गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा

  • गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा

    गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा

    • 02 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 78 Views
    • 0 Shares

    गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा

    1 नोव्हेंबर 2020 - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट-बाल्टिस्तानच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भाषणात या दोन प्रदेशांना तात्पुरता प्रांताचा दर्जा देण्याची घोषणा केली. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील 370 कलम वगळल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान या प्रांतांना तात्पुरता दर्जा दिल्याचे मानले जाते.

    1)  15 नोव्हेंबरच्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूष करण्यासाठी इम्रान खान यांनी घोषणा केल्याचा आरोप पाकिस्तानातील विरोधकांनी केला.

    2)  पाकिस्तानच्या या कृतीवर भारताने तीव्र निषेध नोंदवत गिलगिट-बाल्टिस्तान या भारताच्या प्रदेशांवर पाकिस्तानने अवैधरीत्या कब्जा केला असून तो प्रयत्न लपवण्यासाठी पाकिस्तानने या प्रदेशांना तात्पुरता प्रांताचा दर्जा दिल्याचा आरोप केला.

    3)  गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशात सुमारे 15 लाख लोकसंख्या असून हा प्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग म्हणून ओळखला जातो. पण या प्रदेशाला पाकिस्तान, चीन, भारत आणि ताजिकिस्तान यांच्या सीमा लागून आहेत.

    4)  भारताचे जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान हे सर्व प्रदेश कायदेशीर भाग असून 1947 मध्ये भारतीय संघराज्यात जम्मू काश्मीरचे सामीलीकरण झाल्यामुळे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशाला कायद्याच्या चौकटीत कोणताही आधार नाही. ते प्रदेश भारताचे आहेत.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 78