आझरबैजान व आर्मेनिया शांतता करार

  • आझरबैजान व आर्मेनिया शांतता करार

    आझरबैजान व आर्मेनिया शांतता करार

    • 12 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 372 Views
    • 0 Shares

    आझरबैजान व आर्मेनिया शांतता करार

    9 नोव्हेंबर 2020 - रशियाने केलेल्या मध्यस्थीनंतर आझरबैजान (राजधानी बाकू) आणि आर्मेनिया यांच्यात शांतता करार झाल्याने दोन महिन्यांपासून पेटलेला संघर्ष संपण्याची शक्यता आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांनी या शांतता कराराला ’आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी वेदनादायक’ असल्याचं म्हटलं. त्यामुळे आर्मेनियाची राजधानी येरेवानमध्ये नागरिकांनी या करारास विरोध केला. अझरबैजानचे राष्ट्रपती इलहाम अलीयेव यांनी म्हटलं की या शांतता प्रक्रियेत तुर्कस्थानही भाग घेईल.

         शांतता करारातील तरतुदी-

    1)   वादग्रस्त नागोर्नो-काराबाख आणि आजूबाजूच्या परिसरात रशियन शांती सैन्य तैनात असेल. 2 हजार रशियन सैनिक आर्मेनियाला स्तेप्नाकियर्तशी जोडणार्या रस्त्यावर लक्ष ठेवतील.

    2)   दोन्ही देश युद्धकैद्यांना हस्तांतरित करतील. आार्मेनिया आसपासच्या काही भागातून मागे हटणार.

    3)   अझरबैजान ताब्यात घेतलेला प्रदेश स्वतःकडेच ठेवेल. आझरबैजानकडे वादग्रस्त भागातल्या दुसर्या महत्त्वाच्या शहराचा (शुशा) ताबा असेल. 8 नोव्हेंबरला अझरबैजानने हे शुशा शहर ताब्यात घेतलं होत. नागोर्नो-काराबाखची राजधानी स्तेप्नाकियर्त (जिला अझरबैजानमध्ये खानकेन्दी या नावाने ओळखलं जातं) च्या वरच्या बाजूला असणार्या एका डोंगरावर शुशा शहर वसलेलं आहे. स्तेप्नाकियर्तहून आर्मीनियाकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला हे शहर आहे.

         नागोर्नो-काराबाख -

    1)   नागोर्नो-काराबाख हा 1700 चौरस मैलांचा डोंगराळ भाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा भाग अझरबैजानचा हिस्सा समजला जातो. पण 1994 पासून हा भाग स्थानिक आर्मेनियन लोकांच्या हातात आहे.

    2)   1990 मध्ये सोव्हियत संघाचं विघटन व्हायच्या आधीच नागोर्नो-काराबाख स्वायत्त होऊन अझरबैजानचा भाग झाला होता.

    3)   पारंपरिकदृष्ट्या इथं ख्रिश्चन आर्मेनियाई आणि तुर्क मुसलमान राहातात.

    4)   ऐतिहासिक दृष्ट्या नागोर्नो-काराबाख भाग आझरबैजानच्या ताब्यात आहे. पण, 1994 पासून आर्मेनियन वंशाच्या लोकांचं त्यावर राज्य आहे.

    5)   या भागावरून आर्मीनिया आणि अझरबैजान या दोन राष्ट्रांत 1980च्या शेवटी आणि 1990च्या सुरूवातीला युद्ध झालं होतं. सप्टेंबर 2020 महिन्यात दोन्ही देशांमध्ये पुन्हा भडका पेटला.

         शुशा शहर -

    1)   अझरबैजान आणि आर्मेनिया दोन्ही देशांसाठी शुशा शहराचं वेगवेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे. त्याच्या आधीपर्यंत या भागात मुख्यकरून अझेरी लोकांची वस्ती होती. पण युद्धामुळे हजारो लोकांना आपलं घर सोडून परागंदा व्हावं लागले.

    2)   आर्मेनियासाठी या शहरात पवित्र समजले जाणार ऐतिहासिक गजानचेत्सोत्स चर्च आहे. हे आर्मेनियातल्या सगळ्यांत जुन्या आणि मोठ्या असणार्या चर्चपैकी एक आहे. आर्मेनियाने अझरबैजानवर या चर्चवर हल्ला केल्याचा आरोप केला होता.


    प्रश्नमंजुषा (10)

    1)   नागोर्नो-काराबाख संदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत ?

         )   आंतरराष्ट्रीय पातळीवर हा भाग अझरबैजानचा हिस्सा समजला जातो.   

         )   या प्रदेशात ख्रिश्चन आर्मेनियाई आणि तुर्क मुसलमान राहातात.

         )   नागोर्नो-काराबाखची राजधानी शुशा ही आहे.

         )   हा मध्य आशियातील 1700 चौरस किमीचा डोंगराळ भाग आहे.

         पर्यायी उत्तरे ः

         1)   , ,  

         2)   , ,

         3)   , ,  

         4)   ,

    2)   खालील कोणती जोडी योग्य आहे ?

         )   अझरबैजानचे राष्ट्रपती - इलहाम अलीयेव

         )   रशियाचे पंतप्रधान -व्लादीमीर पुटीन

         )   आर्मेनियाचे पंतप्रधान - निकोल पाशिन्यान

         पर्यायी उत्तरे ः

         1)   फक्त अ

         2)   फक्त अ आणि ब

         3)   फक्त अ आणि क

         4)   , ब आणि क

    3)   1994 पासून नागोर्नो-काराबाख कोणाच्या ताब्यात आहे.

         1)   स्थानिक अझरबैजान लोकांच्या

         2)   आर्मेनियन सरकारच्या

         3)  स्थानिक आर्मेनियन लोकांच्या

         4)   अझरबैजान सरकारच्या

    4)   जोड्या जुळवा ः

              स्तंभ          स्तंभ  I

         शुशा            i.  नागोर्नो-काराबाखची राजधानी

         )   स्तेप्नाकियर्त    ii. आझरबैजानचा ताबा

         )   येरेवान         iiiगजानचेत्सोत्स चर्च

         )   बाकू            iv. आझरबैजानची राजधानी

                            v.  रशियन शांती सैन्य तैनात

                            vi.  आर्मेनियाची राजधानी

         पर्यायी उत्तरे ः

              a          b          c          d

         1)   ii, vi     v          iv, v     i

         2)   ii, iii     i,v        vi         iv

         3)   vi         ii, iii     iv, v     i

         4)   ii, iii     i           vi         iv

    5)   नागोर्नो-काराबाख भागावरून आर्मीनिया आणि अझरबैजान या दोन राष्ट्रांत कोनत्या वर्षी संघर्ष झाला ?

         1)   2020 च्या ऑक्टोबरमध्ये

         2)   1980 च्या शेवटी

         3)   1990 च्या सुरूवातीला

         4)   वरील सर्व

    उत्तरे ः प्रश्नमंजुषा (10)

    1-4

    2-3

    3-3

    4-4

    5-4

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 372