केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त
केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी सरकारने भारतीय परराष्ट्रसेवेतील माजी अधिकारी यशवर्धन कुमार सिन्हा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर "Marching with a Billion,' हे पुस्तक लिहिणारे पत्रकार उदय महुरकर यांना माहिती आयुक्तपदी नेमले.
1) या दोन नावांना काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतला. चौधरी हे मुख्य माहिती आयुक्तपदी व अन्य माहिती आयुक्त पदींच्या निवड मंडळातील एक सदस्य आहेत.
2) देशाच्या मुख्य माहिती आयुक्तपदासाठी अनुभव ह्नळ असून त्या उमेदवाराकडे कायदा, विज्ञान व मानवाधिकार या क्षेत्रातील अनुभव हवा आहे. पण यशवर्धन कुमार सिन्हा यांच्याकडे यातील कोणताच अनुभव नसून त्यांच्या जागी अनुभवी असलेले सध्याचे माहिती आयुक्त वनजा एन. सरना यांना नियुक्त केले जावे, अशी मागणी चौधरी यांनी केली.