विज्ञान तंत्रज्ञान चालू घटना : प्रश्‍नमंजुषा (104)

  • विज्ञान तंत्रज्ञान चालू घटना : प्रश्‍नमंजुषा (104)

    विज्ञान तंत्रज्ञान चालू घटना : प्रश्‍नमंजुषा (104)

    • 20 Mar 2021
    • Posted By : study circle
    • 313 Views
    • 0 Shares

    प्रश्‍नमंजुषा (104) : विज्ञान तंत्रज्ञान चालू घटना

    1) भारतात कधीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले ?
    1) 26 जानेवारी 2021
    2) 1 जानेवारी 2021
    3) 16 जानेवारी 2021
    4) 14 जानेवारी 2021
     
    2) ‘कोव्हॅक्सिन’ संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) या लशीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. 
    ब) मुंबईत या लशीचे उत्पादन हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि  भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे. 
    क) भारत बायोटेक कंपनी चे मुख्यालय पुणे येथे आहे.
    ड) ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या 2 डोसमधील अंतर हे किमान 28 दिवसांचे असणे आवश्यक आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    3) अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील कोणत्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरुद्धची ‘सुपर अँटिबॉडी’ आढळली होती ?
    1) जॉर्ज फ्लॉईड 
    2) फ्रेलिमोचे फिलीप न्यूसी 
    3)  जॉन हॉलिस 
    4) डोमिनिक राब 
     
    4) खालील विधाने विचारात घ्या:
    र) लोडविक फ्रेडरिकऑटेन्स यांनी जगातील पहिली ऑडिओ कॅसेट टेप तयार केली.
    ल)  पहिली ऑडिओ कॅसेट टेप तयार करणारी फिलिप्स ही बेल्जियन कंपनी आहे.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (र)
    2) फक्त (ल)
    3) (र) व (ल) दोन्ही 
    4) दोन्हीही नाहीत 
     
    5) ‘अ‍ॅटोमिक फ्यूजन एनर्जी’ प्लँटमध्ये हायड्रोजनच्या अणूंना ‘फ्यूज’ करण्यासाठी गॅसला किती ऊर्जा द्यावी लागते ?
    1) सुमारे 100 दशलक्ष केल्विन
    2) सुमारे 100 दशलक्ष डिग्री सेंटीग्रेड 
    3) सुमारे 100 दशलक्ष डिग्री फॅरनहीट
    4) सुमारे 100 दशलक्ष डिग्री रँकीन
     
    6) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) 2021 च्या सुरुवाती पर्यंत पॅरिस हवामान करारावर 192 देशांनी सह्या केल्या आहेत. 
    ब)  त्यानुसार वाढते जागतिक तापमान सरासरी  2  अंश सेल्सिअसवर रोखण्याचे ध्येय निश्रि्चत आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    7) भारतीय ‘राष्ट्रीय लोकसंख्या धोरण’ 2000 नुसार कधीपर्यंत ‘एकूण प्रजनन दर’ (टोटल फर्टिलिटी रेट किंवा ‘टीएफआर’) 2.1 पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट होते ?
    1) 2020
    2) 2011
    3) 2010
    4) 2015
     
    8) ‘इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लीअर एक्स्प्रीमेंटल रिअ‍ॅक्टर’ कोठे निर्माण केला जात आहे ?
    1) अमेरिकेतील फ्लोरिडा येथे 
    2) स्वित्झर्लंड व फ्रान्स दरम्यान असलेल्या सेंट पॉल लेज डुरांस येथे 
    3) दक्षिण फ्रान्समधील सेंट पॉल लेज डुरांस येथे 
    4) रशियातील सैबेरिया येथे 
     
    9) ‘महिलांच्या शरीरात दिले जाणारे गर्भनिरोधक’ या संदर्भात कोणते विधान सत्य आहे?
    अ) हे शरीरांतर्गत गर्भनिरोधक एकदा घेतले की 6 महिने गर्भधारणा होत नाही.
    ब) 1989 पासून इंडोनेशिया आणि बांगलादेशांत तिचा वापर सुरू झाला. 
    क) 2016 पासून भारतात तिचा वापर सुरू झाला. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त ब आणि क
    4) अ, ब आणि क
     
    10) 2002 मध्ये करण्याींत आलेल्या 84 वी घटनादुरुस्तीनुसार कोणत्या सालापर्यंत प्रत्येक राज्यास दिलेल्या संसदीय जागांची संख्या वाढणार नाही ? 
    1) सन 2036 पर्यंत 
    2) सन 2045 पर्यंत 
    3) सन 2031 पर्यंत 
    4) सन 2026 पर्यंत 
     
    11) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) देशातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी बोरिबंदर ते ठाणे दरम्यान धावली होती.
    ब) इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशन (आयआरएसडीसी) द्वारे  सीएसएमटी, कल्याण, ठाकुर्ली व ठाणे स्थानकाच्या विकासाचे काम केले जात आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    12) क्योटो करारानुसार औद्योगिक अर्थव्यवस्था असलेल्या 52 देशांनी कोणत्या  ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे ध्येय ठेवले होते ?
    अ) सल्फर हेक्सा फ्लोराईड
    ब) ओझोन
    क) कार्बन डाय ऑक्साईड
    ड) सल्फर डाय ऑक्साईड 
    इ) कार्बन मोनो ऑक्साईड 
    फ) मिथेन
    ग) नायट्रेस ऑक्साईड 
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) अ, ब, क, ड   
    3) ब वगळता सर्व
    4) अ, क, फ, ग  
     
    13) इंटरगर्व्हनल पॅनेल (आयपीसीसी) च्या अहवालानुसार वाढत्या तापमानामुळे  हिमालय क्षेत्रात गेल्या पाच दशकांत ....
    अ) एव्हरेस्टचे ग्लेशियर (हिमकडे) 2 ते 5 किलोमीटरने कमी झाले आहेत.
    ब) भारत आणि नेपाळ यांच्यातील गंगोत्री ग्लेशियर वेगाने संकुचित होत आहे.
    क) 90 टक्के ग्लेशियर चिंताजनक पातळीने आकुंचन पावत आहेत. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    14) 2020 साली भारताने पॅरिस हवामान बदल करार मान्य केल्याने देशाला 1990 च्या तुलनेत ग्रीन हाऊसचे उत्सर्जन कितीने कमी करावे लागणार आहे ?
    1) 10 टक्क्यांने 
    2) 15 टक्क्यांने 
    3) 18 टक्क्यांने 
    4) 5 टक्क्यांने 
     
    15) आयपीसीसीच्या हवामान आणि पर्यावरण शास्त्रज्ञांच्या मते, वाढत्या जागतिक तापमानामुळे ....
    अ) 2012 सालापासून वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमालीचे घटले असून, 24 लाख टन ऑक्सिजन संपुष्टात आला आहे.
    ब) वातावरणात 36 लाख टन कार्बन डायऑक्साईडची वाढ झाली आहे.
    क) 2050 पर्यंत पृथ्वीवरचे तापमान सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढू शकते.
    ड) त्यावर नियंत्रण मिळवले नाही तर 22 व्या शतकात हे तापमान 60 अंशांपर्यंत पोहोचू शकते. 
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    16) पश्रि्चम रेल्वेने कोण्त्या एक्सप्रेस रेल्वेमध्ये ’शापिंग ऑन व्हील योजना’ सुरू केली होती ?
    1) मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस
    2) वांद्रे टर्मिनस-जम्मू तावी एक्सप्रेस
    3) अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर एक्सप्रेस
    4) वरील सर्व
     
    17) कोणत्या भारतीय उत्पादनांना जगभरातील बाजारात पोहोचवण्यासाठी ’हँडिक्राफ्ट्स अँड हॅँडलूम्स एक्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ककएउ)’ ही कंपनी निर्माण करण्यात आली होती ?
    अ) लोखंडाचे हस्तशिल्प 
    ब) चामड्याच्या सजावटीच्या वस्तू
    क) भारतातील प्राचीन वस्तू
    ड) रत्न आणि आभूषण
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  अ, ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    18) भविष्य निर्वाह निधी कायदा कधी संमत करण्यात आलेला होता ?
    1) 1952
    2) 1962
    3) 1972
    4) 1969
     
    19) हँडिक्राफ्ट्स अँड हॅँडलूम्स एक्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ककएउ) या कंपनी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) या कंपनीची स्थापना 1958 मध्ये झाली होती.
    ब) ही कंपनी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधीन आहे.
    क) 2015-16पासून ही कंपनी सातत्याने नुकसानीत आहे.
    ड) 2021 मध्ये तिचे खाजगीकरण केले गेले.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    20) 2020-21  या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर किती (पीएफ) दराने व्याज दिले जाणार आहे?
    1) 7.50 टक्के  
    2) 8.00 टक्के  
    3) 8.50 टक्के  
    4) 9.00 टक्के  
     
    21) ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाच्या एका कव्हर पेजवरील चित्रामध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) या मेगन मर्केलच्या मानेवर गुडघा ठेऊन उभ्या असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ब्रिटनच्या राजघराण्याच्या वर्णद्वेषी वर्तनास अशाप्रकारे निषेध करणारे सदर साप्ताहिक कोणत्या देशातून प्रकाशित होत ?
    1) ब्रिटन 
    2) स्वीडन
    3) स्पेन
    4) फ्रान्स

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (106)
    1-3
     
    2-4
     
    3-3
     
    4-1
     
    5-2
     
    6-3
     
    7-3
     
    8-3
     
    9-3
     
    10-4
     
    11-3
     
    12-4
     
    13-2
     
    14-3
     
    15-3
     
    16-4
     
    17-2
     
    18-1
     
    19-1
     
    20-3
     
    21-4

Share this story

Total Shares : 0 Total Views : 313