महाराष्ट्रातील समाजसुधारक (४) / प्रश्‍नमंजुषा (१४४)

  • महाराष्ट्रातील समाजसुधारक (४) / प्रश्‍नमंजुषा (१४४)

    महाराष्ट्रातील समाजसुधारक (४) / प्रश्‍नमंजुषा (१४४)

    • 18 May 2021
    • Posted By : study circle
    • 684 Views
    • 0 Shares
     महाराष्ट्रातील समाजसुधारक (४)
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात महाराष्ट्रातील समाजसुधारक या विषयावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील काही समाजसुधारकाशी संबंधित महत्त्वाच्या संस्थात्यांचे विचार आणि कार्य, परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
    *   राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :  

    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. बाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    १) काळकर्ते शिवराम महादेव परांजपे  (१८६४-१९२९)
     
    १)  वि. दा. सावरकर यांनी ७ ऑक्टोबर १९०५ रोजी पुण्यात परदेशी कापडाची होळी केली. त्यावेळी हे स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.
        १) शिवराम परांजपे
        २) रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
        ३) काशिनाथ कृष्णाजी आठवले
        ४) सखाराम गणेश देऊस्कर
    २)  लॉर्ड कर्झनच्या भारतीय पूरातत्त्वातील आवडीचा ...... यांनी त्यांच्या हिस्टॉरिकल म्युझियमया पुस्तकात उपहास केला होता.
        १) लोकमान्य टिळक
        २) विष्णुशास्त्री चिपळूणकर       
        ३) शिवराम महादेव परांजपे       
        ४) महादेव गोविंद रानडे
     
    २) गोपाळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५)
     
    १)  पुढील वाक्यात वर्णन केलेली व्यक्ती ओळखा.
        समाज सुधारणेबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते आणि या बाबतीत ते आगरकरांच्या जवळचे होते.
        १९०३ मध्ये धारवाड येथे झालेल्या सामाजिक परिषदेत त्यांनी डिप्रेस्ड क्लासेसच्या उन्नतीसाठी प्रस्ताव मांडून डिप्रेस्ड क्लासची बाजू घेतली.
        पर्यायी उत्तरे :
        १) न्यायमूर्ती रानडे
        २) गो. कृ. गोखले
        ३) विठ्ठल रामजी शिंद
        ४) बाळ गंगाधर टिळक
     
    २)  १८९० मध्ये ........... हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले ?
        १) महादेव गोविंद रानडे
        २) गणेश वासुदेव जोशी
        ३) विश्‍वनाथ नारायण मंडलीक
        ४) गोपाळ कृष्ण गोखले
     
    ३) संत गाडगेबाबा (१८७६-१९५६)
     
    १)  काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी ......... या पारंपारिक प्रचार पद्धतीचा वापर केला.
        १) आख्यान
        २) आरती
        ३) कथा
        ४) कीर्तन
     
    २)  जेव्हा ...... यांना नाशिकचा कलेक्टर पेरी याने, ते धर्मशाळेसाठी काय करू शकतात असे विचारले तेव्हा त्यांनी पेरींना विनंती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे, येथे राहण्यासाठी त्यांच्याकडून एक पैदेखील भाडे घेतले जाणार नाही तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा.
        १) गजानन महाराज
        २) गाडगे महाराज
        ३) मंचरपुर सावरे गावचे पाटील
        ४) देवदत्त घाटे
     
    ४) सेनापती बापट (१८८०-१९६७)
     
    १)  त्या व्यक्तीला ओळखा !
        a) ते इंडिया हाउस मध्ये सहभागी झाले.
              b) जर ते मरण पावले तर त्यांचा पुनर्जन्म भारतात व्हावा जेणेकरून ते त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करू शकतील असे ते मानीत.
              c) बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यास ते पॅरिसला गेले.
              d) सन १९१४ पासून त्यांनी सशस्त्र चळवळ सोडून विकासात्मक सामाजिक कार्यास झोकून घेतले.
        e) त्यांना सेनापती बापट म्हणून अधिक चांगले ओळखले जाते.
        पर्यायी उत्तरे :
        १) पांडुरंग महादेव
        २) गोपाळ हरी देशमुख
        ३) बाबा पद्मनजी
        ४) वासुदेव गणेश जोशी
     
    ५) र. धों. कर्वे (१८८२-१९५३)
     
    १) भारतातील कुटुंबनियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाकडे पाहिले जाते ?
        १) डॉ. द्वारकानाथ कोटणीस
        २) र. धों. कर्वे
        ३) ह. ना. आपटे
        ४) रा. ग. गडकरी
    २)  कुटुंबनियोजनासाठी संततिनियमनाच्या साधनांचा वापर करण्याचा प्रचार खालीलपैकी कोणी प्रथम केला?
        १) धोंडो केशव कर्वे
        २) रघुनाथ धोंडो कर्वे
        ३) डॉ. भाऊ दाजी लाड
        ४) डॉ. कोटणीस
     
    ६) विनायक दा. सावरकर  (१८८३-१९६६)
     
    १)  पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        a) विनायक दा. सावरकर यांनी पंढरपूरच्या प्रसिद्ध मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यास आमरण उपोषण केले.
        b) पांडुरंग सदाशिव साने यांनी अस्पृश्यतेसारख्या दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात सामाजिक चळवळ केली.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही
     
    २)  पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि. दा. सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या?
        अ) विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले.
        ब) स्पृश्य-अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले.
        क) आंतर-जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
        ड) धर्मांतर केलेल्या हिंदुना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबवली.
        पर्यायी उत्तरे :
        १) अ,
        २) ब फक्त
        ३) ब, क आणि ड
        ४) वरील सर्व
     
    ७) आचार्य विनोबा भावे (१८८५-१९८२)
     
    १)  म.गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली ?
        १) पं. जवाहरलाल नेहरू
        २) पं. मोतीलाल नेहरू
        ३) विनोबा भावे
        ४) आचार्य कृपलानी
     
    २)  ’संपूर्ण भूमी ईश्‍वराची आहे’ ही घोषणा कोणी केली?
        १) विनोबा भावे
        २) महात्मा गांधी
        ३) लाल बहादूर शास्त्री
        ४) विनायक सावरकर
     
    ३)  विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते?
        १) वाकृळ
        २) वावोशी
        ३) गागोदे
        ४) गडब
     
    ४)  अस्पृश्यता निवारण, सांप्रदायिक एकता, दारूबंदी, नई तालीम इ. उद्देशाने प्रेरित चळवळ कोणती ?
        १) श्रीनिकेतन
        २) अंत्योदय
        ३) सर्वोदय
        ४) ख्रिश्‍चन मिशन
     
    ८) प्रबोधनकार ठाकरे (१८८५-१९७३)
     
    १)  २० ऑगस्ट १९४७ च्या नवशक्तीत प्रबोधनकार ठाकरे लिहितात राज्याभिषेकाच्यावेळी शिवाजीने फडकवलेला झेंडा” ............
        १) अतिशय साधा होता, त्यावर कसलेही चिन्ह नव्हते. 
        २) अतिशय साधा होता, त्यावर ॐ अक्षर होते.
        ३) अतिशय साधा होता, त्यावर जय भवानी असे शब्द होते. 
        ४) अतिशय साधा होता, त्यावर स्वस्तिक होते.
     
    २)  पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले नाही?
        १) वक्तृत्त्व - कला आणि साधना
        २) आमच्या आठवणी
        ३) दगलबाज शिवाजी
        ४) माझी जीवन गाथा
     
    ९) कर्मवीर भाऊराव पाटील  (१८८७-१९५९)
     
    १)  ......... यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटीलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता.
        १) महात्मा फुले
        २) विठ्ठल रामजी शिंदे
        ३) शाहू महाराज 
        ४) यशवंतराव फुले
     
    २)  (A) आणि (B) विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
        A) भाऊराव पाटील यांना जैन वसतिगृह सोडावे लागले.
              B)  ते कोल्हापूर येथील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगाला उपस्थित राहिले होते.
        पर्यायी उत्तरे :
        १)  (A) आणि (B) बरोबर आहेत व (B), (A) चे स्पष्टीकरण करते.
        २) (A) आणि (B) बरोबर आहेत परंतु (B),(A) चे स्पष्टीकरण देत नाही.
        ३) (A) बरोबर आहे, (B) चुकीचे आहे. 
        ४) (A) चूक आहे, (B) देखील चूक आहे.-------------------------
     
    3)  पुढीलपैकी कोणते विधान कर्मवीर भाऊराव पाटीलांशी संबंधित आहे?
        १)  सातार्‍यातील दूधगाव येथे शाळा काढून त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली.
        २) १९०७ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
        ३) कराडमध्ये ५० विद्यार्थ्यांना घेऊन वसतिगृह सुरू केले.   
        ४) विजयी मराठाचे संपादक पद भूषवले.
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१४४)
     
    १) काळकर्ते शिवराम महादेव परांजपे  (१८६४-१९२९)
    १-१
    २-३
     
    २) गोपाळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५)
    १-२
    २-४
     
    ३) संत गाडगेबाबा (१८७६-१९५६)
    १-४
    २-२
     
    ४) सेनापती बापट (१८८०-१९६७)
    १-१
     
    ५) र. धों. कर्वे (१८८२-१९५३)
    १-२
    २-२
     
    ६) विनायक दा. सावरकर  (१८८३-१९६६)
    १-४
    २-४
     
    ७) आचार्य विनोबा भावे (१८८५-१९८२)
    १-३
    २-१ 
    ३-३
    ४-३
     
    ८) प्रबोधनकार ठाकरे (१८८५-१९७३)
    १-१
    २-२
     
    ९) कर्मवीर भाऊराव पाटील  (१८८७-१९५९)
    १-३
    २-१ 
    ३-१
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 684