भारतीय संविधान व राज्यव्यवस्था प्रश्नपुस्तिका (1)

  • भारतीय संविधान व राज्यव्यवस्था प्रश्नपुस्तिका (1)

    भारतीय संविधान व राज्यव्यवस्था प्रश्नपुस्तिका (1)

    • 01 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 2737 Views
    • 3 Shares
    1) खालील विधाने विचारात घ्या.
    अ) 1935 च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते.
    ब) अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत.
    क) कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहे.
    वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
    1) अ आणि ब
    2) ब आणि क
    3) अ आणि क
    4) अ, ब, आणि क

    2) विधान (A) : भारत सरकार अधिनियम, 1935 नुसार उर्वरित अधिकार हे केंद्रीय कायदेमंडळास देण्यात आलेले होते.
    कारण (R) : भारत सरकार अधिनियम, 1935 ने विषयांची तीन सूचीमध्ये विभागणी केली होती. उदा. - संघ, प्रांत आणि समवर्ती सूची.
    1) (A) आणि (R) दोन्हीही विधाने सत्य आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
    2) (A) आणि (R) दोन्हीही विधाने सत्य आहेत परंतु (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
    3) (A) सत्य आहे परंतु (R) चुकीचे आहे.
    4) (A) चुकीचे आहे परंतु (R) सत्य आहे.

    3) भारतीय इतिहासाच्या संदर्भात संविधानसभेचे सदस्य विविध प्रांतातून -
    1) प्रांतातील जनतेने प्रत्यक्षरीत्या निवडून दिले होते.
    2) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लीम लीगने नियुक्त केले होते.
    3) प्रांतीय विधीमंडळांनी निवडून दिले होते.
    4) घटनात्मक बाबींच्या विशेषज्ञतेच्या आधारावर सरकारने निवडून दिले होते.

    4) 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टीट्यूशन हॉल मध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता ......... म्हणतात.
    1) संसदीय ग्यानपीठ
    2) पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल
    3) पार्लमेंट हाऊस अनेक्स
    4) लोकसभा चेंबर

    5) पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे  आहे?
    अ) घटना समिती (कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली) नंतर विधान समिती (लेजिस्लेटिव्ह असेंब्ली) बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या/हंगामी संसदेत  झाले.
    ब) ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकून मानला गेला.
    1) केवळ अ
    2) केवळ ब
    3) दोन्ही अ व ब
    4) दोन्ही नाहीत

    6) अयोग्य (चूक) कथन ओळखा.
    अ) संविधान सभेची प्रथम बैठक, 9 डिसेंबर, 1946 रोजी झाली. 
    ब) संविधान सभेने 29 ऑगस्ट, 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. 
    क) बी. एन. राव हे संविधान सभेचे सांविधानिक सल्लागार होते.
    1) फक्त अ
    2) फक्त ब  
    3) फक्त क
    4) वरीलपैकी एकही नाही 

    7) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी पार पडली.
    ब) डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते.
    क) भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधान स्वीकारले.
    वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त ब आणि क
    4) फक्त अ आणि क 

    8) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
    1) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.
      2) सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.
      3) सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.
    4) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.

    9) भारताच्या संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    1) संविधान सभा ही अंशतः निर्वाचित आणि अंशतः नामनिर्देशित संस्था होती.
    2) संविधान सभा ही प्रांतांच्या विधान सभा सदस्यांकडून अप्रत्यक्षरीत्या निवडलेली होती.
    3) निवडणुकीची पद्धत ही कॅबिनेट मिशन योजनेने आखून दिली होती.
    4) जागांची विभागणी ही माऊंटबॅटन योजनेनुसार करण्यात आली होती.

    10) संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?
    1) जे. बी. कृपलानी
    2) डॉ. बी. आर. आंबेडकर
    3) सी. राजगोपालाचारी
    4) टी. टी. कृष्णम्माचारी

    11) संविधान सभेच्या मुलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते ?
    1) पंडित नेहरू
    2) वल्लभभाई पटेल
    3) डॉ. राजेंद्र प्रसाद
    4) डॉ. आंबेडकर

    12) संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
    1) डॉ. बी. आर. आंबेडकर
    2) जे. बी. कृपलानी
    3) सरदार वल्लभभाई पटेल
    4) जवाहरलाल नेहरु  

    13) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले?
    a) मूलभूत अधिकार समिती
    b) अल्संख्याक उपसमिती
    c) सल्लागार समिती
    d) राज्ये समिती
    1) फक्त (a), (b), (c)
    2) फक्त (b), (c), (d)
    3) फक्त (a), (b), (d)
    4) फक्त (a), (c), (d)

    14) खालील विधाने विचारात घ्या :
    (a) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली.
    (b) या बैठकीवर मुस्लीम लीग ने बहिष्कार टाकला होता.
    (c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते.
    वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    1) (a) आणि (b)
    2) (b) आणि (c)
    3) (a) आणि (c)
    4) (a), (b) आणि (c)

    15) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
    1) घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली.
    2) डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले गेले.
    3) जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी ’उद्दिष्टांचा ठराव’ मांडला.
    4) ’उद्दिष्टांचा ठराव’ हा एक मताने 26 जानेवारी 1947 रोजी मंजूर झाला.

    16) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली?
    1) 11
    2) 16
    3) 114
    4) 165

    17) संविधानसभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना ...... रोजी स्विकारली.
    1) 9 डिसेंबर, 1946, तिच्या पहिल्या बैठकीत
    2) 22 जानेवारी, 1947 जेव्हा सुप्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव स्विकारला गेला.
    3) 22 जुलै, 1947
    4) 14 ऑगस्ट, 1947

    18) खालील विधाने विचारात घ्या :
    a) पं. ठाकुरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे मानले.
    b) बेरूबरी संघ खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्याहून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे.
    c) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबरी संघ खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले.
    d) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात - समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला.
    वरीलपैकी कोणते विधान/विधान बरोबर आहे/त?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त (a)
    2) (a), (b) आणि (c)
    3) फक्त (d)
    4) (a), (b), (c) आणि (d)

    19) खालील जोड्या जुळवा.
    अ (घटनात्मक वैशिष्ट्ये)           ब (स्रोत)
    अ) कायद्याचे राज्य                I) रशियाची राज्यघटना
    ब) मार्गदर्शक तत्त्वे                II) इंग्लंडची राज्यघटना
    क) समवर्ती सूची                        III) आयरिश राज्यघटना
    ड) मूलभूत कर्तव्ये                     IV) ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
    1) I II III IV
    2) II III IV I
    3) III IV I II
    4) IV I II III

    20) भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी ‘न्यायिक पुनर्विलोकनाचा’ विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ?
    1) ग्रेट ब्रिटन
    2) फ्रान्स
    3) आयर्लंड
    4) अमेरिका

    21) भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतांसंदर्भात सूची अ व सूची ब यांच्या जोड्या जुळवा
    सूची-अ                                    सूची-ब
    a) ब्रिटिश राज्यघटना                     i) उपराष्ट्रपतींचे पद
    b) आयर्लंडची राज्यघटना             ii) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक
    c) ऑस्ट्रेलियाची राज्यघटना             iii) मार्गदर्शक तत्वे
    d) अमेरिकेची राज्यघटना             iv) कॅबिनेट व्यवस्था
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    1) (iv) (iii) (ii) (i)
    2) (i) (ii) (iii) (iv)
    3) (iii) (iv) (i) (ii)
    4) (ii) (i) (iv) (iii)

    22) भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्त्वे स्वीकारण्यात आली ?
    अ) राज्याची नीती  निर्देशक तत्त्वे 
    ब) स्वातंत्र्य, समता व बंधुता
    क) कायद्याचे राज्य
    ड) कायदा निर्मिती प्रक्रिया
    1) फक्त अ, ब आणि क
    2) फक्त ब आणि क
    3) फक्त क आणि ड
    4) फक्त ब, क आणि ड 

    23) भारतीय संविधानाने विविध देशांच्या संविधानातून खालील गोष्टी घेतलेल्या आहेत.
    जोड्या लावा
                         ब
    अ) इंग्लंड               i) बलशाली केंद्र सरकार
    ब) फ्रान्स व अमेरिका         ii) मूलभूत कर्तव्ये
    क) सोव्हिएट रशिया       iii) मूलभूत हक्क
    ड) कॅनडा               iv) मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी
    पर्यायी उत्तरे -
    1) (iv) (iii) (ii) (i)
    2) (iii) (ii) (iv) (i)
    3) (ii) (i) (iv) (iii)
    4) (i) (iv) (ii) (iii)

    24) खालील विधाने विचारात घ्या :
    a) कायद्यापुढील समता ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतली आहे.
    b) कायद्याचे समान संरक्षण ही मूळची ब्रिटिश संकल्पना आहे.
    c) कायद्यापुढील समता ही संकल्पना मकायद्याचे अधिराज्यफ या संकल्पनेचा एक घटक आहे.
    d) कायद्याचे अधिराज्यफआणि न्यायालयीन पुर्नविलोकन हे राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचे (संरचनेचे) प्रमुख घटक आहेत आणि म्हणून ते घटनादुरुस्तीद्वारेदेखील नष्ट करता येत नाहीत.
    1) (a), (b), (c)
    2) (b), (c), (d)
    3) (a) आणि (b)
    4) (c) आणि (d)

    25) खालील योग्य जोड्या जुळवा :
    भारतीय संविधानातील तत्त्वे                      संविधानातून स्वीकारली
    अ) संसदीय शासन पद्धती                   I) अमेरिका
    ब) सर्वोच्च न्यायालयाची स्थापना           II) ब्रिटन
    क) राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे   III) जर्मनी
    ड) आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत              IV) आयर्लंड
     
    हक्क रद्द करणे
    1) II I IV III
    2) I II III IV
    3) IV III II I
    4) IV II III I

    26) खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्यघटनेकडून घेतलेली नाही?
    1)  मूलभूत अधिकार
    2)  मार्गदर्शक तत्त्वे
    3)  राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत
    4)  राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन

    27) खालील विधाने विचारात घ्या :
    a) ’कायद्यापुढील समता’ ही संकल्पना मूळची अमेरिकन आहे तर ’कायद्याचे समान संरक्षण’ ही संकल्पना ब्रिटिशांकडून घेतली आहे.
    b) ’कायद्याचे अधिराज्य’ ज्याचा अंतर्गत अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्यघटनेचे ’पायाभूत वैशिष्ट्य’ असून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही.
    c) राजदूत, याच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी व दिवाणी कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे.
    वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
    पर्यायी उत्तरे :
    1) (a) फक्त
    2) (b) फक्त
    3) (b) आणि (c) फक्त
    4) (c) आणि (d) फक्त

    28) भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारले आहे ?
    1) केन्द्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना
    2) राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत
    3) प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना
      4) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराच्या निलंबना संबंधीच्या तरतुदी

    29) खालील विधाने विचारात घ्या.
    अ) ब्रिटिश घटना ही अलिखित आहे.
    ब) ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे.
    क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचीक आहे.
    वरीलपैकी कोणते विधान चुकीचे  आहे?
    1) अ
    2) ब
    3) क     
    4) यापैकी नाही

    30) भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा. 
    यादी क्र. 1 (वैशिष्ट्ये)                                यादी क्र. 2 (स्रोत)
    a) राज्यपालांचे पद                         i) भारत सरकार कायदा 1935
    b) न्यायालयीन पुनरावलोकन        ii) ब्रिटिश घटना
    c) मार्गदर्शक तत्त्वे                        iii) आयर्लंडची घटना
    d) संसदीय राज्यपद्धती                        iv) अमेरिकेची घटना
    पर्याय :
    (a) (b) (c) (d)
    1) (i) (iv) (iii) (ii)
    2) (iv) (iii) (i) (ii)
    3) (iii) (i) (iv) (ii)
    4) (i) (iii) (iv) (ii)


    उत्तरे
     
    1-1

    2-4

    3-3

    4-2

    5-3

    6-4

    7-4
     
    8-3

    9-4

    10-1

    11-2

    12-3

    13-1

    14-1

    15-4

    16-1

    17-3

    18-1

    19-2

    20-4

    21-1

    22-3

    23-1

    24-4

    25-1

    26-1

    27-3

    28-4

    29-3

    30-1

Share this story

Total Shares : 3 Total Views : 2737