अंदमान-निकोबार द्वीपसमूह / प्रश्नमंजुषा (107)

  • अंदमान-निकोबार द्वीपसमूह  / प्रश्नमंजुषा (107)

    अंदमान-निकोबार द्वीपसमूह / प्रश्नमंजुषा (107)

    • 28 Mar 2021
    • Posted By : Study Circle
    • 388 Views
    • 0 Shares

     प्रश्नमंजुषा (107)

    1) भारताचा कासव संरक्षण कार्यक्रम कधी जाहीर झाला ?
    1) 1  फेब्रुवारी 2015 
    2) 5  जानेवारी 2021 
    3) 1  फेब्रुवारी 2021 
    4) 16 मार्च 2020 
     
    2) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) लिटल अंदमान हे यूनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिलेले भारताचे दक्षिणेकडील टोक आहे.
    ब) संपूर्ण निकोबार किनारपट्टी नियमन कायद्यानुसार हा सी आर झेड-1, म्हणजे सर्वाधिक संरक्षण असणारा किनारपट्टीचा भाग आहे.
    क) ग्रेट अंदमान हे बेट अंदमान-निकोबार संपूर्ण द्वीपसमूहातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे.
    ड) वनांचे अनेक प्रकार असलेले जगातील सर्वोत्तम सांभाळलेले विषुववृत्तीय पर्जन्यवन निकोबार बेटावर आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    3) अंदमान आणि निकोबार प्रदेशात एकूण लहान मोठी किती बेटे आहेत ?
    1) 836
    2) 897 
    3) 863
    4) 683
     
    4) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) शोंपेन ह्या मूळनिवासी जमातीचे संरक्षित क्षेत्र म्हणजे ग्रेट निकोबार.
    ब) ओंगे ह्या मूळनिवासी जमातीचे संरक्षित क्षेत्र म्हणजे लिटल अंदमान.
    क) नेग्रिटो ह्या मूळनिवासी जमातीचे संरक्षित क्षेत्र म्हणजे कार निकोबार.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    5) गँलाथिया बे हा समुद्रकिनारा कोठे आहे ?
    1) गल्फ ऑफ मन्नारच्या श्रीलंकन किनारपट्टीला लागून
    2) लक्षद्वीप  बेटाजवळ
    3) खंबायतच्या आखाताचा एक भाग
    4) ग्रेट निकोबार बेटाजवळ
     
    6) भारतातील कोणत्या बेटावर अंडी घालण्यासाठी येणारी लेदर-बॅक कासवे सुमारे 14 हजार किलोमीटर दूरवरील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या किनार्‍यांवरून येतात ?
    1) ग्रेट निकोबार
    2) लिटल अंदमान
    3) लक्षद्वीप 
    4) मिनीकॉय
     
    7) 2015 साली खालीलपैकी कोणत्या आदिम जमातीची जीवनपद्धती लक्षात घेऊन त्याम्च्या निवसी क्षेत्रात कोणतेही मोठे प्रकल्प उभे करायचे नाहीत, असे ठरले होते ?
    1) नेग्रिटो
    2) ओंगे
    3) शोंपेन 
    4) वरील सर्व
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (107)
    1-3
     
    2-2
     
    3-1
     
    4-2
     
    5-4
     
    6-2
     
    7-3
     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 388