
Date : 26/10/2020
नॉर्वेच्या समितीदद्वारे शांततेचे नोबेल मानकर्यांची निवड
नोबेलचे इतर सर्व पुरस्कार हे स्वीडनच्या राजधानीत प्रदान केले जात असले तरी शांततेचे नोबेल पारितोषिक नॉर्वेची ऑस्लो येथील समिती देते.
1. 1901 पासून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात झाली व ते नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे. हे आल्फ्रेड नोबेल यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार होत आहे. नोबेल यांनी त्यांच्या इच्छापत्रात म्हटले आहे की, पारितोषिक दिले जाताना उमेदवाराचे राष्ट्रीयत्व बघितले जाऊ नये, मग ती व्यक्ती स्कँडेनेव्हियन असो किंवा नसो.
2. नामांकन व निवड प्रक्रियेत नॉर्वेची नोबेल समिती 1904 मध्ये स्थापन झाली, तेव्हापासून सचिवाच्या मदतीने काम बघू लागली. ही व्यक्ती संस्थेची संचालकही असे. 1901 पासून नॉर्वेच्या नोबेल समितीवरही टीका झाली आहे. यंदा हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला (डब्ल्यूएफपी) मिळाला आहे.
3. नॉर्वेचा राष्ट्रभक्त व ख्यातनाम लेखक बिजोर्नस्टेम जोर्नसन याच्या मते आंतरराष्ट्रीय शांतता चळवळीला असा पुरस्कार देण्यास मान्यता देणारे नॉर्वेचे विधिमंडळ हे पहिले होते.
4. नोबेल पारितोषिक वितरणाचे काम नोबेल यांनी स्वीडिश व नॉर्वेच्या संस्थांना वाटून दिले, कारण शांततेचे पारितोषिक हे राजकीय वादात अडकू शकते व ते राजकारणाचे साधन म्हणून वापरले जाऊ शकते. त्यामुळे शांततेसाठी या पुरस्काराचा वापर होण्याऐवजी राजकारणासाठी होईल.
5. विसाव्या शतकात आठ स्कँडेनिव्हियनांना शांततेचे पारितोषिक मिळाले; त्यातील पाच स्वीडिश होते व दोन नॉर्वेचे होते.
वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी)
1. 2020 चे शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) या संस्थेला देण्यात आले. जगभरामध्ये तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणार्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी काम करणार्या डब्ल्यूएफपीच्या नावाची घोषणा नॉर्वेतील ऑस्लो येथील समिती केली.
2. वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) ही संस्था, संयुक्त राष्ट्र संघांची उपसंस्था आहे. जगभरामधील भूकेसंदर्भातील समस्या आणि अन्नसुरक्षेच्या क्षेत्रामध्ये या संस्थेचे मागील जवळजवळ 60 वर्षांपासून अधिक काळ काम सुरु आहे.
3. दर वर्षी डब्ल्यूएफपी ही संस्था 83 देशांमधील 91 लाख 40 हजार गरजू व्यक्तींना अन्य पदार्थ पुरवते.
4. या संस्थेची स्थापना 1963 साली झाली आहे.
5. या संस्थेचे मुख्यालय इटलीमधील रोम शहरात आहे. या संस्थेच्या जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये शाखा आहेत.