इंडियन नॅशनल काँग्रेस / प्रश्‍नमंजुषा (१६४)

  • इंडियन नॅशनल काँग्रेस / प्रश्‍नमंजुषा (१६४)

    इंडियन नॅशनल काँग्रेस / प्रश्‍नमंजुषा (१६४)

    • 22 May 2021
    • Posted By : study circle
    • 8586 Views
    • 13 Shares
     इंडियन नॅशनल काँग्रेस
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षातकाँग्रेस पक्ष व स्वातंत्र्य चळवळयावर अनेक प्रश्‍न विचारले गेलेले आहेत. काँग्रेस पक्षाची अधिवेशने, त्यातील ठराव, जहाल व मवाळ कालखंडातील नेते व त्यांची धोरणेविविध चळवळी व त्यांचे नेतृत्त्व, तसेच त्यावर विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास विभाग
     
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :

    १.५ भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास -
     
    भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना (इंडियन नॅशनल काँग्रेस) मवाळ गटाचा काळ, जहाल गटाची वाढ, बंगालची फाळणी, होमरूल चळवळ.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    इंडियन नॅशनल काँग्रेस
    १)  काँग्रेसची स्थापना
    २)  महत्त्वाची अधिवेशने
    ३)  काँग्रेसचे महत्त्वाचे नेते
    ४)  मवाळवादी नेतृत्त्व
    ५)  जहालवादी नेतृत्त्व
    ६)  बंगालची फाळणी व स्वदेशी चळवळ (१९०५)
    ७)  होमरूल चळवळ (१९१६-२१)
    ८)  रौलेट विरोधी आंदोलन
    ९)  स्वराज पक्ष (१९२३)
    १०) काँग्रेस समाजवादी पार्टी
     
    काँग्रेसची स्थापना
     
    १)  राष्ट्रीय काँगे्रसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता?
              a) गोपाळ कृष्ण गोखल
        b) गंगारामभाऊ मस्के
              c) गोपाळ गणेश आगरकर
              d) फिरोजशहा मेहता
        १) (a) (b) बरोबर
        २) (b) (c) चूक
        ३) (a), (b) आणि (d) बरोबर
        ४) (a), (b), (c) (d)

    २)  * त्यांनी १८९५ च्या पुण्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला.
        * मुंबई व युरोपात वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या.
        * कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली. त्या कोण होत्या?
        पर्यायी उत्तरे :
        १) रखमाबाई
        २) आनंदीबाई जोशी
        ३) कृष्णाबाई केळवकर
        ४) काशीबाई कानिटकर

    ३)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेते सहभागी होते.
        a) जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी
        b) उमेशचंद्र बॅनर्जी, सर अ‍ॅलन ह्युम
        c) गणेश जोशी, विनायक सावरकर
        d) ईश्‍वरचंद्र विद्यासागर, दुर्गाराम मंछाराम
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (b) आणि (c) फक्त
        ३) (c) आणि (d) फक्त
        ४) (a) आणि (d) फक्त

    ४)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या?
        अ) पाश्‍चात्त्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.
        ब) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे पर्यंत खाली आणणे.
        क) लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.
        १) अ आणि ब
        २) ब आणि क
        ३) अ आणि क
        ४) अ, , आणि क

    ५)  १८८५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते ?  
        १) देशाच्या विविध भागात राहणार्‍या व देशसेवा करू इच्छिणार्‍या लोकांत मैत्रीसंबंध वाढविणे.
        २) भारतीय लोकांमधील धर्म, जात, पंथ, प्रांत भेद दूर करुन ऐक्याची भावना निर्माण करणे.
        ३) भारतातील महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा घडवून आणून त्या सरकारपुढे मांडणे.
        ४) ब्रिटिश विरोधी सशस्त्र क्रांती घडवून आणणे.

    ६)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण -
        १) तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते
        २) तिच्या सभासदामध्ये विविध धर्माचे लोक होते
        ३) तिचे ध्येय राष्ट्रवादी होते     
        ४) वरीलपैकी सर्व

    ७)  पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
        a) राष्ट्रीय काँग्रेस संघटनेला ‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग‘ असे लॉर्ड कर्झन यांनी म्हटले.
              b) सन १८१८ मध्ये काँग्रेस अधिवेशनाला जागा मिळू नये असे प्रयत्न गव्हर्नर जनरल डफरीन यांनी केले.                                     
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a) योग्य आहे          
        २) केवळ (b) योग्य आहे
       ३) (a) (b) दोन्ही योग्य         
        ४) (a) (b) अयोग्य 

    ८)  राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव संमत करण्यात आले ?
              a) ब्रह्मदेश खालसा करण्यात यावा.
        b) सनदी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २४ वर्ष असावी.
        c) इंडिया कौन्सिल (भारत मंडळ) रद्द करावे.
        d) लष्करी खर्च वाढविण्यात येऊ नये.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
        २) (a), (b) आणि (d)
        ३) (a) आणि (c)
        ४) (c) आणि (d)

    ९)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे ?
        अ) भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे.
        ब) भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे.
        क) लष्करावरील खर्च कमी करणे.
        ड) अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलीनीकरणास विरोध करणे.
        १) फक्त अ
        २) फक्त क आणि ड
        ३) अ,,क आणि ड
        ४) फक्त ब

    १०) देवबंद चळवळीने १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केले?
        १)  राष्ट्रीय काँग्रेस सभेचे स्वागत केले.
        २) राष्ट्रीय काँग्रेस सभा उपयोगाची नाही.
        ३) राष्ट्रीय काँग्रेस सभेवर बहिष्कार घालावा.
        ४) राष्ट्रीय काँग्रेस सभा मुसलमानांविरुद्ध आहे.

    महत्त्वाची अधिवेशने
     
    १)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनिधी हजर होते ?
        १) ७३
        २) ७५
        ३) ७२
        ४) ७६

    २)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती ?
              a) प्रथम - १८८५
              b) पाचवे - १८८९
              c) विसावे - १९०४
              d) एकतिसावे - १९१५
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (a) आणि (c) फक्त
        ३) (b), (c) आणि (d) फक्त
        ४) (a),(b),(c),(d)

    ३)  जोड्या जुळवा :
        भारतीय राष्ट्रसभेची मुंबई येथील अधिवेशने अध्यक्ष
        a) १८८९         i) सर हेन्री कॉटन
        b) १९०४         ii) एस. पी. सिन्हा
              c) १९१५         iii) सर विल्यम वेडरबर्न
        d) १९३४         iv) डॉ. राजेंद्र प्रसाद
            (a)         (b)         (c)          (d)
        १)     (iii)       (i)          (ii)          (iv)
              २)     (iii)       (iv)        (i)           (ii)
              ३)     (i)          (ii)         (iii)        (iv)
              ४)     (iv)        (iii)        (ii)          (i)

    ४)  १८८५ साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले, यावेळी अध्यक्षपद यांनी भूषविले.
        १) ए. एम. बोस
        २) आर. सी. दत्त
        ३) डब्ल्यू. सी. बॅनर्जी
        ४) बी. एन. धार

    ५)  राष्ट्रीय क्राँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
        १) अ‍ॅलन अ‍ॅक्टोव्हिएन ह्यूम
        २) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
        ३) व्योमेशचंद्र बॅनर्जी
        ४) स्वातंत्र्यवीर सावरकर

    ६)  २८ डिसेंबर १८८५ रोजी भरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
        १) अ‍ॅलम ह्यूम
        २) वेडरबर्न
        ३) व्योमेशचंद्र बॅनर्जी
        ४) लॉर्ड डफरिन

    ७)  २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ...... होते.
        १) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
        २) व्योमेशचंद्र बॅनर्जी
        ३) लोकमान्य टिळक
        ४) चित्तरंजनदास

    ८)  २८ डिसेंबर १८८५ रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते?
        १) अ‍ॅलन ह्युम, हेन्री कॉटन व विल्यम वेडरबर्न
        २) अ‍ॅलन ह्युम, व्हाईसरॉय डफरीन व जॉर्ज यूले
       ३) विल्यम वेडरबर्न, व्हाईसरॉय डफरीन व हेन्री कॉटन
        ४) अ‍ॅलन ह्युम, लॉर्ड कर्झन व विल्यम वेडरबर्न

    ९)  खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
        १) राष्ट्रसभेची स्थापना १८८५ मध्ये झाली.
        २) राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
        ३) राष्ट्रसभेचे जनक अ‍ॅलन ह्यूम होते.
        ४) इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर नेत्यांची दृढ श्रद्धा होती.

    १०) राष्ट्रीय काँग्रेसचे नियोजित पहिले अधिवेशन पुणे येथे होऊ शकले नाही कारण
        अ) पुणे येथे कॉलरा रोगाची साथ सुरू होती. 
        ब) पुणे येथे महाभयंकर दुष्काळ पडला होता.
        क) पुणे येथे देवीच्या रोगाची साथ पसरलेली होती.
        ड) पुणे येथील अधिवेशनास अनेक राजकीय नेत्यांचा विरोध होता.
        वरील कोणते विधान बरोबर आहे ?
        १) अ, ब आणि क फक्त
        २) अ फक्त
        ३) ब आणि क फक्त
        ४) क आणि ड फक्त

    ११) पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        a)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास ७३ प्रतिनिधी उपस्थित होते.
              b) सर ए. ओ. ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ‘सेफ्टी व्हॉल्व’ म्हणून कार्य करावयास सांगितले.
        पर्यायी उत्तरे -  
        १) केवळ (a)
              २) केवळ (b)
              ३) (a) व  (b) दोन्ही
              ४) (a) (b) दोन्ही नाही.

    १२) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते; कारण -
        १) पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे
        २) पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे
        ३) मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे
        ४) मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे

    १३) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण .........
        १) पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे      
        २) मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे   
        ३) पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव  झाल्यामुळे
        ४) मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे

    १४) राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इ.स. १८८६ च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
        १) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
        २) सय्यद बद्रुद्दिन तय्यबजी
        ३) दादाभाई नौरोजी
        ४) व्योमेश चंद्र बॅनर्जी

    १५) दादाभाई नौरोजी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते ?
        १) १८८६
        २) १८९०
        ३) १८९३
        ४) १९०६
        १) फक्त १ व ४
        २) फक्त २ व ३
        ३) फक्त १,,
        ४) फक्त १,,

    १६) १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष ......... होते. 
        १) सुभाषचंद्र बोस
        २) दादाभाई नौरोजी
        ३) लाला लजपतराय
        ४) गोपाळ कृष्ण गोखले

    १७) इ.स. १९०६ च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
        १) व्योमेश चंद्र बॅनर्जी
        २) दादाभाई नौरोजी
        ३) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
        ४) अ‍ॅलन ह्यूम

    १८) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या २१ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
        १) वल्लभभाई पटेल
        २) जवाहरलाल नेहरू
        ३) गोपाळ कृष्ण गोखले
        ४) लाला लजपतराय

    १९) जोड्या जुळवा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने -
            स्थळ व वर्षे                   अध्यक्ष
              a) कलकत्ता (१८८६)              i) अ‍ॅनी बेझंट
              b) अलाहाबाद (१८८८)             ii) दादाभाई नौरोजी
              c) वाराणसी (१९०५)              iii) जॉर्ज युल
              d) कलकत्ता (१९१७)              iv) गोपाळकृष्ण गोखले
        पर्यायी उत्तरे :
            (a)         (b)         (c)          (d)
              १)     (i)          (iv)        (iii)        (ii)
              २)     (ii)         (iii)        (iv)         (i)
              ३)     (iii)       (iv)        (i)           (ii)
              ४)     (iv)        (iii)        (ii)          (i)

    २०) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले ?
        १) पुणे
        २) मुंबई
        ३) मद्रास
        ४) कलकत्ता

    २१) महात्मा गांधी हे ......... येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
        १) मुंबई 
        २) कोलकाता
        ३) बेळगाव
        ४) मद्रास

    २२) पुढील कोणते विधान योग्य आहे ?
        a) काँग्रेसच्या १८८८ च्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणारा आद्य इंग्रज होता - जॉर्ज यूल.
              b) सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई येथे भूषविले.           
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a) योग्य आहे          
        २) केवळ (b) योग्य आहे  
        ३) (a) (b) दोन्ही योग्य           
        ४) (a) (b)दोन्ही अयोग्य

    २३) पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
        a) डिसेंबर १८८५ मध्ये मुंबई येथे बोलविल्या गेलेल्या अखिल भारतीय अधिवेशनात सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी हिरीरीने सहभाग घेतला.
              b) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिवर्षी डिसेंबर मध्ये अधिवेशन होत असे.
              पर्यायी उत्तरे :
              १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही (a) (b)
        ४) न (a)  (b) 

    २४) १९१७ साली कोणाची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्षा म्हणून निवड झाली होती ?
        १) अ‍ॅनी बेझंट
        २) रमाबाई रानडे
        ३) सरोजिनी नायडू
        ४) पंडिता रमाबाई

    २५) सन १९१७ च्या राष्ट्रीयसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
        १) दादाभाई नौरोजी
        २) अ‍ॅनी बेझंट
        ३) लोकमान्य टिळक
        ४) बाबू अंबिकाचरण मुजुमदार

    २६) १९०७ च्या काँग्रेसच्या सुरत येथील अधिवेशनाचे मवाळ पक्षाचे अध्यक्ष कोण होते ?
        १) दादाभाई नौरोजी
        २) रास बिहारी बोस
        ३) एम्. जी. रानडे
        ४) फिरोजशहा मेहता

    २७) शासकीय कर्मचार्‍यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली ?
        १) लॉर्ड कर्झन
        २) लॉर्ड डफरीन
        ३) लॉर्ड रिपन
        ४) ए. ओ. ह्यूम

    २८) काँग्रेस स्थापनेसंदर्भातील ‘सुरक्षा झडप सिद्धांता‘ ला ‘दंतकथा‘ संबोधून कोणी नाकारले आहे ?
        १) ए. ओ. ह्यूम
        २) ए. आर. देसाई
        ३) ताराचंद
        ४) बिपिन चंद्र 

    २९) कोण्या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लीम लीगचे ऐक्य झाले?
        १) लखनौ
        २) सुरत
        ३) दिल्ली
        ४) मुंबई

    ३०) १९१७ साली कोणाची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्षा म्हणून निवड झाली होती ?
        १) अ‍ॅनी बेझंट
        २) रमाबाई रानडे
        ३) सरोजिनी नायडू
        ४) पंडिता रमाबाई

    ३१) काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकार्‍यांनी प्रयत्न केले?
        १) मुंबई (१८८९)
        २) अलाहाबाद (१८८८)
        ३) मद्रास (१८८७)
        ४) कलकत्ता (१८८६)

     काँग्रेसचे लाहोर अधिवेशन (१९२९)
     
    १)  १९२९ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर अधिवेशन हे स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासाचे महत्त्वाचे आहे कारण-
        १) काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित केला.
        २) जहाल आणि मवाळ वाद्यातील मतभेद नाहीसे केले.
        ३) द्विराष्ट्रीय सिद्धांत नाकारणारा ठराव पारित केला.  
        १) फक्त १ बरोबर
        २) फक्त २ व ३ बरोबर
        ३) १ व ३
        ४) यापैकी नाही

    २)  संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
        १) लखनौ
        २) मुंबई
        ३) लाहोर
        ४) सुरत

    ३)  कराची येथील काँग्रेसच्या सभेत :
        a) मूलभूत हक्कांबाबतचा महत्त्वाचा ठराव मंजूर केला गेला.
              b) काही उद्योगांचे राष्ट्रीयकरण करावे यास पसंती दिली गेली.
        वरील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) न (a) (b)
        ४) दोन्ही (a) (b)

     फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन (१९३६)
     
    १)  इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन १९३६ साली ....... येथे भरले होते.
        १) जळगाव
        २) धुळे  
        ३) फैजपूर 
        ४) चाळीसगाव

    २)  फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
        १) ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते
        २) त्या अधिवेशनाला सुमारे ४०,००० शेतकरी उपस्थित होते.
        ३) त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरूजी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
        ४) शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

    ३)  भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन ‘फैजपूर काँग्रेस’ चे अध्यक्षपद कोणी भूषविले होते?
              १) जवाहरलाल नेहरू
        २) महात्मा गांधी
        ३) वल्लभभाई पटेल
        ४) एम. एन. रॉय

    काँग्रेसचे महत्त्वाचे नेते
     
    १)  भारताचे ‘पितामह’ म्हणून कोणास ओळखले जाते ?
        १) न्यायमूर्ती रानडे
        २) फिरोजशहा मेहता
        ३) रविंद्रनाथ टागोर
        ४) दादाभाई नौरोजी

    २)  ...... हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष होते.
        १) अब्दुल कलाम आझाद
        २) मौलाना आझाद
        ३) बद्रुद्दिन तैयबजी
        ४) हकीम खान

    ३)  जोड्या जुळवा :
              a) ह्यूम         i)  भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस
        b) दिनशा वाच्छा  ii)  भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव
        c) गोपाळ कृष्ण गोखले         iii)  भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव
        d) दाजी आबाजी खरे           iv)  भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील गोखलेंचे उत्तराधिकारी
        पर्यायी उत्तरे :
                       (a)          (b)          (c)           (d)
              १)     (i)           (ii)          (iii)          (iv)
              २)     (iv)         (iii)         (ii)           (i)
              ३)     (iii)         (iv)         (i)            (ii)
              ४)     (ii)          (i)           (iv)          (iii)

    ४)  १८९० मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीमध्ये पुढील पैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?
        १) दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, ब्राडलॉ, अ‍ॅडम्स हॉवर्ड
        २) युल, ह्यूम, अ‍ॅडम्स, नॉरटॉन, हॉवर्ड.             
        ३) ह्यूम, टिळक, कँपबेल, ब्राडलॉ, नॉरटॉन
        ४) युल, ह्यूम, ब्राडलॉ, नॉरटॉन, कँपबेल

    ५)  भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे सांगितली ?
        a) भारतात सुधारणा घडवून आणणे.
        b) राष्ट्रीय भावनेचा विकास करणे.
              c) देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे.
              d) भारतीयांच्यात ऐक्याचा विकास करणे.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c)
        २) (b) आणि (d)
        ३) (c) आणि (b)
        ४) (d) आणि (a)

    ६)  राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती?
              a) सामाजिक समता/समानता
              b) राष्ट्रीय भावना
        c) धर्मनिरपेक्षता
        d) ऐक्यभावनेचा विकास व दृढीकरण
        पर्यायी उत्तरे :  
        १)  (a) आणि (c) फक्त           
        २) (b) आणि (d) फक्त
        ३) (a) आणि (d) फक्त            
        ४) (a),(b) आणि (c) फक्त

    ७)  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूतअसे जिनांचे वर्णन कोणी केले आहे?
        १) महात्मा गांधी
        २) सरोजिनी नायडू
        ३) जवाहरलाल नेहरू
        ४) तेज बहादूर सप्रू 

    ८)  प्रसिद्ध ‘भारत छोडो’चा ठराव .... यांनी मांडला.
        १) महात्मा गांधी
        २) नेताजी बोस
        ३) जवाहरलाल नेहरू
        ४) बापूजी अणे

    मवाळवादी नेतृत्त्व
     
    १)  १९०२ मध्ये इंपिरीयल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे लोकनियुक्त सभासद कोण झाले?
        १) गोपाल कृष्ण गोखले
        २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        ३) महात्मा गांधीजी
        ४) लोकमान्य टिळक

    २)  नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे विचार कशातून प्रतीत होतात ?
        १) भारत सेवक समाज
        २) भारत जनता समाज
        ३) भारत समता समाज
        ४) भारत एकता समाज

    ३)  बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे’‘ असे कोणाचे मत होते ?
        १) महादेव गोविंद रानड
        २) गोपाळ कृष्ण गोखले
        ३) फिरोेझशहा मेहता
        ४) दादाभाई नौरोेजी

    ४)  पूर्व राष्ट्रवादी नेत्यापैकी कोण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिक्षक होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आणि पुणे सार्वजनिक सभेचे सचिव होते आणि बॉम्बे प्रोव्हिन्सियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल येथील निवडक सदस्य या रूपाने सेवा केली होती ?
        १) डॉ. आत्माराम पांडुरंग         
        २) महादेव गोविंद रानडे 
        ३) गोपाल कृष्ण गोखले          
        ४) आर. जी. भांडारकर

    ५)  गोपाळ कृष्ण गोखलेंनी कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात जाहीर केले होते की, वसाहतीचे स्वराज्य मिळविणे हे काँग्रेसचे ध्येय राहील?
        १) सुरत, १९०७
        २) वाराणशी, १९०५
        ३) कलकत्ता, १९०६
        ४) मुंबई, १९१५

    ६)  ...... हे भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते.
        १) अरविंद घोष
        २) गोपाल कृष्ण गोखले
        ३) बाळ गंगाधर टिळक
        ४) बिपिनचंद्र पाल

    ७)  मवाळांचा नेता कोण होता?
        १) टिळक
        २) गोखले
        ३) आगरकर
        ४) रानडे

    ८)  बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे’‘ असे कोणाचे मत होते ?
        १) महादेव गोविंद रानडे
        २) गोपाळ कृष्ण गोखले
        ३) फिरोेझशहा मेहता
        ४) दादाभाई नौरोेजी

    ९)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा.
        १) राजगुरू
        २) बिपिनचंद्र पाल
        ३) दिनशा वाच्छा
        ४) मोतीलाल नेहरू

    १०) १९०६ च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी ‘स्वराज्य’ शब्द उघडपणे वापरला आणि या अधिवेशनात
        अ) राष्ट्रगीत म्हणून ‘वंदे मातरम्’ प्रथमच गायले गेले.
        ब) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला.
        क) मवाळ मार्गाचा स्विकार करण्यात आला.
        ड) बॅरिस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले.
        वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?
        १) अ आणि ब
        २) क आणि ड
        ३) ब आणि क
        ४) अ आणि ड

    ११) भारताचे ‘पितामह’ म्हणून कोणास ओळखले जाते ?
        १) न्यायमूर्ती रानडे
        २) फिरोजशहा मेहता
        ३) रविंद्रनाथ टागोर
        ४) दादाभाई नौरोजी

    १२) खालीलपैकी कोण जहालवादी नेता नव्हता ?
        १) लाल लजपतराय
        २) बिपिनचंद्र पाल
        ३) बाळ गंगाधर टिळक
        ४) दादाभाई नौरोजी

    १३) चळवळ करा, अखंड चळवळ कराहा ‘स्वराज्यांचा मंत्र’ देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?
        १) फिरोजशहा मेहता
        २) रंगय्या नायडू
        ३) नरेंद्रनाथ सेन
        ४) दादाभाई नौरोजी

    १४) ‘ब्रदर्स-इन-लॉ‘ म्हणून कोणास ओळखले जाते ?
              a) फिरोजशहा मेहता-बद्रुद्दीन तय्यबजी-काशीनाथ तेलंग
              b) दिनशा वाच्छा - दादाभाई नौरोजी-शिवराम साठे
              c) रामचंद्र साने - सिताराम चिपळूणकर -गोपाळकृष्ण गोखले
              d) कृष्णाजी नुलकर - नारायण चंदावरकर - गंगाराम मस्के
        वरील कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
        १) (a) आणि (b) फक्त           
        २) (a),(b) आणि (d) फक्त
        ३) (a) फक्त
        ४) (a) आणि (c) फक्त

    १५) भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दादाभाई नौरोजी यांनी दिलेले सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते ?
        १) ब्रिटिशांनी भारताचे केलेले आर्थिक शोषण त्यांनी उघडे केले.
        २) भारतीय प्राचीन ग्रंथांचे भाषांतर करून त्यांनी भारतीयांत स्वाभिमान जागविला.
        ३) इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा भारतीय समाजातील अनिष्ट, सामाजिक प्रथांचे निर्मूलन करण्यावर त्यांनी  जास्त भर दिला.
          योग्य पर्याय निवडा :
        १) फक्त १
        २) फक्त १ आणि २
        ३) १ व ३
        ४) १, २ आणि ३

    १६) मवाळांनी काय मागितले नाही?
        A) जमिनीवरील कर कमी करणे, मिठावरील कर माफ करणे.
        B) सावकारांच्या जुलमांपासून संरक्षण.
        C) इंग्रजांना उच्च पदांवर नेमणूक न देणे.
        १) केवल (B)
        २) केवल (C)
        ३) (B) व (C)
        ४) एकही पर्याय योग्य नाही

    १७) काँग्रेसमधील कोणत्या गटावर ’संधिसाधू’, ’ब्रिटिश धार्जिणे’, ’राजकीय भिकारी’ अशी टिका केली जात असे?
        १) महाराष्ट्रीयन
        २) बंगाली
        ३) जहाज
        ४) मवाळ

    १८) इंग्रजी राजवट ही एक प्रकारे वरदान आहे असे मवाळवादी नेत्यांना का वाटू लागले ?
        १) प्रांता-प्रांतांमध्ये व अनेक संस्थानांमध्ये विभागल्या गेलेला देश ब्रिटिशांनी एक केले.
        २) ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्या.
        ३) ब्रिटिशांनी शेती व्यवसायात प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केला.
        ४) इंग्रजांनी भारतात औद्योगिक प्रगती साध्य केली.

    १९) भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल ?
        १) मवाळांच्या आवेदनांबाबत ब्रिटिशांची थोडेसे द्यावयाचे व बहुतांशी नाकारावयाचे अशी नीती होती.
        २) मवाळांच्या मते ब्रिटिशांची उच्चपदी नेमणूक राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या व नीतिमत्तेच्या  दृष्टिकोनातून अयोग्य होती.
        ३) ब्रिटिशांनी मवाळांकडे दुर्लक्ष केले कारण मवाळांना जनआधार नव्हता.
        ४) वरील एकही विधान अयोग्य नाही. 

    २०) ब्रिटिश शासनाकडे मवाळांनी कोणत्या मागण्या मागितल्या होत्या?
        (A) शेतसार्‍यात वाढ करावी.
        (B) सरकारने शेतकर्‍यांना कमी दराने कर्ज द्यावे.
              (C) मिठावरील कर सरकारने वाढवावा.
        (D) प्रचलित कर व्यवस्थेत बदल करावा.
        पर्यायी उत्तरे :
        १) (A) आणि (B) चूक
        २) (B) आणि (C) बरोबर
        ३) (C) आणि (A) चूक
        ४) (C) आणि (D) बरोबर

    २१) सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय सभेच्या या मागण्या होत्या?
        अ) भारतीयांना सरकारी नोकर्‍यात घ्यावे
        ब) शेतकर्‍यांवरचे कर कमी करावेत
        क) भारतीयांचे दारिद्य्र दूर करावे
        ड) भारतीयांची पिळवणूक करणे थांबवावे
        १) (अ), (ब), (क), (ड)           
        २) फक्त (अ) आणि (ड)
        ३) फक्त (ब) आणि (क)         
        ४) फक्त (अ) आणि (क)

     जहालवादी नेतृत्त्व
     
    १)  स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचे पुरस्कर्ते कोण होते ?
        १) महात्मा गांधी
        २) गो. कृ. गोखले
        ३) लोकमान्य टिळक
        ४) सुभाषचंद्र बोस

    २)  जोसेफ बॅपटिस्टा हे ...... यांचे सहकारी आणि वकील होते.
        १) फिरोजशहा मेहता
        २) रहिमतुल्ला सयानी
        ३) शंकर शेठ
        ४) लोकमान्य टिळक

    ३)  भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
        १) म. गांधी
        २) दादाभाई नौरोजी
        ३) लाला लजपतरॉय
        ४) लोकमान्य टिळक

    ४)  ’स्वराज्य’ म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते, तर ’स्वराज्य’ म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते?
        अ) महात्मा गांधी
        ब) अरविंद बाबू
        क) सुभाष चंद्र बोस
        ड) अरविंद घोष
        १) फक्त अ
        २) फक्त ड
        ३) ब आणि क
        ४) क आणि ड

    ५)  भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते ?
        १) भगतसिंग
        २) लोकमान्य टिळक
        ३) राजगुरू
        ४) वि. दा. सावरकर

    ६)  ‘प्रतियोगी सहकारिता‘ हे ...... यांचे धोरण होते.
        १) दादाभाई नौरोजी
        २) महात्मा गांधीजी
        ३) लोकमान्य टिळक
        ४) पंडित जवाहरलाल नेहरू

    ७)  विजोड व्यक्ती ओळखा :
        १) बॅरिस्टर जयकर
        २) वासुदेव दास्ताने
        ३) अब्दुल सैफ
        ४) अण्णासाहेब भोकरकर

    ८)  स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचे पुरस्कर्ते कोण होते ?
        १) सुभाषचंद्र बोस
        २) महात्मा गांधी
        ३) गो. कृ. गोखले
        ४) लोकमान्य टिळक

    ९)  ‘प्रतियोगिता सहकार पक्ष‘ स्थापनेत .......... यांचा सहभाग होता. 
              a) न. चि. केळकर
              b) मदन मोहन मालवीय
              c) डॉ. बा. शि. मुंजे
              d) लोकनायक मा. श्री. अणे
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (a) आणि (c) फक्त
        ३) (a),(b) आणि (c) फक्त
        ४) (a),(b),(c),(d)   

    १०) टिळक व शिवरामपंत यांच्या साक्षीने भारतातील परदेशी कापडाची पहिली होळी ............ येथे पेटविली गेली.
        १) पुणे
        २) मुंबई
        ३) नाशिक
        ४) मद्रास

    ११) लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.
              a) साराबंदी मोहीम
        b) गणेश उत्सव
              c) होमरूल लीग
        d) शिवाजी उत्सव
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (c), (b), (d)
              २) (a) (b), (c), (d)
              ३) (b) (d), (a), (c)
              ४) (d) (c), (b), (a)

    १२) लोकमान्य टिळकांनी ४ तत्त्व अंगीकारली होती. त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती?
        १) स्वराज
        २) स्वदेशी
        ३) सहकार
        ४) राष्ट्रीय शिक्षण

    १३) लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवीनच”, असे म्हणू शकले कारण त्यांना
        १) समाजाचे दारिद्य्र दूर करायचे होते              
        २) समाजाचे मागासलेपण पाहवत नव्हते
        ३) विविध संपर्क माध्यमे उपलब्ध होती व ब्रिटिशांच्या कायद्याची ओळख होती
        ४) त्यांचे स्वतःचे वृत्तपत्र होते

    १४) जहाल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरिता कोणत्या साधनांचा अवलंब केला?
        १) राष्ट्रीय शिक्षण - मोर्चा - स्वदेशी
        २) स्वदेशी - आंदोलन - क्रांती
        ३) बहिष्कार - आंदोलन - मोर्चा
        ४) बहिष्कार - स्वदेशी - राष्ट्रीय शिक्षण

    १५) स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पुढीलपैकी कोणत्या नावाने हेटाळणी केली जात असे.
        १) अस्पृश्यांचे पुढारी
        २) मराठ्यांचे पुढारी
        ३) तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी
        ४) गरिबांचे पुढारी

    १६) २७ जुलै १८७९ रोजी टिळकांना अटक करण्यात आली. पुढीलपैकी कोणते आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते?
              a) त्यांनी १५ जूनच्या केसरी मध्ये, शिवाजी उत्सवाच्यावेळी ‘शिवाजीचे बोल‘ ही कविता एका तरुणाने वाचली होती, ती प्रसिद्ध केली होती.
        b) शिवाजी उत्सवात टिळकांनी केलेल्या भाषणात, शिवाजीने अफझलखानाचा वध केला त्याबद्दल शिवाजीची बाजू उचलून धरली.
        c) त्यांनी गणपती व शिवाजी उत्सव सुरू केले.
        d) त्यांनी इंग्रजीतून ‘मराठा‘ हे वृत्तपत्र सुरू केले.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c) फक्त            
        २) (a) आणि (b) फक्त
        ३) (a), (b) आणि (d) फक्त
        ४) (a), (b), (c) आणि (d)

    १७) १९०८ मध्ये टिळकांना ६ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ....... साठी ठोठावण्यात आली.
        १) एका इंग्रज दाम्पत्याच्या हप्त्याचे समर्थन केले.
        २) केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरु केली.           
        ३) लाला लजपतराय व बिपिनचंद्रपाल यांना पाठिंबा दिला.
        ४) स्वराज्य, स्वदेशी व परदेशी मालावर बहिष्कार या कार्यक्रमाला पाठिंबा दिला.

    बंगालची फाळणी व स्वदेशी चळवळ (१९०५)
     
    १)  स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीला मिळालेले पुढारी ...... होते.
        a) बा. गं. टिळक
        b) शि. म. परांजपे
        c) सौ. केतकर   
              d) सौ. अ. वि. जोशी
        e) विष्णू गोविंद बिजापूरकर
              f) महादेव राजाराम बोडस
        १) (a), (b), (e) फक्त
        २) (a), (b), (c), (f) फक्त 
        ३) (a), (b), (d), (e) फक्त
        ४) (a), (b), (c), (d), (e) आणि (f)

    २)  बंगालच्या फाळणीचा प्रमुख उद्देश ........ होता.
        १)  बंगाल प्रांताचा कारभार सुधारणे
        २) आसामची उन्नती साधणे.
        ३) कलकत्त्याचा प्रभाव कमी करणे
        ४) भेद नीतीद्वारे राष्ट्रीय चळवळीवर आघात करणे

    ३)  पुढील विधानांपैकी कोणते एक खरे नाही ?
        a) ज्या दिवशी बंगालची फाळणी झाली त्यादिवशी बंगालमध्ये सर्वदूर लोकांनी हिंदू, मुस्लीम, ख्रिश्‍चन कोणीही असला तरी एकमेकांना राखी बांधली.
              b) बंगालची फाळणी जी १९०५ मध्ये लादली गेली ‘सन १९२० मध्ये मागे घेतली गेली.
        पर्यायी उत्तरे :
              १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही (a) (b)
        ४) न (a)  (b) 

    ४)  सन १९०५ च्या बंगाल फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हते ?
        a) बिहार व ओरिसाच्या भागाचे बंगाल पासून विलगीकरण.
              b) पूर्व बंगाल व आसामचा नवा प्रॉव्हिन्स निर्माण करणे.
              पर्यायी उत्तरे :
              १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही (a) (b)
        ४) न (a)  (b) 

    होमरूल चळवळ (१९१६-२१)
     
    १)  होमरूल चळवळ कोणी सुरू केली?
        १) अ‍ॅनी बेझंट व लोकमान्य टिळक
        २) नामदार गोखले व अ‍ॅनी बेझंट
        ३) न्या. रानडे व लोकमान्य टिळक
        ४) दादाभाई नौरोजी व अ‍ॅनी बेझंट

    २)  महाराष्ट्रात होमरुल लीगची चळवळ ....... यांनी सुरु केली.
        १) महात्मा गांधी
        २) महात्मा फुले
        ३) पंडित नेहरू
        ४) लोकमान्य टिळक

    ३)  महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते होते ......
        १) अ‍ॅनी बेझंट
        २) लोकमान्य टिळक
        ३) बॅरिस्टर.खापर्डे
        ४) डॉ. बी.एस. मुंजे

    ४)  महाराष्ट्रात होमरुल लीगची चळवळ .......... यांनी सुरु केली.
        १) महात्मा गांधी
        २) महात्मा फुले
        ३) पंडित नेहरू
        ४) लोकमान्य टिळक

    ५)  होमरूल चळवळीबद्दल पुढीलपैकी काय खरे नाही?
        १) खापर्डेनी अमरावतीला होमरूल लीगची शाखा सुरू केली.
        २) अमरावती होमरूल लीगचे खापर्डे अध्यक्ष होते.
        ३) यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते.
        ४) नागपूरच्या परिसरात मुंजेंनी होमरूल लीगच्या शाखा स्थापन केल्या.

    ६)  मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरुल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले.
        a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली.
        b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली.
        c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापना केली.
        वरील कोणते विधान योग्य आहे?
        १) (a)
        २) (b)
        ३) (c)
        ४) वरील सर्व

    ७)  बाळ गंगाधर टिळक यांनी डॉ. अ‍ॅनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीग बाबत काय खरे नाही?
        १) तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढविण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा होता.
        २) ब्रिटिशांनी तिला दडपण्याचे ठरविले. वर्तमान पत्रांची मुस्कटदाबी केली.
        ३) मवाळांनी व मुस्लीम लीग पुढार्‍यांनीही तिच्या कार्यक्रमात भाग घेतला.
        ४) वरील एकही नाही.

    ८)  मोरेश्‍वर वासुदेव अभ्यंकर हे ..... येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते.
        १) मराठवाडा
        २) कोकण
        ३) विदर्भ
        ४) खानदेश

    ९)  लो. टिळकांनी २३ एप्रिल १९१६ ला पुण्यामध्ये .......... ची स्थापना केली.
        १) प्रभाकर
        २) डेक्कन एज्युकेशन सोसायटी  
        ३) फर्ग्युसन कॉलेज
        ४) होमरूल लिग

    १०) लोकमान्य टिळकांनी आपल्या चळवळीचे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी .... या संज्ञे ऐवजी ‘होमरूल’ ही संज्ञा वापरण्याचा निर्णय घेतला.
        १) स्वराज्य
        २) बहिष्कार
        ३) स्वदेशी
        ४) राष्ट्रीय शिक्षण

    ११) होमरूल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला ?
        a) कॉमन वील
              b) न्यू इंडिया
              c) हरिजन
              d) स्वराज्य
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (a),(b),(c) फक्त
        ३) (a) आणि (d) फक्त
        ४) (b),(c),(d) फक्त

    १२) होमरूल आंदोलन (१९१६-१८) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या .......... कालखंडात सुरू झाले.
        १) क्रांतिकारी राष्ट्रवादी
        २) जहालवादी
        ३) नेमस्तवादी
        ४) गांधीवादी

    १३) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        a) साउथ इंडियन लिबरल फेडरेशन हे अ‍ॅन्टी होमरूल लीग या नावानेही ओळखले जात असे.
        b) साउथ इंडियन लिबरल फेडरेशन ने होमरूल सध्या लागू करू नये असा अहवाल माँटेग्यूला दिला.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    १४) होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती ?
        १) दक्षिण आफ्रिका
        २) आयर्लंड
        ३) नेदरलँडस्    
        ४) भारत

    १५) पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान खालील चळवळ भारतामध्ये लोकप्रिय झाली.
        १) होमरुल चळवळ
        २) स्वदेशी चळवळ
        ३) बहिष्कार चळवळ
        ४) स्वाभिमान चळवळ

    रौलेटविरोधी आंदोलन
     
    १)  जालियनवाला बागेतील निरपराधी निःशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले ?
        १) जनरल डायर
        २) ओ’ड्वायर
        ३) चेल्म्सफोर्ड
        ४) कर्झन

    २)  गांधीजींनी सत्याग्रह सभाकशाच्या विरोधात सुरू केली?
        १) मीठ कायदा
        २) रौलेट कायदा
        ३) भारत सरकारचा १९१९ चा कायदा
        ४) जालियनवाला बाग हत्याकांड

    ३)  ...... ला विरोध दर्शवण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी ’नाइटहुड’ किताब परत केला.
        १) कम्युनल अवॉर्ड
        २) जालियनवाला बाग दुर्घटना
        ३) सविनय कायदेभंग आंदोलन
        ४) चौरीचौरा घटना

    ४)  २०१९ हे वर्ष ...... या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष  होते.
        १) लंडन येथे भारतीय होमरुल सोसायटीची स्थापना
        २) टिळकांची मंडाले कारागृहात हद्दपारी
       ३) मीठाचा सत्याग्रह
        ४) जालीयनवाला बाग हत्याकांड

    ५)  जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले गेले होते ?
        १) हंटर कमिशन
        २) सायमन कमिशन
        ३) वेल्बी कमिशन
        ४) सार्जंट कमिशन

    स्वराज पक्ष (१९२३)
     
    १)  स्वराज पक्षाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते सभासद होते?
        a) न. चि. केळकर
        b) शांताराम दाभोळकर
        c) पुरुषोत्तमदास त्रिकमदास
        d) भुलाभाई देसाई
        e) जाफरभाई लालजी
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b), (c) फक्त
        २) (c), (d), (e) फक्त
        ३) (a), (b), (c) आणि (d) फक्त
        ४) (a), (b), (c), (d) आणि (e)

    २)  इ.स. १९२५ च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
        १) वाय. बी. चव्हाण
        २) मोरारजी देसाई
        ३) विठ्ठलभाई पटेल
        ४) वल्लभभाई पटेल

    ३)  स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण?
        १) लो. टिळक
        २) रासबिहारी घोष
        ३) म. गांधी
        ४) मोतीलाल नेहरू

    ४)  स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते ?
        a) कायदे मंडळात प्रवेश
              b) इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थांचा बहिष्कार
              c) वैधानिक विशेष
        १) (a)
        २) (a), (b)
              ३) (b), (c)
        ४) (c)

    ५)  पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती होती ?
              a) ब्रिटिशांची ’फोडा आणि झोडा’ नीती
        b) पक्ष शिस्तीचा अभाव
        c) जनतेच्या पाठिंब्याचा अभाव
        d) स्वराज्य पक्षात फूट
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c) फक्त
        २) (b) आणि (d) फक्त
        ३) (c) आणि (d) फक्त
        ४) (a), (b), (c) आणि (d)

    ६)  इ.स. १९१९ च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?
        १) उदारमतवादी पक्ष
        २) स्वराज्य पक्ष
        ३) काँग्रेस पक्ष
        ४) मुस्लीम लीग

    ७)  खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?
        १) महात्मा गांधी
        २) लोकमान्य टिळक
        ३) चित्तरंजन दास
        ४) न्यायमूर्ती रानडे

    ८)  स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ?
        १) परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे
        २) भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे 
        ३) ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य
        ४) असहकार चळवळ सुरु करणे.

    काँग्रेस समाजवादी पार्टी (१९३४-४८)
     
    १)  काँग्रेस सोशलिस्ट, .......... हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते.
        १) पुरुषोत्तम कानजी
        २) सुरजी वल्लभदास
        ३) रतनसी चापसी 
        ४) पुरुषोत्तम त्रिकमदास

    २)  पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
              a) जयप्रकाश नारायण यांनी कॅलिफोर्निया, आयोवा, विन्सकाँसिन व ओहिओ विद्यापीठात अध्ययन केले.
        b) जयप्रकाश नारायण विन्स्काँसिन विद्यापीठात शिकत असताना समाजवादी विचारधारेकडे वळले.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) बरोबर (b) चूक
        २) (a) चूक (b) बरोबर
        ३) दोन्ही बरोबर
        ४) दोन्ही चूक

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१६४)
    काँग्रेसची स्थापना
    १-४
    २-३
    ३-१
    ४-१
    ५-४
    ६-४
    ७-२
    ८-४
    ९-३
    १०-१

    महत्त्वाची अधिवेशने
    १-३
    २-४
    ३-१
    ४-३
    ५-३
    ६-३
    ७-२
    ८-१
    ९-२
    १०-२
    ११-२
    १२-१
    १३-३
    १४-३
    १५-४
    १६-२
    १७-२
    १८-३
    १९-२
    २०-२
    २१-३
    २२-१
    २३-२
    २४-१
    २५-२
    २६-२
    २७-१
    २८-४
    २९-१
    ३०-१
    ३१-२

    काँग्रेसचे लाहोर अधिवेशन (१९२९)
    १-१
    २-३
    ३-३

    फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन (१९३६)
    १-३
    २-४
    ३-१

    काँग्रेसचे महत्त्वाचे नेते
    १-४
    २-३
    ३-१
    ४-२
    ५-२
    ६-२
    ७-२
    ८-१

    मवाळवादी नेतृत्त्व
    १-१
    २-१
    ३-२
    ४-३
    ५-२
    ६-२
    ७-२
    ८-२
    ९-३
    १०-३
    ११-४
    १२-४
    १३-४
    १४-३
    १५-१
    १६-४
    १७-४
    १८-१
    १९-४
    २०-३
    २१-१

    जहालवादी नेतृत्त्व
    १-३
    २-४
    ३-४
    ४-२
    ५-२
    ६-३
    ७-४
    ८-४
    ९-४
    १०-१
    ११-३
    १२-३
    १३-३
    १४-४
    १५-३
    १६-२
    १७-१

    बंगालची फाळणी व स्वदेशी चळवळ (१९०५)
    १-४
    २-४
    ३-२
    ४-१

    होमरूल चळवळ (१९१६-२१)
    १-१
    २-४
    ३-२
    ४-४
    ५-३
    ६-३
    ७-४
    ८-३
    ९-४
    १०-१
    ११-१
    १२-२
    १३-२
    १४-२
    १५-१

    रौलेटविरोधी आंदोलन
    १-१
    २-२
    ३-२
    ४-४
    ५-१

    स्वराज पक्ष (१९२३)
    १-४
    २-३
    ३-४
    ४-१
    ५-४
    ६-२
    ७-३
    ८-३

    काँग्रेस समाजवादी पार्टी (१९३४-४८)
    १-४
    २-३

Share this story

Total Shares : 13 Total Views : 8586