मुंबईतील सागरीजल नि:क्षारीकरण प्रकल्प / प्रश्‍नमंजुषा (१८३)

  •  मुंबईतील सागरीजल नि:क्षारीकरण प्रकल्प / प्रश्‍नमंजुषा (१८३)

    मुंबईतील सागरीजल नि:क्षारीकरण प्रकल्प / प्रश्‍नमंजुषा (१८३)

    • 27 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 857 Views
    • 5 Shares
     प्रश्‍नमंजुषा (१८३) : मुंबईतील सागरीजल नि:क्षारीकरण प्रकल्प
     
    १)  समुद्राच्या पाण्यातून मीठ काढण्याच्या या प्रक्रियेला काय म्हणतात ?
        १) ऊर्ध्वपातन  (डिस्टिलेशन)
        २) रिव्हर्स ऑस्मॉसिस
        ३) निःक्षारीकरण (डिसॅलिनेशन)
        ४) इलेक्ट्रोडायलिसिस
     
    २)  ‘रिव्हर्स ऑस्मॉसिस’ संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ) रिव्हर्स ऑस्मॉसिस पध्दतीचा उपयोग प्रथम पाणबुडीमध्ये केला गेला.
        ब) रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये यांत्रिक दाबाचा उपयोग करून ऑस्मॉसिसची प्रक्रिया उलट दिशेने केली जाते.
        क) २०१९ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाने ‘आरओ’ विक्रीवर निर्बंध घातले होते.
        ड) ‘रिव्हर्स ऑस्मॉसिस’  मध्ये कमी ताकदीचे द्रव सेमिपरमिएबल मेंब्रेन वापरतात.
        पर्यायी उत्तरे :
        १) विधाने अ, ब आणि क बरोबर
        २) विधाने ब, क आणि ड बरोबर
        ३) विधाने अ, ब आणि ड बरोबर
        ४) विधाने अ आणि ब बरोबर
     
    ३)  ऑर्थोटोलेडिन चाचणीचा उपयोग  कशासाठी करतात ?
        १) पेयजलातील अवशिष्ट आयोडिनची मात्रा समजण्याकरिता
        २) पेयजलातील अवशिष्ट क्लोरिनची मात्रा समजण्याकरिता
        ३) पेयजलातील ओझोनची मात्रा समजण्याकरिता
        ४) पेयजलातील जीवणूंची मात्रा समजण्याकरिता
     
    ४)  जल शुध्दीकरणाच्या पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
        अ) इलेक्ट्रोडायलिसिस पद्धतीत ८० ते ९० टक्के पाणी उपलब्ध होते.
        ब) रिव्हर्स ऑसमॉसिस पद्धतीत केवळ ४० ते ६० टक्के पाणी उपलब्ध होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त ब
        ३) अ आणि ब दोन्ही
        ४) कोणतेही नाही
     
    ५)  मुंबई महापनगरपालिकेच्या मालाड मनोरी येथील सागरीजल निःक्षारीकरण प्रकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
        १) हा प्रकल्प इस्राईल सरकारच्या सहकार्याने कार्यान्वित होणार आहे.
        २) या प्रकल्पाची सुरुवातीची क्षमता  दर दिवशी २०० दशलक्ष लिटर इतकी आहे.
        ३) मनोरी इथं प्रकल्पातील गुंतवणूक १६०० कोटी रुपयांची आहे.
        ४) २०२५ पासून या प्रकल्पातून पेयजल उपलब्ध होणार आहे.
     
    ६)  खालील जोड्या अचूक जुळवा :
           स्तंभ अ (पद्धत)                 स्तंभ ब (कार्य)
        अ. ओझोनचा वापर                                        I. पाण्यातील क्षारांचे प्रमाण कमी करणे
        ब. अतिनील किरणांचा उपयोग                   II. पाण्यातील जंतूंच्या निर्मूलनासाठी
        क. इलेक्ट्रोलिसिस किंवा आयन एक्सचेंज    III. पाण्यातील जंतू मारण्याकरिता
        ड. क्लोरिन/आयोडिन या रसायनांचा वापर           IV. पाण्यातील दुर्गंधी कमी करण्याकरिता
        पर्यायी उत्तरे :
                                
              1)       II             III            I               IV
              2)       II             I               III            IV
              3)       III           II             IV            I
              4)       IV           III            I               II
     
    ७)  भारतात खालीलपैकी कोठे प्रकल्प समुद्राच्या पाण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्प कार्यान्वित नाही ?
        १) गुजरात राज्यात
        २) दक्षिण चेन्नईतील नेम्मेली येथे
        ३) उत्तर चेन्नईच्या मिंजूर येथे
        ४) यापैकी नाही
     
    ८)  खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
        विधान (अ) : २०१९ मध्ये आरओ फिल्टर संयंत्रांवर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली होती.
        कारण (र) :  अल्ट्राफिल्टरेशन मेन्बरेन फिल्टरमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते.
        पर्यायी उत्तरे :
        (१)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
        (२)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
        (३)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
        (४)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    ९)  जगात समुद्राचा खारटपणा काढून टाकून तयार केल्या जाणार्‍या गोड पाण्यापैकी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांत किती पान्याची निर्मिती होते ?
        १) २७%
        २) ३७%
        ३) ४७%
        ४) ५७%
     
    १०) मुंबईचा पेयजल पुरवठ्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ) मुंबईची रोजची पाण्याची गरज ४२०० दशलक्ष लिटर आहे.
        ब) पुणे व चेन्नई शहरांच्या पाण्याच्या प्रतिदिन गरजेइतक्या पाण्याची मुंबईत चोरी होते.
        क) मुंबईत पाण्याच्या गळतीचे प्रमाण २७ टक्के म्हणजे सुमारे ७५० दशलक्ष लिटर एवढे प्रचंड आहे      
        ड) प्रत्येक मुंबईकर दिवसाला १४०  लिटर पाणी वापरतो.
        पर्यायी उत्तरे :
        १) अ, ब आणि क बरोबर
        २)  , क आणि ड बरोबर
        ३) अ, ब आणि ड बरोबर
        ४)  , क आणि ड बरोबर
     
    ११) रिव्हर्स ऑस्मॉसिसचा शोध कोणी लावला ?
        १) १७८५ :  व्हन मारूम
        २) १८११ :  ऑर्थोटोलेडिन
        ३) १९६० : कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी
        ४) १९९७ : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी
     
    १२) खालील विधाने विचारात घ्या :
        अ) मिनरल वॉटरची व्याख्या ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस’ने केली आहे.
        ब)  केंद्रीय भूजल मंत्रालयाने वॉटर क्वालिटी असोसिएशन स्थापन केली आहे. 
        क) पेयजलाचा सामू ६.५ ते ८.५ इतका असावा.
        वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त अ आणि ब
        ३) फक्त अ आणि क
        ४) अ, ब आणि क
     
    १३) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
        १) स्वच्छ पाणी आणि शुध्द पाणी या वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
        २) पाण्याची गुणवत्ता त्यामध्ये मिसळलेल्या विद्राव्य किंवा अविद्राव्य घटकांमुळे ठरत असते.
        ३) हायड्रोजन सल्फाइड सारख्या द्रव्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते.
        ४) डिस्टिल्ड वॉटर इतर कोणत्याही पाण्याप्रमाणे मानवी शरीरात शोषून घेतले जात नाही.
     
    १४) पाणी शुद्धीकरणाच्या इलेक्ट्रोडायलिसिस तंत्रासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ) इलेक्ट्रोडायलिसिस तंत्राने क्षारयुक्त खारट भूजल पेयजलात रूपांतर करता येते.
        ब) लष्करी वापरासाठी किंवा आपत्ती निवारणाच्या दूरस्थ ठिकाणी हे तंत्र वापरता येते.
        क) इलेक्ट्रोडायलिसिस पद्धतीत वापरल्या गेलेल्या मेंब्रेन्स काळ टिकतात.
        ड) इलेक्ट्रोडायलिसिस पद्धतीत कँडल फिल्टर्स वापरतात.
        पर्यायी उत्तरे :
        १) अ, ब आणि क बरोबर         
        २)  , क आणि ड बरोबर
        ३) अ, ब आणि ड बरोबर                        
        ४)  , क आणि ड बरोबर
     
    १५) जल शुद्धीकरणाच्या पद्धतीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
              a)  आयन एक्सचेंज पध्दतीचा उपयोग पाण्यातील अतिरिक्त क्षारांचे प्रमाण कमी करण्याकरिता होतो.
              b)  नॅनो सिल्व्हर कोटेड कार्बन फिल्टरद्वारा पाण्यातील अनावश्यक चव-वास-रंग यावर नियंत्रण ठेवले जाते.
              वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
        १) फक्त (a)
        २) फक्त (b)
        ३) (a) (b) दोन्ही
        ४) दोन्हीही नाहीत
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१८३)
    १-३
    -
    ३-१
    ४-३
    ५-१
    ६-३
    ७-४
    ८-१
    ९-३
    १०-१
    ११-३
    १२-४

     

Share this story

Total Shares : 5 Total Views : 857