जगातील सर्वात मोठ्या पक्ष्याचे जीवाश्म
1 नोव्हेंबर 2020 - अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी एका विशालकाय पक्षाच्या जीवाश्माच्या शोध लावला. हा पक्षी सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. या पक्ष्याचे पंख 21 फूट लांब होते. पृथ्वीवरून डायनासोर लुप्त झाल्यानंतर हे पक्षी अपेक्षेपेक्षा जास्त आकारात विकसित झाले. तसेच ते अनेक वर्षांपर्यंत महासागरावरून फिरत होते. ते एकाचवेळी अनेक आठवड्यांपर्यंत समुद्रावरून उड्डाण करण्यास सक्षम होते. ते समुद्रातही विहार करत असत. अंटार्क्टिका भागात 1980 च्या दशकात हे जीवाश्म सापडले होते. हे पक्षी लुप्त झालेल्या विशालकाय पक्ष्यांच्या प्रजातीचे प्रतिनिधीत्व करतात.
1) समुद्रावरून दीर्घ अंतर कापणार्या पक्ष्यांना वांडरिंग अल्बाट्रॉस असे म्हटले जाते. या पक्ष्यांचे पंख अन्य पक्ष्यांच्या तुलनेत मोठे म्हणजे एकूण 11 फूट लांब पसरू शकतात.
2) पॅलेगोर्निर्थिड म्हणून ओळखले जाणार्या पक्ष्यांनी सुमारे पाच ते सहा कोटी वर्षांपूर्वी महासागरांवरून मोठ्या प्रमाणात प्रवास केला होता. पॅलेगोर्निर्थिडचे जे जीवाश्म सापडले आहे ते जबड्याच्या हाडाचे आहे. तसेच ते सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वीचे आहे.