लसीकरणाचा दुसरा टप्पा - प्रश्नमंजुषा : (100)

  •  लसीकरणाचा दुसरा टप्पा - प्रश्नमंजुषा : (100)

    लसीकरणाचा दुसरा टप्पा - प्रश्नमंजुषा : (100)

    • 26 Feb 2021
    • Posted By : study circle
    • 147 Views
    • 0 Shares

     लसीकरणाचा दुसरा टप्पा - प्रश्नमंजुषा : (100)

    1) केंद्र सरकारने  लसीकरणाबाबतची नियमावली कधी जाहीर केली ?
    1) 16 जानेवारी 2021
    2) 1 मार्च 2021 
    3) 14 डिसेंबर 2020 
    4) 1 डिसेंबर 2020
     
    2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) 16 जानेवारी 2020 रोजी भारतात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला. 
    ब) 2021 च्या सुरुवातीस पुण्यातील सीरम संस्थेची ‘कोव्हिशिल्ड’ आणि हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींना मंजुरी देण्यात आली होती.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    3) फेब्रुवारी 2021 पर्यंत जगभरातील 21 कोटी लोकांचे लसीकरण झाले होते. त्यात कोणत्या देशाचे नागरिक जास्त आहेत ?
    1) युरोपीय संघ
    2) अमेरिका 
    3) चीन 
    4) रशिया
     
    4) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (पदनाम)                   स्तंभ ब (व्यक्ती)
    अ. केंद्रीय आरोग्य सचिव              I. डॉ. बलराम भार्गव
    ब. आयसीएमआरचे महासचिव         II. रणदीप गुलेरिया
    क. एम्सचे संचालक                      III. व्ही. के. पॉल 
    ड. लसीकरणाच्या कृतिगटाचे प्रमुख   IV  राजेश भूषण 
    पर्यायी उत्तरे :
    क   
    (1) II IV    III    II
    (2) IV    I II III
    (3) III    II IV I
    (4) IV III I II
     
    5) फेब्रुवारी 2021 मध्ये देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण कोणत्या दोन राज्यांमध्ये होते ?
    1) छत्तीसगड व मध्य प्रदेश
    2) गुजरात व पंजाब
    3) महाराष्ट्र व केरळ 
    4) कर्नाटक व दिल्ली
     
    6) जागतिक लसीकरणा संदर्भात खालीलपैक्री चुकीची जोडी शोधा :
    अ) चीन : जून 2020 मध्ये आणि 
    ब) ब्रिटन : डिसेंबर 2020
    क) अमेरिका : जानेवारी 2021
    ड) रशिया : ऑगस्ट 2020 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    7) लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणाचे लाभार्थी ओळखा :
    अ) 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 10 कोटी लोक
    ब)  50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 27 कोटी नागरिक
    क) सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्ती
    ड)  लष्करी-निमलष्करी जवान, सफाई व आरोग्य कर्मचारी
    पर्यायी उत्तरे :
    1) ब, क बरोबर
    2) फक्त अ आणि क बरोबर
    3) अ, ब  बरोबर
    4)  अ, ड बरोबर 
     
    उत्तरे - प्रश्नमंजुषा (100)

    1-3
     
    2-3
     
    3-2
     
    4-2
     
    5-3
     
    6-3
     
    7-2
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 147