-
पाकिस्तान डेमॉक्रेटिक मूव्हमेंट
- 02 Nov 2020
- Posted By : Study Circle
- 37 Views
- 0 Shares
पाकिस्तान डेमॉक्रेटिक मूव्हमेंट
1 नोव्हेंबर 2020 - ऑक्टोबर 2020 मध्ये पाकिस्तानातील सर्व विरोधी पक्ष, लष्कर आणि इम्रान यांच्याविरोधात पाकिस्तान डेमॉक्रेटिक मूव्हमेंट या नावाने एकवटले. त्यात माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग, भुट्टोंची पाकिस्तान पीपल्स पार्टी, मौलाना फजलूर रहमान यांची जमियत-उलेमा-ए-इस्लाम आदींचा समावेश आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेतृत्व नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज आणि बंधु शाहबाद शरीफ हे करत आहेत. नवाज शरीफ लंडनमध्ये असून, त्यांनी तेथून केलेल्या भाषणात पाकमधील लष्करी हस्तक्षेप थांबवावा, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत सर्व विरोधक, लष्कर इम्रानच्या विरोधात एकत्र आले. त्यांना तेथील जनतेचा पाठिंबा मिळतो आहे. या विरोधकांनी कराची, क्वेट्टा आणि गुजरानवाला येथे घेतलेल्या सभांना लक्षावधी नागरिकांनी गर्दी केली.
- डबघाईला आलेल्या पाक अर्थव्यवस्थेचे संकट आ वासून उभे आहे. चीनच्या मदतीने उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित आर्थिक महामार्गाची मूळची किंमत 40 अब्ज डॉलर्सवरून 80 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. त्यासाठीचा निधी एक टक्का दराने देण्याची मागणी धुडकावून चीनने 19 टक्के दर केला आहे. कोरोनाने पाकमधील डबघाईला आलेले उद्योग बंद पडू लागले आहेत. परिणामी, बेरोजगारी प्रचंड वाढली. अफगाणिस्तानातून येणार्या निर्वासितांचा ताण त्यांना सोसावा लागतो आहे. या 22 कोटींच्या देशाचे आजचे दरडोई उत्पन्न, सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) जगातील देशांमध्ये 151 व्या क्रमांकापर्यंत घसरले, कर्जाचा डोंगरही वाढतो आहे.
- पाकिस्तानचे विद्यमान अध्यक्ष डॉ. आरिफ अल्वी हे इम्रान यांच्या पक्षाचे असले तरी तेही इम्रानविरोधात सहभागी होतील का, अशी भीती त्यांना आहे.
- 22 ऑक्टोबर 1947 ला भारतीय लष्कर काश्मिरात उतरले, काश्मिरात या कारवाईचे तत्कालिन कारण राजा हरिसिंगांची विनंती हे होते. या लष्करी कारवाईतील 26 ऑक्टोबर हा दिवस पाकिस्तानमध्ये काळा दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने (26 ऑक्टोबर 2020 रोजी) इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 1947 च्या ठरावानुसार काश्मिरात सार्वमत घ्यावे आणि तसे ते घेण्याच्या अटीवर शांततेचा प्रस्ताव सादर केला. पाकिस्तानातील वााढत्या समस्यांवरून देशवासीयांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे असेल तर पाकिस्तानी राज्यकर्त्यांपुढे एकमेव मार्ग असतो तो म्हणजे काश्मीरप्रश्नी गळा काढण्याचा. इम्रान यांनी तोच मार्ग अवलंबला असून, काश्मिरात सार्वमत घेण्याच्या अटीवर शांततेचा प्रस्ताव सादर केला. त्यांची ही मागणी पाकधार्जिण्यांना तसेच लष्करशाहीला चुचकारणारी आहे.
- भारताने काश्मीरमध्ये लष्करी कारवाई केल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने याबाबत ठराव केला होता. त्यात पाकिस्तानने आपले सैन्य म्हणजे टोळीवाले मागे घ्यावे, संपूर्ण काश्मीर तसेच गिलगिट-बाल्टिस्तान भारताच्या ताब्यात द्यावे आणि मग सार्वमत घ्यावे, असे नमूद करण्यात आले होते.
- वायव्य सरहद्द प्रांत म्हणजेच आताचा खैबर पख्तुनख्वा या भागातील रहिवाशांना पाकिस्तानात समाविष्ट व्हायचे नव्हते, आपल्याला बळजबरीने पाकिस्तानात घेतल्याची त्यांची नाराजी घालवण्यासाठी पाकिस्तानने त्या टोळीवाल्यांना काश्मीर बळकावून दाखवा, मग तुम्हाला योग्य ते बक्षीस देऊ, असे गाजर दाखवले होते. या टोळीवाल्यांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी काश्मीरच्या राजा हरिसिंगांनी भारताला लष्कर पाठवण्याची विनंती केली.
1) काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून 5 ऑगस्ट 2019 रोजी 370 कलम रदद्द केले.
2) गिलगिट-बाल्टिस्तान हा एक स्वतंत्र प्रांत आहे.