हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्टमधला फरक

  • हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्टमधला फरक

    हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्टमधला फरक

    • 03 Nov 2020
    • Posted By : vaishali
    • 82 Views
    • 0 Shares

     

    Date : 26/10/2020

    हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्टमधला फरक

    बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती यांचा परिणाम आरोग्यावर होत असतोछातीत दुखणं म्हणजे हृदयाशी संबंधित आजारापणाचे लक्षण असू शकतं.

    हार्ट अॅटॅक

    1. याचा अर्थ हृदयाला होणारा रक्त पुरवठा खंडित होणे

    2. रक्ताभिसरणातून उद्भवणारा हा गंभीर दोष आहे

    3. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्या एखाद्या रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह बंद होऊन त्या स्नायूला होणारा रक्त पुरवठा थांबतोत्यामुळे हृदयाच्या स्नायूचा तो भाग निर्जीव होतो.

    4. हार्ट अॅटॅक आल्यावर व्यक्ती जिवंत असतेहृदयाचे स्पंदन आणि श्वास सुरू असते.

    5. छातीत दुखणेदम लागणेडाव्या खांद्यात दुखणेखूप घाम येणे अशी लक्षणे असतात.    

    6. औषधेइंजेक्शने देऊन आणि वेळ पडल्यास अॅन्जिओप्लास्टी करून प्राण वाचवता येतात.    

    7. यामागे उच्च रक्तदाबरक्तातील कोलेस्टेरॉलची उच्च पातळीधूम्रपानमधुमेहस्थूलत्व ही मुख्य कारणे असतात.

    8. हार्ट अॅटॅक आल्यावर - इसीजी काढावापाण्यात विरघळणार्या अॅस्पिरीनच्या 150 मि.ग्रॅमच्या 2 गोळ्या आणि क्लोपिडोग्रेल-75 या औषधाच्या 4 गोळ्या द्याव्यात.

    कार्डिअॅक अरेस्ट

    1. याचा अर्थ हृदयाचे स्पंदन किंवा धडधड बंद होणे

    2. हृदयातील विद्युत क्रिया (इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटीबंद पडल्यामुळे निर्माण होणारा हा प्राणांतिक दोष असतो.

    3. हृदयाचे पंपिंग पूर्ण थांबते आणि मेंदूकडे तसेच हृदयासह शरीरातील इतर अवयवांकडे जाणारा रक्तपुरवठा बंद पडतो.

    4. व्यक्तीचे हृदयाचे स्पंदन पूर्ण बंद पडल्यावर व्यक्तीची शुध्द पूर्ण हरपतेत्यानंतर श्वसन बंद पडते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

    5. बहुसंख्य वेळा कोणतेही लक्षण रुग्णाला आधी कळत नाही.

    6. काही मिनिटात कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि सीपीआर देऊन तसेच यंत्राद्वारे डी.सीशॉकहृदयात अॅडरीनॅलिनचे इंजेक्शन देऊन काही प्रसंगी हृदय पुन्हा चालू होऊ शकते

    7. हृदयाचे ठोके खूप जास्त किंवा खूप कमी पडणे किंवा अनियमित पडणेकाही हृदय विकारहार्ट अॅटॅकरक्तदाब खूप वाढणे किंवा खूप कमी होणेरक्तातील पोटशियम सारख्या काही घटकांचे प्रमाण वाढणे ही या मागील कारणे असू शकतात.

    8. कार्डिअॅक अरेस्ट झाल्यावर-सीपीआरकृत्रिम श्वासोच्छवास द्यावा त्वरित कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सला फोन करावा आणि त्या व्यक्तीला जवळच्या इस्पितळात करोनरी आययसीयूमध्ये दाखल करावे.

     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 82