नेमणुका -पुरस्कार / प्रश्नमंजुषा (68)

  • नेमणुका -पुरस्कार / प्रश्नमंजुषा (68)

    नेमणुका -पुरस्कार / प्रश्नमंजुषा (68)

    • 27 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 183 Views
    • 0 Shares
    चेतन शर्मा
     
     
            24 डिसेंबर 2020-  भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा (54 वर्षीय) यांची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (मदन  लाल, आर.पी. सिंग आणि सुलक्षणा नाईक) एका वर्षासाठी (2021) तीनजणांची निवड समिती जाहीर केली -
    अध्यक्ष  - चेतन शर्मा 
    • सदस्य - अ‍ॅबी कुरुविल्ला, देबाशिष मोहंती 
    • भारतीय संघाच्या निवड समितीसाठी अजित आगरकर, चेतन शर्मा, मनिंदर सिंग, अ‍ॅबी कुरुविल्ला, शिवसुंदर दास, देबाशिष मोहंती, रणदेब बोस, नयन मोंगिया, विजय दाहिया यांनी अर्ज केले होते. यामधून पाच जणांची सल्लागार समितीने केली होती. या पाच माजी खेळाडूंमधून तिघांना निवड समिती सदस्य म्हणून सधी दिली.
    • चेतन शर्मा - 88 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते.

    लीजन ऑफ मेरिट  सन्मान 2020
     
     
            22 डिसेंबर 2020 - भारत-अमेरिकेतील सामरिक भागीदारी पुढे नेत भारताला जागतिक शक्ती म्हणून नावारूपास आणल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिजन ऑफ द मेरिट पुरस्कार जाहीर केला होता, हा पुरस्कार मोदी यांच्या वतीने भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी स्वीकारला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
    • ’लीजन ऑफ मेरिट’ हा अमेरिकेचा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव पंतप्रधान आहेत.  
    • भारत-अमेरिका भागीदारीत मोठी प्रगती करण्यात हातभार लावल्याने मोदी यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक शक्ती म्हणून उदयास आणले तसेच भारत व अमेरिका या दोन्ही देशातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यातील भागीदारी पुढे नेली.
    • हा पुरस्कार कुठल्याही सरकारच्या प्रमुखालाच वैशिष्ट़यपूर्ण कामगिरीसाठी दिला जातो. 
    • सदर पुरस्कार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन व जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनाही देण्यात आला, तो त्या देशांच्या राजदूतांनी स्वीकारला. 
    • जपानचे माजी पंतप्रधान अ‍ॅबे यांना स्वंतत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक धोरणांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
    • मॉरिसन यांना जागतिक आव्हानांना तोंड देत सर्व देशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    •  78 वर्षांपूर्वी प्रारंभ झाला - 
    1) 20 जुलै 1942 रोजी अमेरिकन काँग्रेसने लीजन ऑफ मेरिट मेडल देण्यास सुरुवात केली. हा पुरस्कार अमेरिकन लष्कर आणि परदेशातील लष्कराच्या सदस्यांना तसेच राजकीय व्यक्तींना प्रदान करण्यात येतो. असाधारण कामगिरी करणार्‍यांना हा सन्मान दिला जातो. 
    2) अमेरिकेकडून परदेशी नागरिकांना देण्यात येणार्‍या सर्वोच्च पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार आहे.

    •  पंतप्रधान मोदींना  मिळालेले जागतिक सन्मान -
    1) 2016 : ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौद (सौदी अरेबिया)
    2) 2016 :  स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान (बहारीन)
    3) 2018 :  ग्रँड कलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाइन अवॉर्ड (पॅलेस्टाइन ) 
    4) 2019 : ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार (संयुक्त अरब अमिरातीअरब अमिरात)
    5) 2019 : ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू (रशिया) 
    6) 2019 : ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इजुद्दीन (मालदीव) 
    7) 2020 : लीजन ऑफ मेरिट (अमेरिका)
     
    यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार
     
     
     
            17  डिसेंबर 2020 - संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाने (यूएनईपी) ‘यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर केले असून हा मान मिळविणार्‍या सात जणांमध्ये 29 वर्षीय विद्युत मोहन या भारतीय उद्योजकाचा समावेश  आहे. मोहन यांनी क्टिव्हेटेड कार्बन ची निवड करून शेतकर्‍यांच्या दारापाशी मूल्यसाखळी आणली आणि हवा प्रदूषण कमी करण्यात हातभार लावला, असे ‘यूएनईपी’ने म्हटले. 2030 पर्यंत, त्यांची ‘ताराचार’ ही संस्था 30 लाख शेतकर्‍यांपर्यंत पोहोचून 4 अब्ज डॉलरचे उत्पन्न त्यांना मिळवून देऊ शकते.
    • अभिनव कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत पर्यावरणासमोरील आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. 
    • विद्युत मोहन यांनी 2018 मध्ये ‘ताराचार’या सामाजिक संस्थेची स्थापना केली. 
    • शेतातील काडीकचरा जाळण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून त्यापासून इंधन बनविण्यासाठी ते शेतकर्‍यांना प्रोत्साहन देतात. यापासून शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्यांनी 4500 हजार शेतकर्‍यांशी संपर्क साधून 3000 टन काडीकचर्‍यावर प्रक्रिया केली. 
    • त्यांनी छोट्या आकारातील, कमी किमतीचे आणि कोठेही हलविता येण्यासारखे उपकरण तयार केले असून त्याचा वापर करून शेतकरी काडीकचर्‍याचे रुपांतर इंधनात, खतात किंवा उपयुक्त रसायनांमध्ये (क्टिव्हेटेड कार्बन) करू शकतात. याद्वारे ते 40 टक्के अधिक उत्पन्न मिळवू शकतात.
     
    प्रश्नमंजुषा (68)
     
    1) 2020 लरर ’लीजन ऑफ मेरिट’ या अमेरिकेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
    अ) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन 
    ब) इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू
    क) जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे
    ड) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 
    पर्यायी उत्तरे :
    1)  अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3)  अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    2) खालीलपैकी कोणाची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी 2021 सालाकरिता निवड झाली?
    1)  देबाशिष मोहंती 
    2)  अ‍ॅबी कुरुविल्ला
    3)  चेतन शर्मा
    4)  अजित आगरकर
     
    3) 2020 सालचा ‘यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार 29 वर्षीय विद्युत मोहन या भारतीय उद्योजकास कोणत्या संस्थेमार्फत देण्यात आला ?
    1)  संयुक्त राष्ट्रांचा फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसी)
    2)  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा)
    3)  संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) 
    4)  दी एनव्हायर्नमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी)
     
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (68)
    1-4
     
    2-3
     
    3-3 

Share this story

Total Shares : 0 Total Views : 183