सामाजिक सुधारणा / प्रश्‍नमंजुषा (१३३)

  • सामाजिक सुधारणा / प्रश्‍नमंजुषा (१३३)

    सामाजिक सुधारणा / प्रश्‍नमंजुषा (१३३)

    • 17 May 2021
    • Posted By : study circle
    • 2461 Views
    • 7 Shares
     

    सामाजिक सुधारणा / प्रश्‍नमंजुषा (१३३)

     
          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”सामाजिक  - धार्मिक सुधारणांच्या चळवळी” या विषयावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सामाजिक सुधारणाशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, त्यांचे विचार आणि कार्य, प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल. 

     सामान्य अध्ययन पेपर (1) : इतिहास व भूगोल* राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक : 

    1.2  आधुनिक भारताचा इतिहास -  सामाजिक धार्मिक सुधारणा आणि त्यांचा समाजावरील परिणाम.

     1.3  प्रबोधन काळ  -

    1.3.1 सामाजिक-सांस्कृतिक बदल - ख्रिश्‍चन मिशनरीबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भूमिका, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (1828-1857)

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)

     १)  ख्रिश्‍चन मिशनरींचे महाराष्ट्रातील कार्य 
    २)  महाराष्ट्रातील महिला सुधारणा चळवळ
    ३)  महाराष्ट्रातील आदिवासी विकास चळवळ
     

     

    (१) ख्रिश्‍चन मिशनरी आणि सामाजिक-धार्मिक सुधारणा 

     
    १)  खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या ख्रिश्‍चन मिशनरी धर्मप्रसाराचे काम करीत होत्या?
              a) चर्च मिशनरी सोसायटी         
        b) स्पॅनिश मिशनरी सोसायटी
        c) लंडन मिशनरी सोसायटी
        d) अमेरिकन मराठी मिशन
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (a), (c) आणि (d) फक्त
        ३) (c) आणि (d) फक्त
        ४) (b), (c) आणि (d) फक्त
     
    २)  पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती ?
        १) लंडन मिशनरी सोसायटी
        २) स्कॉटिश मिशनरी सोसायटी
        ३) अमेरिकन मराठी मिशन       
        ४) पोर्तुगीज मिशनरी सोसायटी 
     
    ३)  सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निर्बंध घातलेले होते. परंतु ते सर्व १८१३ च्या चार्टर कायद्याने काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठ्या संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा महत्त्वाचा भाग बनून गेले. ते लोक कोण होते?
        १) अरबी व्यापारी
        २) फ्रेंच व्यापारी
        ३) इंग्लिश ख्रिश्‍चन मिशनरी
        ४) अमेरिकन ख्रिश्‍चन मिशनरी
     
    ४)  महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी स्थापन केलेल्या ..... ने १८६२ मध्ये सहकारी पतपेढी ची पायाभरणी केली होती.
        १) मुंबई असोसिएशन
        २) वसई असोसिएशन            
        ३) ठाणे असोसिएशन 
        ४) वेस्टर्न इंडिया असोसिएशन
     
    ५)  हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली ?
        १) गंगाधर शास्त्री जांभेकर
        २) गजाननराव वैद्य
        ३) जोतिबा फुले
        ४) महादेव गोविंद रानडे
     
    ६)  ख्रिश्‍चन धर्मातील समतेने प्रभावित होऊन कोणी ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला नाही ?
        a) पंडिता रमाबाई
        b) नारायण शेषाद्री
              c) विष्णू भास्कर करमरकर
        d) रामकृष्ण विनायक मोडक      
              e) बाबा पद्मनजी
              f) नीलकंठ शास्त्री गोर्‍हे
        g) नारायण वामन टिळक
        १) (b)
        २) (e)
        ३) (g)
        ४) (b), (e) (g) तिन्ही पर्याय चुकीचे आहेत.
     
    ७)  ख्रिस्ती मिशनर्‍यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला ?
        १) बाळशास्त्री जांभेकर
        २) विष्णुशास्त्री चिपळूणकर
        ३) महात्मा फुले
        ४) विष्णूबुवा ब्रह्मचारी
     
    ८)  युरोपातील ख्रिस्ती धर्मातील ‘प्रतिधर्म-सुधारणा’ चळवळ म्हणजे काय?
        १) कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी धर्मगुरूंविरुद्ध केलेले बंड        
        २) प्रॉटेस्टंट पंथांच्या अनुयायांनी पोपविरुद्ध केलेले बंड
        ३) पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य
        ४) मार्टिन ल्युथरने प्रसिद्ध केलेला धर्मसुधारणा जाहीरनामा
     
    ९)  एकोणिसाव्या शतकातील धार्मिक आंदोलन संबंधी खालील वक्तव्य वाचा.
        १) हिंदू धर्मातील रुढीवादाला विरोध करताना, राजा राममोहन रॉय याने ख्रिश्‍चन धर्माला सुद्धा सारखा मानण्यास जोर दिला.
        २) महाराष्ट्रात खालील जातिवर्गाला वर आणण्यासाठी गोपाळ हरी देशमुख याने परमहंस मंडळी यांची स्थापना केली.
        ३) सिंग सभा आंदोली पंजाब मध्ये झाले ज्यात तट खालसा किंवा संपूर्ण शुद्ध शीख असण्यासंबंधी लक्ष्य ठेवले गेले आणि शीख धर्माला बहुदेशवादापासून शुद्ध केले गेले.
        या वक्तव्यापैकी कोणते अचूक आहे ?
        पर्यायी उत्तरे :
        १) १ आणि ३
        २) २ आणि ३
        ३) १,२ आणि ३
        ४) १ आणि २
     
    १०) सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता?
        १) मानवता धर्मानुसार नव-समाजाची उभारणी
        २) इंग्रजी शासनाला विरोध करणे
        ३) धार्मिक भावना रुजविण        
        ४) भारतात लोकशाहीचा पुरस्कार करणे
     
    ११) खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा ः
        अ) भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्विकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या.
        ब) हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) दोन्ही विधाने बरोबर व विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
        २) दोन्ही विधाने चुकीची आहेत.
        ३) दोन्ही विधाने बरोबर परंतु विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
        ४) विधान अ बरोबर पण विधान ब चूक
     
    १२) ब्रिटिशांच्या आगमनाने भारतीय समाजाच्या जागतिकीकरणाला सुरुवात झाली, असे म्हणजे पाहिजे कारण त्यामुळे भारतीयांना 
        १) पाश्‍चिमात्य संस्कृती विचारधारांची ओळख झाली
        २) नवे उद्योग करण्याची व संपर्क साधने वापरण्याची संधी मिळाली
        ३) येथे दिलेली सर्व                             
        ४) कायद्याच्या राज्याची ओळख झाली
     
    १३) १९ व्या शतकातील धार्मिक व सामाजिक सुधारणाचळवळीचे मुख्य उद्दिष्ट होते .......
        १) ब्रिटिश वसाहतवादाला विरोध
        २) परमार्थ किंवा मोक्षप्राप्ती
        ३) स्वधर्माभिमान
        ४) मानवतावाद  
     
    १४) ‘मानवजातीसाठी एक धर्म, एक जात व एक देव’ हे ध्येयवाक्य कोणी दिले आहे ?
        १) स्वामी परमानंद
        २) रामास्वामी पेरियार
        ३) श्री नारायण गुरु
        ४) श्री शंकराचार्य
     
    (२) महिलाविषयक सुधारणा
     
    १)  ...... याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
        १) ग्रँट डफ
        २) लॉर्ड वेलस्ली
        ३) विलियम बेंटिक
        ४) हेन्री डंडास रॉबर्टसन
     
    २)  जोड्या जुळवा.
        a) ताराबाई शिंदे        i) शारदा सदन
        b) तान्ह्युबाई बिर्जे             ii) हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना
        c) पंडिता रमाबाई      iii) स्त्री-पुरुष तुलना ग्रंथ
        d) रमाबाई रानडे       iv) भारतातील पहिली महिला संपादक
                  (a)       (b)        (c)         (d)
              १)     (iv)      (iii)       (ii)         (i)
              २)     (iii)      (iv)       (i)          (ii)
              ३)     (ii)       (i)         (iv)        (iii)
              ४)     (i)        (iii)       (ii)         (iv)
     
    ३)     बेहरामजी मलबारी या गृहस्थांनी कोणत्या विषयावर लॉर्ड रिपन यास निवेदने दिली?
              a) सती विवाह
              b) जरठ विवाह
              c) बाल विवाह
              d) सक्तीचे वैधव्य
        पर्यायी उत्तरे -
        १) (a) फक्त
              २) (b) फक्त
        ३) (c) आणि (d)
        ४) (d) फक्त
     
    ४)  खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, 1891' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षांवरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
        १) महादेव गोविंद रानडे
        २) स्वामी विवेकानंद
        ३) बाळ गंगाधर टिळक
        ४) गोपाळकृष्ण गोखले
     
    ५)  जोड्या लावा :
              a) रमाबाई रानडे        i) स्त्री-पुरुष तुलना
        b) जनाक्का शिंदे       ii) आर्य महिला समाज
        c) पंडिता रमाबाई      iii) डिप्रेस्ड क्लास मिशन
        d) ताराबाई शिंदे       iv) हिंदू लेडिज सोशल क्लब
        पर्यायी उत्तरे :
                  (a)       (b)        (c)         (d)
              १)     (iv)      (iii)       (ii)         (i)
              २)     (iv)      (i)         (iii)        (ii)
              ३)     (iii)      (iv)       (i)          (ii)
              ४)     (i)        (ii)        (iii)        (iv)
     
    ६)  ‘हिंदू सोशल अँड लिटररी क्लब’ व ‘भारत महिला परिषद’ याची स्थापना कोणी केली?
        १) रमाबाई रानडे
        २) पंडिता रमाबाई
        ३) ताराबाई शिंदे
        ४) गोदावरी परुळेकर
     
    ७)  खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
        १) ताराबाई शिंदे - बालगृह        
        २) पंडिता रमाबाई - मुक्तिसदन
        ३) रमाबाई रानडे - सेवासदन
        ४) ताराबाई मोडक - शिशुविहार
     
    ८)  स्त्री मुक्ती संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केले नाही ?
        १) म. गो. रानडे
        २) गो. ग. आगरकर            
        ३)  धों. के. कर्वे 
        ४) वरील एकही पर्याय बरोबर नाही
     
    ९)  पुढील दोन विधानांचा विचार करा.
        a) पूर्वी किमान काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती होती व स्त्रिया श्रेष्ठ समजल्या जायच्या परंतु नंतर जसा मानवी समाजाचा विकास झाला तसा या परिस्थितीत फरक पडला.
              b) कामाच्या वाटणीची संकल्पना त्यास कारणीभूत आहे.
        आता सांगा की -
        १) प्रथम विधान बरोबर परंतु दुसरे प्रथम विधानाकरता कारण नाही.
        २) प्रथम विधान बरोबर व दुसरे प्रथम विधानाकरता कारण आहे.
        ३) प्रथम विधान अयोग्य त्यामुळे दुसर्‍याबाबत प्रथमच्या कारणाचा प्रश्‍न उद्भवत नाही.
        ४) प्रथम अथवा द्वितीय कोणतेही विधान बरोबर नाही.
     
    १०) सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली ?        
        १) स्त्री विचारवती
        २) सार्वजनिक सभा
        ३) सत्यशोधक सभा
        ४) परमहंस सभा
     
    ११) स्त्री मुक्तीकरणाबाबत कोणत्या दोन वैधानिक तरतुदी चुकीच्या आहेत.
        a) सन १८५६ मध्ये विधवा पुनर्विवाह करू शकत.
        b) सन १८७२ मध्ये विशेष विवाह अधिनियम नागरी विवाह मानायचा.
        c) सन १९३८ मध्ये हिंदू स्त्रिया विभक्त होऊ शकत व पोटगी मागू शकत.
        d) सन १९४६ मध्ये हिंदू स्त्रियांना संपत्तीचा हक्क मिळाला.
        १)  (a) आणि  (b)
        २)  (c) आणि  (d)
        ३) (a) आणि  (c)
        ४) (b) आणि  (d)
     
    १२) सतीच्या चालीचे वर्णन शास्त्राच्या संमतीने केलेला खून”, असे कोणी केले आहे?
        १) विल्यम बेंटिंक
        २) महात्मा ज्योतिबा फुले
        ३) राजा राममोहन रॉय          
        ४) पंडित ईश्‍वरचंद्र विद्यास
     
    १३) ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वांत जास्त उल्लेखनीय कार्य पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात होते?
        १) सती प्रथा नष्ट करणे
        २) विधवा पुनर्विवाह
        ३) हुंडा प्रथा नष्ट करणे
        ४) विवाह वय
     
    १४) १८५६ च्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती ? 
        १) स्त्री शिक्षण
        २) गुलामांच्या व्यापारावर बंदी
        ३) विधवांना पुनर्विवाहास परवानगी
        ४) सतीबंदी कायदा
     
    १५) सन १८८२ - ८३ या काळात बालविवाहाचा अभ्यास करून शासकीय नोकरीत अविवाहितांना प्राधान्य, बाल विवाह परिणामांचा समावेश पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमात करणे, विवाहित विद्यार्थ्यांना विद्यापीठीय परीक्षेस अपात्र करणे या प्रमुख शिफारशी कोणी सुचविल्या ?
        १) गोविंद देवल
        २) वासुकाका जोशी 
        ३) बेहरामजी मलबारी
        ४) गोपाळ गणेश आगरकर
     
    १६) सामाजिक अत्याचारास बळी ठरलेल्या बालविधवासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह चालविणार्‍या महाराष्ट्रातील आधुनिक स्त्री सुधारक कोण ?
        १) रमाबाई रानडे
        २) पंडिता रमाबाइ
        ३) डॉ. आनंदीबाई जोशी
        ४) सावित्रीबाई फुले 
     
    १७) जोड्या लावून योग्य पर्याय निवडा.
        a) म. गो. रानडे                i)   मुलींसाठी शाळा, पुणे
              b) जोतिबा फुले                ii)   विधवा विवाहोत्तेजक मंडळ
              c) पंडिता रमाबाई           iii)   आर्य महिला समाज
              d) धोंडो केशव कर्वे          iv)  अनाथ बालिकाश्रम, पुणे
                       (a)      (b)       (c)        (d)
        १)    (ii)      (i)        (iv)       (iii)
        २)  (i)       (ii)       (iii)       (iv)
        ३)  (ii)      (i)        (iii)       (iv)
        ४)  (i)       (ii)       (iv)       (iii)
     
    १८) महाराष्ट्रातील कोणत्या दोन समाजसुधारकांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे आणि स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरला ?
        १) महात्मा ज्योतिबा फुले, पंडिता रमाबाई
        २) पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे
        ३) महात्मा ज्योतिबा, रमाबाई रानडे
        ४) महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले 
     
    १९) रमाबाई रानडे यांच्या शारदा सदन या संस्थेच्या सल्लागार मंडळात खालीलपैकी कोणत्या थोर व्यक्ती संबंधित होत्या?
        अ) बाबा पदमनजी
        ब) न्या. रानडे
        क) न्या. तेलंग
        ड) डॉ. भांडारकर
        १) अ आणि ब फक्त
        २) ब, क आणि ड फक्त
        ३) क आणि ड फक्त
        ४) ड फक्त
     
    २०) खालीलपैकी कोणत्या सुधारकाने / सुधारकांनी विधवेशी /विधवांशी विवाह केला / केले?
        a) विष्णुशास्त्री पंडित
        b) महात्मा ज्योतिबा फुले
        c) महादेव गोविंद रानडे
        d) धोंडो केशव कर्वे
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
        २) (d)
        ३) (b)
        ४) (a) आणि (d)
     
    २१) सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्यावतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती?
        अ) बाळशास्त्री जांभेकर
        ब) जगन्नाथ शंकरशेठ
        क) पंडिता रमाबाई
        ड) वि. रा. शिंदे
        १) अ आणि क
        २) फक्त ब
        ३) फक्त क
        ४) फक्त ड
     
    २२) सेवासदनया संस्थेचा उद्देश काय होता?
        अ) हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे.
        ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे.
        क) त्यांना गृहउद्योग शिकविणे.
        ड) विधवांच्या विवाहास चालना देणे.
        १) अ, ब आणि क
        २) फक्त अ
        ३) ब आणि क
        ४) फक्त ड
     
    २३) इ.स. १८८९ च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणार्‍या दोन महिला प्रतिनिधी कोण होत्या?
        १) दुर्गाबाई देशमुख आणि लिला रॉय
        २) पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर
        ३) गोदावरी परुळेकर आणि अनुसयाबाई काळे
        ४) डॉ. अ‍ॅनी बेझंट आणि मादाम भिकाजी कामा--
     
    २४) पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
        १) आर्य महिला समाज
        २) भारत महिला परिषद
        ३) द मुस्लीम वुमेन्स असोसिएशन
        ४) भारत स्त्री महामंडळ-
     
    (३) आदिवासी चळवळ
     
    १)  भिल्ल व इतर जमातींची परिस्थिती उंचावण्यासाठी १९२२ मध्ये ‘भिल्ल सेवा मंडळा’ ची स्थापना कोणी केली?
        १) अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर
        २) एन्. एम्. जोशी
        ३) कृष्णाजी दत्त
        ४) ज्योतिबा फुले
     
    २)  आदिवासी चळवळीच्या संदर्भात पुढील कोणते अयोग्य आहे ?
        १) शामराव व गोदावरी परुळेकर यांनी वारळींच्या उन्नतीसाठी बरेच परिश्रम घेतले.
        २) बाळासाहेब खेर यांनी आपले कार्य हिंदू सेवा समाजाची स्थापना करून सुरु केले.
        ३) ताराबाई मोडक यांनी ठाणे जिल्ह्यात कोसबाड येथे काम केले.       
        ४) अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांच्याकडून प्रेरणा घेतली.
     
    ३)  भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती?
        १) आदिवासींच्या जमीन लागवडीशी
        २) आदिवासींच्या पुरातन सामाजिक रूढीशी
        ३) आदिवासींच्या शिक्षणाशी
        ४) आदिवासींच्या राजकीय गटाशी
     
    ४)  आदिवासी चळवळीचे अध्ययन करून श्री महापात्रा यांनी त्यांच्या चळवळीचे खालील प्रकार सांगितले आहेत -
        अ) प्रतिक्रियावादी चळवळ         
        ब) रूढीवादी किंवा पारंपारिक चळवळ
        क) क्रांतिकारी किंंवा सुधारणावादी चळवळ
        ड) वांशिक चळवळ
        १) अ आणि ब
        २) ब आणि क
        ३) अ, ब आणि क
        ४) क आणि ड
     
    ५)  इ. स. १९२२ मध्ये के. ठक्कर बाप्पा यांनी गुजरात मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली?
        १) कोरकू सेवा
        २) भिल्ल सेवा
        ३) कोलाम सेवा
        ४) जनजाती सेवा
     
    ६)  मुंबईमध्ये सफाई कामगार व मेहतर यांच्याकरिता सहकारी संस्थांची स्थापना कोणी केली?
        १) बी. आर. आंबेडकर
        २) बाल गंगाधर टिळक
        ३) महात्मा ज्योतिबा फुले
        ४) ठक्कर बाप्पा
     
    ७)  महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते?
        अ) सेनापती पांडुरंग बापट
        ब) अनुताई वाघ
        क) ताराबाई मोडक
        ड) केशवराव जेधे
        १) ब,
        २) अ,
        ३) अ,
        ४) ब,
     
    (4) फारसी समाजातील सुधारणा
    १)  पुढील वाक्यात वर्णन केलेल्या समाज सुधारकाचे नाव ओळखा.
        a) १८४० साली एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक पदावर ते पहिले भारतीय ठरले.
        b) १८५१ मध्ये त्यांनी पारशी धर्मसुधारणेसाठी रहनुमाई मझदयानी सभा स्थापन केली.
        c) ते बॉम्बे असोसिएशनचे एक संस्थापक होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) नौरोजी फरदुनजी
        २) एस्. एस्. बेंगाली
        ३) दादाभाई नौरोजी
         ४) फिरोजशाहा मेहता
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१३३)
    (१) ख्रिश्‍चन मिशनरी आणि सामाजिक-धार्मिक सुधारणा
    १-२
    २-४
    ३-३
    ४-२
    ५-२
    ६-४
    ७-४
    ८-३
    ९-२
    १०-१
    ११-३
    १२-३
    १३-४
    १४-३
     
    (२) महिलाविषयक सुधारणा
    १-४
    २-२
    ३-२
    ४-३
    ५-१
    ६-१
    ७-१
    ८-४
    ९-२
    १०-१
    ११-२
    १२-३
    १३-२
    १४-३
    १५-३
    १६-४
    १७-३
    १८-१
    १९-२
    २०-४
    २१-२
    २२-१
    २३-२
    २४-१
     
    (३) आदिवासी चळवळ
    १-१
    २-२
    ३-१
    ४-३
    ५-२
    ६-४
    ७-३
     
    (4) फारसी समाजातील सुधारणा
    १-१

Share this story

Total Shares : 7 Total Views : 2461