पाचव्या जनरेशनची उडणारी कार
स्लोव्हाकियातील स्टिफन क्लेइन यांनी पाचव्या जनरेशनची उडणारी कार तयार करुन तिची यशस्वी चाचणी करुन दाखवली. या उडणार्या एअर कारची संकल्पना आणि प्रोटोटाईप नोव्हेंबर 2019 मध्ये शांघाय येथे सर्वसामान्यांसाठी सादर करण्यात आली होती. अशाच प्रकारची एरोमोबिलची एअरकार अवकाशात झेपावली आहे.
एअर कारची वैशिष्ट्ये -
1) ही एअरकार दोन आसनी आहे. त्याचे वजन 1100 किलो इतके आहे.
2) यात प्रत्येक उड्डाणाच्यावेळी अतिरिक्त 200 किलो वजन वाहून नेता येते.
3) या एअरकारला बीएमडब्लूचे 1.6 लिटर इंजिन आहे.
4) यामधून 140 इतकी प्रभावी हॉर्स पॉवर जनरेट होते.
5) या एअरकारची अंदाजे ट्रॅव्हल रेंज 1 हजार किलोमिटर
6) लाईट कंझ्मशन हे 18 लिटर प्रतितास इतके आहे.