राष्ट्रीय संघटना, पक्ष व संस्था / प्रश्‍नमंजुषा (१६१)

  • राष्ट्रीय संघटना, पक्ष व संस्था / प्रश्‍नमंजुषा (१६१)

    राष्ट्रीय संघटना, पक्ष व संस्था / प्रश्‍नमंजुषा (१६१)

    • 21 May 2021
    • Posted By : study circle
    • 4574 Views
    • 4 Shares
    राष्ट्रीय संघटना, पक्ष व संस्था
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकासयावर  अनेक प्रश्‍न विचारले जातात. काँग्रेसपूर्व काळातील महत्त्वाच्या राष्ट्रीय संघटना, तसेच भारतातील काही महत्त्वाचे पक्ष व त्यांचे संस्थापक, त्यांचे कार्य व त्यावर  विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) :  इतिहास विभाग
     
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
     
    १.५ भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास -
        सामाजिक पार्श्‍वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    राष्ट्रीय संघटना, पक्ष व संस्था
     
        १. मुंबई प्रांतातील राजकीय संघटना
     
    १)  बॉम्बे असोसिएशन
    २)  बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
    ३)  ईस्ट इंडिया असोसिएशन
    ४)  इंडियन असोसिएशन
    ५)  होमरूल लीग
    ६)  हिंदू महासभा
    ७)  स्वराज पक्ष
    ८)  डॉ. आंबेडकरांच्या राजकीय संघटना
    ९)  राष्ट्रीय सेवक संघ
     
        २. मुंबई प्रांतातील सामाजिक संघटना
     
    १)  सार्वजनिक सभा
    २)  सामाजिक परिषद
    ३)  भारत सेवक समाज
    ४)  महिलांच्या संघटना
     
        ३. भारतातील संघटना
     
    मुंबई प्रांतातील राजकीय संघटना
     
    १)  खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ?
              a) ज्ञान प्रसारक मंडळी
        b) बॉम्बे असोसिएशन
        c) लंडन इंडियन असोसिएशन
        d) ईस्ट इंडिया असोसिएशन
        पर्यायी उत्तरे -
        १) (a),(b) आणि (c) फक्त
        २) (b),(c) आणि (d) फक्त
        ३) (a),(b) आणि (d) फक्त
        ४) (a),(b),(c),(d)

    २)  मुंबई इलाख्यातील खालील राजकीय संघटनांची, स्थापना वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.
        अ) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
        ब) बॉम्बे असोसिएशन
        क) ईस्ट इंडिया असोसिएशन
        ड) सार्वजनिक सभा
        १) ब,,क आणि ड
        २) ब,,ड आणि अ
        ३) ब,,क आणि अ
        ४) ब,,ड आणि क

    ३)  जोड्या जुळवा :  
        अ) जगन्नाथ शंकर शेठ           I.   ईस्ट इंडिया असोसिएशन
        ब) दादाभाई नौरोजी              II.  भारत सेवक समाज
        क) गणेश वासुदेव जोशी          III.  बॉम्बे असोसिएशन
        ड) गोपाल कृष्ण गोखले           IV. पुणे सार्वजनिक सभा      
            अ   ब   क   ड
        १)   I   III       II       IV
        २)  III   I         IV      II
        ३)  IV   II        I        III
        ४)    III   I         II       IV

    ४)  योग्य कालानुक्रमानुसार खालील संस्थेंची मांडणी करा :
        अ) इंडियन असोसिएशन
        ब) बॉम्बे असोसिएशन
        क) पुणे सार्वजनिक सभा
        ड) मद्रास महाजन सभा
        १) ब, , ,
        २) अ, , ,
        ३) ब, , ,
        ४) ड, , ,

    ५)  जोड्या लावा.
          संस्था                             संस्थापक
              a) मुंबई असोसिएशन                                   i) जगन्नाथ शंकरशेठ
              b) मुंबई प्रेसिडेंसी असोसिएशन                ii) फिरोजशाह मेहता
              c)  पुणे सार्वजनिक सभा                            iii) न्यायमूर्ती रानडे
              d)  मद्रास महाजन सभा                             iv) जी. एस. अय्यर
        पर्यायी उत्तरे  :
                       (a)    (b)    (c)     (d)                                                                               
              १)     (i)     (ii)    (iii)   (iv)                                                                             
        २)     (ii)    (i)     (iv)   (iii)
              ३)     (iii)   (iv)   (i)     (ii)                                                                              
        ४)     (iv)   (iii)   (ii)    (i)

    ६)  १८९३ साली इंडियन पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्यापाठीमागे सर विल्यम वेडरबर्न आणि डब्लू.एस. केन यांचा उद्देश काय होता ?
        १) ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन मध्ये भारतीय राजकीय सुधारणांसाठी आंदोलन करणे.
        २) ब्रिटनच्या इम्पिरिअल ज्युडिसिअरीमध्ये भारतीयांच्या प्रवेशाचा पुरस्कार करणे.
        ३) ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याची चर्चा घडून आणणे.
        ४) ब्रिटिश संसदेत प्रतिष्ठित भारतीयांच्या प्रवेशासाठी आंदोलन.

     
    बॉम्बे असोसिएशन
     
    १)  १८५२ मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?
        १) महात्मा फुले
        २) गणेश वासुदेव जोशी
        ३) डॉ. आंबेडकर
        ४) जगन्नाथ शंकर शेठ

    २)  बॉम्बे असोसिएशनशी स्थापना कोणी केली?
        १) विश्‍वनाथ नारायण मंडलीक
        २) डॉ.भाऊ दाजी लाड
        ३) गणेश वासुदेव जोशी                
        ४) नाना शंकरशेठ

    ३)  द बाँबे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण होते?
        १) भाऊ दाजी लाड
        २) फर्दुनजी नौरोजी   
        ३) विनायकराव जगन्नाथ
        ४) बोमनजी होरमुसजी

    ४)  बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून ....... ह्यांची निवड केली होती.
        १) सर जमशेटजी जीजीभाई
        २) दादाभाई नौरोजी.
        ३) डॉ. आत्माराम पांडुरंग
        ४) गो. ग. आगरकर

    ५)  इ. स. १८५२ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती ?
        १) बॉम्बे असोसिएशन
        २) ईस्ट इंडिया असोसिएशन    
        ३)  सार्वजनिक सभा
        ४) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन

    ६)  खाली दिलेली विधाने कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत ?
              a) लोकांच्या मागण्या इंग्लंडमधील सरकारपर्यंत पोहचविल्या.
        b) व्ही. एन्. मंडलिक आणि नवरोसजी सरदुनखी हे पुढारी असोशिएशनमध्ये सामील झाले.
        c) युरोपियन अधिकार्‍यांच्या गलेलठ्ठ पगाराचा निषेध केला.
        d) हिंदू, पारसी, मुसलमान, पोर्तुगीज, ज्यू यांचे पुढारी एकत्रित आले.
        पर्यायी उत्तरे :
        १) बॉम्बे असोशिएशन
        २) इंडियन असोशिएशन
        ३) ईस्ट इंडिया असोशिएशन
        ४) हिंदूस्थान रिपब्लिक असोशिएशन

    ७)  ............ ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.
              १) ईस्ट इंडिया असोसिएशन
        २) पुणे सार्वजनिक सभा          
        ३) बॉम्बे असोसिएशन
        ४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

    ८)  ‘बॉम्बे असोसिएशन’ या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश्य ........ होते.
        a) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा ह्याची दखल घेणे.
        b) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे.
        c) इंग्रजाविरुद्ध सत्याग्रह करावे हे ठरविणे.
              d) सनदशीर मार्गाने लोकांची गार्‍हाणी सरकारपर्यंत पोहोचविणे.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (d)
              २) (b) आणि (c)
              ३) (c) आणि (d)
              ४) (a) आणि (b) 

     
    बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
     
    १)  बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिले ?
              a) फिरोजशाह मेहता
              b) बाळशास्त्री जांभेकर
              c) भाऊ महाजन
              d) बद्रुद्दीन तैयबजी
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
        २) (b) आणि (c)
        ३) (c) आणि  (d)
        ४) (d) आणि (a)

    २)  ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन’ चे संस्थापक सदस्य कोण होते?
              a) के. टी. तेलंग
        b) फिरोजशहा मेहता
              c) बद्रुद्दीन तयब्बजी
        d) म. गो. रानडे
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b), (d)
              २) (b), (c), (d)
              ३) (a), (b), (c)
              ४) (c), (d), (a)

    ३)  ...... याची स्थापन मुंबई शहरातील तीन प्रमुख जमातीचे प्रतिनिधित्व करणार्‍या मेहता, तेलंग आणि तय्यबजी यांनी केली.
        १) बॉम्बे असोसिएशन
        २) बॉम्बे प्रेसिडन्सी असोसिएशन
        ३) मुंबई सभा
        ४) पूना सार्वजनिक सभा

     
     ईस्ट इंडिया असोसिएशन
     
    १)  १८६६ मध्ये दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. १८६९ मध्ये तिची मुंबई शाखा स्थापन केली. मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते ?
        १) काशिनाथ तेलंग
        २) भाऊ दाजी लाड              
        ३) फिरोजशहा मेहता
        ४) बद्रुद्दीन तैय्यबजी

     
    इंडियन असोसिएशन
     
    १)  राष्ट्रीय सभेची (काँग्रेस) स्थापना होण्यापूर्वी अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी यासाठी कोलकाता येथे कोणती राजकीय संघटना कार्यरत होती?
        १) सार्वजनिक सभा
        २) महाजन सभा
        ३) प्रार्थना समाज
        ४) इंडियन असोसिएशन

    २)  १८७६ मध्ये, ’इंडियन असोसिएशन’ या संस्थेची स्थापना झाली, या संस्थेचे हेतू काय होते?
        (A) हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करणे.
        (B) देशामध्ये लोकमत जागृत व संघटित करणे.
              (C) हिंदू व मुसलमान यांच्यात फूट पाडणे.
        (D) राजकीय चळवळीत देशातील सर्व जनतेला सामील करून घेणे.
        पर्यायी उत्तरे :
        १) (A) आणि (D) चूक
        २) (B) आणि (C) बरोबर
        ३) फक्त (A) चूक
        ४) फक्त (C) चूक

    ३)  पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही?
        a) भारत व इंग्लंडमधील कितीतरी इंग्रजांना इंडियन असोसिएशन स्थापन झालेले आवडले नाही म्हणून त्यांना एक पर्याय हवा होतो.
        b) सर ए. ओ. ह्यूम जो की एक निवृत्त नागरी अधिकारी होता त्याची अशी इच्छा होती की एक संस्था जी एक सेफ्टी व्हॉल्व म्हणून स्थापन व्हावी आणि काँग्रेसची स्थापना झाली. गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    भारत सेवक समाज
    १)  भारत सेवक समाजाची स्थापना नामदार गोखले यांनी कोणत्या साली केली?
        १) १९१९
        २) १९०५
        ३) १९०६
        ४) १९०४

    २)  ‘भारत सेवक समाज’ या संस्थेशी खालीलपैकी कोण संबंधित होते?
              a) गोपाळ कृष्ण गोखले
        b) श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंझरू
        c) ठक्करबप्पा, ना. भ. जोशी, काकासाहेब लिमये
        d) डॉ. भांडारकर, गंगाराम भाऊ मस्के
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (c) आणि (d) फक्त
        २) (a), (b) आणि (c) फक्त
        ३) (b), (c) आणि (d) फक्त
        ४) (a), (b) आणि (d) फक्त

    ३)  ....... यांनी ‘भारत सेवक समाजाची’ स्थापना केली.
        १) गोपाळ गणेश आगरकर
        २) गोपाळ कृष्ण गोखले
        ३) महात्मा जोतिबा फुले
        ४) लाल लजपतराय

    ४)  ‘भारत सेवक समाज’ या संस्थेचे संस्थापक कोण होते ?
        १) दादाभाई नौरोजी
        २) गोपाळ कृष्ण गोखले
        ३) महात्मा गांधी
        ४) बिपिन चंद्र पाल

     
    होमरूल लीग
     
    १)  सप्टेंबर १९१६ मध्ये, ‘होमरूल लीग’ची स्थापना ...... यांनी केली.
        १) इंदुलाल याज्ञिक
        २) जॉर्ज अरुंडेल
        ३) अ‍ॅनी बेझंट
        ४) गोपाळ कृष्ण गोखले

     
    हिंदू महासभा (१९१५/१९३३)
     
    १)  नागपूर येथे हिंदू महासभेची स्थापना कधी झाली?
        १) ११ नोव्हेंबर १९२३
        २) ११ डिसेंबर १९२३
        ३) २३ जानेवारी १९२४
        ४) ०२ मार्च १९२४

    २)  हिंदू महासभेचा अतिशय सनसनाटी कार्यक्रम म्हणजे साडेचार लाख ....... ज्यांनी इस्लामाचा स्विकार केला होता आणि ज्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांनी पुन्हा धर्मात आणणे हा होता.
        १)  चौहान राजपूत
        २) राठोड राजपूत
        ३) मलकान राजपूत
        ४) गौतम राजपूत

    ३)  अलाहाबाद येथे अखिल भारतीय हिंदू महासभा स्थापन करण्यात आली कारण -
              a) ब्रिटिशांना विरोध करणे
              b) हिंदूचे धर्मांतर थांबविणे
              c) अस्पृश्यता निवारण करणे
              d) काँग्रेसला मदत करणे
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c)
              २) (b) आणि (d)
        ३) (a) आणि (b)
        ४) (c) आणि (d)

    ४)  अलाहाबाद येथे अखिल भारतीय हिंदू महासभा स्थापन करण्यात आली कारण -
              a) ब्रिटिशांना विरोध करण
        b) हिंदूचे धर्मांतर थांबविणे 
              c) अस्पृश्यता निवारण करणे
              d) काँग्रेसला मदत करणे
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c)
              २) (b) आणि (d)
        ३) (a) आणि (b)
        ४) (c) आणि (d)

    ५)  भारताच्या फाळणीला खालीलपैकी कोणत्या संघटनांनी विरोध केला?
        a) हिंदू महासभा
        b) समाजवादी पक्ष
        c) शीख समाज
        d) समतावादी पक्ष
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (b), (c) आणि (d) फक्त
        ३) (a), (b) आणि (c) फक्त
        ४) (a), (c) आणि (d) फक्त

    ६)  १९४० मध्ये डॉ. हेडगेवारांचे निधन झाल्यानंतर इंदूरच्या शाखेचे ’संघचालक’ म्हणून नेमलेल्या ...... यांनी त्यांची प्रथम निष्ठा भारत व काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केले.
        १) गोळवलकर गुरूजी
        २) भय्याजी दाणी
        ३) विनायक सिताराम सरवटे
        ४) डॉ. मुंजे

     
    स्वराज पक्ष
     
    १)  स्वराज पक्षाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते सभासद होते?
        a) न. चि. केळकर
        b) शांताराम दाभोळकर
        c) पुरुषोत्तमदास त्रिकमदास       
              d) भुलाभाई देसाई
              e) जाफरभाई लालजी
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b), (c) फक्त
        २) (c), (d), (e) फक्त
        ३) (a), (b), (c) आणि (d) फक्त
        ४) (a), (b), (c), (d) आणि (e)

    २)  लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत ........ यांचा सहभाग होता.
        a) जमनादास मेहता
        b) रामराव देशमुख
        c) रामभाऊ मंडलीक
        पर्यायी उत्तरे -
        १) (a) आणि (d) फक्त
        २) (a) आणि (b) फक्त
        ३) (a) आणि (c) फक्त
        ४) (a),(b) आणि (c)

    ३)  स्वराज पार्टीची स्थापना झाल्यावर, गांधीजींना हवे होते की काँग्रेसजनांनी ग्रामीण भागात विधायक कामे करावीत त्यात काय सम्मिलित नव्हते?
        १) दारूबंदी मोहमी
        २) कमजोर वर्गात व अस्पृश्यांकरिता सामाजिक कार्य
        ३) सर्व वर्गांकरिता इस्पितळांची स्थापना
        ४) राष्ट्रीय शाळांची स्थापना

     
    डॉ. आंबेडकरांच्या राजकीय संघटना
     
    १)  डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
        १) शेतकरी कामगार पक्ष          
        २) ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन     
        ३) द इनडिपेंडन्ट लेबर पार्टी
          योग्य पर्याय निवडा :
        १) फक्त १ आणि २
        २) फक्त २ आणि ३
        ३) फक्त १
        ४) १, २ आणि ३

    २)  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालील कोणते राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले?
        अ) बहिष्कृत हितकारिणी सभा
        ब) रिपब्लिकन पक्ष
        क) स्वतंत्र मजूर पक्ष
        ड) शेड्युल्ड कास्ट फेडरेशन
        पर्यायी उत्तरे :
        १) (ब) फक्त
        २) (अ) आणि (ब) फक्त
        ३) (अ), (ब) आणि (ड)
        ४) (क) आणि (ड)

    ३)  ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ कोणी स्थापन केली ?
        १) महात्मा ज्योतिबा फुले         
        २) विठ्ठल रामजी शिंदे            
        ३) छत्रपती शाहू महाराज
        ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    ४)  स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही ?
        (a) तो डॉ. आंबेडकरांनी स्थापन केला.
        (b) ‘जनता’ या पक्षाचे मुखपत्र होते.
        (c) काबाडकष्ट करणार्‍यांचे हित पक्षाने जोपासले.
              (d) पक्षाने १९३७ च्या निवडणुका लढविल्या.
              (e) पक्ष अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झाला.
        १) (b)
        २) (c)
        ३) (d)
        ४) (e)

    ५)  इ. स. १९४२ मध्ये डॉ. आंबेडकरांनी कोणता पक्ष स्थापन केला ?
        १) स्वतंत्र मजूर पक्ष
        २) शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन
        ३) बहिष्कृत हितकारिणी सभा
        ४) जस्टिस पार्टी

    ६)  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला?
        १) शेड्यूल्ड कास्टस् फेडरेशन
        २) स्वतंत्र मजूर पक्ष             
        ३) समता पक्ष
        ४) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

     
    राष्ट्रीय सेवक संघ
     
    १)  १९४० मध्ये डॉ. हेडगेवारांचे निधन झाल्यानंतर इंदूरच्या शाखेचे ’संघचालक’ म्हणून नेमलेल्या ...... यांनी त्यांची प्रथम निष्ठा भारत व काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केले.
        १) गोळवलकर गुरूजी
        २) भय्याजी दाणी
        ३) विनायक सिताराम सरवटे
        ४) डॉ. मुंजे

    २)  पुढीलपैकी कोणी ’वुई’ हे पुस्तक लिहिले ?
        १) शामाप्रसाद मुखर्जी
        २) वि. दा. सावरकर             
        ३) माधव सदाशिव गोळवलकर
        ४) मदनमोहन मालवीय

     
    कम्युनिस्ट पक्ष
     
    १)  महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल?
        १) सेनापती बापट
        २) श्रीपाद डांगे
        ३) लालजी पेंडसे
        ४) अच्युत पटवर्धन

     
    मुंबई प्रांतातील सामाजिक संघटना
     
    १)  १८४८ मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉ. भाऊ दाजी लाड, विश्‍वनाथ मंडलिक व गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभात संशोधनात्त्मक लेख वाचले. ही सभा कोणती ती ओळखा?
        १) पुणे सार्वजनिक सभा
        २) ज्ञानप्रसारक सभा
        ३) परमहंस सभा
        ४) बुद्धीवर्धक सभा

    २)  महाराष्ट्रात सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने कोणत्या संस्था स्थापित झाल्या होत्या?
        अ) बॉम्बे असोसिएशन
        ब) डेक्कन प्रांतस्थ मंडळी
        क) प्रार्थना समाज
        ड) युगांतर समिती
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ आणि ब
        २) फक्त अ, ब आणि क
        ३) अ, , क आणि ड
        ४) फक्त ड

    ३)  जोड्या जुळवा :
              a) द लंडन इंडियन सोसायटी  i) वो. चं. बॅनर्जी त्याचे सेक्रेटरी होते.
        b) ईस्ट इंडिया असोसिएशन ii)  सेवानिवृत्त इंग्रजी अधिकार्‍यांची कमिटी
        c) इंडियन सोसायटी              iii) आनंदमोहन बोस
        d) सार्वजनिक सभा                               iv)  आरंभी पूना असोसिएशन म्हणून अस्तित्वात आली
        पर्यायी उत्तरे :
                  (a)     (b)     (c)     (d)
              १)     (i)      (ii)     (iii)    (iv)
              २)     (ii)     (i)      (iv)    (iii)
              ३)     (iv)    (iii)    (ii)     (i)
              ४)     (iii)    (iv)    (i)      (ii)

    ४)  १६ ऑक्टोबर १८९९ रोजी पैसा सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली?
        १)  वासूकाका जोशी
        २) अंताजी दामोदर काळे
        ३) मोरेश्‍वर गोपाळ देशमुख
        ४) लोकमान्य टिळक

    ५)  जोड्या जुळवा
        अ) भारत सेवक समाज                  I) स्वामी विवेकानंद       
        ब) सेवा सदन                         II) गोपाळकृष्ण गोखले
        क)रामकृष्ण मिशन                    III) डॉ. अ‍ॅनी बेझंट
        ड)  महिलांचा अखिल भारतीय संघ       IV) रमाबाई रानडे   
            (अ) (ब) (क) (ड)
        १)  (I)     (II)    (III)   (IV)                                                                   
        २)  (II     (IV)  (I)    (III)
        ३)  (IV)  (III)   (II)    (I)
        ४)  (III)   (I)     (IV)  (II)

     
    सार्वजनिक सभा
     
    १)  ‘पुणे सार्वजनिक सभेची’ स्थापना कोणी केली ?
        १) फिरोजशहा मेहता
        २) रंगय्या नायडू
        ३) गणेश वासुदेव जोशी
        ४) नाना शंकर शेठ

    २)  पुण्यात ‘सार्वजनिक सभेची’ स्थापना ...... यांनी केली. 
        १) न्यायमूर्ती रानडे
        २) लोकहितवादी
        ३) गो. ग. आगरकर
        ४) ग. वा. जोशी

    ३)  ...... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते
        १) के. टी. तेलंग
        २) एस. एम. परांजपे
        ३) विश्‍वनाथ मंडलीक
        ४) जी. व्ही. जोशी

    ४)  खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात ’सार्वजनिक सभेची’ स्थापना करण्यात आली होती?
        १) औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी
        २) न्या. चंदावरकर
        ३) रामचंद्र साने
        ४) वामन शिवराम आपटे

    ५)  १८९० मध्ये ........... हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले ?
        १) महादेव गोविंद रानडे          
        २) गणेश वासुदेव जोशी
        ३) विश्‍वनाथ नारायण मंडलीक
        ४) गोपाळ कृष्ण गोखले

    ६)  पुण्याच्या सार्वजनिक सभेने मांडलेल्या स्वागत समारंभाचा प्रस्ताव स्वीकारण्यास ...... यांनी नकार दिला.
        १) लॉर्ड रिपन
        २) सर जेम्स फर्ग्युसन
        ३) लॉर्ड मेकॉले
        ४) सर रिचर्ड टेंपल

     
    सामाजिक परिषद
     
    १)  सोशल कॉन्फरन्स स्थापन करण्यास कोणी पुढाकार घेतला?
        a) सोशल कॉन्फरन्स गटाचे असे प्रयत्न होते की सामाजिक समस्या काँग्रेसच्या अधिवेशनात चर्चिल्या जाव्यात.
        b) काँग्रेस पुढारी त्यास प्रतिकूल होते.
        c) म्हणून सोशल कॉन्फरन्स १८८७ मध्य काँग्रेस अधिवेशनानंतर आयोजित केली गेली.
        d) दोघांमध्ये वितंड टाळण्यास त्यांनी जाहीर केले की सोशल कॉन्फरन्स काँग्रेस अधिवेशनाच्या दालनात होणार नाही.
        १) न्यायमूर्ती रानडे
        २) केशवचंद्र सेन
        ३) गोपाळ गणेश आगरकर        
        ४) गोपाळ कृष्ण गोखले

    २)  भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
              a) म. गो. रानडे
        b) मो. क. गांधी
        c) बेहरामजी मलबारी
        d) बा. गं. टिळक
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त (a)
        २) (a) आणि (c)
        ३) (c) आणि (d)
        ४) (a) आणि (d)

    ३)  १९१५ साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष ........ होते.
        १) आर. पी. परांजपे
        २) म. गो रानडे
        ३) धों. के. कर्वे
        ४) गो. ग. आगरकर

    ४)  स्वातंत्र्य चळवळीदरम्यान राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना झाली त्याचे कारण सांगा.
        १) बंगालमधील वेगवेगळ्या सामाजिक सुधारकांचा गट आणि संघटना एकत्र येऊन व्यापक प्रमाणावरील लोकांचे हितसंबंध आणि इतर बाबींची चर्चा करून सरकारकडे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व करणे.
        २) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला तिच्या वाटाघाटी, सामाजिक सुधारणांचा समावेश करावयाचा नव्हता आणि त्यामुळे त्यासाठी तिने वेगळी परिषद स्थापन करण्याचे ठरविले.
        ३) न्या. म. गो. रानडे आणि बेहरामजी मलबारी यांनी सर्व समाजसुधारणा गटांना देशभरातून एकत्र आणून त्यांची एक संघटना स्थापन करण्याचे ठरविले.
        ४) वरील १, २ आणि ३ पैकी एकही बरोबर नाही.

    ५)  भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
        १) न्या. म. गो. रानडे यांनी १८८७ मध्ये सामाजिक परिषदेची स्थापना केली.
        २) सामाजिक परिषदेचा हेतू संपूर्ण देशात सामाजिक सुधारणांविषयी परिणामकारक काम व करणे हा होता.
        ३) तिचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले.
        ४) १८९५ पर्यंत या परिषदेचे अधिवेशन, प्रत्येक वर्षी एका ठिकाणी व एकाच मंडपात, भारतीय राष्ट्रीय सभेबरोबर भरत होते.

     
    महिलांच्या संघटना
     
    १)  पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
        १) आर्य महिला समाज
        २) भारत महिला परिषद
        ३) द मुस्लीम वुमेन्स असोसिएशन
        ४) भारत स्त्री महामंडळ

    २)  ’भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ’ ही संघटना ...... यांनी स्थापन केली.
        १) कनुबेन मेहता
        २) सरलादेवी चौधुराणी
        ३) मेहरीबाई टाटा
        ४) तापीबाई हर्डीकर

    ३)  स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले
        १) अखिल भारतीय हिंदू महिला परिषद
        २) अखिल भारतीय महिला परिषद
        ३) अखिल महिला धर्म परिषद
        ४) अखिल भारतीय आर्यभगिनी परिषद

    ४)  महात्मा फुलेंनी कोणती भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणेतराने मोठ्या धैर्याने, परोपकार बुद्धीने ब्राह्मण विधवांसाठी काढली?
        १) अनाथालय
        २) बालहत्या प्रतिबंध गृह
        ३) महिलाश्रम
        ४) पुनर्विवाहोत्तेजक मंडळ

    ५)  महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहास चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली?
        १) निष्काम कर्ममठ
        २) अनाथ बालिकाश्रम            
        ३) विधवा विवाहोत्तेजक मंडळी
        ४) विधवा विवाह संघ

    ६)  महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी जानेवारी, १८९९ मध्ये सुरू केलेल्या ’अनाथाश्रमा’चा उद्देश काय होता?
        १) अनाथ मुलींना शिक्षण
        २) विधवांना शिक्षण
        ३) विधवा पुनर्विवाहितांना आधार
        ४) पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण

     
    भारतातील संघटना
     
    १)  कोणत्या वर्षी ‘मद्रास महाजन सभा’ या संस्थेची स्थापना झाली होती ?
        १) १८५२
        २) १८५३
        ३) १८८३
        ४) १८८४

    २)  खालीलपैकी कोणती एक जोडी चूक आहे?
        १) भारतीय राष्ट्रीय सभा- १८८५
        २) हिंदू महासभा- १९११
        ३) मुस्लीम लीग- १९०६          
        ४) स्वतंत्र मजदूर पक्ष- १९३६

    ३)  इ.स. १८७५ मध्ये .......... यांनी ’इंडियन लीगची’ स्थापना केली.
        १) आनंद मोहन बोस
        २) शिशिर कुमार बोस
        ३) मनमोहन बोस
        ४) व्योमेशचंद्र बॅनर्जी

    ४)  ‘युनियननिस्ट पाटी’ कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली होती?
        १) हिंदूचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी
        २) मुस्लिमांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी
        ३) जमीनदारांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी
        ४) व्यापार्‍यांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी

     
    मुस्लीम लीग
     
    १)  मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?
        १) इस्लामाबाद
        २) ढाका
        ३) अलाहाबाद
        ४) अलिगड

    २)  मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली ?
        १) ढाका
        २) कोलकाता
        ३) चितगांव
        ४) मुर्शिदाबाद

    ३)  लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना १९०६ मध्ये स्थापन झाली?
        १) राष्ट्रीय काँग्रेस
        २) सार्वजनिक सभा
        ३) मुस्लीम लीग
        ४) आझाद हिंद सेना

     
    जस्टीस पक्ष
     
    १)  ‘द साउथ इंडियन लिबरल फेडरेशन’ या पहिल्या ब्राम्हणेत्तर संस्थेचे रूपांतर नंतर ...... या लोकप्रिय पक्षात करण्यात आले.
        १) प्रजा पक्ष
        २) स्वराज्य पक्ष
        ३) जस्टीस पक्ष
        ४) काँग्रेस पक्ष

     
    फॉरवर्ड ब्लॉक
     
    १)  फॉरवर्ड ब्लॉकया पक्षाची स्थापना कुणी केली ?
        १) मोतीलाल नेहरू
        २) सुभाषचंद्र बोस
        ३) राममनोहर लोहिया
          ४) डॉ. बी. आर. आंबेडकर

     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१६१)
     
    मुंबई प्रांतातील राजकीय संघटना
    १-४
    २-२
    ३-२
    ४-१
    ५-१
    ६-१
    बॉम्बे असोसिएशन
    १-४
    २-४
    ३-१
    ४-१
    ५-१
    ६-१
    ७-३
    ८-१
    बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
    १-४
    २-३
    ३-२
    ईस्ट इंडिया असोसिएशन
    १-२
    इंडियन असोसिएशन
    १-४
    २-४
    ३-४
    भारत सेवक समाज
    १-२
    २-२
    ३-२
    ४-२
    होमरूल लीग
    १-३
    हिंदू महासभा (१९१५/१९३३)
    १-१
    २-३
    ३-३
    ४-३
    ५-३
    ६-३
    स्वराज पक्ष
    १-४
    २-४
    ३-३
    डॉ. आंबेडकरांच्या राजकीय संघटना
    १-२
    २-४
    ३-४
    ४-४
    ५-२
    ६-१
    राष्ट्रीय सेवक संघ
    १-३
    २-३
    कम्युनिस्ट पक्ष
    १-२
    मुंबई प्रांतातील सामाजिक संघटना
    १-२
    २-२
    ३-१
    ४-२
    ५-२
    सार्वजनिक सभा
    १-३
    २-४
    ३-४
    ४-१
    ५-४
    ६-२
    सामाजिक परिषद
    १-१
    २-१
    ३-३
    ४-३
    ५-३
    महिलांच्या संघटना
    १-१
    २-३
    ३-२
    ४-२
    ५-३
    ६-२
    भारतातील संघटना
    १-४
    २-२
    ३-
    ४-३
    मुस्लीम लीग
    १-२
    २-१
    ३-३
    जस्टीस पक्ष
    १-३
    फॉरवर्ड ब्लॉक
    १-२

Share this story

Total Shares : 4 Total Views : 4574