  बाकाबाई ही ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली.
     
    ६०) १८५७ च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते.
              a) कंपनीच्या शासनाचा शेवट
        b) भारतीयांना प्रशासनात नोकर्‍या दिल्या नाहीत.
        c) स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा
        d) सैन्याची पुनर्रचना
        पर्यायी उत्तरे ;
        १) (a), (b) आणि (c) फक्त
        २) (b), (c) आणि (d) फक्त
        ३) (a), (c) आणि (d) फक्त
        ४) वरील सर्व
     
    ६१) सन १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ?
        १) विस्तारवादी
        २) साम्राज्यवादी
        ३) वसाहतवादी
        ४) दहशतवादी
     
    ६२) १८५७ च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता?
        १) लष्करी व्यवस्थेत बदल झाला
        २) ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे राज्य संपुष्टात आले.
        ३) नवे उद्योगधंदे व व्यापार पद्धतीत वाढ
        ४) हिंदू-मुस्लीम ऐक्याला तडा गेला.
     
    आदिवासींचे उठाव
     
    १)  योग्य जोड्या लावा :
        a) भिल्लांचा उठाव                                     i) १८३८
              b) पागल पंथीयांचा उठाव           ii) १८२९
        c) कोळ्यांचा उठाव                                     iii) १८२५
        d) फरेजी उठाव                                         iv) १८१७
        पर्यायी उत्तरे :
                  (a)      (b)       (c)        (d)                                                             
              १)  (i)       (ii)       (iii)       (iv)        
        २)  (iii)     (i)        (iv)       (ii)
        ३)  (iv)     (iii)      (ii)        (i)         
        ४)  (ii)      (iv)      (i)         (iii)
     
    २)  पश्‍चिम महाराष्ट्रातील इंग्रजी सल्तनत अव्हेरणारा आदिवासी नेता कोण होता?
        १) रामोजी शिंदे
        २) बहिर्जी नाईक
        ३) उमाजी नाईक
        ४) उखाजी नाईक
     
    ३)  डोंगरकपारित समांतर सरकार बनवून पुणे व सातारा भागातील खेड्यात महसूल जमा करण्यास कोणी सुरुवात केली होती?
        १) उमाजी नाईक
        २) राघोजी भांगरे
        ३) पुत्तोजी नाईक
        ४) भागोजी नाईक
     
    ४)  पुणे-मुंबई मार्गाजवळील मांगीरबाबा मंदिर म्हणजे ...... यांची समाधी आहे.
              १) राघोजी साळवे
        २) लहुजी साळवे
        ३) उमाजी नाईक
        ४) दादाजी नाईक
     
    ५)  ...... हा महाराष्ट्रातील रामोशी उठावाचा नेता होता.
        १) राजा प्रताप सिंह
        २) फोंड सावंत
        ३) चितुर सिंह
        ४) दत्तात्रय पेटकर
     
    ६)  इ.स. १८५७ मध्ये काजीसिंग व ...... हे दोन्ही भिल्ल नेते एक झाले व त्यांनी सुमारे दीड हजार भिल्लांची पलटण उभारली.
        १) दौलत सिंग
        २) काळू बाबा
        ३) भीमा नाईक
        ४) मोवासिया नाईक
     
    ७)  १८५७ च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेत कोण होते?
              a) काजीसिंग नाईक
        b) भीमा नाईक
              c) भागोजी नाईक
        d) दौलतसिंग
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) फक्त
              २) (a) आणि (b) फक्त
              ३) (a), (b) आणि (c) फक्त
              ४) वरील सर्व पर्याय योग्य आहेत
     
    ८)  कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता?
              a) खानदेशात
        b) नगर जिल्ह्यात
              c) कोल्हापूर
        d) सोलापूर
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
              २) (c) आणि (d)
              ३) (d) फक्त
              ४) (a) फक्त
     
    ९)  ...... यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडींचा पराभव केला होता. 
        १) उमा नाईक
        २) ख्वाजा नाईक
        ३) भीमा नाईक
        ४) काजी सिंग
     
    १०) अंबापाणीच्या उठावात पुढीलपैकी कोण नव्हते ?
        १) काजी सिंग
        २) भागोजी नाईक
        ३) दौलत सिंग
        ४) काळू भिवा
     
    ११) जोड्या जुळवा :
              (अ) कोल्हापूर          i) भगवंतराव
              (ब) खानदेश             ii) रामजी शिरसाट
        (क) मुंबई                  iii) भिमा नाईक
              (ड) नाशिक               iv) गुलमार डुबे
                       (अ)  (ब)  (क)  (ड)
              1)      i          ii          iii          iv
              2)      iv        iii         ii           i
              3)      ii         iii         iv          i
              4)      iii        iv         i            ii
     
    १२) ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्या समोर कोणाचा आदर्श होता ?  
        १) न्या. म.गो.रानडे
        २) छ. शिवाजी महाराज
        ३) गणेश वासुदेव जोशी
        ४) स्वा. वि. दा. सावरकर
     
    १३) ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेन्री मारला गेला?
        १) अंबापाणी
        २) नांदगाव
        ३) नांदुरशिंगोटे
        ४) पेठ-सुरगाणा
     
    १४) १८५७ च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला ?
        अ) पेठ
        ब) सुरगाणा
        क) हरसूल      
        १) फक्त अ
        २) फक्त अ आणि ब
        ३) फक्त ब आणि क
        ४) अ,ब आणि क
     
    १५) ५ डिसेंबर १८५७ रोजी ..... भागात भिल्लांनी उठाव केले.
        १) त्र्यंबकेश्‍वर
        २) सिन्नर
        ३) पांचाळे
        ४) सांगवी
     
    १६) भिल्लाचा उठाव ........ येथे झाला.
        १) पुणे
        २) खानदेश
        ३) मुंबई
        ४) कोकण
     
    १७) सन १८३९ मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला?
              a) कोळ्यांनी
        b) भिल्लानीं
              c) वारल्यांनी
        d) कथकर्‍यांनी
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) फक्त
              २) (b) आणि (c)
              ३) (a) आणि (b)
              ४) (d) फक्त
     
    १८) खानदेशातील कोणत्या जमातीने ब्रिटिश सरकार विरोधी उठाव केला?
        १) भिल्ल
        २) कोळी
        ३) रामोशी
        ४) पारधी
     
    १९) रामोशींबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
        १) कधी काळी, इंग्रज येण्या अगोदर ते दरोडेखोरी करीत.
        २) सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते   
        ३) इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्व कमी झाल्याने व इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले
        ४) वरीलपैकी एकही अयोग्य नाही. 
     
    २०) कोळींच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल?
        १) कोळींनी तीन टप्प्यात उठाव केला १८२४, १८३९ व सुमारे १८४५ मध्ये.
        २) कोळी, साधे कोळी व डोंगरी कोळी तसेच सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागले होते.
        ३) इंग्रज कोळींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत.
        ४) वरील एकही नाही.
     
    २१) उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले?
        १) उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती.
        २) शेतकरी व गावकरी त्यांना उद्युक्त व मदत करीत होते.
        ३) वरील दोन्ही विधाने बरोबर.     
        ४) वरील कोणतेही बरोबर नाही.
     
    २२) उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले ?
        १) त्यांना पकडण्यास जाहीर केलेले रु. १०० रु. १२०० रु. ५००० चे बक्षीस !
        २) त्यांना मदत करणार्‍यास जाहीर केलेली देहदंडाची शिक्षा !
        ३) विविध संवेदनशील क्षेत्रात उभे केलेले नाक्यांचे जाळे !   
        ४) वरील सर्व 
     
    २३) १९ व्या शतकात संपूर्ण भारतात ठिकठिकाणी आदिवासींचे बंड झालेले दिसते, कारण .........
        १) सावकरांचा जाच
        २) आदिवासींचे स्वार्थी नेतृत्व      
        ३) ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण
        ४) वरीलपैकी कोणतेही नाही.
     
    २४) १९ व्या शतकात भारतातील आदिवासींच्या उठावाला कारणीभूत घटक कोणता ?
        १) ब्रिटिशांनी शेतसारा आणि आदिवासींच्या उत्पादनावर कर यांची सुरुवात केली.
        २) आदिवासी भागात ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी केलेले धार्मिक कार्य.
        ३) आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात वाढलेली सावकार, व्यापारी व जमीनदारांची मध्यस्थ म्हणून वाढलेली भूमिका.
        ४) यापैकी एकीही नाही.
     
    २५) १८९९-१९०० या काळात कोणाच्या नेतृत्वाखाली मुंडा या वन्य जमातीने उठाव केला ?
        १) बिरसा मुंडा
        २) राणी चेन्नमा
        ३) जमीनदार
        ४) बेल्लू थप्पी
     
    २६) जोड्या जुळवा :
              a) गोंडांचा सशस्त्र उठाव           i) गाऊंग गी
        b) सालवीनचा उद्रेक              ii) कारेन पुढारी
        c) थारावाड्डीचा उद्रेक             iii) बलभद्र देव
        d) हेनझाडाचे बंड                 iv) नागा म्यात हतून
        पर्यायी उत्तरे :
                  (a)       (b)        (c)         (d)
              १)     (ii)       (i)         (iii)        (iv)
              २)     (iv)      (iii)       (ii)         (i)
              ३)     (iii)      (ii)        (i)          (iv)
              ४)     (i)        (iv)       (ii)         (iii)
     
    २७) १८३१ मध्ये मुंडा आदिवासींचे बंड पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी पसरले  
              a) रांची, छोटा नागपूर
              b) हजारीबाग, ओरिसा                               
              c) रांची, हजारीबाग, पालमाऊ, मानभूम
              d) बिहार फक्त
        १) (c) फक्त
        २) (a), (d)
        ३) (b), (c)
              ४) (c), (d)
     
    २८) १९२० मध्ये महात्मांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन राष्ट्रीय चळवळीत कोणत्या टोळ्या सहभागी झाल्या?
        १) संथाळ, ओरान, भिल्ल आणि गोंड
        २) संथाळ, वारली, कातकरी आणि भिल्ल
        ३) भिल्ल, गोंड, वारली आणि संथाळ
        ४) भिल्ल, गोंड, संथाळ आणि कातकरी
     
    २९) संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला?
        १) संथाळ प्रदेश
        २) संथाळ प्रांत
        ३) संथाळ इलाखा
        ४) संथाळ परगना
     
    ३०) पाळेगारांचा उठाव ...... भागात झाला.
        १) दक्षिण भारत
        २) उत्तर भारत
        ३) गुजरात
        ४) ओरिसा
     
    ३१) यादी - I आणि यादी -II जुळवा आणि खालील कोडच्या माध्यमाने अचूक उत्तर मिळवा.  
        यादी - I (जनजातीय आंदोलनासंबंधी शब्द)           यादी -II (अर्थ)
        A) दिकू                                १) छोटा नागपूर भागात जमिनीला एकत्र करुन ठेवण्याचे तंत्र
        B) हूल                                 २) आंध्र प्रदेशातील रम्पा भागामधील शेती बदलण्याचे प्रकार
        C) पोडू                                 ३) संथाल शब्द बाहेरच्या व्यक्ती किंवा परदेशीसाठी
        D)  खूटकाथी                            ४) उदीत होणे यासाठी संथाल शब्द
        पर्याय :                      
              १)   A-4, B-3, C-2, D -1
              २)  A-4, B-3, C- 1, D-2
              ३)   A-3, B-4, C-1, D-2
              4 A-3, B-4, C-2, D-1
     
     
    : उत्तरे :
     
            (1) मुंबई प्रांताचा इतिहास 
     
    1) मराठेशाही
    2) इंग्रज-मराठे संघर्ष
    3) मुंबई प्रांताचे प्रशासन
    4) 1857 चा उठाव
    5) आदिवासींचे उठाव

    मराठेशाही -
     
    1-3
     
    2-3
     
    3-4
     
    4-2
     
    5-4
     
    6-3
     
    7-4
     
    8-4
     
    9-2
     
    10-4
     
    11-3
     
    12-3
     
    13-1
     
    14-2
     
    15-1
     
    16-3
     
    17-2
     
    18-4
     
    19-3
     
    इंग्रज-मराठे संघर्ष -
     
    1-2
     
    2-4
     
    3-1
     
    4-1
     
    5-2
     
    6-2
     
    7-3
     
    मुंबई प्रांताचे प्रशासन -
     
    1-1
     
    2-1
     
    3-2
     
    4-3
     
    5-4
     
    6-1
     
    7-1
     
    8-4
     
    9-1
     
    10-2
     
    1857 चा उठाव -
     
    1-4
     
    2-3
     
    3-2
     
    4-1
     
    5-2
     
    6-3
     
    7-2
     
    8-1
     
    9-4
     
    10-3
     
    11-2
     
    12-3
     
    13-3
     
    14-3
     
    15-2
     
    16-4
     
    17-2
     
    18-2
     
    19-4
     
    20-1
     
    21-3
     
    22-3
     
    23-3
     
    24-1
     
    25-4
     
    26-1
     
    27-1
     
    28-4
     
    29-2
     
    30-4
     
    31-4
     
    32-4
     
    33-2
     
    34-1
     
    35-3
     
    36-1
     
    37-3
     
    38-2
     
    39-1
     
    40-4
     
    41-4
     
    42-4
     
    43-3
     
    44-3
     
    45-2
     
    46-1
     
    47-4
     
    48-4
     
    49-3
     
    50-1
     
    51-2
     
    52-1
     
    53-2
     
    54-1
     
    55-2
     
    56-2
     
    57-4
     
    58-3
     
    59-4
     
    60-3
     
    61-1
     
    62-4

    आदिवासींचे उठाव -
     
    1-3
     
    2-3
     
    3-1
     
    4-1
     
    5-3
     
    6-3
     
    7-4
     
    8-1
     
    9-3
     
    10-2
     
    11-3
     
    12-2
     
    13-3
     
    14-4
     
    15-1
     
    16-2
     
    17-1
     
    18-1
     
    19-4
     
    20-4
     
    21-3
     
    22-4
     
    23-3
     
    24-4
     
    25-1
     
    26-3
     
    27-1
     
    28-1
     
    29-4
     
    30-1
     
    31-4

     

Share this story

Total Shares : 19 Total Views : 6017