पंचायती राज व नागरी प्रशासन प्रश्नपुस्तिका (3)
- 02 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 1495 Views
- 2 Shares
पंचायती राज व नागरी प्रशासन प्रश्नपुस्तिका (3)
1) ग्रामीण स्थानिक शासनाची पंचायती राज रचना ही प्रथम कोणी अवलंबली?
1) राजस्थान आणि मध्य प्रदेश
2) आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल
3) राजस्थान आणि आंध्र प्रदेश
4) आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश
2) पंचायती राज ही यासारखी पद्धती आहे -
1) स्थानिक शासन्
2) स्थानिक प्रशासन
3) स्थानिक स्वयंशासन
4) धोरणात्मक योजना
3) पंचायत राज ही खालीलपैकी कोणती प्रणाली आहे?
1) स्थानिक सरकार
2) स्थानिक प्रशासन
3) नागरी स्थानिक स्वराज्य संस्था
4) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था
4) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरिता भारतीय राज्यघटनेच्या पुढील भागांत दुरुस्ती करण्यात आली :
1) 8 वा भाग, 240 कलम
2) 7 वा भाग, 241 कलम
3) 5 वा भाग, 242 कलम
4) 9 वा भाग, 243 कलम
5) “स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे“ असे कोणी म्हटले आहे ?
1) विलियम रॉबसन
2) लॉर्ड ब्राईस
3) आयव्हर जेनिंग्स
4) जी.डी.एच. कोल
6) अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था ...... मध्ये स्थापन करण्यात आली.
1) 1951
2) 1926
3) 1917
4) 1971
7) ई-पंचायत हा ...... साली मान्य झालेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजनेमधील प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे.
1) 2006
2) 2011
3) 2012
4) 201
8) 1952 पासून पंचायती राज संस्था कार्यरत आहेत परंतु त्यांना जबाबदार सार्वजनिक संस्थांचा दर्जा प्राप्त झालेला नाही कारण ः
a) नियमित निवडणुकांचा अभाव
b) समाजातील दुर्बल घटकांचे अपुरे प्रतिनिधित्व
c) अपुरी सत्ता
d) केंद्र सरकारचे अपुरे नियंत्रण
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (d) बरोबर आहे.
2) केवळ (a) बरोबर आहे.
3) (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
4) केवळ (b) बरोबर आहे.
9) महाराष्ट्रातील पंचायती राज्याची स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा.
1) 1 मे 1960
2) 1 मे 1961
3) 1 मे 1959
4) 1 मे 1962
10) सध्या महाराष्ट्रात ...... राज्य वित्त आयोग कार्यरत आहे.
1) चौथा
2) तिसरा
3) सहावा
4) पाचवा
11) आधुनिक नागरी स्थानिक स्वशासना विषयी भारतातील पहिला ठराव/कायदा कोणता आहे ?
1) लॉर्ड रिपनचा ठराव
2) लॉर्ड मेयोचा ठराव
3) बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट
4) विकेंद्रीकरण आयोग
12) बलवंतराय मेहता समितीनुसार जिल्हा अधिकारी हा असा असेल.
1) जिल्हा परिषदेच्या बाहेरचा
2) जिल्हा परिषदेच्या मतदान विरहित सभासद
3) जिल्हा परिषदेमध्ये मतदान करण्याचा हक्क असलेला सभासद
4) जिल्हा परिषदेचा चेअरमन (सभाध्यक्ष)
13) पुढील विधाने वाचून योग्य पर्यायाची निवड करा.
a) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदानाची सक्ती करणारे गुजरात हे पहिले राज्य आहे.
b) राज्यपाल ओ. पी. कोहलींनी गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम (दुरुस्ती) विधेयक, 2009 ला संमती दिली आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) आणि (b) दोन्ही
4) वरीलपैकी एकही नाही
14) अशोक मेहता समितीमध्ये सदस्य होते
अ) प्रकाशसिंह बादल
ब) एम. जी. रामचंद्रन
क) इ.एम.एस. नंबुद्रीपाद
ड) बी. चंद्रशेखर
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ, ब, क
2) फक्त अ, ब, ड
3) फक्त अ, क, ड
4) फक्त ब, क, ड
15) जोड्या लावा :
(अ) (ब)
अ) वसंतराव नाईक समिती I) 1985
ब) बोंगिरवार समिती II) 1984
क) पी.बी.पाटील समिती III) 1970
ड) जी.व्ही.के.राव समिती IV) 1960
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) IV I II III
2) IV III I II
3) III IV II I
4) IV III II I
16) खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली?
1) 1952
2) 1954
3) 1957
4) 1959
17) महाराष्ट्रात कोणत्या समितीने जिल्हाधिकार्याच्या नेमणुकीऐवजी त्याच दर्जाचा स्वतंत्र अधिकारी जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नेमण्याची शिफारस केली होती ?
1) वसंतराव नाईक
2) बलवंतराव मेहता समिती
3) ल. ना. बोंगिरवार
4) पी. बी. पाटील समिती
18) जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस ...... केली.
1) वसंतराव नाईक समितीने
2) एल. एन. बोंगीरवार समितीने
3) बलवंतराय मेहता समितीने
4) पी. बी. पाटील समितीने
19) महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण भागात स्थानिक स्वशासनाचे प्रारूप कसे असावे याबाबत शिफारशी करण्यासाठी कोणती समिती नियुक्त केली होती?
1) बलवंतराय मेहता समिती
2) वसंतराव नाईक समिती
3) अशोक मेहता समिती
4) जी. व्ही. के. राव समिती
20) 73 व्या घटनादुरुस्तीसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.?
a) सर्व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत महिलांकरता 33 टक्के जागा आरक्षित असतील.
b) पंचायत राज संस्थांना संसाधने पुरवण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापले जातील.
c) पंचायत राज संस्थांचे निर्वाचित सभासद, जर त्यांना दोन पेक्षा अधिक मुले असतील, तर अपात्र ठरतील.
d) राज्य सरकारांनी पंचायत राज्य संस्थांना बरखास्त केले तर 6 महिन्याच्या आता निवडणुका घेतल्या जातील.
पर्यायी उत्तरे :
1) (b) आणि (d)
2) (a) आणि (d)
3) (a), (c) आणि (d)
4) (a), (b) आणि (d)
21) 73 व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्यसरकारांसाठी ऐच्छिक आहेत ?
a) 2-3 स्तरीय रचना
b) निश्चित कार्यकाळ
c) ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती
d) जिल्हा नियोजन समिती
पर्यायी उत्तरे :
1) (c) आणि (d)
2) (a) आणि (b)
3) (b) आणि (d)
4) (a) आणि (c)
22) कोणत्या राज्यांना 73 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीपासून सूट देण्यात आली आहे?
a) मिझोराम
b) मेघालय
c) नागालँड
d) अरुणाचल
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a), (b), (c)
2) फक्त (b), (c), (d)
3) फक्त (c), (d), (a)
4) फक्त (d), (a), (b)
23) पंचायतराज वर 73 व्या घटनादुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या, खालीलपैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाहीत ?
अ) ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरीत्या निवडले जातील.
ब) पंचायत राज्य संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये त्यांना कर, जकाती व पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल.
क) पंचायत राज्य संस्थांची निवडणूक लढविण्यासाठी 21 वर्षे ही किमान वयोमर्यादा असेल.
ड) स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणार्या पंचायत राज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि क
2) फक्त ब आणि क
3) फक्त ब आणि ड
4) फक्त अ आणि ड
24) 73 व्या घटना दुरुस्ती 1992 कायद्याचा उद्देश हा देशातील पंचायतराज संस्थांना चालना देणे हा असून त्याद्वारे खालीलपैकी कोणत्या संस्थांची तरतूद करण्यात आली आहे?
अ) जिल्हा नियोजन बैठकीची स्थापना
ब) राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आणि त्याद्वारे पंचायती निवडणुका घेणे.
क) राज्य वित्त आयोगाची स्थापना
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ बरोबर
2) फक्त अ आणि ब बरोबर
3) ब आणि क बरोबर
4) अ, ब आणि क
25) 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ?
1) 25 वर्षे
2) 18 वर्षे
3) 21 वर्षे
4) 30 वर्षे
26) 73 व्या घटनादुरुस्ती मधील तरतुदी आणि कलमे यांची जुळणी करा.
अ) पर्याप्त अधिकारांसह ग्रामसभेची स्थापना I) 243
ब) ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीची स्थापना करणे II) 243
क) सामान्यपणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षांचा राहील III) 243
ड) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी आरक्षण IV) 243
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) III I IV II
2) I II III IV
3) IV III II I
4) II IV I III
27) खालील विधाने विचारात घ्या :
a) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली.
b) राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) आणि (b)
4) वरीलपैकी नाही
28) ‘पंचायत राज्या‘ संबंधी 73 व्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणती तरतूद करण्यांत आलेली नव्हती ?
1) ग्रामीण स्थानिक संस्थेतील एकूण निर्वाचित जागांपैकी एकतृतीयांश जागा या सर्व स्तरावर महिलांसाठी राखीव असतील.
2) राज्यांनी पंचायत राज संस्थांना त्यांचे आर्थिक स्रोत ठरवून देण्यासाठी वित्त आयोगांची निर्मिती करावी.
3) जर पंचायत राज संस्था राज्यशासनाने मुदतपूर्व विसर्जित केल्या, तर नव्याने सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेतल्या जाव्यात.
4) पंचायत राज्यातील निर्वाचित सदस्यांना जर दोन पेक्षा अधिक अपत्ये असतील, तर ते अपात्र ठरतील.
29) 74 वी घटना दुरुस्ती कायदा 1992 मध्ये सुधारणा केव्हा झाल्या?
a) 1 एप्रिल 1992
b) 20 एप्रिल 1992
c) 20 एप्रिल 1993
d) 26 जानेवारी 1992
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) फक्त (c)
4) वरीलपैकी एकही नाही
30) 74 वी घटनादुरुस्ती कायदा 1992 नुसार मोठ्या शहराची (महानगर) लोकसंख्या किती निश्चित करण्यात आली आहे?
a) 10 लाख किंवा अधिक
b) 20 लाख किंवा अधिक
c) 50 लाख किंवा अधिक
d) 1 कोटी किंवा अधिक
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) फक्त (c)
4) (a), (b), (c) आणि (d) हे सर्व
उत्तरे
1-3
2-4
3-4
4-4
5-1
6-2
7-1
8-3
9-4
10-1
11-2
12-4
13-3
14-1
15-4
16-3
17-1
18-2
19-2
20-4
21-1
22-1
23-1
24-4
25-3
26-1
27-1
28-4
29-3
30-4