बिहार विधानसभा निवडणूक

  •   बिहार विधानसभा निवडणूक

    बिहार विधानसभा निवडणूक

    • 11 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 201 Views
    • 0 Shares

      बिहार विधानसभा निवडणूक

    10 नोव्हेंबर 2020 - कोरोना संकटाच्या काळानंतर झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीएपुन्हा एकदा बाजी मारलीभाजप बिहारमध्ये दुसर्या क्रमांकाचा पक्ष झाल्याने त्याचे श्रेय पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले गेलेबिहारमध्ये कोणताही मोठा नेता नसताना भाजप एक मजबूत पक्ष म्हणून समोर आलाबिहारमध्ये भाजपचे सुशील कुमार मोदी ज्येष्ठ नेत आहेतया निवडणुकीमध्ये आरजेडीच्या 31 वर्षाच्या तेजस्वी यादव यांनी आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवलीत्यांनी राजदला बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष बनवलामात्र ते आपल्या सभांना होणार्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्यामध्ये अपयशी ठरले.

     * बिहार विधानसभा पक्षनिहाय जागा ( एकूण जागा - 243)

    1.   राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)-  75

    2.   भाजप -  74

    3.   जनता दल (युनायटेड) -  43

    4.   काँग्रेस -  19

    5.   सीपीआय एमएल - 12

    6.   एमआयएम -  5

    7.   हिंदुस्थानी आवाम मोर्चा (सेक्युलर) -  4

    8.   विकासशील इन्साफ पार्टी (व्हीआयपी) -  4

    9.   सीपीआय -  2

    10.  सीपीआय एम -  2

    11.  लोकजनशक्ती पक्ष (एलजेपी) -  1

    12.  बहुजन समाज पक्ष (बीएसपी) - 1

    13.  अपक्ष - 1

    *    बिहारमध्ये 7.3 कोटी मतदार असून तीन टप्प्यांमध्ये 57.04 टक्के मतदान झालेत्यामुळे सुमारे 4.17 कोटी मतांची मोजणी करावी लागली.

    *    करोनामुळे मतदान केंद्रांची संख्या 63 टक्कयांनी वाढवण्यात आली होती. 2015 मध्ये 72 हजार मतदान केंद्रे होती, 2020 मध्ये ती 1.06 लाख झालीशिवायप्रत्येक मतदान केंद्रावर 1600 मतदारांऐवजी 1 हजार मतदारांची यादी बनवली गेली होतीत्यामुळे मतदान यंत्रांची संख्याही वाढली व मतमोजणीच्या फेर्याही वाढल्याकिमान 19 ते कमाल 52 फेर्या होतातसरासरी 25-25 फेर्या होतातपण या वेळी सरासरी 35 फेर्या झाल्याकरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करून बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली गेल्याने निकालाचा वेग मंदावला.


     

     विधानसभा पोटनिवडणुका

    10 नोव्हेंबर 2020 -  देशभरातील 11 राज्यांमधील विधानसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सर्वाधिक 40 जागा जिंकल्या.

    मध्य प्रदेश  -  मध्य प्रदेशातील 28 जागांच्या पोटनिवडणुकांच्या निकालावर भाजप सरकारचे भवितव्य अवलंबून होतेसध्या भाजपचे संख्याबळ 107 असल्याने किमानजागा जिंकणे आवश्यक होते. 19 जागा जिंकून भाजपने बहुमत संपादन केले व शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर झालेकाँग्रेसने 9 जागा जिंकल्यामार्च 2020 मध्ये काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 22 आमदारांनी पक्षात बंडखोरी केली होतीत्यामुळे कमलनाथ सरकार कोसळले होते.

    मणिपूर - भाजपला या राज्यातल्या पोटनिवडणुकांमध्ये 2 जागा तर अन्य एक जागा अपक्षाला मिळाली.

    हरियाणा - राज्यातील बरोडा विधानसभा जागा काँग्रेसच्या खात्यात गेली असून इंदू राज नरवाल यांनी भाजप पुरस्कृत व ऑलिम्पिक कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांचा10,566 मतांनी पराभव केलाया मतदारसंघातून योगेश्वर दत्त यांना दुसर्यांदा पराभव  झाला. 2019च्या विधानसभा निवडणुकांत ते 4800 मतांनी हरले होते.

    तेलंगणा - भाजपचे उमेदवार एमरघुनंदन राव यांनी 1,079 मतांनी डुब्बाक पोटनिवडणुकीत विजय मिळवला.

    ओदिशा - सत्तारुढ बीजेडीने 2 जागा जिंकल्या.

    नागालँड - सत्तारुढ एनडीपीपी पुरस्कृत मेडो योखा यांनी दक्षिण अंगामी जागा जिंकली.

    गुजरात - गुजरातमध्ये सर्वच्या सर्व 8 जागा भाजपने जिंकल्याजून 2020 मध्ये राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 8 आमदारांनी राजीनामे दिले होतेया 8 पैकी 5 जणांनी भाजप प्रवेश केला होता.

     

    उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातल्या 7 जागांपैकी 6 जागा भाजपने तर 1 जागा समाजवादी पार्टीने जिंकली.


    प्रश्नमंजुषा (6)

    1.   ऑलिम्पिक कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी येथून आमदारकीची निवडणूक लढविली होती ?

         1)   पंजाब राज्यातील गुरुदासपूर विधानसभा मतदारसंघ

         2)   हरियाणा राज्यातील फरीदाबाद विधानसभा मतदारसंघ

         3)   उत्तरप्रदेश राज्यातील नोएडा विधानसभा मतदारसंघ

         4)   हरियाणा राज्यातील बरोडा विधानसभा मतदारसंघ

    2.   बिहार विधानसभेतील आमदारांची एकूण संख्या किती ?

         1)   223

         2)   253

         3)   243

         4)   233

    3.   बिहार विधानसभा 2020 निवडणुकीनंतरच्या पक्षीय बलानुसारचा योग्य उतरता क्रम शोधा-

         .  जनता दल (युनायटेड)

         .   राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)

         .   काँग्रेस

         .   सीपीआय एमएल

         .   भाजप

         पर्यायी उत्तरे ः

         1)   ,  

         2)   

         3)   

         4)   

    4.   नोव्हेंबर 2020 मध्ये किती राज्यात विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या ?

         1)   11

         2)   15

         3)   21

         4)   8

     

    उत्तरे : प्रश्नमंजुषा - 6

    1-4

    2-3

    3-4

    4-1

Share this story

Total Shares : 0 Total Views : 201