लोकमान्य टिळक / पश्‍नमंजुषा (१४१)

  • लोकमान्य टिळक / पश्‍नमंजुषा (१४१)

    लोकमान्य टिळक / पश्‍नमंजुषा (१४१)

    • 18 May 2021
    • Posted By : study circle
    • 862 Views
    • 3 Shares
    लोकमान्य टिळक 
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात लोकमान्य टिळक यांच्यावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. लोकमान्य टिळक यांचे विचार आणि कार्य, त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांच्यावर परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
    *   राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :  
     
    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    लोकमान्य टिळक  (१८५६-१९२०)
     
    १)  ...... स्फूर्ती घेऊन १८९३, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
        १) मुसलमानांच्या ईद सणावरून
        २) मुसलमानांच्या मोहर्रम सणावरून
        ३) बंगालच्या दुर्गा पूजेवरून
        ४) योम किप्पूर सणावरून
     
    २)  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९५ मध्ये कोणता उत्सव सुरू केला?
        अ) शिवजयंती
        ब) गणेशोत्सव
        क) नवरात्र
        ड) राष्ट्रीय
        १) फक्त अ
        २) फक्त ब
        ३) अ आणि ब
        ४) क आणि ड
     
    ३)  लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य उत्तराचा पर्याय निवडा.           
              a) सुरत काँग्रेस सभा
              b) लखनौ करार
              c) गणपती उत्सव
              d) शिवजयंती उत्सव
        पर्यायी उत्तरे :
        १) (c), (d), (a), (b)
        २) (d), (c), (a), (b)
        ३) (a), (b), (c), (d)
        ४) (a), (c), (d), (b)
     
    ४)  ...... यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणांत ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
        १) राजा राममोहन रॉय
        २) स्वामी दयानंद सरस्वती
        ३) बाळ गंगाधर टिळक
        ४) गोपाळ गणेश आगरकर
     
    ५)  जर देवाने अस्पृश्यता सहन केली, तर त्याला मी देव मानणार नाही.असे उद्गार कोणी काढले ?
        १) लोकमान्य टिळक - डिप्रेस्ड क्लासेसच्या दुसर्‍या सभेत
        २) महात्मा गांधी - वायकोम सत्याग्रहात  
        ३) वल्लभभाई पटेल - १९२१ च्या काँग्रेस अधिवेशनात
        ४) मदन मोहन मालवीय - काँग्रेस च्या अस्पृश्यता निवारण समितीत
     
    ६)  लोकमान्यांचे पुत्र श्रीधरपंत टिळक यांनी ....... यांच्या श्रीकृष्ण मेळ्याचा कार्यक्रम टिळकांच्या वाड्यात घडवून आणण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले आणि पुण्यातील सनातन्यांचा रोष ओढवून घेतला.
        १) केशवराव जेधे
        २) पांडुरंग नथूजी राजभोज
        ३) महादेव शास्त्री दिवेकर
        ४) ल. ब. भोपटकर
     
    उत्तरे : पश्‍नमंजुषा (१४१)
    १-२
    २-१
    ३-१
    ४-३
    ५-१
    ६-२

Share this story

Total Shares : 3 Total Views : 862